मध्य प्रदेशातील भोपाळच्या बाणगंगा भागात इस्लामिक कट्टरपंथींच्या दबावामुळे हिंदू कुटुंबांचे स्थलांतर झाल्याचा दावा केला जातोय. स्थानिक हिंदू कुटुंबांचा आरोप आहे प्रेम नगरमधील मुस्लिम समुदायाचे लोक हिंदूंच्या घरासमोर शिवीगाळ करतात, गोंधळ घालतात आणि तलवारीचा धाक देखील दाखवतात. ज्यामुळे त्यांना परिसर सोडण्यास भाग पाडले जात आहे. यानंतर बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने बाणगंगा परिसरात निषेध केला आणि हनुमान चालीसा पठण केले.
Read More
Reduced urban migration of industrial workers for livelihood and increased employment opportunities in rural areasसध्या ‘कोरोना’ पुन्हा काहीसे डोके वर काढत असल्यामुळे, पूर्वानुभवातून प्रशासनासह नागरिकही सतर्कता बाळगताना दिसतात. कारण, ‘कोरोना’चे केवळ मानवी आरोग्यावर नाही, तर सामाजिक, औद्योगिक आणि व्यावसायिक पातळीवरही लक्षणीय परिणाम झाले. त्यापैकी एक मोठा बदल म्हणजे, औद्योगिक कामगारांचे रोजीरोटीसाठी घटलेले शहरी स्थलांतर आणि ग्रामीण भागात वाढलेल्या रोजगाराच्या संधी. तेव्हा, या परिवर्तनाची कारणमीमांसा करणारा हा
Denmark and Britain have signaled a change in their migration policiesसध्या जगातील अनेक देशांमध्ये स्थलांतरण धोरणाचा पुनर्विचार सुरू आहे. गेल्या काही दशकांत स्थलांतरणाबाबत उदारीकरण स्वीकारलेल्या अनेक देशांनी आता त्या धोरणाचा पुनर्विचार करण्यास सुरुवात केली आहे. नुकताच डेन्मार्क आणि ब्रिटन यांनी त्यांच्या स्थलांतरण धोरणात बदलाचे संकेत दिले आहेत.
पावसाची वर्दी घेऊन येणारा पक्षी म्हणून ओळख असलेला नवरंग म्हणजेच 'इंडियन पिट्टा' कोकणात दाखल झाला आहे (indian pitta migration). रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी या पक्ष्याची मधुर शीळ कानी पडू लागली आहे (indian pitta migration). पावसाळ्याच्या तोंडावर हा पक्षी स्थानिक स्वरुपाचे स्थलांतर करत असला तरी, कोकणात या पक्ष्याची काही संख्या घरटी देखील बांधते. (indian pitta migration)
कम्युनिस्ट पक्षांनी आजवर जी अयोग्य धोरणे राबविली, त्याच्या परिणामस्वरुप केरळ हे आज देशातील सर्वाधिक महागाईने उच्चांक गाठलेले राज्य म्हणून समोर आले आहे. अर्थशून्य कारभारात सुधारणांऐवजी आपल्या चुकांचे खापर केंद्र सरकारवर फोडण्याचा धडाकाच लावलेल्या, अशा या सर्वाधिक साक्षर राज्याचे भवितव्य म्हणूनच अंधकारमय!
मानवी स्थलांतर ही खरं तर मानवी उत्क्रांतीपासूनचीच निरंतर सुरु असलेली प्रक्रिया. अशा स्थलांतरातून नवीन प्रदेशात प्रत्येक धार्मिक समुदायाची तेथील स्थानिक समाजांशी जुळवून घेण्याची प्रक्रियाही वेगवेगळी असते. काही गट नव्या देशांत गेल्यावरही आपली वेगळी ओळख कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात, तर काही लोकसंख्येच्या बळावर स्थानिक संस्कृतीत मोठे बदल घडवण्याचा प्रयत्नही करताना दिसतात. मात्र, हिंदू समाजाचा दृष्टिकोन प्रारंभीपासूनच यापेक्षा पूर्णतः वेगळा राहिला आहे. हिंदू जिथे जातो, तेथील स्थानिक संस्कृतीशी तो समरस होतो, त्या
सध्या मुंबईनजीकच्या तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि पश्चिम घाटातील जंगलांमध्ये फुलपाखरांचे थवेच्या थवे दिसू लागले आहेत. काही किमीचे स्थलांतर करून ही फुलपाखरे इथल्या जंगलाच्या आसर्याला आली आहेत. फुलपाखरे स्थलांतर कशा पद्धतीने करतात, त्यांची दिशा काय असते, कालावधी कोणता असतो, याविषयी ऊहापोह करणारा हा लेख...
'भारतीय वन्यजीव संस्थान'ने (डब्लूआयआय) मणिपूरमध्ये 'सॅटेलाईट टॅग' लावलेल्या 'चिऊलुआन-२' नामक अमूर ससाणा पक्ष्याने महाराष्ट्रामार्गे केनियापर्यंतचे स्थलांतर पूर्ण केले आहे (amur falcon migration). स्थलांतरादरम्यान त्याने सांगलीत थांबा घेतला आणि त्यानंतर गुहागरमार्गे अरबी समुद्रात प्रवेश करुन आफ्रिकेतील सोमालिया गाठले (amur falcon migration). १४ ते २७ नोव्हेंबर अशा १३ दिवासांमध्ये या पक्ष्याने ७ हजार ३०० किलोमीटरचा प्रवास केला असून सध्या तो केनियामध्ये आहे. (amur falcon migration)
'वाँडरिंग ग्लायडर' नावाचे लाखो चतुर मुंबईत दाखल असून या चतुरांचे थवे गेल्या काही दिवसांपासून आकाशात भिरभिरताना दिसत आहेत (dragonfly migration in mumbai). भारताच्या पुर्वोत्तर भागातून शहरात दाखल झालेले हे इवलेसे चतुर अरबी समुद्रामार्गे आफ्रिकेच्या दिशेने आगेकूच करणार आहेत (dragonfly migration in mumbai). त्यामुळे काही दिवसांसाठीच मुक्कामी असणाऱ्या या चतुरांना पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळाली आहे. (dragonfly migration in mumbai)
'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ने (बीएनएचएस) 'जीपीएस टॅग’ केलेला एक रोहित (फ्लेमिंगो) पक्षी 'अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू’च्या निवार्यास आला आहे (flamingo migration). 'मकॅन’ नावाचा हा रोहित पक्षी टॅग केल्यापासून गुजरात ते ठाणे खाडी असा प्रवास करत असून गेली दोन वर्षे तो अटल सेतू परिसरात स्थलांतर करत आहे (flamingo migration). 'जीपीएस टॅग’मुळे त्याच्या या संपूर्ण प्रवासाचा उलगडा झाला आहे. ( flamingo migration )
पालघर जिल्ह्यातील चिंचणीचा किनारा हा स्थलांतरित पक्ष्यांसाठी माहेरघर ठरत आहे (lesser sand plover). येथील पक्षीनिरीक्षक दरवर्षी पायामध्ये 'A9P' या क्रमांकाचा 'कलर फ्लॅग' असलेल्या छोट्या चिखल्या (lesser sand plover) प्रजातीच्या पक्ष्याची नोंद करत आहेत. दक्षिण रशिया आणि उत्तर हिमालयातील प्रदेशामधून पालघरच्या किनारपट्टीवर स्थलांतर करणाऱ्या या पक्ष्यामुळे येथील किनारी अधिवासाचे महत्व अधोरेखित झाले आहे. (lesser sand plover)
पक्षी स्थलांतरामधील काही गुपिते उलगडण्यामध्ये संशोधकांना यश मिळाले आहे (bird migration). मोठ्या स्थलांतरादरम्यान पक्ष्यांचा वेग काय असतो, ते आकाशमार्गाची निवड कशा पद्धतीने करतात अशा अनेक प्रश्नांची उकल काही अंशी संशोधकांनी केली आहे. जर्मनी आणि आॅस्ट्रेलियात केलेल्या पक्षी स्थलांतराच्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. (bird migration).
जगभरातील स्थलांतरीत संधीच्या शोधात कॅनडात जाऊन स्थायिक होण्याचे स्वप्न पाहत असतात. कॅनडातील ट्रूडो सरकार सुद्धा देशातील वृद्धत्व आणि लोकसंख्या कमी होण्याचे मोठे आव्हान दूर करण्यासाठी जगभरातील स्थलांतरीतांचे आपल्या देशात स्वागत करते. पण आता समृद्ध आणि शांतताप्रिय जीवन जगण्याचे स्वप्न पाहून कॅनडात आलेले स्थलांतरीत, कॅनडातील वाढत्या महागाईमुळे पाठ फिरवत आहेत. अशी माहिती इन्स्टिट्यूट फॉर कॅनेडियन सिटीझनशिप या संस्थेच्या अभ्यासातून समोर आली आहे.
हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर शाही गरुडाचे (इम्पीरियल ईगल) मुंबई महानगर प्रदेशामध्ये (imperial eagle in mumbai mmr) आगमन झाले आहे. कल्याण भागात सध्या या पक्ष्याचे दर्शन होत असून हा राज्यात स्थलांतर करून येणारा सर्वांत मोठा गरुड आहे (imperial eagle in mumbai mmr). असे असले तरी, मुंबई महानगर प्रदेशात त्याच्या रोडावलेल्या संख्येबद्दल पक्षीतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. हिवाळ्याच्या आगमनाबरोबर देश-विदेशांमधून अनेक पक्ष्यांचे राज्यात स्थलांतर होते. यामध्ये किनारी पाणपक्ष्यांची संख्या अधिक असली तरी शिकारी पक्ष्या
बांग्लादेशमध्ये हिंदू समुदायातील लोकांचा कट्टरपंथीयांकडून छळ होत असल्याने त्यांना आपले घर सोडून स्थलांतर करावे लागत आहे. येथील कट्टरपंथीयांकडून होणाऱ्या हिंदू समाजातील महिलांवरील बलात्कार आणि त्यांच्या हत्येमुळे लँड जिहादसारख्या घटना घडत आहे.
मध्य आशियामधून 'हिमालयीन ग्रिफाॅन' ( himalayan griffon ) प्रजातीच्या गिधाडांच्या स्थलांतराला सुरुवात झाली आहे. 'भारतीय वन्यजीव संस्थान'ने (डब्लूआयआय) याविषयाची माहिती दिली असून त्यांनी जीपीएस टॅग केलेले एक गिधाड उत्तर भारतात पोहोचले आहे. त्यामुळे लवकरच ही गिधाड मध्य भारत आणि महाराष्ट्रात दाखल होतील असा अंदाज आहे. ( himalayan griffon )
जगभरातील बरेचसे पक्षी एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी स्थलांतर करतात, हे आपण जाणतोच. आपल्या भोवतालाच्या परिसराशी जुळवून घेण्यासाठी नैसर्गिकपणे घडणारी ही प्रक्रिया. जगभरातील लाखो पक्षी विविध हंगामांत स्थलांतर करतात. काही पक्षी प्रजननाच्या कालावधीत, तर काही ऋतूबदलानुसार स्थलांतराचा निर्णय घेतात. पक्षी स्थलांतराच्या या कालावधीमध्ये वातावरणात होणारे बदल आणि या बदलांचे परिसंस्थेतील इतर घटकांवर होणारे परिणाम, यांचेही सहसंबंध जोडलेले आहेत. त्यामुळे पक्षी स्थलांतरावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या अवलंबून असलेल्या प्रजा
नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांनी दि. ८ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे नेदरलँडचे सरकार कोसळले आहे. नेदरलँडमध्ये दोन पक्षांच्या युतीने सरकार स्थापन केले होते. मात्र मायग्रेशन पॉलिसीबाबत या दोन्ही पक्षांचे एकमत होत नव्हते. सततचे वाद होत असल्यामुळे ही युती मोडली. त्यानंतर डच पंतप्रधान मार्क यांनी आपला राजीनामा सादर केला. किंग विल्यम अॅलेक्झँडर यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला आहे.
भारतातून बरेच विद्यार्थी उच्चशिक्षणासासाठी परदेशात जाणे पसंत करतात. त्यामुळे अमेरिका, लंडन, कॅनडा अशा अनेक ठिकाणी भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यांना परदेशात जाण्याकरिता खास ’स्टडी व्हिसा’देखील मिळतो. यापैकी काही विद्यार्थी असे असतात जे परदेशात शिकायला गेल्यानंतर त्याच ठिकाणी स्थायिक होण्याचा निर्णय घेतात. अशाच विद्यार्थ्यांसोबत कॅनडामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कॅनडामधील ७०० हून अधिक भारतीयांना त्यांच्या महाविद्यालयीन प्रवेशाची ऑफर लेटर, ज्याच्या आधारे ते तीन-चार वर्षां
संकटग्रस्त पक्ष्यांच्या यादीत नोंद असणाऱ्या 'इंडियन स्किमर' (indian skimmer) म्हणजेच 'पाणचिरा' या पक्ष्याचे रविवारी पालघरमध्ये दर्शन झाले. पक्षीनिरीक्षकांना हा दुर्मीळ हिवाळी पाहुणा नांदगाव किनाऱ्यावर दिसला. मुंबई महानगर प्रदेशात 'पाणचिरा' (indian skimmer)पक्ष्याच्या फार कमी नोंदी असून अधिवास नष्टतेमुळे या पक्ष्याला संकटग्रस्त पक्ष्यांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. (indian skimmer)
मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातील चित्ते आल्यानंतर आता महाराष्ट्र सरकार लवकरच चंद्रपूर जिल्ह्यातून नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघाचे स्थलांतर सुरू करणार आहे.राज्यातील वाघांचे अशाप्रकारचे वैज्ञानिक संवर्धनाचे हे पहिलेच स्थलांतर असेल. जास्त वाघ असलेल्या भागात वाघांची संख्या कमी करणे तसेच मनुष्य-प्राणी संघर्ष कमी करणे हा यामागचा उद्देश आहे. महाराष्ट्र वन विभागाने दि. १५ सप्टेंबर रोजी भारत सरकारच्या पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडून आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत.
शेतमजुरी, वीटभट्टी स्थलांतर या चक्रातच आयुष्य होरपळणार्या कातकरी समाजाच्या उत्थानासाठी सर्वंकष प्रयत्न करणारे रवींद्र नागो भुरकूंडे यांच्या कार्यविचाराचा घेतलेला मागोवा...
मुंबईच्या किनाऱ्या लागत साकार होत असलेल्या 'कोस्टल रोड'च्या बांधकामामुळे बाधित होऊ घातलेल्या समुद्री प्रवाळांचे २०२० सालच्या नोव्हेंबर महिन्यात स्थलांतर करण्यात आले होते. फाॅल्स पिलो आणि इतर सहा प्रजातींचे स्थलांतरण यावेळी करण्यात आले होते. राष्ट्रीय समुद्रीविज्ञान संस्थेने कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात हे स्थलांतर केले होते.
पाणी ज्या परिसंस्थेचा भाग आहे, त्या परिसंस्थेतील सर्वच अधिवासांच्या र्हासाला सुरुवात झाली आहे. यामध्ये सागरी आणि गोड्या पाण्याच्या अधिवासाचा प्रामुख्याने समावेश आहे. गोड्या पाण्यातील जैवविविधता ही प्रादेशिक किंवा सागरी परिसंस्थेत अधिवास करणार्या प्रजातींच्या दुप्पट दराने र्हास पावत आहे. परिणामी, या अधिवासाशी अनुकूलित होऊन त्यामध्ये तग धरून राहिलेल्या प्रजातीदेखील संकटात सापडत आहेत, अशीच एक प्रजात म्हणजे ‘गोबी.’ संशोधनाच्या दृष्टीने फार कमी अभ्यास झालेल्या या प्रजातीचा वेध घेणारा हा लेख...
चंद्रपूर, वरोरा व भद्रावती तालुक्यातील पुरात अडकलेल्या ७०० ते ८०० नागरिकांचे स्थलांतरण करण्यात येत असून एसडीआरएफची एक टीम व स्थानिक टीमच्या सहाय्याने वर्धा नदी पात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे.
लाल डोंगरमधील नागरिक भीतीखाली ; पुनर्वसनासोबत स्थलांतरणाची मागणी
नवी मुंबईमध्ये या वर्षी दि. १९ एप्रिल रोजी टॅग केलेला लेसर फ्लेमिंगो 'हुमायून' गुजरातच्या भावनगर येथे पोहोचला आहे. एप्रिल महिन्यात 'ग्रेटर' आणि 'लेसर' फ्लेमिंगोंचे जीपीएस टॅगगिंग करण्यात आले होते. बीएनएचएसच्या शास्त्रज्ञांनी भरतीच्या ठिकाणी जाऊन सहा फ्लेमिंगोना रेडिओ टॅग केले. हे सर्व फ्लेमिंगो बेलापूर जवळच्या 'ट्रेनिंग शिप चाणक्य' आणि लगतच्या पाणथळ प्रदेशात फिरत होते. नंतर या सहा फ्लेमिंगोंपैकी 'हुमायून' दि. ३० जून रोजी भावनगरला पोहोचला आहे.
1969 साली व त्यानंतर एकदा भारतात खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले व आता ‘युटर्न’ घेऊन संपूर्ण खासगीकरणाच्या दिशेने आपली वाटचाल सुरू झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे किंवा राष्ट्रीयीकृत सरकारी बँकांचे आगामी काळात 100 टक्के खासगीकरण होण्याची शक्यता आहे. ‘दि बँकिंग कंपनीज्’ (अॅक्विझिशन अॅण्ड ट्रान्सफर ऑफ अंडरटेंकिग्ज कायदा, 1970) अंतर्गत केंद्र सरकार सहकारी बँकेत किमान 51 टक्के हिस्सा ठेवण्याची आवश्यकता आहे. या आधी हा हिस्सा 26 टक्के असावा, अशी मान्यता होती. कायद्यातील या तरतुदीमुळे 100 टक्के ह
युक्रेनमधील महिलांच्या परिस्थितीचा आढावा घेतला, तर जाणवेल की, युद्धग्रस्त स्थितीत स्त्रीला विकृततेचा सामना करावा लागतो. असाहाय्य महिलेला मदत करणारे लोक आहेत. पण, परिस्थितीमुळे तिच्या स्त्रीत्वाचा फायदा घेणारेही आहेत. वाईट असणार्यांमुळे मुली, महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त होते.
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील धोकादायक इमारती आणि दरडींखाली राहणार्या रहिवाशांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
मुंबईच्या मानखुर्द सॉल्टपॅन्स येथे रिंग केलेला बाकचोच तूतरी पक्षी (कर्ल्यू सँडपायपर) मध्य मंगोलियातील उगी तलावात आढळून आला आहे. या पक्ष्याला जानेवारी २०२२च्या सुरुवातीला मानखुर्द सॉल्टपॅन्स येथे बीएनएचएसकडून रिंग लावण्यात आली होती. 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) रिंग केलेल्या कर्ल्यू सँडपायपर पक्ष्याने या प्रवासादरम्यान तब्बल ४.५ हजार किमीचे अंतर कापल्याची माहिती समोर आली आहे.
तामिळनाडूमध्ये टॅग केलेला केंटीश फ्लोवर हा पक्षी पुण्याजवळील भिगवणमध्ये आढळून आला आहे. बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) संशोधकांनी पक्षी स्थलांतरच्या अभ्यासाकरिता या पक्ष्याला टॅग केले होते.
नवी मुंबईत रिंग केलेला 'लाल टिलवा' पक्षी (रेडशॅंक) सायबेरियामधील अल्टाई भागात आढळून आला आहे. 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) रिंग केलेल्या पक्ष्याने या प्रवासादरम्यान तब्बल ५ हजार किमीचे अंतर कापल्याची माहिती समोर आली आहे.
वन्यजीवांसाठी त्यांचा अधिवास आणि त्यांच्या भ्रमणासाठी ‘कॉरिडोर’ महत्त्वाचा असतो. सद्यपरिस्थितीत जगात वन्यजीवांच्या अधिवासाचा होणारा र्हास आणि नष्ट होणार्या ‘कॉरिडोर’ची समस्या गंभीर आहे. त्या विषयावर उहापोह करणारा हा लेख...
श्रीलंकेतील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे. राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या विरोधात आता श्रीलंकेतील तरुण रस्त्यावर उतरले असून त्यांनी राजपक्षे यांच्याविरोधात जोरदार निदर्शने केली आहेत
मादी हेगलिन गल पक्ष्याने श्रीलंकेपासून सायबेरियापर्यंत स्थलांतर केल्याची माहिती समोर आली आहे. श्रीलंकेतील शास्त्रज्ञांनी या पक्ष्याच्या स्थलांतराच्या पूर्ण चक्राचे म्हणजेच श्रीलंका ते सायबेरिया आणि पुन्हा सायबेरिया ते श्रीलंका, अशी नोंद केली आहे. स्थलांतराचे हे चक्र पूर्ण करण्यासाठी या मादी गल पक्ष्याने तब्बल १९ हजार ३६० किमीचे अंतर कापले आहे. या पक्ष्यावर लावलेल्या सॅटेलाईट ट्रान्समीटरमुळे ही माहिती समोर आली आहे.
पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाकरिता चीनमध्ये रिंग केेलेला 'कर्ल्यू सॅण्डपायपर' (बाकचोच तुतारी) (curlew sandpiper) पक्षी नवी मुंबईच्या पाणथळ क्षेत्रात आढळून आला आहे. 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'च्या (बीएनएचएस) संशोधकांच्या निदर्शनास हा पक्षी आला आहे. या स्थलांतरामुळे हिवाळ्यात स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांसाठी अतिक्रमणाच्या गर्तेत सापडलेले मुंबई आणि नव्या मुंबईचे पाणथळ क्षेत्र महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित झाले आहे. (curlew sandpiper)
रशियावरुन साधारण ५ हजार किमीपेक्षा अधिकचे अंतर कापून मुंबईमध्ये पाहुणा पक्षी दाखल झाला आहे. बुटेड गरुड (Booted Eagle) प्रजातीमधील हा पक्षी आपल्या हिवाळी स्थलांतराच्या निमित्ताने सध्या मुंबईत पाहुणाचारासाठी थांबला आहे. रशियामध्ये संकटात सापडलेल्या बुटेड गरुड (Booted Eagle) प्रजातीचे स्थलांतर जाणून घेण्यासाठी सॅटेलाईट ट्रान्समीटर लावलेला हा पहिलाच बुटेड गरुड आहे.
पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाअंतर्गत नवी मुंबईच्या पाणथळीवर रिंग केलेला कर्ल्यु सॅण्डपायपर (बाकचोच तुतारी) पक्षी चीनमध्ये सापडला आहे. 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'अंतर्गत हा अभ्यास सुरू असून त्याअंतर्गत या पक्ष्याच्या पायाला रिंग लावण्यात आले होते. या पक्ष्याने मुंबई ते चीन असा प्रवास केल्याने स्थलांतरित पक्ष्यांकरिता मुंबई आणि नव्या मुंबईतील पाणथळ जागा महत्त्वाच्या असल्याचे पुन्हा एकदा समोर आलंय.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये युरेशियन ग्रिफाॅन गिधाडाची प्रथमच नोंद करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या गिधाडाच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी लावण्यात येणारा टॅग त्याच्या शरीरावर आढळून आला आहे. हा टॅग केरळमध्ये लावल्याची माहिती मिळाली असून या पक्ष्याने केरळपासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापर्यंत प्रवास केल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
हेगलिन गल पक्ष्याने श्रीलंकेपासून कझाकिस्तानपर्यंत स्थलांतर केल्याची माहिती समोर आली आहे. या स्थलांतरादरम्यान त्याने सुमारे ६,५०० किमीचे अंतर कापले आहे. श्रीलंकेतील शास्त्रज्ञांनी या पक्ष्यावर लावलेल्या सॅटेलाईट ट्रान्समीटरमुळे ही माहिती समोर आली आहे.
सेवासुविधा तर सोडाच, पण राज्यात नव्याने लावण्यात आलेल्या कडक निर्बंधात पत्रकार वर्गाला उपनगरी रेल्वेने प्रवासाची मुभादेखील सरकारतर्फे देण्यात आलेली नाही. ‘लोकल’ प्रवासासाठी पत्रकारांना परवा मुंबईत आंदोलने करावी लागली, जे पत्रकार अनेकांना न्याय देण्यासाठी वेळेची परवा न करता, रात्रीचा दिवस करुन शासनावर प्रश्नांची सरबत्ती करत असतात, आज त्याच पत्रकारांना स्वत:च्या हक्कांसाठी झगडावे लागत आहे, हे करुणास्पद म्हणावे लागेल.
गुजरातच्या नल सरोवर पक्षी अभयारण्यात पाच महिने पाहुणचार घेतल्यानंतर मादी क्रौंच (काॅमन क्रेन) पक्ष्याने पुन्हा कझाकिस्तानच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केला आहे. या पक्ष्याला 'जीपीएस-जीएसएम' टॅग लावले असून 'भारतीय वन्यजीव संस्थान'च्या (डब्लूआयआय) शास्त्रज्ञ तिच्या स्थलांतरावर नजर ठेवून आहेत. गेल्यावर्षी ही मादी क्रौंच पक्षी २० दिवसांमध्ये ५ हजार किमीचे स्थलांतर करुन उत्तर कझाकिस्तानमधून गुजरातमध्ये आली होती.
आतापर्यंत या लेखमालेत आपण ‘आर्यांचे आक्रमण/स्थलांतर’ या भ्रामक कल्पनेच्या स्वरूपाचा तपशीलवार आढावा घेतला. विविध संशोधकांनी आणि अभ्यासकांनी या भ्रमाच्या बाजूने पुरावे आणि तर्क देण्याच्या नावाखाली तितकाच मोठा कल्पनाविलास उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यांमध्ये युरोपीय विद्वान आघाडीवर आहेत. त्यांचीच री ओढणारे शहामृगाच्या कुळातले भारतीय विद्वानही काही कमी संख्येने नाहीत! आतापर्यंत या भ्रमाच्या भोपळ्यावर विविध भौतिक पुरावे, शास्त्रीय कसोट्या आणि सबळ तर्काच्या आधारावर विळा चालवण्याचे काम अनेक भारतीय अभ्यासक आणि
सॅटलाईट टॅगव्दारे शास्त्रज्ञांची नजर
पक्ष्यांचा पायाला 'कलर फ्लॅग'
'डब्लूआयआय'च्या शास्त्रज्ञांनी केला उलगडा
मागच्या लेखापासून ‘पुरातत्त्व’ (Archaeology) हे शास्त्र आर्यांच्या स्थलांतराच्या आणि आक्रमणाच्या बाबतीत काय सांगते, ते आपण पाहत आहोत. त्यामध्ये सिंधू खोर्यातल्या प्राचीन नागरीकरणाचे अवशेष हे इ. स. पूर्व किमान चौथ्या सहस्रकातले किंवा अजूनच प्राचीन आहेत, हे पाहिले. सिंधू नागरीकरणात घोडे आणि रथ यांचे पुरावेसुद्धा आपण पाहिले. आर्यांनी सिंधू खोर्यात तथाकथित आक्रमण केल्यानंतर पुढच्या काळात वेदांची निर्मिती केलेली नसून वस्तुत: तो काळ वैदिक संस्कृतीचाच होता - अर्थात वैदिक साहित्याची निर्मिती त्याच्या कितीतरी आधीच
अरबी समुद्रावरुन उडून आफ्रिकेत जाणार का ?
'भारतीय वन्यजीव संस्थान'चा अभ्यास