राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आमच्यासाठी दिवाळीप्रमाणे आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी नेहमीच प्रेरणा आणि मोलाची साथ दिली. विधान परिषदेच्या तालिका सभापतिपदाची संधी देऊन त्यांनी मातंग समाजातील पहिल्या व्यक्तीला या पदावर पोहोचविले. यामुळे संपूर्ण समाज त्यांचा कायम ऋणी राहील.
Read More
खरं तर आज देशभक्त कोणाला म्हणावे, हा एक मोठा प्रश्न आहे. माझ्या मते जो आपले स्वतःचे काम प्रामाणिकपणे पार पडतो, त्यात कुचराई केलेली त्याला स्वतःला अजिबात आवडत नाही, तो खरा देशभक्त पण आजचे चित्र फार भयानक आहे. लोकांचा कल हा काम टाळण्याकडे जास्त दिसून येतो. लोक मिळेल त्यानिमित्ताने काम टाळत जातात, दुर्लक्ष करतात. थोडक्यात कष्टाळू लोकांपेक्षा कष्ट टाळू लोकांची संख्याच मोठी आहे.
एकूणच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण जीवन हे राष्ट्रभक्तीने रसरसलेले व एका सच्चा समाजसुधारकाचे जीवन आहे. कुठल्याही भारतीय उपासना पद्धतीचा विरोध त्याच्यात दिसत नसून, जर असेल तर तो केवळ आणि केवळ समाज सुधारणेच्या दृष्टीनेच आहे. मात्र, त्यांच्या सगळ्या भूमिका लक्षात येण्यासाठी, त्यांची स्वतः लिहिलेली पुस्तके वाचणे गरजेचे असून, त्यांच्याबाबत अनेक एजंटांनी स्वतःची मतं बाबासाहेबांच्या तोंडी घालण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे, ती वाचून आपल्याला खरे बाबासाहेब उमजणार नाहीत. आपले राष्ट्रभक्त व समाज सुधा
चिनी कम्युनिस्ट सरकारने चिनी जनतेला नव्या वर्षाची भेट काय दिली, तर एक नवा कायदा. हा कायदा म्हणजे, देशभक्ती शिक्षा कायदा. या कायद्यांतर्गत म्हणे, चीन आता विद्यार्थ्यांना देशभक्तीचे धडे देणार आहे. कारण, चिनी प्रशासनाचे म्हणणे आहे की, युवकांमध्ये ऐतिहासिक शून्यवाद निर्माण झाला आहे. देशाबद्दल निष्ठा कमी होत आहे. जनतेमध्ये देशप्रेम वाढावे म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून चीन आता जनतेमध्ये देशप्रेम रूजवणार आहे.
राष्ट्रपतीपदाची रामनाथ कोविंद यांची कारकिर्द म्हणजे समन्वय, सहभागिता सहकार्य या तत्वांवर आधारित राष्ट्राचा विकास अशीच म्हणावी लागेल. संविधान आणि संस्कार यांच्या प्रेरणेने देशाचा सर्वोच्च नागरिक म्हणून त्यांनी राष्ट्रपतीपदाची धुरा कुशलपणे हाताळली. प्रसिद्धीपासून दूर राहून कोणत्याही वादाचा केंद्रबिंदू न होता, अत्यंत सहज निरलसपणे देशाच्या संविधानात्मक विकासामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या राष्ट्रपतीपदाचा कार्यकाल संपुष्टात आला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याकार्याचा आणि एकंदर व्
'गजानन विजय ग्रंथ’ - आधुनिक महिपतीचे अवतार समजले जाणार्या ह. भ. प. दासगणु महाराजांनी लिहिलेली ही २१ अध्यायांची पोथी. त्यात १५व्या अध्यायात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे वर्णन आढळते. आपल्याला यातूनच टिळकांची महती कळते. जशी ही धर्म व अध्यात्मातील महती आपल्याला आढळते तशी अनेक ठिकाणी टिळकांची महती आपल्याला आढळते. अशा टिळकांची जयंती व पुण्यतिथी आपण दरवर्षी साजरी करतो. तशीच आज आपण ती साजरी करत आहोत. त्यानिमित्ताने...
‘मी या देशाला देव मानते’ - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूद्रौपदी मुर्मू यांचा विजय हा संविधानाचा विजय आहे. संविधानाने दिलेल्या लोकशाहीचा विजय आहे, संविधानाच्या सहभागिता, राजकीय न्याय आणि सर्वसमावेशकता या मूल्यांचा विजय आहे. भारतीय लोकशाहीचे सामर्थ्य या विजयाने अधोरेखित झाले आहे.
लष्करी सेवेत असताना मदतीची भावना जागृत होते, कष्टाची ओळख होते, कठीण प्रसंगी जीव अडचणींत टाकून काम फत्ते करायची सवय लागते आणि त्यातून ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना कायमस्वरूपी मनात निर्माण होते. तो या देशप्रेमाची वाच्यता करत नाही. असे युवक समाजामध्ये राष्ट्रप्रेमाचे बंध गुंफतात. राष्ट्रीय सौहार्द आणि देशाची ओळख निर्माण करण्यात त्यांचा मोठा वाटा असतो. म्हणूनच ‘अग्निपथ’ योजनेमुळे लष्कराच्या कार्यक्षमतेवर कोणत्याही मर्यादा येणार नाहीत. युवकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत व्हावी, ही यामागची भावना आहे.
जगभरच्या लोकशाही देशांना ‘आफ्स्पा’ किंवा ‘पॅट्रीयट’सारखे कायदे करावे लागतात आणि प्रसंगी ते निष्ठूरपणे राबवावेही लागतात. अशा कायद्यांच्या अंमलबजावणी दरम्यान अनेकदा बळाचा वापर होतो, हे जरी मान्य असले तरी हा कायदा काढून घ्या, हा कायदा रद्द करा वगैरे मागण्या समर्थनीय ठरत नाहीत.
समाजात नवयुवकांमध्ये राष्ट्रनिष्ठा जागृत करण्यासाठी समरस प्रयत्न करणारे नाशिकचे नाना बच्छाव यांच्याविषयी...
शालेय जीवनातच राष्ट्रप्रेमाचे बाळकडू मिळाल्याने राष्ट्ररक्षणापेक्षा राष्ट्रउभारणी व सामाजिक सुधारणा घडवण्यासाठी ‘स्वधिष्ठान’ उभारणार्या ओनिल मकरंद कुलकर्णी या तरुणाविषयी...
‘सर्जिकल स्ट्राईक’वर प्रश्चचिन्ह उपस्थित करणारे, ‘तुकडे तुकडे गँग’ची भाषा बोलणारे आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या अर्थसंकल्पात पायाभूत सोयीसुविधांच्या विकासाऐवजी ‘देशभक्ती’चा नारा लावला. तेव्हा, देशभक्तीच्या या ‘केजरीवाल पॅटर्न’चा समाचार घेणारा हा लेख...
दरवर्षी आज दि. ७ डिसेंबर रोजी देशातील जनता व इतर सामाजिक संस्था ध्वजनिधी जमा करतात. या निधीचा वापर देशाचे रक्षण करीत असताना धारातीर्थी पडलेल्या वीर जवानांच्या, पत्नींच्या व मुलांच्या, माजी सैनिकांच्या कल्याणासाठी केला जातो. जिल्हा सैनिक बोर्ड शाळा, कॉलेज व विविध संस्थांच्या मदतीने निधीची रक्कम गोळा केली जाते.
लतादिदी आज ९१ वर्षांच्या झाल्या आहेत.
स्वा. सावरकरांचे ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ हे विचार मनाला पटतात. हिंदूंनी ‘राष्ट्र प्रथम’ मानले. स्वा. सावरकरांचे ‘हिंदुत्व’ हे धार्मिक नव्हते, तर ते राष्ट्रीय होते. त्यांचा सिद्धांत काळाच्या कसोटीवर टिकणारा आहे. कोरोनासारख्या राष्ट्रीय संकटात हिंदूंनी देवळे बंद ठेवली. धार्मिक सण-समारंभ थांबवले. देशहित-समाजहिताचा प्रथम विचार केला. आपापल्या मुल्ला-मौलवीची, चर्च मंडळाची मुस्लीम-ख्रिश्चनांप्रमाणे वाट बघितली नाही. कारण, त्यांचा दृष्टिकोन ‘राष्ट्रीय’ होता.
आत्यंतिक राष्ट्रप्रेम, सामाजिक प्रश्नांची जाण आणि चित्रपटातून प्रबोधन या त्रिसूत्रीवर जीवनक्रम आचरणारे,तारुण्यात असताना मुक्ती संग्रामात स्वतःला झोकून देणारे स्वातंत्रसैनिक आणि तोच सेनानीपणा समाजकार्यात जपणारे सच्चे नागरिक म्हणजे अर्थात चित्रतपस्वी ‘राजदत्त.’
सर्वसामान्यांचा मोदींना मिळालेला प्रतिसाद हा इतका अफाट होता की, त्यादिवशी थाळी निनादाने आसमंत निनादून गेले होते. दिव्यांच्या प्रयोगालाही आज देशात असाच प्रतिसाद मिळाला. अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा सण साजरा करण्याची परंपरा असलेल्या या देशात या झारीतल्या शुक्राचार्यांपेक्षा नेतृत्वाचा प्रकाश दाखविणार्यांची विश्वासार्हता अधिक आहे.
देशासाठी काम करताना एखाद्याला प्रचंड रागाचा सामना करावा
देशनीती आणि विदेशनीती परस्परांना पूरक आहेत. जर देश सुरक्षित नसेल, देशाच्या सीमा निश्चित नसतील, देशात राहाणारे नागरिक कोण आणि परदेशातून आलेले कोण? त्यांच्यात पुन्हा धार्मिक छळामुळे आलेले शरणार्थी किती? पोट भरण्यासाठी आलेले कायदेशीर लोक किती आणि घुसखोर किती ? हे निश्चित नसेल, तर तो देश आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्याही फार काळ प्रगती करू शकत नाही.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत ‘वतन’ या दूरदर्शनने निर्मित केलेल्या देशभक्तीपर गीताचे प्रकाशन झाले.
सार्वभौमत्व, भौगोलिक सुरक्षा, अंतर्गत आणि बहिर्गत निर्णय स्वातंत्र्य, आर्थिक आणि सामाजिक निर्णय स्वातंत्र्य या चार मुद्द्यांवर राष्ट्र किती सुरक्षित आहे, सामर्थ्यवान आहे, ते ठरते. अशा मानबिंदूंचे रक्षण करण्याचा हक्क आपल्या देशाला आहे. भारतासारखे खरोखरीच सामर्थ्यवान राष्ट्र या मानबिंदूंचे राखण करण्यासाठी सर्व उपलब्ध पर्याय (आणि अस्तित्वाचा प्रश्न असेल, तर प्रथम उपयोग करण्याचा आण्विक पर्यायही) वापरेल, हा विश्वास देशाच्या सुरक्षेचा मुख्य आधार असतो.
पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या निधनाला आज चार दशकांहून अधिक काळ लोटला असला तरी त्यांचे चिंतन आजही ताज्या फुलांप्रमाणे टवटवीत आहेत.
स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक व्याख्यांचं स्वरूप बदलायला लागलं. रोज सकाळी प्रार्थना नंतर तास सुरू होत असत. परत शाळा सुटताना शेवटची प्रार्थना, वंदे मातरम् असायचे. यातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती, मोठ्या लोकांचा आदर यांसारख्या गोष्टी शिकायला मिळायच्या. यातील बऱ्याच गोष्टी सध्या लुप्त झाल्या आहेत. म्हणूनच स्वतःला विचारा, मी या देशासाठी काय करतो?
माझ्या आयुष्यात अटलजींच्या तीन जाहीरसभा ऐकण्याचा योग आला. त्यांना जवळून पाहण्याची संधी मला मिळाली, हा माझ्या आयुष्यातील परमभाग्याचा क्षण आहे
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि रामचंद्र प्रतिष्ठानच्यावतीने कारागृहातील बंदिवानांसाठी एक स्तुत्य उपक्रम तो म्हणजे बंदिवानांसाठी स्वा. वि. दा. सावरकरांच्या जीवनविषयावर निबंधस्पर्धा.