मराठी सिनेविश्वातल्या स्टारकिड्सची नेहमीच चर्चा होताना दिसते. कोणी सिनेविश्वातच आईबाबांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन आपल्या करियरला सुरुवात केली तर कोणी वेगळी वाट निवडली. त्यातीलच एक म्हणजे प्रसिद्ध मराठी अभिनेते स्वप्नील राजशेखर यांची कन्या. कृष्णा असं त्यांच्या लेकीचं नाव आहे. नुकतंच तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तर पुढील शिक्षणाची तयारी ती करतेय. या शिवाय नुकतीच तिने राज्यस्तरीय परिक्षा दिली असून त्यातही ती अव्वल आल्याचं स्वतः स्वप्नील यांनी सांगितलं आहे.
Read More
(DCM Ajit Pawar Reaction on Viral Video of IPS Anjana Krishna) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू गावातील कथित बेकायदेशीर मुरुम उत्खनन प्रकरणी एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोन करून सुरु असलेली कारवाई थांबवण्याचा आदेश देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी विरोधकांकडून त्यांच्यावर सडकून टीका होत आहे.
"भगवद्गीतेच्या प्रत्येक श्लोकात आध्यात्मिक ज्ञानाची शिकवण आहे. भारतात जे आहे आणि इतर विकसित राष्ट्रांकडे जे नाही, ते नेमके हेच आध्यात्मिक ज्ञान आहे. भगवद्गीतेतील समत्व दर्शनाचे तत्वज्ञान हेच भारताचे खरे तत्वज्ञान आहे", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल यांनी केले. केरळच्या कलाडी श्री शारदा सैनिक शाळेत गीतायनम राष्ट्रीय चर्चासत्राचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी युगांडामध्ये भारताचा अभिमान उंचावला आहे. युगांडाच्या पंतप्रधानांशी भेट घेत मानवतेसाठी केलेल्या कार्यांवर, जागतिक प्रेम, शांतता आणि ऐक्यावर आध्यात्मिक चर्चा त्यांनी केली. या दरम्यान मानवतेसाठी केलेल्या कार्यांबद्दल पंतप्रधान रोबिना नब्बान्जा यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा सत्कार ही केला.
वृंदावन येथे आयोजित कथा कार्यक्रमादरम्यान जगद्गुरु रामभद्राचार्य महाराज यांनी अनेक सामाजिक व धार्मिक विषयांवर आपले विचार व्यक्त केले. त्यांनी धर्मांतर, लव्ह जिहाद, मंदिरांचे अधिग्रहण, संत समाजाची स्थिती आणि श्रीकृष्ण जन्मभूमीशी संबंधित प्रकरण यावर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. धर्मांतरणाला एक गंभीर समस्या म्हणत हे समाज फोडण्याचे षड्यंत्र असल्याचे त्यांनी सांगितले. ते स्पष्टपणे म्हणाले की, सनातन धर्माशी खेळ करणाऱ्यांचा नक्की बदला घेतला जाईल.
हॉकी ठाणे असोसिएशनतर्फे शालेय ९-साईड हॉकी लीगचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. २९ शाळांमधील एकूण ७६ संघांनी या लीगमध्ये सहभाग नोंदवला आहे.
आदीवासी आणि ग्रामीण भागात व्यसनधीनतेचे प्रमाण वाढत आहे. तरूण पिढीमध्ये देखील व्यसनधीनतेचे प्रमाण अधिक आहे असे दिसून येत आहे. तरूण पिढीला व्यसन लागूच नये याकरिता शाळा आणि महाविद्यालयीन जीवनात जनजागृती केली पाहिजे. तरूण या व्यसनधीनतेकडे वळले आहेत. त्यांचा आजार समजून घेऊन त्यांना त्यातून बाहेर काढले पाहिजे, असे मत डॉ. कृष्णा भावले यांनी व्यक्त केले.
मागील लेखात बिहारमधील मुजफ्फरपूरच्या वृद्धाच्या मृत्यूचे कारण आपण पाहिले. अनेकांनी अशी उदाहरणे ऐकली असतील वा प्रत्यक्ष पाहिली असतील. वर्तमानपत्रांतून येणार्या गोष्टीच सत्य मानल्याने, वर्तमानपत्रांतून न येणार्या गोष्टींमधील ज्ञानाच्या महान कक्षांकडे आम्ही तोंड फिरवून बसतो.
'सध्याचे युग राष्ट्र आणि धर्माचे आहे. हे सनातनचे युग आहे. जर कोणी सनातनचा नाश करण्याबद्दल बोलत असेल आणि देशात सत्ता मिळवण्याबद्दलही बोलत असेल, तर तसे चालणार नाही.' असे म्हणत कल्कीधामचे मुख्य पुजारी आचार्य प्रमोद कृष्णम यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार अखिलेश यादव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्याचे दिसतेय. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील एका खाजगी कार्यक्रमात ते बोलत होते.
'अनेक विनाषकारी शक्ती गजवा-ए-हिंद करू पाहतायत, परंतु आपले स्वप्न एकच आहे, भगवा-ए-हिंद!', अशी कडक घोषणा बागेश्वर धामचे मुख्य पुजारी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी रविवारी केली. पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर 'सनातन महाकुंभ'चा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी धीरेंद्र शास्त्री यांनी पुन्हा एकदा हिंदू राष्ट्रासाठी आवाज उठवल्याचे दिसून आले.
विठ्ठल रूपाने गोवर्धन पर्वताहून आलेला पांडुरंग कृष्ण आणि उद्धवाने सुरू केलेला नामसंकीर्तन रम्य प्रसंग समस्त वारकर्यांच्या रूपाने डोळ्यासमोर उभा राहतो; त्याचे बीज पांडुरंग विठ्ठल आहे आणि हेच ग्रंथ लिहिण्याचे प्रयोजन तत्त्वनिष्ठ संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक, महाराष्ट्र शासनाचा संतसाहित्यातील सर्वोच्च पुरस्कार ‘ज्ञानोबा तुकोबा पुरस्कारा’ने सन्मानित डॉ. मधुकर रामदास जोशी यांचे आहे. दिल्लीच्या ‘भारतीय इतिहास अनुसंधान परिषद’ (आयसीएचआर) या संस्थेने परवानगी आणि आर्थिक साहाय्य केल्याने त्यांनी हा शोध प्रकल्प पूर्ण
(Chinmoy Krishna Das Arrested) बांगलादेशमधील चितगाव न्यायालयाने इस्कॉन प्रभु चिन्मय कृष्ण दास यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. सहाय्यक सरकारी वकील सैफुल इस्लाम उर्फ अलिफ यांच्या हत्येप्रकरणी ही कारवाई करण्यात येत आहे. गेल्या वर्षी ७ नोव्हेंबर रोजी न्यायालयाच्या आवाराबाहेर अलिफ यांची हत्या करण्यात आली होती.
दहशतवादी तहव्वूर राणाच्या ‘एनआयए’ कोठडीत वाढ
भारतीय राष्ट्रदर्शन विकसित होण्यासाठी किमान १५ ते २० हजार वर्षे लागली. त्यामुळे आपल्या संस्कृतीची मुळे खोलवर रुजलेली आहेत. पाश्चात्य देशांच्या ’नेशन’ या संकल्पनेशी भारताच्या ’राष्ट्र’ या संकल्पनेची तुलनाच होऊ शकत नाही. कारण, आपल्याकडे बहुराष्ट्रवाद नाही. आपल्या संस्कृतीत एकतेचा संदेश आहे. आपण भूमीला ’माता’ मानतो. त्यामुळे ’नेशन’ आणि ’राष्ट्र’ या भिन्न संकल्पना आहेत,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल यांनी केले. रुईया महाविद्यालयात दि. २२ ते दि. २५ एप्रिल रोजीदरम्यान आयोजित
MLA MT Krishnappa कर्नाटक राज्यातील जनता दलाचे आमदार एमटी कृष्णाप्पा यांनी विधानसभेत बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाने ते पुन्हा एकदा नकारात्मक दृष्टीकोन घेऊन प्रकाशझोतात आले आहेत. काही राज्यांमध्ये महिलांना संबंधित राज्य सरकार प्रतिमहा २ हजार तर महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून १५०० रुपये दिले जात आहेत. यावरून कर्नाटकातील पुरूषांना का काही नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर महिलांना पैसे तर पुरूषांनाही मद्य दिले जावे, असे बेताल वक्तव्य एमटी कृष्णाप्पा यांनी केले आहे
Kapil Krishna Mandal arrested बांगलादेशात हिंदूंवर अन्याय अत्याचार सुरूच आहेत. बांगलादेशात विश्व हिंदू परिषदेचे महासचिव कपिल कृष्ण मंडल यांना पोलिसांनी शनिवारी १५ मार्च २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास अटक केली. त्यांच्यावर राजद्रोह आणि देशद्रोहाविरोधात गंभीर आरोप लावण्यात आला आहे.
मनसेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात, राज ठाकरेंनी मार्गदर्शन कमी आणि कुंभमेळ्याची टिंगलटवाळीच जास्त केली. “बाळा नांदगावकरांनी महाकुंभातून गंगेचे पाणी कमंडलूमधून आणले, तेव्हा मी हड ते पाणी कोण पिणार म्हणून नाकारले,” असे ठाकरे म्हणाले. “तिथे स्नान करताना अनेक जण अंग खाजवतात,” असेही राज म्हणाले. थोडक्यात, गंगेचे पाणी अशुद्ध असून ते पाणी कोण पिणार, असा त्यांचा आक्षेप होता. ‘राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी व अनुसंधान संस्थान’च्या शास्त्रज्ञांनी गंगेवर संशोधनही केले आहे ते जरी वाचले असते, तरी राज यांना
गीता केवळ श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले शाब्दिक तत्त्वज्ञान नसून, जीवनातील अनंत गूढ तत्त्वांचे ज्ञान प्राप्त करून, प्रत्यक्ष जीवन जगण्याचे एक महान दिव्य शास्त्र आहे. यादृष्टीने हे महनीय शास्त्र जगासमोर आल्यास, सर्व जगच या महान ग्रंथाकडे मानवी जीवनाकरिता एक आवश्यक संहिता म्हणून बघेल. यामुळे भगवद्गीता केवळ हिंदूंचा धार्मिक ग्रंथ न राहता, अखिल विश्वाचा जीवन ग्रंथ बनेल.
वाल्मिक कराडच्या बातम्या का बघतोस? असा सवाल करत बीडमधील एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. बुधवार, ५ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली असून पीडित तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Dwarka गुजरातमधील देवभूमी द्वारकामध्ये राज्य सरकारने पुन्हा एकदा बुलडोझरची कारवाई केली आहे. किनारपट्टी भागातील शेकडो एकर जमीन ही सरकारी मालमत्तेची आहे. एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत असणारी घरे व इतर धार्मिक आणि व्यावसायिक वास्तू उभारण्यात आल्या आहेत. आता ही बांधकामे हटवण्यात आली असून पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
(Krishna Andhale) बीड मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला आहे. मात्र अद्याप या प्रकरणातील एक संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यामध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. याचदरम्यान संतोष देशमुखांच्या भावाकडून लवकर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Chinmay Krishna Das Prabhu बांगलादेशात सत्तापालटानंतर हिंदूंवरील अन्याय अत्याचार थांबायचे नाव घेत नाहीत. बांगलादेशात सध्या मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार आहे. काही दिवसांआधी बांगलादेशातील सरकारने इस्कॉन टेंपलचे साधू चिन्मय कृष्ण दास प्रभू यांना चितगाव येथील न्यायालयाने जामीन नाकारला. चिन्मय कृष्ण दास प्रभू हे चितगाव येथील पुंडरिक धामचे प्रमुख आहेत.
मुंबई : जे आमचे आहे, ते आम्हाला मिळालेच पाहिजे, अशी भावना मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी व्यक्त केली. रविवार, दि. २९ डिसेंबर रोजी बालाजी मंदिर वरळी येथे आयोजित आरंभ गर्जना सोहळा धार्मिक विधीला ते उपस्थित होते.
मुंबई : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम कृष्णा ( S. M. Krishna ) यांचे मंगळवारी (१० डिसेंबर) रोजी पहाटे निधन झाले. त्यांनी वयाच्या ९२व्या वर्षी बंगळुरू येथील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. एस. एम. कृष्णा हे कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रमंत्रीदेखील होते.
आज गीताजयंती. गीतेतील उपदेश जरी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्धाच्या वेळी केलेला असला, तरी आपल्या प्रत्येकाला तो पावलोपावली उपयोगी पडत असतो. आज पाच हजार वर्षे उलटून गेल्यानंतरही भगवद्गीतेचे महत्त्व कमी झालेले नाही. उलट ते अधिक वाढतच आहे. गीतेच्या प्रचार-प्रसारार्थ काम करणार्या संस्थांचे या सगळ्यात मोठे योगदान आहे. अशाच संस्थांपैकी एक म्हणजे पुण्यातील ‘गीताधर्म मंडळ.’ गेली 100 वर्षे कार्यरत असणार्या या मंडळाच्या कार्याचा ‘गीताजयंती’च्या निमित्ताने घेतलेला हा आढावा.
बांगलादेश मध्ये अल्पसंख्यांक हिंदू समाजावर सुरू असलेले अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाहीये. या अत्याचाराच्या विरोधात भारतात जागोजागी निदर्शनं सुरू आहेत. अशातच आता भारताने चर्चेच्या दिशेने पहिले पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी सोमवार दिनांक ९ डिसेंबर रोजी धाका येथे पोहोचले असून भारत आणि बांगलादेश यांच्या मध्ये द्विपक्षीय बैठक होणार असल्याची चर्चा आहे.
शेख हसीना यांचे सरकार उलथवल्यापासून ते आजतागायत बांगलादेशातील हिंदू जीव मुठीत घेऊन जगत आहेत. त्यात ‘इस्कॉन’च्या चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना देशद्रोहाच्या खोट्या आरोपांखाली झालेली अटक, त्यांना जामीन मिळू नये म्हणून केलेली कायदेशीर कोंडी, यावरुन बांगलादेशमधील हिंदूंची विदारक परिस्थिती समोर यावी. त्यामुळे अमेरिकी ‘डीप स्टेट’चे हस्तक असलेल्या युनूस राजवटीत बांगलादेशी हिंदूंचे भय संपण्याची चिन्हे नाहीत.
(Bangladeshi Hindus) बांगलादेशात हिंदूंवर सातत्याने होत असलेले हल्ले तसेच बांगलादेशातील हिंदू धर्मगुरु इस्कॉनचे चिन्मय कृष्ण दास यांना झालेली अटक या संपूर्ण प्रकरणावर अमेरिकेकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकेतील राज्य विभागाचे उपप्रवक्ते वेदांत पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना बांगलादेशमधील अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांबाबत मंगळवार, दि. ३ डिसेंबर रोजी धार्मिक आणि मूलभूत मानवी हक्कांसह मूलभूत स्वातंत्र्यांचा आदर करण्याचे आवाहन केले.
बांगलादेशमधील हिंदू अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अत्याचाराचे नवे अध्याय दिवसेंदिवस रचले जात आहेत. अशातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बांगलादेशमध्ये अटक करण्यात आलेले आणि देशद्रोहाचा आरोप असलेले ईसकॉनचे पुजारी चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांच्या जामिनाची सुनावणी पुढीच्या महिन्यावर ढकल्याणात आली आहे. ३ डिसेंबर रोजी, म्हणजेच मंगळवारी झालेल्या सुनावणीसाठी कोर्टात कोणताही वकील हजर न राहिल्याने हा निर्णय घेतल्याची माध्यमांना मिळाली आहे.
मुंबई : बांगलादेशमधील हिंदू धर्मगुरू इस्कॉनचे चिन्मय कृष्ण दास यांचा खटला लढणारे वकील ( Lawyer ) अॅड. रेमण रॉय यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात वकील रेमण रॉयगंभीर जखमी झाले असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. इस्कॉन कोलकाता उपाध्यक्ष राधारमण दास यांनी आपल्या सोशल मिडियावरून याबाबत प्राथमिक माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार चिन्मय कृष्ण दास यांना कायदेशीर संरक्षण देणे ही त्यांची एक चूक झाली ज्यामुळे रेमण रॉय यांच्यावर ही वेळ आली.
मुंबई : 'बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार त्वरित थांबवावेत आणि श्री चिन्मय कृष्णा दास यांची तुरुंगातून सुटका करावी’, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ( RSS ) बांगलादेश सरकारला केले आहे. सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी शनिवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी यासंदर्भात एक पत्रक जारी केले असून, बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराप्रकरणी निषेध व्यक्त केला आहे.
नवी दिल्ली : सामाजिक सेवा संस्था ‘माय होम इंडिया’च्या वतीने ११ वा कर्मयोगी पुरस्कार ( Karmayogi Award ) यशस्वीरीत्या संपन्न झाला. या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-सरकार्यवाह श्री कृष्ण गोपाल यांनी डॉ. विश्वामित्र बत्रा यांना सन्मानित केले.
मुंबई : समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित कृष्णा दादाराव शिंदे निर्मित आणि योगिता कृष्णा शिंदे यांच्या आर. के. योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा.लि.तर्फे बनवण्यात आलेला ‘मिशन अयोध्या’ ( Mission Ayodhya film ) हा चित्रपट दि. २३ जानेवारी २०२५ रोजी राममंदिर स्थापनेच्या प्रथम वर्षपूर्तीचे औचित्य साधून महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या ऐतिहासिक निर्मितीनंतर प्रथमच मराठी चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर भव्य दृश्यांमधून रामललाच्या मूर्तीचे दर्शन चित्रपट भक्तांना घडणार आहे. चांदण्याच्या तेजाने झळाळ
बांगलादेशातील इस्कॉन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर, अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इस्कॉन संसथेशी संबंधित १७ जणांचे बँक खाती गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बांगलादेशच्या केंद्रीय बँकेने २९ नोव्हेंबर रोजी हा निर्णय घेतल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे.
(Chinmay Krishna Das) बांग्लादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हिंसाचाराच्या विरुद्ध लढा देणारे इस्कॉन पुंडरिक धामचे अध्यक्ष चिन्मय कृष्णा दास ब्रह्मचारी यांना ढाका येथे देशद्रोहाचा आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. बांग्लादेशमध्ये दास यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने हिंदू रस्त्यावर उतरले आहेत. अशातच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेवर चिंता व्यक्त केली आहे.
नाशिक : श्री बागेश्वरधामचे पिठाधीश्वर परमपूज्य श्री धिरेंद्र कृष्ण शास्त्री ( Dhirendra maharaj ) अर्थात श्री. बागेश्वर धाम महाराज गुरूवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी नाशिक पुण्यनगरीत येत असून त्यांच्या उपस्थितीत श्री बागेश्वरधाम महाराष्ट्र सेवा समिती, नाशिक जिल्हा यांच्यावतीने एकदिवसीय संत सभा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता तपोवन येथील मोदी मैदानावर होणार आहे. समितीच्यावतीने या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या संत सभेत नाशिक आणि संपूर्ण उत्
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील घटक पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करून पक्षविरोधी भूमिका घेणार्या, तसेच महायुती सरकारची प्रतिमा मलिन करत जाणीवपूर्वक पक्षशिस्तभंग करणार्या आठ पदाधिकार्यांवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे ( Sunil Tatkare ) यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
भारत अॅनिमेशन क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याच्या मार्गावर असून भारत येत्या काळात जगभराला सामग्री पुरवेल, असे दिसून येते. विविध क्षेत्रांत भारत आत्मनिर्भर होत असताना, या क्षेत्रातही त्याचे वाढते योगदान त्याला प्रमुख जागतिक खेळाडू अशी ओळख मिळवून देणारी ठरणार आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी कृष्ण जन्मभूमी-शाही इदगाह मशीद वादात हिंदू बाजूने दाखल केलेले १८ दावे सुनावणीयोग्य असल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे हिंदू समाजाचे विजयाकडे आणखी एक पाऊल पडले असल्याचे मानले जाते. देवता आणि हिंदू पक्षांनी दाखल केलेल्या दाव्यांच्या मेंटेनिबिलिटीस अर्थात दावे सुनावणीयोग्य असण्यास शाही इदगाह मशिदीच्या व्यवस्थापनाने आव्हान दिले होते.
सांगलीतील कृष्णा नदीच्या पात्रातील मगरींचा विणीचा हंगाम संपत आला आहे (Krishna river crocodile). मगरीची इवलीशी पिल्ले कृष्णा माईच्या पाण्यात डोक काढताना दिसू लागली आहेत (Krishna river crocodile). यंदाच्या हंगामात मगरींच्या अंदाजे १८ घरट्यांचे निरिक्षण वन्यजीवप्रेमींनी केले आहे. आठवड्याभरात झालेल्या जोरदार पावसामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने काही घरटी पाण्याखाली गेल्याचे निरीक्षणही नोंदविण्यात आले आहे. (Krishna river crocodile)
‘ने मजसी ने, परत मातृभूमीला। सागरा प्राण तळमळला’ या काव्यपंक्ती जेव्हा जेव्हा ऐकल्या, तेव्हा तेव्हा वाटले ज्या महापुरुषाने ही मातृप्रेमाची उत्कट भावना शब्दबद्ध केली, त्यासाठी, त्यावर काहीतरी मोठे लिहावे, करावे, लिहिले जावे, केले जावे. एक कलाकार म्हणून अनेकदा एखादे काम जेव्हा आपल्या पदरी पडते, त्यावेळी अनेक प्रश्न मनात स्फुरतात. रणदीप हुड्डा दिग्दर्शित, अभिनीत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चरित्रपट मनातील अशाच सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन जातो. समुद्र ओलांडून किनार्यावर पोहोचणे अजून कठीण, तरीपण म्हणावे लागेल की
‘पिरामल रिअल्टी’ व ‘इस्कॉन’ने ठाणे शहरात ‘पिरामल वैकुंठ’ येथे ‘श्री श्री राधा गोविंददेव मंदिर’ हे भव्य मंदिर उभारले आहे. दि. १७ मार्च रोजी या मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. ‘पिरामल एंटरप्रायझेस लिमिटेड’चे अध्यक्ष अजय पिरामल यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ आणि समाजाच्या हितासाठी ‘इस्कॉन’च्या साहाय्याने या मंदिराची स्थापना केली. हे मंदिर समाजकल्याणासाठी, समाजाच्या अध्यात्मिक वृद्धीसाठी कार्य करणारे एक अध्यात्मिक केंद्र असेल. नागर वास्तूशैलीतील हे मंदिर येत्या काळात ठाणे शहराचे वैभव ठरेल, यात कुठलीच शंका न
काँग्रेसचे बहिष्कृत नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पुन्हा एकदा नेते राहूल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. आचार्य म्हणाले, राहुला गांधी जोपर्यंत पक्षात आहेत, तोपर्यंत काँग्रेसला कुणीही वाचवू शकत नाही. तसेच, काँग्रेसच्या दुर्दशेसाठी एकच व्यक्ती जबाबदार आहे, ती व्यक्ती म्हणजे राहुल गांधी, असेही आचार्य प्रमोद कृष्णम यांनी सांगितले.
राहुल गांधी काल-परवा म्हणाले की, “आदिवासी हेच या देशाचे खरे मालक आहेत.” मग ईशान्य पूर्व भारतातले ख्रिस्तीबहुल राज्यातील सध्याचे धर्मांतरित बांधव पूर्वी कोण होते? या राज्यातील मूळचे ते आदिवासी बांधव ख्रिस्ती का झाले? या षड्यंत्रामागे कोण आहेत, याबाबत राहुल गांधी बोलतील का? राहुल गांधी म्हणत असतात की, या देशात प्रत्येक जातीची जनगणना झालीच पाहिजे. ‘जिसकी जितनी आबादी उसका उतना हक!’
अध्यात्माबद्दल बोलायचे तर संतांनी अंतिम सत्य जाणलेले असते. भगवंताची प्रचिती घेतलेली असते. मग त्यांचे सांगणे, त्यांची अनुभूती, आपण का स्वीकारत नाही? भगवंत आहे, हे जाणूनही काही माणसे आपल्या ज्ञानाहंकाराने ते नाकारतात. त्यांना स्वामींनी ‘पापी’ म्हटले आहे. कारण, ते इतरांच्या बुद्धीत ईश्वराविषयी भ्रम निर्माण करतात. ही माणसे जाणूनबुजून ईश्वराचे अस्तित्वच नाकारतात. इतरांचा बुद्धिभ्रंश करतात, म्हणून स्वामी त्या देह बुद्धीधारक अहंकारी माणसांची दुरात्मा, अतिशय वाईट (महांनष्ट) व चांडाळ म्हणजे दुष्कृत्ये करणारे म्हणून
आज नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये नवीन गुंतवणूकदार सदस्यतेची मुहुर्तमेढ रोवली गेली आहे. २९ फेब्रुवारीला एनएससीमध्ये सदस्यांची संख्या ९ कोटी पार झाली आहे. आजपर्यंत एकूण १६.९ कोटी ग्राहकांची कोड नोंदणी दाखल झाली आहे. आता ग्राहक एकाहून अधिक कोडची नोंदणी स्टॉक एक्सचेंजबरोबर करू शकतील.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाकडे ‘रावण’ या भूमिकेतूनच बघितलेले दिसते आणि अतिशय सावध राहून त्या संकटांचा मुकाबला केला. यासोबतच श्रीरामांनी वालीचा वध करून, किष्किंधेचे राज्य त्याचा भाऊ सुग्रीवाला दिले, तर रावणाचे राज्य त्याचा भाऊ बिभीषणाला दिले. कंस वधानंतर भगवान श्रीकृष्णांनी मथुरेचे राज्य त्याचे वडील उग्रसेन यांना दिले. ही दुसर्या राज्याप्रति व तेथील जनसमूहाप्रति व्यक्त केलेली व स्वीकारलेली भावना यावर आज आपण सर्वांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे.
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा कोरेगाव मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंगळवार, दि. १३ फेब्रुवारी रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला.यासंदर्भात आमदार शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असणारे जलसंधारणाचे काम केले जाईल. पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला न्याय देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
काँग्रेसमधील अंतर्गत कलह आणि पक्षाने राम मंदिराचे निमंत्रण नाकारल्याच्या विरोधात वक्तव्य करणारे आचार्य प्रमोद कृष्णम यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. आचार्य यांच्यावर पक्षविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. आचार्य प्रमोद यांनी या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
अयोध्येप्रमाणे लवकरच मथुरेतही श्रीकृष्ण विराजमान होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी पुणे येथे रविवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सगळ्या गोष्टी कायदेशीररित्या होत आहेत, असेही ते म्हणाले आहेत.