यापुढे उबाठा गटाच्या कुणीही आमच्या नेत्याबद्दल असे वक्तव्य केले तर आम्ही मंत्री आणि आमदार आहोत हे बाजूला ठेवून बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे. तसेच त्यांनी आमदार भास्कर जाधव यांचा आदित्य ठाकरेंवर टीका करतानाचा एक व्हिडिओसुद्धा दाखवला.
Read More
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या युतीची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. बुधवार, १६ जुलै रोजी एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली.
सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्यासाठी विचार, विश्वास आणि विकास या त्रिसुत्रीवर बुधवारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन सेना या दोन पक्षांनी युती केली. नरिमन पॉइंट येथील महिला विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दोन्ही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत युतीची घोषणा करण्यात आली. यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, शिवसेना आमदार दिपक केसरकर, आमदार दिलीप लांडे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, सहमुख्य प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे व प्रम
खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआय-एमआयएम) या पक्षाची नोंदणी रद्द करण्यासाठी निवडणूक आयोगाला निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका मंगळवार, दि.१५ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्या.सूर्यकांत आणि न्या.जोयमाला बागची यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली आहे.
शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि अधिकृत पक्षाचे नाव एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर आता ऑगस्ट महिन्यात सुनावणी होणार आहे.या प्रकरणासंदर्भातील अंतरिम दिलासासाठी दाखल केलेल्या याचिकेवर न्या.सूर्यकांत आणि न्या. जयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सोमवार, दि.१४ जुलै रोजी सुनावणी झाली आहे. या याचिकेत येणाऱ्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी काही तात्पुरता दिलासा द्य
स्वतःचे २० नगरसेवकदेखील निवडून येणार नाहीत हे माहिती झाल्यामुळे उबाठाचे काही लोक हात धुवून मनसेच्या मागे लागले आहेत, अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. शुक्रवार, ११ जुलै रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.
पुणे जिल्ह्यातील उबाठा गट आणि मनसेचे महत्त्वाचे पदाधिकारी तसेच प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्यांनी गुरुवार, १० जुलै रोजी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यातील आनंदआश्रमात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
शिळे आणि निकृष्ट जेवण दिल्याचा आरोप करत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. मंगळवार, ८ जुलै रोजी हा प्रकार घडला असून या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये केलेल्या कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बुधवार, ९ जुलै रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
शिवसेना सोडण्यापूर्वी राज माझ्याकडे आला आणि नाशिकची मागणी केली,” अशी आठवण खुद्द हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बर्याच वर्षांपूर्वी एका मुलाखतीमध्ये सांगितली होती. "नाशिक शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि कायम राहील,” असे बाळासाहेब नेहमी म्हणत. ते होते तोपर्यंत हे खरेही होते. मात्र, त्यांच्यापश्चात पक्षावर मांड ठोकलेल्या उद्धव ठाकरे यांच्या हातातून हा बालेकिल्ला पूर्णपणे सुटला आहे. त्याचा पाया राज ठाकरे, तर कळस भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी चढवण्याचे काम केले. आपल्या पहिल्याच निवडणुकीत मनसेने ना
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'जय गुजरात' असा नारा दिल्याने उबाठा गटासह विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. दरम्यान, आता शिवसेनेनेही उद्धव ठाकरेंचा एक जुना व्हिडीओ शेअर करत त्यांच्यावर पलटवार केला आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अधिकृत शिवसेना म्हणून साल २०२३ मध्ये निवडणूक आयोगाने मान्यता देण्याचा आणि त्यांना 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला उबाठा गटाने आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्याची विनंती उबाठा गटाचे वकील देवदत्त कामत यांनी बुधवार दि. २ जुलै रोजी केली असता, न्यायालयाने १४ जुलै रोजी सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी निवड करण्यात आली आहे. सोमवार, ३० जून रोजी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.
आपला मेळावा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या विचारांचा तर दुसरा मेळावा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा आहे, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उबाठा गटावर केला आहे. गुरुवार, १९ जून रोजी शिवसेना पक्षाच्या ५९ व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते.
राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो, तसा त्यांचा जीव बीएमसीच्या तिजोरीत आहे, असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उबाठा गटावर केला आहे. गुरुवार, १९ जून रोजी वरळीतील डोम सभागृह येथे शिवसेनेचा ५९ व्या वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन असून दोन्ही पक्षांकडून वेगवेगळे मेळावे घेण्यात येणार आहे. गुरुवार, १९ जून रोजी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. दरम्यान, या मेळाव्यात दोन्ही पक्ष महापालिका निवडणूकांचे रणशिंग फुंकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिवसेनेच्या दोन्ही पक्षांकडून वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्याआधीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे एक व्यंगचित्र चांगलेच व्हायरल होत आहे. या व्यंगचित्रातून हिंदूत्वाच्या मुद्दयावरून उबाठा गटाला डिवचल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवसेनेचा ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही पक्षांकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र, त्याआधीच मुंबईत उबाठा गटाला खिंडार पडले आहे. उबाठा गटाच्या मुंबईतील अनेक माजी नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
पुणे, चंद्रपूर, नंदुरबार आणि धाराशिव या चार जिल्ह्यातील कांग्रेस, शरद पवार गट आणि उबाठा गटाच्या माजी नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने महाविकास आघाडीला खिंडार पडले आहे. मंगळवार, १७ जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे उबाठा पक्षाचे माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मंगळवार, १० जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
सांगली जिल्ह्यातील उबाठा गटाचे शिलेदार डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. सोमवार, ९ जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. तसेच चंद्रहार पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनीही यावेळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
ज्या माणसासाठी आम्ही प्रतिष्ठा पणाला लावली त्यानेसुद्धा बेईमानी करावी, अशी खंत संजय राऊतांनी व्यक्त केली आहे. उबाठा गटाचे सांगलीतील नेते डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. यावर राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली.
माजी मंत्री तथा काँग्रेसचे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधु शंकर म्हेत्रे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. गुरुवार, ६ जून रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
उबाठा गटाचे नेते चंद्रहार पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली असून यामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. येत्या सोमवारी चंद्रहार पाटील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मंत्री संजय शिरसाट यांनी बुधवार, ४ जून रोजी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
उबाठा गटाचे सांगलीतील नेते चंद्रहार पाटील हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. दरम्यान, आता चंद्रहार पाटील यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर याबद्दल पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.
नाशिक जिल्ह्यात उबाठा गटाला मोठा झटका बसला आहे. माजी आमदार निर्मला गावित यांच्यासह उबाठा गटाच्या उपनेत्या, अनेक पदाधिकारी आणि इगतपुरी तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १५०० महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Former MLA Narendra Darade joins Shiv Sena ‘उबाठा’ गटाचे नाशिकचे माजी आमदार नरेंद्र दराडे, तसेच मुंबईतील माजी नगरसेविका सुजाता सानप यांनी शनिवार, दि. २४ मे रोजी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
(Harshad Prakash Karkar left UBT and joined Shiv Sena) मुंबई महानगरपालिका विधी समितीचे माजी अध्यक्ष आणि माजी नगरसेवक हर्षद प्रकाश कारकर यांनी उबाठाला 'जय महाराष्ट्र' करीत शिवसेनेत प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कारकर यांनी शुक्रवार, दि. ९ मे रोजी शिवसेनेत प्रवेश केला.
उबाठा गटाला लागलेली गळती दिवसेंदिवस वाढत असून आता नवी मुंबई महापालिकेतही त्यांना जोरदार धक्का बसला आहे. नवी मुंबई महापालिकेतील उबाठा गटाचे माजी नगरसेवक आणि पक्षाचे प्रतोद रतन मांडवे तसेच त्यांच्या पत्नी सुनीता रतन मांडवे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाला खिंडार पडले आहे. मंगळवार, २९ एप्रिल रोजी ठाणे शहरातील नौपाडा विभागातील उबाठा गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंदआश्रमात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा धक्का दिला आहे. सोमवार, २८ एप्रिल रोजी मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर आणि उबाठा गटाचे उपनेते दत्ता दळवी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
चंद्रकांत खैरेंसाठी शिवसेनेचे दार बंद आहे. त्यांना आमच्याकडे एन्ट्री नाही, असे विधान खासदार संदीपान भुमरे यांनी केले. त्यांनी सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधला.
मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आल्यावर काहीजणांना मुंबईकरांची आठवण येते, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. शुक्रवार, ११ एप्रिल रोजी मुंबईतील विविध राजकीय पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.
Sudhir Salvi पक्षांतर्गत नियोजन शून्य, पण चमकोगिरी अधिक करणाऱ्या माजी खा. विनायक राऊत आणि आदेश बांदेकर यांचे पंख छाटण्यात आले आहेत. ‘उबाठा’ गटात सहाव्या सचिवाची नियुक्ती करीत, प्रस्तापितांना सूचक इशारा देण्यात आला आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांच्या गळ्यात सचिव पदाची माळ घालण्यात आली आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने वेळेत उपचार न केल्याने तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, शिवसेनेकडून भिसे कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली होती. परंतू, भिसे कुटुंबियांनी ती मदत नाकारली असल्याचे सांगण्यात येत आहे.
Kunal Kamra काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुणाल कामरा या स्टँडअप कॉमेडियनने कविता रचली. त्यामुळे शिवसैनिकांनी त्याला जशास तसं उत्तर दिले. त्यानंतर कुणाल कामरा हा उबाठा गटाच्या सांगण्यावरून हे सर्व करत असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर त्याला कायद्याची लढाई लढावी लागली होती. अशातच आता संतप्त शिवसैनिकांनी पुन्हा आता कुणाल कामराला घेरले आहे.
उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या जबर तडाख्यांनी उबाठा गटाचे बुरुज एकामागून एक ढासळू लागले आहेत. या बुरुजांची डागडुजी करणे अजूनही उद्धव ठाकरे यांना शक्य झालेले नाही. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या कामाचा आवाका पाहून, ठाकरेंचा एक एक मोहरा एकनाथ शिंदेंकडे डेरेदाखल होत असून, ठाकरे आणि त्यांच्या विश्वप्रवक्त्यांना हताशपणे बघण्यावाचून दुसरा पर्यायच राहिलेला नाही. कोकणातून राजन साळवी यांनी ठाकरेंना रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. तिकडे छत्रपती संभाजीनगरमधूनही ठाकरेंच्या पक्षाला गळती लागली आह
विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी होणाऱ्या निवडणूकीकरिता शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर केला आहे. शिवसेनेकडून संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांना संधी देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून उबाठा गटात गळती सुरुच असून आता पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील उबाठा महिला आघाडीला खिंडार पडले आहे. बुधवार, १२ मार्च रोजी येथील असंख्य पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
अपक्ष आमदार शरद सोनावणे यांनी शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी धनुष्यबाण हाती घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
विधानसभा निवडणूकीनंतर उबाठा गटाला लागलेली गळती अजूनही कायम असून आता कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाला मोठा धक्का बसला आहे. गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरेंच्या माजी आमदाराने त्यांची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला.
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याबद्दल अपशब्द वापरत केलेल्या वक्तव्यामुळे संजय राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या विधानानंतर शिवसेनेकडून संजय राऊतांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
(Mumbai Coastal Road) तब्बल १ हजार ४०० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या कोस्टल रोडला भेगा पडल्याने बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मात्र, हे ‘उबाठा’चे पाप असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
माजी आमदार सुभाष बने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने उबाठा गटाला कोकणात खिंडार पडले आहे. शनिवार, १५ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रत्नागिरी येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
राजन साळवी यांच्यानंतर आता विदर्भातील उबाठा गटाच्या बड्या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केला असून उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गुरुवार, १३ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे येथील आनंदआश्रमात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
उबाठा गटाचे नेते आणि माजी आमदार राजन साळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. गुरुवार, १३ फेब्रुवारी रोजी ठाण्यातील आनंदाश्रम येथे हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शिवसेनेचे अनेक बडे नेते उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या निवडणूका तोंडावर असताना उद्धव ठाकरेंना एकामागून एक धक्के बसत आहेत. आता पुण्यातील माजी आमदार महादेव बाबर हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
मुंबई महापालिकेतील उबाठा गटाच्या माजी नगरसेविका राजूल पटेल यांच्यासह विविध जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने उबाठा गटाला मोठा दणका बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवार, २८ जानेवारी रोजी हा पक्षप्रवेश पार पडला.
धाराशीव जिल्ह्यात काही बदल झाल्यास विशेष वावगे वाटायला नको, असे विधान परिवहन मंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. त्यामुळे धाराशीवमध्ये उबाठा गटात भुकंप होणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
बाळासाहेबांच्या विचारांचे मारक त्यांचे स्मारक बांधू शकत नाहीत, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. गुरुवार, २३ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त बीकेसी येथे आयोजित शिवसेनेचा मेळाव्यात ते बोलत होते.