राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी भाजपचे विधानपरिषदेतील गटनेते आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ११ जणांची समिती गठीत करण्यात आली आहे. गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
Read More
जर मनसे महायूतीच्या विरोधातील सगळे उमेदवार मागे घेणार असेल आणि आमचे आमदार वाढणार असतील, तर एका पदासाठी अडून राहणं संयुक्तिक राहणार नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घ्या, अशा सुचना मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत. त्यामुळे मी आज माझ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून भूमिका ठरवणार आहे, असे वक्तव्य माहिम विधानसभेतील शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी केले आहे.
"माहिममध्ये अशा प्रकारची लढत होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी खूप प्रयत्न केले. परंतू, शेवटी यावर निर्णय होऊ शकला नाही. मात्र, आम्ही मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊनच आमची भूमिका ठरवू," अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. माहिममध्ये शिवसेनेचे सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे तिथे यंदा तिरंगी लढत होणार आहे.
सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी आता शिवसेना आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी उबाठा गटाचे आदेश बांदेकर यांच्याकडे हे पद होते. या नियुक्तीवर आता उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.
यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कच्या जागेची मागणी करणारे ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांनीही मुंबई महानगरपालिकेला अर्ज दिले होते. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात कुणाची तोफ धडाडणार? याकडे सर्वांचे लक्ष असेल. मंत्री दीपक केसरकर यांनी शिंदे गट आपला अर्ज मागे घेणार, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे ठाकरे गटाचा मार्ग मोकळा झाला, असे बोलले जात होते.
पहिला शिवसैनिक अशी ज्यांची ओळख होती, ते म्हणजे मनोहर जोशी. शिवसेना पक्ष कायम आपल्या आक्रमक राजकारणासाठी ओळखला जातं. अशा आक्रमक पक्षाला मनोहर जोशींनी कधी-कधी शांततेत सुद्धा क्रांती होऊ शकते, हे शिकवलं. आज मनोहर जोशींची आठवण काढण्याच कारणं म्हणजे, शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी केलेला एक खुलासा, २००० साली मनोहर जोशींच्या घरावर हल्ला करण्यास उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मला उकसवलं होतं, संजय राऊत यांनी तर थेट पेट्रोल टाकून संपूर्ण घर जाळण्याचा सल्ला दिला होता. असा धक्कादायक खुलासा शिवसेना आमदार सदा सरवणका
श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास करणार आहे. त्यासाठी मुंबादेवी मंदिर विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या गटाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक मुंबईतील शिवसेना भवन येथे सोमवारी घेतली. यावेळी त्यांनी जिल्हाप्रमुखांना भावनिक आवाहन केले. "२०२४ साली देशात हुकुमशाही येणार असल्याचे यावेळी ठाकरे म्हणाले. तसेच आपल्याकडे मशाल चिन्ह आहेच, त्याशिवाय माझ्या मनात आणखी दहा चिन्ह आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चिंता न करता आता संघर्ष करण्यास तयार रहावे. भाजपाचे तळवे चाटण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही." असं ते यावेळी म्हणाले.
यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गट की शिंदे गट?
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याबाबत सर्वप्रथम शिवसेनेने महापालिकेकडे अर्ज केला. त्यानंतर शिंदे गटाकडून आमदार सदा सरवणकर यांनी अर्ज केला.
कोरोना निर्बंध पूर्णपणे हटवल्यानंतर यंदा सर्वच जण उत्साहात गणेशोत्सव साजरा करत होते. "या अशा उत्साहाच्या प्रसंगी प्रभादेवी येथे जे घडले ते झाले नसते तर बरे झाले असते"अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दिली आहे
शिवसेना आणि दसरा मेळावा या दोन गोष्टींचं नातं गेली अनेक वर्ष टिकून आहे. दादरच्या शिवाजी पार्क येथे दरवर्षी हा दसरा मेळावा आयोजित केला जातो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेकजण याठिकाणी येत असतात. मात्र शिवसेनेत सुरु असलेल्या खडाजंगीमुळे यावर्षीचा दसरा मेळावा कोण घेणार? याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून आहे. अशातच "दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंचाच दसरा मेळावा होणार आणि महापालिकेला त्याबाबत भूमिका स्पष्ट करावीच लागेल.", असे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर शनिवारी (२७ ऑगस्ट) पत्रकारांशी ब
शिवसेनेचा दसरा मेळावा २०१२, तारिख होती २४ ऑक्टोबर मात्र त्या दिवशी शिवसैनिकांचा विठ्ठल त्याच्या पंढरीत म्हणजेच शिवाजी पार्कात दसरा मेळाव्यासाठी उपस्थित नव्हता. तर त्या दिवशी पहिल्यांदाच बाळासाहेबांनी शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. पण हा आपल्या बाळासाहेबांनी आपल्याशी साधलेला शेवटचा संवाद ठरणार आहे, याची त्यादिवशी कोणालाच कल्पना नव्हती. पुढे १७ नोव्हेंबर २०१२ या दिवशी बाळासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला आणि ८६ वर्षाचे बाळासाहेब ठाकरे नामक वादळ कायमचं शांथावलं. यासगळ्यावर आज चर्चा कराव
महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुंबई महापालिका वॉर्ड पूर्नरचनेबद्दल चर्चा सुरू असताना आमदार सदा सरवणकर यांनी ठाकरे गटातील पक्षश्रेष्ठींवर थेट विधीमंडळातच आरोप लावले आहेत. सरवणकर ज्या शिवसेना भवननजीक दादरच्या मतदार संघातील वॉर्ड वरळीला जोडण्याचा प्रकार झाल्याचा आरोप करत त्यांनी आदित्य ठाकरेंवरच निशाणा साधला. माझ्या मतदार संघातील वॉर्ड हे वरळीला का नेण्यात आले, असा थेट सवाल त्यांनी विधानसभेत विचारला.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वविरोधात उठाव केल्यानंतर सुरु झालेल्या एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे संघर्ष अजूनच तीव्र होत चालला आहे. खरी शिवसेना कोणाची या वादात आता शिवसेना भवनाचा वादही पेटला आहे