“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे वाळवी आहे. जिथे जाईल तिथे पोखरायला सुरुवात करते,” हे उद्धव ठाकरेंचे बेताल वक्तव्य त्यांच्या आजच्या विदारक स्थितीचे प्रतीक आहे. निवडणुकीतील दारुण पराभवातून आलेल्या राजकीय नैराश्याचे बळी ठरलेल्या उद्धव ठाकरेंची अवस्था म्हणूनच गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही अशीच झाली आहे.
Read More
काँग्रेसी युवराज राहुल गांधी, ठाकरे आणि पवार कंपनीने एकत्र येत, पुन्हा एकदा ‘ईव्हीएम’ तसेच महाराष्ट्रातील विधानसभा निकालावर शंका उपस्थित केली. यापूर्वी या तिघांनी वैयक्तिकपणे हेच आरोप वारंवार केले होते आणि कोणीही दखल न घेतल्याने, एकत्र येत त्यांनी ते पुन्हा एकदा त्याच आरोपांचा पाढा वाचला. पण, म्हणतात ना तेरड्याचा रंग तीन दिवस, त्याप्रमाणे मविआच्या असल्या उथळ आरोपांनाही आता जनता गांभीर्याने घेणे नाहीच!
नाशिक जिल्ह्याबरोबरच उत्तर महाराष्ट्रातून महायुतीने महाविकास आघाडीला ( MVA ) धोबीपछाड दिल्यानंतर, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मविआची नौका किनार्याला लागण्यापूर्वीच बुडण्याच्या मार्गावर आहे. एक-एक करुन मविआतील तिन्ही घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देत असून, उबाठा आणि काँग्रेसला चांगलीच गळती लागली आहे. ज्यांची पूर्ण हयात काँग्रेसमध्ये गेली, अशा उत्तम कांबळे यांचा मुलगा जॉय कांबळे यांनी नुकताच काँग्रेसचा ‘हात’ सोडत, हाती शिवबंधन बांधले. त्यांच्या पाठोपाठ ३० व
(CM Devendra Fadnavis) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना विरोधकांना थेट भाषणातून टोला लगावला आहे. त्यांनी महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला वळवले गेले या विरोधकांच्या सततच्या रडगाण्यावर उपहासात्मक टिका केली आहे.
Gopichand Padalkar : शपथविधीवर बहिष्कार टाकतात यांना मतदार संघात लोकं जोड्यानं हाणतील, आमदार गोपीचंद पडळकरांची जहरी टीका
महाविकास आघाडी आता विरोधात असल्याने अशी आग लावण्याची कामे करणार - सदाभाऊ खोत Sadabhau Khot | Maha MTB
(Chandrashekhar Bawankule) महाविकास आघाडीतील काही आमदार आणि खासदार अस्वस्थ असून, ते आपली अस्वस्थता आमच्याकडे व्यक्त करीत आहेत. अनेकजण भाजपाच्या संपर्कात आहेत, असा खळबळजनक दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. ११ डिसेंबर रोजी केला.
इगतपुरीचा बुरूज का ढासळला ? ( Hiraman Khoskar )
मुंबई : महाविकास आघाडीच्या ( MVA ) प्रस्थापित नेत्यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा राग मतदारांवर काढण्यास सुरुवात केली आहे. या नेत्यांच्या ताब्यातील दूध संघांनी संघटितरित्या दुधाचे दर पाडून दूध उत्पादक शेतकर्यांना वेठीस धरले आहेत. त्यामुळे दूध उत्पादकांचे दररोज पाच कोटींचे नुकसान होत आहे.
नवनीत राणांच्या नणंदबाईंच्या पराभवाची कारणं कोणती?
उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करायला हवा होता, असे वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केले आहे. त्यामुळे आता ठाकरेंचा चेहरा घोषित न करणे मविआला भोवले का? याबद्दल या व्हिडीओतून जाणून घेऊया.
(Ajit Pawar) महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीच्या सत्तास्थापनेबाबत भाजपचे केंद्रातील वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असेही म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांनीही संख्याबळावर भाष्य करत मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत नसल्याचे सूचक विधान केले. अशातच "अजित पवारांना मुख्यमंत्री केले तर आम्ही त्यांचं स्वागतच करू", अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली होती. रोहित पवारांच्या या वक्तव्यावर अजित पवारांनी प्रत्य
मुंबई : महायुती सरकार उत्तम काम करू शकते हा विश्वास असल्यानेच महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेने मते दिली आहेत. महाविकास आघाडीकडून ( MVA ) ईव्हीएमवर अविश्वास दाखवून मतदारांचा अपमान केला जात आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. लोकसभेच्या पराभवाचे आम्ही आत्मचिंतन केले, त्यातून शिकलो व पुढे गेलो आणि जिंकलो. जनतेने डबल इंजिन सरकारला मतं दिली आहे. जनतेने मविआचा करेक्ट कार्यक्रम केला आहे तसेच ४४० वॉल्टचा करंटही दिला आहे, असाही टोला त्यांनी लगावला.
मुंबई : विधानसभेला मविआची सत्ता येणार, आपणच मुख्यमंत्री होणार, अशी स्वप्ने महाविकास आघाडीतील डझनभर नेत्यांनी पाहिली होती. प्रत्यक्षात जनतेने त्यांना असा तडाखा दिला, की मुख्यमंत्रीच काय, तर विरोधी पक्षनेतेपदाची ( Opposition Leader ) खुर्चीही त्यांच्या नशिबी आलेली नाही. राज्याच्या इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेतेपद रिक्त राहणार आहे.
नाशिक : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ( MVA ) मिळालेला अल्पसा आनंद अवघ्या सहा महिन्यांतच महायुतीने हिरावून घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत मविआच्या विजयी भ्रमाचा भोपळा फोडत जिल्ह्यात महायुतीने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांपैकी १४ जागांवर महायुतीने दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीला जिल्ह्यात नावालाही शिल्लक ठेवले नाही. यात भाजपला पाच, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) सात, शिवसेनेला (शिंदे) दोन जागी विजय मिळाला. तर एमआयएमच्या मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी अपक्ष उमेदवार आसिफ
डोंबिवली : डोंबिवली मतदारसंघामध्ये भाजप महायुतीचे उमेदवार रविंद्र चव्हाण ( Ravindra Chavan ) आणि मविआचे उमेदवार दिपेश म्हात्रे यांच्यात लढत झाली. पण, यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी बाजी मारली.
मुंबई : महाराष्ट्रात महायुती ( Mahayuti ) आघाडी पुन्हा सत्तेत येण्यासाठी सज्ज झाली आहे. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा समावेश आहे.
लांगूलचालन करून सत्ता मिळवण्याची स्वप्ने पाहणार्या महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील जनतेने धडा शिकवला आहे. काँग्रेस-शरद पवार आणि उबाठा गटाचा विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ झाला असून, ६०च्या आतच त्यांचा डाव आटोपला आहे. भाजपने ‘न भूतो’ अशी विक्रमी कामगिरी करीत भल्याभल्यांना धोबीपछाड दिला आहे. भाजपच्या ( BJP ) या महाविजयाची पाच कारणे...
महाराष्ट्रात जर पुन्हा मविआचे सरकार आले, तर काय होईल, याचे संकेत स्पष्ट उद्धव-आदित्य ठाकरे या पितापुत्रांच्या जोडगोळीने आपल्या प्रचारादरम्यानच्या भाषणांतून दिले. विरोधकांवर सूडबुद्धीने कारवायांच्या धमक्यांपासून ते त्यांना बर्फाच्या लादीवर लोळवण्यापर्यंतचे हे क्रूर, विद्ध्वंसक विचार या कुटुंबाच्या सत्तेसाठीच्या तडफडीचीचेच द्योतक!
नागपूर : “काँग्रेसचा जाहीरनामा धूळ खात पडला असून ते खोटे बोलतात, हे लोकांना कळले आहे. त्यामुळे जनतेचा महायुतीवर विश्वास आहे,” असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Bawankule ) यांनी सांगितले. त्यांनी सोमवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी कामठी येथे माध्यमांशी संवाद साधला.
काँग्रेसचा जाहीरनामा धूळ खात पडला असून असून ते खोटे बोलतात हे लोकांना कळले आहे. त्यामुळे जनतेचा महायूतीवर विश्वास आहे, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. त्यांनी सोमवार, १८ नोव्हेंबर रोजी कामठी येथे माध्यमांशी संवाद साधला.
मुंबई : ‘ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’चा प्रवक्ता असलेल्या सज्जाद नोमानी ( Sajjad Nomani ) याचे ‘व्होट जिहाद’चे वक्तव्य त्यांच्या अंगलट आले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नोमानीने परभणी येथील पत्रकारपरिषदेत केलेल्या वादग्रस्त जिहादी मानसिकतेच्या वक्तव्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. आयोगाने त्याची तात्काळ दखल घेत, २४ तासांत या प्रकरणाचा तपशीलवार अहवाल सादर करण्याचे आदेश परभणी जिल्हाधिकार्यांना दिले आहेत.
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस जाती-जातींमध्ये लोकांना विभाजित करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच अल्पसंख्याकांची एकगठ्ठा मते मिळवण्यासाठी महाविकास आघाडीकडून धार्मिक धृवीकरणावर भर दिला जात आहे. त्यातच ‘ऑल इंडिया मुस्लीम लॉ बोर्डा’चा प्रवक्ता सज्जाद नोमाणीने ‘व्होट जिहाद’च्या ( Vote Jihad ) आवाहन केल्याने, या आवाहनाला सडेतोड उत्तर
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस उरलेले असताना, सज्जाद नोमानी ( Sajjad Nomani ) याने मविआ समोर प्रस्ताव मांडला आहे, नेमकं प्रकरण काय आहे हे जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमातून
सत्तापिपासू मविआचा पराभव निश्चीतपणे होईल असा विश्वास व्यक्त केला आहे चारकोप मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार योगेश सागर ( Yogesh Sagar ) यांनी.
मुंबई : “महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या आणि मुंबईत शपथविधीची तयारी करा,” असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी मुंबईकरांना केले. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात गुरुवार, १४ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, कॅबिनेटमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
येत्या पाच वर्षात महाविकास आघाडीच्या काळात गेलेला महाराष्ट्राचा गौरव परत आणण्याचे काम महायूतीचे सरकार करणार आहे, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी केले. चंद्रपूर येथील प्रचारसभेत ते बोलत होते. शुक्रवार, १५ नोव्हेंबर रोजी हिंगोली, उमरखेड आणि चंद्रपूर विधानसभेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभा पार पडल्या.
(AIUB )महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतश्या नवनवीन राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता 'ऑल इंडिया उलेमा बोर्ड, महाराष्ट्र' या मुस्लीम संघटनेने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आणि उबाठा यांच्या महाविकास आघाडीला पाठिंबा देत आपल्या १७ मागण्यांचे निवेदन सादर केले आहे, या मागण्या मान्य झाल्यास मुस्लिम समाज आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शरद पवार, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीला भरघोस मतदान क
मुंबई : महायुतीतर्फे रविवारी दि. १० नोव्हेंबर रोजी ‘संकल्पपत्र’ आणि मविआकडून ( MVA ) ‘महाराष्ट्रनामा’ नावाखाली जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. मात्र, मविआच्या जाहीरनाम्यातील महापुरुषांच्या छायाचित्रांमध्ये स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचे छायाचित्र वगळल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे जाहीरनामा जरी मविआचा असला, तरी त्यावर वरचष्मा हा काँग्रेसचाच असल्याचे स्पष्ट होत आहे.
ठाणे : महाविकास आघाडीतील ( MVA ) तिन्ही पक्षांमध्ये कुणाचा पायपोस कुणाला नाही, अशी स्थिती असताना एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात झालेल्या बंडखोरीला काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचीच फूस असल्याचे उघड झाले आहे. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मनोज शिंदे यांना काँग्रेस अध्यक्षांनीच फोनवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या व्हायरल संभाषणाने काँग्रेसची चांगलीच पोलखोल झाली आहे.
नागपूर : भाजपा महायुती विधानसभा निवडणूक विकासासाठी लढत आहे तर, दुसरीकडे महाविकास आघाडीमधील ( MVA ) नेते मुख्यमंत्री होण्यासाठी निवडणूक लढत आहेत. महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाचा चेहरा रोज बदलत असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. महाराष्ट्राच्या भल्यासाठी महायुतीचा एक-एक उमेदवार विधानसभेत पोहचवावा, असे आवाहन त्यांनी केले.
ठाणे : ( Kiren Rijiju ) “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणार्या काँग्रेस आणि राहुल गांधी यांना बाबासाहेबांच्या संविधानावर बोलण्याचा अधिकार नाही,” असे वक्तव्य केंद्रीय अल्पसंख्यांक तथा संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी केले असून, त्यावेळी बाबासाहेबांना दिलेल्या हीन वागणुकीचे अनेक दाखले देत त्यांनी काँग्रेसचा पर्दाफाश केला.
ऑल इंडिया उलमा बोर्डकडून इंडी आघाडी आणि काँग्रेसला काही मागण्यांसदर्भात पत्र लिहिण्यात आले आहे. या पत्रात विधानसभा निवडणूकीत पाठिंबा देण्याच्या बदल्यात १७ मागण्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना या मागण्यांची पुर्तता करण्याचे आश्वासनही दिले आहे. MVA
नाशिक : ( Satyapaal Singh ) “देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर देशातल्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षा देण्याचे काम केले. पंतप्रधान मोदी यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात ८० टक्के नक्षलवादी कारवाया कमी झाल्या आहेत. या काळात फक्त कर्नाटकमध्ये दोनदा आणि पंजाब राज्यात एकदा अनुचित घटना घडली आहे. देश प्रगतिपथाकडे जात असताना महाराष्ट्रात मात्र तुष्टीकरणाचे राजकारण करण्याचे काम महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सुरु आहे,” असा घणाघात माजी केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी केला. विधानसभा निवडण
(MVA) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात प्रचाराला वेग आला आहे. आगामी निवडणुकीमध्ये महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. राज्यभरातील नेत्यांनी प्रचारसभा, वचननामे, आश्वासनांच्या खिरापतींचा सपाटा लावला आहे.
मुंबई : ( Sharad Pawar ) “मी जातीयवाद केल्याचे एक उदाहरण दाखवा,” असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि मविआचे शिल्पकार शरद पवार यांनी नुकतेच दिले होते. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवारांनी जातीयवादी राजकारणाने महाराष्ट्राचे समाजमन कलुषित केल्याची टीका एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना, शरद पवारांनी दि. २ नोव्हेंबर रोजी बारामती येथे पत्रकार परिषदेत मी जातीयवादी राजकारण केल्याची उदाहरणे देण्याचे आव्हान दिले होते. त्यामुळे दै. ‘म
ठाणे - विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर पहिले पाऊल टाकणाऱ्या महाराष्ट्राला तब्बल दहा वर्षे मागे नेऊन विकासाची वाट रोखणारे महाविकास आघाडी ( MVA ) सरकार व नाकर्ते मुख्यमंत्री म्हणून इतिहासात नोंद झालेले उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी भाजपाने जंग पुकारला असून महाराष्ट्रद्रोही, विकासद्रोही, शेतकरीविरोधी, महिला व युवकविरोधी, बाळासाहेबांचे हिंदुत्व खुंटीवर टांगून काँग्रेसचा लाळघोटेपणा करणारे धर्मद्रोही ठाकरे यांच्यावर प्रदेश भाजपातर्फे दररोज आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे, असे भाजपाचे विधानपरिषद ग
नाशिक : ( MVA ) पक्षनेतृत्वाने उमेदवारी मागे घेण्याचे दिलेले आदेश बंडखोरांकडून धुडकावण्यात आले असून, अनेकांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना एकप्रकारचा झटका मिळाल्याचे दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपल्या ताब्यात ठेवलेल्या इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाला विकासापासून काँग्रेसने दूर ठेवले. तसेच काँग्रेस पक्षाने निष्ठावंत पदाधिकार्यांना उमेदवारीपासूनही दूर ठेवले आहे. त्यामुळे तिळपापड झालेल्या पदाधिकार्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यात उबाठा गट
मुंबई : ( MVA) मतांसाठी आश्वासनांची खैरात वाटणारे अनेक नेते आजवर पाहिले. परंतु, विशिष्ट समुदायाला खुश करण्यासाठी स्वधर्मातील सणांवर बंदी आणणारे नेतृत्त्व महाराष्ट्राने पहिल्यांदाच अनुभवले. महाविकास आघाडी आणि त्यांच्या मुख्यमंत्र्याने अडीच वर्षांच्या कार्यकाळात हिंदू धर्मीयांच्या सणांमध्ये ना ना प्रकारे विघ्ने आणण्याचा प्रयत्न केला. दिवाळीला विरोध, शिव जयंतीला विरोध, कोरोनाचे कारण पुढे करून मंदिरांचे दरवाजे बंद. पण, त्याच काळात विशिष्ट धर्मीयांना सवलत देण्यात आली. त्यामुळे ठराविक व्होट बँकेला खुश ठेवण्यासाठी
ठाणे : ( Mahayuti ) ठाण्याच्या कोपरी-पाचपाखाडी मतदार संघात मविआ आघाडीत बंडाळी कायम आहे. विधानसभा निवडणुकीच्या अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी कोपरी-पाचपाखाडी मतदार संघातून काँग्रेसच्या मनोज शिंदे आणि सुरेश पाटील खेडे या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने मविआमधील उबाठा गटाच्या उमेदवाराच्या अडचणी वाढल्या आहेत.
मुंबई : (MVA) मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे उभे राहणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘थीम पार्क’ हे प्रारंभीपासून वादाच्या भोवर्यात अडकले आहे. निव्वळ आकसबुद्धीच्या राजकारणापायी या प्रस्तावित ‘थीम पार्क’च्या विकासामध्ये अनेक अडथळे निर्माण करण्यात आले.
Mumbai MVA news : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून नॅरेटीव्ह बांधणीला वेग आला आहे. महायुती सरकारच्या काळात राज्यात महिला सुरक्षित नसल्याचे खोटे नॅरेटीव्ह तयार केले जात आहे. महाराष्ट्रात दररोज सात बलात्काराचे गुन्हे नोंद होतात. दरवर्षी 64 हजार महिला आणि मुली बेपत्ता होतात, अशी पुस्तिका महाविकास आघाडीने प्रकाशित केली आहे. मात्र, अशाप्रकारची खोटी माहिती देण्याआधी त्यांनी स्वतःच्या घरात डोकावले असते, तर अशी हिंमत केली नसती. कारण, महाविकास आघाडी सत्तेवर असताना, महिलांवरील अत्याचाराने कळस गाठला ह
महायुती सरकारच्या काळात अनेक उद्योग राज्याबाहेर गेले, त्यातील मोठे प्रकल्प गुजरातला पळवण्यात आले, असे खोटे नॅरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पुन्हा सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची पोलखोल केली असून, 'मविआ' सरकारच्या काळातील पापांचा पाढा वाचला आहे.
जागावाटपाचा वाद विकोपाला! काँग्रेस बाहेर पडणार? l Congress l MVA
( Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana ) राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अभूतपूर्व यशानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या काही नेत्यांकडून या योजनेबाबत चुकीच्या अफवा पसरवल्या जात होत्या. अशातच या योजनेसंदर्भात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक्स या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत या अफवांना पूर्णविराम दिला आहे.
Nana Patole यांची तक्रार फक्त उद्धव ठाकरेंनीच केली असं नाही? यात नानांच्या काँग्रेसमधल्याच राजकीय विरोधकांचाही सामावेश आहे...
२०१९मध्ये MVA सरकार सत्तेत आल्यानंतर भाजप सरकारच्या काळात घेतलेल्या अनेक निर्णयाने स्थगिती देण्यात आली. अनेक महत्वाकांक्षी लोकोपयोगी प्रकल्प बंद करण्यात आले. याच प्रकल्पांचा आढावा आजच्या व्हिडिओतून घेऊया.
( MVA ) “राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच विरोधकांच्या ‘नॅरेटिव्ह’ बांधणीला वेग येऊ लागला आहे. उद्योग राज्याबाहेर गेले, महायुतीच्या सत्ताकाळात महाराष्ट्र मागे पडला,” असे मुद्दे दामटवून मतदारांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पण, याकडे डोळसपणे पाहाता, ‘मविआ’च्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या विकासाचा आलेख तळाला गेल्याचे समोर येते. त्यामुळे ‘विकासनीती हवी की भकास व्यक्ती’ हे आता मतदारांनी ठरवण्याची वेळ आली आहे. दि. २० नोव्हेंबर रोजी मतपेटीत बंद होणारे प्रत्येक मत महाराष्ट्राचे
Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या साकोली विधानसभा मतदारसंघाबाबत या व्हिडीओतून जाणून घेऊया. | Sakoli Vidhansabha
विधानसभा निवडणूका जवळ आल्या असूनही महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रीपदाचा वाद काही संपताना दिसत नाही. उबाठा गट आणि काँग्रेसनंतर आता शरद पवारांनीसुद्धा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्याचे वक्तव्य केले. त्यामुळे जयंत पाटील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.