‘आंतरराष्ट्रीय योग दिना’च्या निमित्ताने आपण योग प्रकारांची माहिती करुन घेत आहोत. मागील भागात ‘बहिरंग योग - यम’ म्हणजे नेमके काय, याविषयीची सविस्तर माहिती आपण करुन घेतली. आजच्या भागात ‘बहिरंग योग - नियम’ यासंबंधीच्या विविध पैलूंची सविस्तर माहिती करुन घेऊया.
Read More
सारे जग झपाट्याने पुढे वाटचाल करीत आहे. कारण, गतिशीलता हा प्रत्येकाचा स्थायी गुणधर्म होय. किंबहुना, हे सारे जगच चलायमान आहे. जिकडे पाहाल तिकडे सर्वांचे येणे-जाणे चालूच आहे. येथे कोणीही थांबलेला नाही. कारण, ‘थांबला तो संपला’ किंवा ‘आराम हराम आहे’ या म्हणी आम्हाला गतिशील होण्याकरिता नेहमीच प्रेरणा देत असतात. पण, अशा या परिवर्तनशील जगात आपले चालणे किंवा गतिमान होणे हे मात्र विधायक असले पाहिजे.
जागतिक आरोग्य संघटनेने १६८ देशांची नुकतीच पाहणी केली. सर्वाधिक शारीरिक कष्ट करणार्या देशांच्या या यादीत युगांडाने अव्वल स्थान पटकावले आहे.