काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या दाव्यास छेद दिल्याने मंत्रिपद गमवावे लागलेले कर्नाटक काँग्रेसचे नेते के. एन. राजण्णा यांच्या समर्थकांनी बुधवारी निदर्शने केली.
Read More
मुंबई : चहावाला, सलूनवाला आणि मंडपवाल्याचे पैसे कधीच उधार ठेवू नयेत असे संजय शिरसाट ( Sanjay Shirsat ) यांनी आपल्या कार्यक्रमात म्हटले. मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर संजय शिरसाट यांचा पहिला जाहीर कार्यक्रम शिर्डी येथे झाला. या कार्यक्रमाला बऱ्याच मान्यवरांची उपस्थिती होती.
नवी मुंबई : राज्याच्या वन खात्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर लोकनेते नामदार गणेश नाईक ( Ganesh Naik ) यांचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर नागपूरवरून प्रथमच आज नवी मुंबईमध्ये आगमन झाले. नामदार गणेश नाईक यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
नागपूर : शपथविधीनंतर नवनिर्वाचित मंत्री संजय शिरसाट ( Sanjay Shirsat ) यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांबाबत सूचक वक्तव्य केले आहे. अडीच वर्षे पूर्ण होण्याआधीच मंत्र्यांना डच्चू मिळू शकतो, याकडे त्यांनी माध्यमांचे लक्ष वेधले.
(Chhagan Bhujbal) मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेल्या छगन भुजबळांना राज्यसभेत पाठवले जाणार, अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र आपण राज्यसभेवर जाणार नाही, असे भुजबळांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. "आता राज्यसभेवर जाणं म्हणजे मतदारसंघातील मतदारांशी प्रतारणा केल्यासारखं होईल", असं भुजबळ म्हणाले आहेत.
मुंबई: मलबार हिल मतदारसंघाचे आमदार मंगल प्रभात लोढा ( Mangal Prabhat Lodha ) यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. आपल्या संस्कृतीच्या रक्षणार्थ आणि सन्मानार्थ लोढा यांनी रामनामाचा मफलर घालून संस्कृत भाषेतून शपथ घेतली.
महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक येत्या दि. २० जून रोजी पार पडणार आहे, निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांतर्फे उमेदवार बुधवार, दि. ९ जून रोजी जाहीर करण्यात आले आहेत.