कोकण कला व शिक्षण विकास संस्था, मुंबई यांच्या माध्यमातून प्रत्येक शैक्षणिक वर्षात हजारो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचे उपक्रम राबविला जातो. यावर्षी हि आतापर्यंत सिंधुदुर्ग, पुणे, बीड,अहिल्याबाई नगर, ठाणे, रायगड सह अनेक जिल्ह्यात शैक्षणिक साहित्य वाटप संपन्न झाले असून याच वाटपाचा भाग म्हणून आज श्री माउली विद्यामंदिर डोंगरपाल येथे ३१ शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेलं शालेय साहित्य उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हा उपक्
Read More
(Maharashtra Weather Update) राज्यात सध्या काही भागात जोरदार पाऊस सुरू असतानाच हवामान विभागाने पुढील दिवसांसाठी पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे. कोकण, गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ४ जुलै आणि ५ जुलैला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून सुनील नारकर यांनी पदभार स्वीकारला आहे. सुनील नारकर हे कणकवली तालुक्यातील पियाळी गावचे आहेत. या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. नारकर हे सन १९९७ मध्ये कोकण रेल्वेमध्ये रत्नागिरीत क्षेत्रीय ट्रॅफिक व्यवस्थापक पदावर रुजू झाले. त्यानंतर त्यांनी मडगाव येथे वरिष्ठ क्षेत्रीय वाहतूक व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. पुढे बेलापूर येथे कोकण रेल्वे मुख्यालयामध्ये मुख्य वाणिज्य प्रबंधक म्हणून त्यांनी यशस्वी कामगिरी बजावली. आता पदोन्नतीने त्यांची कोकण रेल्वेचे मुख्य
काही वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डिंगणे डोंगरपाल गावातील श्री माऊली विद्यामंदिरामध्ये पाण्याची व्यवस्थाही नव्हती. एक घागरभर पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी शिक्षकेतर कर्मचार्यांबरोबर केलेली पायपीट, आजूबाजूच्या छोट्याशा तळ्यातून पिण्यासाठी आणायला लागणारे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी हायस्कुलने वर्षानुवर्षे केलेली धडपड आजही आठवते. पण, यातूनच जन्म झाला ‘कोकण’ संस्थेच्या ‘स्वच्छ पाणी’ या चळवळीचा...
खासदार म्हणून निवडून आल्याच्या 1 वर्षाच्या आतच नरेश म्हस्के यांनी रेल्वे विषयक अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. गेल्या 4 वर्षांपासून गणेशोत्सवासाठी कोकणात रेल्वेने जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ठाणे रेल्वे स्थानकात तिकीटासाठी दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरु कराव्यात ही प्रवासी संघटनेची मागणी प्रलंबित होती. खासदार नरेश म्हस्के यांनी पाठपुरावा केल्याने आजपासून या दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरु झाल्या असून त्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.
यंदा समुद्री कासवांच्या पिल्लांबाबत कोकण किनारपट्टी लखपती झाली. कारण, समुद्री कासव विणीच्या २०२४-२५ या यंदाच्या हंगामात कोकणातून तब्बल १ लाख ७१ हजार २४५ पिल्लं समुद्रात सोडण्यात आली (sea turtle hatchlings released from Konkan coast). रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यापैकी यंदा सर्वाधिक पिल्लं ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सोडण्यात आली, तर कासवाची सर्वाधिक घरटी रत्नागिरीच्या जिल्ह्यातील गुहागरच्या किनाऱ्यावर आढळून आली. (sea turtle hatchlings released from Konkan coast)
दि. 15 डिसेंबर 2024 रोजी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास ही तुलनेने कमी चर्चिली जाणारी, पण प्रचंड संधी असलेल्या खात्यांची जबाबदारी नितेश राणे यांच्याकडे आली. बेधडक शैली, कट्टर हिंदुत्ववादी प्रतिमा आणि आक्रमक नेतृत्वासाठी ओळखल्या जाणार्या नितेश राणे यांनी या खात्यांना केवळ गतिमान केले नाही, तर महाराष्ट्रासह कोकणच्या विकासाचा एक नवा अजेंडा देशासमोर ठेवला. त्यांच्या प्रत्येक निर्णयातून दिसते ती दूरदृष्टी, कृतिशीलता आणि सामान्य माणसाच्या हिताची कळकळ. नितेश राणे यांनी मत्स्यव
मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या तटबंदीवर उभा असलेला शिवरायांचा ८३ फूट उंच पुतळा केवळ स्मारक नाही, तर मराठा आरमाराच्या तेजस्वी परंपरेचे जागृत प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावर निर्माण केलेले भारतीय इतिहासातील पहिले स्वकीय आरमार, ही केवळ दूरदृष्टी नव्हे, तर सागरी सुरक्षिततेची स्वाभिमानी घोषणा होती. या परंपरेला नव्याने उजाळा देण्यासाठी राजकोट किल्ल्याच्या परिसरात ‘शिवआरमार’ संग्रहालय उभारण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. बुधवार, दि. ११ जून रोजी त्यास मंजुरी देण्यात आली.
मच्छीमार महामंडळाचे कामकाजही तातडीने सुरु होणार
कोकण किनारपट्टीवरील जैवविविधतेचे मापन करणारा ‘प्रोजेट कोस्टल २.०’ हा प्रकल्प नुकताच पार पडला. या प्रकल्पाच्या माध्यमातून उलगडलेल्या कोकणातील किनारी जैवविविधता आणि किनारी प्रदेशात राहणार्या समुदायांच्या सहसंबंधाविषयी ऊहापोह करणारा लेख...
मच्छीमारांनी बोटींमध्ये वापरल्यानंतर उरलेले इंजिन ऑईल खरेदी करून त्याद्वारे रोजगार देऊन सागरी प्रदूषणावर रोख बसविण्याचा प्रयत्न ‘ओशन ऑईल कलेक्शन एन्व्हॉर्यमेंटल अॅक्शन नेटवर्क’(ओशन) या प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणात होत आहे. चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना देणार्या या प्रकल्पाविषयी...
रविवारसह सोमवारी बरसणाऱ्या पावसाने राज्यात अनेक ठिकणी नुकसाने केले. मंगळवार, दि. २७ मे रोजी पावसाचा जोर कायम राहणार असून, कोकणासह, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’चा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले.
"सनातन विचारधारेच्या आधारे राष्ट्राचे पुनरुत्थान हेच संघाचे कार्य आहे. हिंदू समाज हाच राष्ट्रीय समाज आहे. तो टिकला तर राष्ट्र टिकेल.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिति महाराष्ट्र राज्य संघटन मंत्री पराग कंगले यांनी केले.
( Rain warning Heavy rain expected in Malvan including konkan ) महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असून आज २१ मे रोजी कोकण आणि महाराष्ट्रातील काही जिल्हांना हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकणासह पुणे, कोल्हापुर, सातारा, बीड, संभाजीनगर या जिल्हांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
( Self-Redevelopment meeting at Konkan Divisional Commissioner Office ) राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ११ जणांचा अभ्यासगट गठीत करण्यात आला आहे. या अभ्यासगटाची दुसरी बैठक गुरुवारी सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथील कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली.
( Self-Redevelopment Study Group meets at Konkan Commissioner Office ) राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ११ जणांचा अभ्यासगट गठीत करण्यात आला आहे. नुकतीच या अभ्यासगटाची पहिली बैठक वांद्रे येथे पार पडली होती. आता उद्या गुरुवार, ०८ मे रोजी दुपारी ३ वाजता या अभ्यासगटाची दुसरी बैठक सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथील कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेत यंदाही कोकणाचा डंका पहायला मिळाला. अन्य शाखांपेक्षा यंदा विज्ञान शाखेचा निकाल आशादायक असून, मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी सर्वाधिक आहे.
"कोकणी माणसाचे भावविश्व मराठी साहित्यामध्ये योग्य शब्दात चितरणारे मधु मंगेश कर्णिक म्हणजे सामर्थ्य आणि परमार्थाचा अनोखा संगम आहे" असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या ९५व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याच्या भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, अध्यक्ष
कोकणातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाप्रमुखांसह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षाला खिंडार पडले आहे. मंगळवार, १५ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुक्तागिरी निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
खाणकाम क्षेत्रात ट्रकचालक म्हणून झालेली सुरुवात ते दशावतारातील खलनायक म्हणून झालेली ओळख, असा वेंगुर्ल्याच्या स्वप्निल नाईक यांचा जीवनप्रवास...
अखिल भारतीय कोकण विकास महासंघाच्या वतीने सिंधुदूर्ग जिल्ह्यात प्रथमच वधू-वर सूचक महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक, १३ एप्रिल रोजी कुडाळ येथील स्व. बापूसाहेब महाराज सभागहात सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
( government bring a lake plan for fishermen in Konkan pravin darekar ) कोकणात मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते. पर्यटनसोबत कोकणच्या आर्थिक विकासाला मासेमारीतून मोठा उपयोग होणार आहे. ज्याप्रमाणे सरकार मागेल त्याला शेततळे देते त्याप्रमाणे कोकणात मच्छिमारांसाठी मागेल त्याला तलाव ही योजना आणणार का? असा सवाल भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासावेळी मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांना विचारला.
विलिनीकरणानंतर कोकण रेल्वेचे नाव तसेच राहणार
( Power lines on Konkan coast will be made underground Chief Minister Devendra Fadnavis ) कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांत वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे होणारी जीवित आणि वित्तहानी कमी करण्यासाठी कोकण आपत्ती सौम्यीकरण हा 5 हजार कोटींचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यासाठी बाह्यस्त्रोत बँकांकडून निधी उपलब्ध होत आहे. याअंतर्गत कोकण किनारपट्टीतील सर्व वीजवाहिन्या भूमिगत करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
कोकण रेल्वे मार्गावर मुंबईवरुन कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईतून कोकणात जाण्यासाठी रेल्वे गाड्यांना नेहमीच गर्दी असते. विशेषतः कोकणातील गणेशोत्सव आणि शिमगोत्सव या काळात कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते आणि यात ट्रेनचे तिकीट न मिळणे, रेल्वेला प्रचंड गर्दी यामुळे चाकरमान्यांचे हाल होतात. याच पार्श्वभूमीवर कोकणात गावी येण्यासाठी मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई येथील चाकरमान्यांना सोप व्हावे यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. मध्य रेल्वे होळी उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या
शिरढोण व खोणी भूखंड विक्रीसाठी उपलब्ध; इच्छुकांना निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन
कोकणचा विकास म्हणजे केवळ मोठमोठे प्रकल्प नाहीत, तर आपली संस्कृती, आपली माणसं आणि आपला निसर्ग जपत पुढे जाण्याचा प्रवास आहे. हाच विचार पुढे नेण्यासाठी कोकण भूमी प्रतिष्ठान घेऊन येत आहे, ग्लोबल कोकण महोत्सव २०२५, दिनांक ६ मार्च ते ९ मार्च दरम्यान नेस्को ग्राउंड, गोरेगाव (मुंबई) येथे हा भव्य सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद उद्योग मंत्री उदय सामंत भूषवणार असून, या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षपदी रोजगार हमी योजना मंत्री भारत गोगावले असणार आहेत. या महोत्सवाचे प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्राचे माहिती तं
मुंबईस्थित चाकरमानी होळीनिमित्त कोकणातील मुळगावी जाण्याच्या तयारीत असतात. कोकणात शिमगा आणि गणेशोत्सव या दोन्ही सणांना विशेष महत्त्व आहे. कोकणात जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचे नियोजन केले आहे.होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या समन्वयाने रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.
देवरुखच्या 'सह्याद्री संकल्प सोसायटी'ने रत्नागिरीतील पाच तालुक्यांमधून धनेशाच्या जवळपास ६० घरट्यांच्या (ढोल्या) नोंदी केल्या आहेत (hornbill conservation project in konkan). सध्या कोकणात सुरू असणाऱ्या धनेश पक्ष्यांच्या विणीचा हंगाम सुरू आहे (hornbill conservation project in konkan). या घरट्यांच्या निरिक्षणाचे काम संस्थेचे कार्यकर्ते स्थानिक धनेशमित्रांच्या मदतीने करत असून त्यामधून जन्मास येणाऱ्या पिल्लांच्या नोंदीही घेण्यात येणार आहेत (hornbill conservation project in konkan). गेल्या काही वर्षांमध्ये कोकणाती
महाराष्ट्रातील यंदाच्या समुद्री कासव विणीच्या हंगामातील पहिले पिल्ले शनिवार दि. ४ जानेवारी रोजी रत्नागिरीतील गुहागरच्या किनाऱ्यावरुन समुद्रात रवाना झाली (guhagar beach).यंदाच्या सागरी कासवांच्या विणीच्या हंगामातील कोकण किनारपट्टीवरील पहिले घरटे गुहागरमध्ये नोव्हेंबरमध्ये सापडले होते (guhagar beach). त्यामधून बाहेर पडलेल्या काही पिल्लांना शनिवारी समुद्रात सोडण्यात आले. (guhagar beach)
मुंबई : “कोकणाच्या सर्वांगीण विकासासोबत कोकण किनारपट्टीच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी केले. ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’च्या कोकण प्रांताच्या ५९व्या प्रांत अधिवेशनाला शुक्रवार, दि. २७ डिसेंबर रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगरी, भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी येथे सुरुवात झाली. यावेळी मंत्री राणे उपस्थित होते.
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे २२६४ सदनिकांच्या विक्रीकरिता जाहीर सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. दि. ०६ जानेवारी २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदारांना अर्ज सादर करता येणार आहे, अशी माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रधान्य’ तत्वावरील ११ हजार १७६ घरांच्या विक्रीसाठी कोकण मंडळाने २ डिसेंबरपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत इच्छुक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी २९ ठिकाणी स्टॉल उभारण्यात आले.
म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे अत्यल्प, अल्प व मध्यम उत्पन्न गटाकरिता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावरील घरांच्या विक्रीसाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत विरार-बोळींज, खोणी-कल्याण, शिरढोण-कल्याण, गोठेघर-ठाणे, भंडार्ली-ठाणे येथे ही घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. घरांच्या विक्रीत वाढ व्हावी व या गृहनिर्माण प्रकल्पांतील सदनिकांबाबत सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी दि. ०२ ते ११ डिसेंबरया कालावधीत व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे, अशी माहिती कोंकण मंडळाच्या मुख्य अ
सिंधुदुर्ग वन विभागाने रविवार दि. १ डिसेंबर रोजी कणकवली येथे विक्रीस आणलेल्या खवले मांजराला ताब्यात घेतले (pangolin seized from konkan). यावेळी या खवले मांजराची तस्करी करणाऱ्या पाच आरोपींना अटक करण्यात आली (pangolin seized from konkan). अटक केलेले आरोपी हे देवगडचे असून ते कणकवलीत खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यासाठी आले होते (pangolin seized from konkan). यानिमित्ताने कोकणात अजूनही खवले मांजराची छुपी तस्करी सुरू असल्याचे समोर आले आहे. (pangolin seized from konkan)
ठाणे : कोकणातील दुर्गम भागासह विविध शाळांमध्ये नवनवीन शैक्षणिक प्रयोग व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी कार्य करणारे १५१ आदर्श शिक्षक, ३० शिक्षकेतर कर्मचारी आणि ११ आदर्श संस्थाचालकांना आज सन्मानित करण्यात आले. विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे ( Vasantrao Davkhare ) यांच्या स्मृत्यर्थ आमदार निरंजन डावखरे व भाजपा शिक्षक आघाडी-कोकण विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या पुरस्कारातून गुणवंत शिक्षकांच्या कार्याचा सन्मान झाला असल्याची भावना शैक्षणिक वर्तुळातून
कमळ फुललं! कोकणातून ( Kokan ) उबाठा हद्दपार!
सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून बेडकांच्या नव्या प्रजाती शोध लावण्यात आला आहे. कोकणच्या भूमीवरुन या प्रजातीचे नामकरण 'फ्रायनोडर्मा कोंकणी', असे करण्यात आले आहे (frog from sindhudurg). कुडाळ तालुक्यातील पाणथळ आणि कातळ सड्यांवर या बेडकाचा अधिवास आहे (frog from sindhudurg). या शोधामुळे सिंधुदुर्गातील पाणथळ जागा आणि कातळ सड्यांवरील जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. (frog from sindhudurg)
मुंबई : “हिस्ट्री आणि इतिहास या दोन्ही शब्दांत मोठे अंतर आहे. ‘हिस्ट्री’ म्हणजे पूर्वजांचा काळ उलगडणारी केवळ कथा आहे, तर इतिहास म्हणजे आपल्या पूर्वजांचा खरा पुरुषार्थ आहे. तो फक्त कागदावर मांडून पूर्ण होत नाही,” असे प्रतिपादन ‘अखिल भारतीय इतिहास संकलन योजना’ (नवी दिल्ली) राष्ट्रीय संगठन सचिव डॉ. बालमुकुंद पाण्डेय ( Dr. Balmukund Pandey ) यांनी केले.
पुणे : ( Vishwajeet Deshpande ) “महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत हिंदूंमध्ये जातीजातींत फूट निर्माण करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहे व आजमितीला ‘बटोगे तो कटोगे’ एवढ्या गंभीर स्थितीत एकूणच हिंदू समाज पोहोचला आहे. अशा वेळी आपण आधी हिंदू आहोत.
महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर रात्रीच्या वेळी चमकणाऱ्या निळ्या लाटांच्या दर्शनाला तारकर्ली समुद्र किनाऱ्यापासून सुरुवात झाली आहे (bioluminescence blue sea wave). सोमवार दि २१ आॅक्टोबर रोजी तारकर्लीच्या किनाऱ्यावर चकाकणारी निळी चादर पसरल्याचे चित्र दिसले. त्यामागचे कारण म्हणजे 'बायोलूमिनेसेन्ट डिनोफ्लॅगलेट्स'( नोक्टीलिका) हा सूभ्म जीव (bioluminescence blue sea wave). या समुद्री सूक्ष्म जीवांमधून उत्सर्जित होणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे समुद्राच्या लाटांवर निळा प्रकाश पसरतो(bioluminescence blue sea wave). मात्र, या
म्हाडा कोंकण मंडळाच्या विरार बोळींज वसाहतीतील टप्पा क्रमांक १,२ व ३ मधील अल्प, मध्यम उत्पन्न गटातील ९४०९ सदनिकाधारकांकडून आकारण्यात येणारे मासिक सेवाशुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सेवाशुल्क कमी करण्याबाबत वसाहतीतील रहिवाशांकडून व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून वारंवार मागणी करण्यात येत होती. त्याबाबत गृहनिर्माण मंत्री अतुल सावे व म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या संयुक्त बैठकीत झालेल्या निर्णयानुसार सदर प्रकल्पामध्ये आजतागायत प्रत्यक्ष ताबा घेतलेल्या व यापुढे
सायन -पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पुल क्र.३च्या मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या उत्तर वाहिनी मार्गिकेचे उद्घाटन व रेवस ( रायगड ) ते रेडी (सिंधुदुर्ग) या सागरी महामार्गावरील सात खाडी पुलांच्या कामाचे भूमिपूजन रविवार, दि १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे.
(Mega Aerospace Silicon Wafer Projects) रत्नागिरी येथील वाटद, झाडगाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रात २९ हजार, ५५० कोटी गुंतवणुकीच्या दोन प्रकल्पांना शुक्रवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. यामुळे ३८ हजार, १२० इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे. उच्च तंत्रज्ञानावर आधारित या गुंतवणूक प्रकल्पांमध्ये सिलीकॉन वेफर्स, एटीएमपी, फॅब आणि अवकाश तंत्रज्ञान (एरोस्पेस) आणि संरक्षण या क्षेत्राशी संबंधित आहेत.
(Konkan) विषारी सापांचे माहेरघर कोकणचे किनारी सडे Species & Habitats Awareness Programme. The First Ever Wildlife Video Series In Marathi.
Ganeshotsav 2024 भाजपा चारकोप विधानसभा व आमदार योगेश सागर यांच्या वतीने गौरी गणपती साठी कोकणात दिनांक ४ व ५ सप्टेंबर रोजी विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे, आज प्रथम बस गणपती बाप्पा मोरया या गजरात रवाना झाली. ५ सप्टेंबर रोजी ३ विशेष एसी बस व एस टी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
यंदाच्या वर्षी गणरायाचे आगमन ०७ सप्टेंबर रोजी होणार असून बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी पहिली पसंती एसटीला दिली आहे. त्यामुळे ४२०० गट आरक्षणासह एकूण ४९५३ जादा बसेस आतापर्यंत फुल्ल झालेले आहेत. हे पाहता उद्या ३ सप्टेंबरपासून जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.
कोकणवासीयांसाठी एक आनंदाची बातमी पुढे आली आहे. बोरिवलीतून कोकण रेल्वे सुरु होणार असून कोकणवासीयांचा प्रवास सुखकर होणार आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या नेतृत्वात कोकणासाठी बोरिवलीतून ही विशेष रेल्वे गाडी सुरु करण्यात आली आहे. भाजप नेते सुनिल राणे यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्र ते कर्नाटकपर्यंत विस्तारलेल्या सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग प्रदेशात (sahyadri konkan wildlife corridor) ३२ वाघांचा वावर असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील सह्याद्रीला केंद्रस्थानी ठेवून 'वाईल्डलाईफ काॅन्झर्वेशन ट्रस्ट'ने (डब्लूसीटी) कोल्हापूर वन विभाग आणि 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'च्या मदतीने तयार केलेल्या अहवाल कराडमध्ये पार पडलेल्या 'सह्याद्री व्याघ्र भूप्रदेश संवर्धन परिषदे'त प्रसिद्ध करण्यात आला (sahyadri konkan wildlife corridor). या अहवालात सह्याद्रीत मादी वाघ पिढ्यानपिढ्य
७ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी आता लालपरीही सज्ज झाले आहे. मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान ४३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे.