‘हिरवा निसर्ग हा भोवतीने जीवन सफर करा मस्तीने’ हे सोनू निगम यांनी गायलेले गाणे आपला जीवनप्रवासच खरं तर आपल्यासमोर आणून ठेवते. प्रत्येकाच्या जीवनात अडीअडचणी, सुख-दु:ख यांची रेलचेल सुरू असतेच; पण या सगळ्यातूनही आपले जीवन आनंदाने व्यतीत करणं, ज्यांना खर्या अर्थाने जमतं-त्या म्हणजे स्त्रिया! घर, संसार, मुलांचा सांभाळ या सगळ्या जबाबदार्या खांद्यावर पेलताना कुठेतरी स्वतःचं जगणं विसरलेल्या स्त्रिया कुटुंबाच्याच आनंदात आपला आनंद मानतात आणि हसत जीवन जगतात. मात्र, संसाराच्या गाडीला थोडासा ब्रेक मारत, नव्या देशात प्
Read More
आठवड्याच्या दर शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाची माहिती आम्ही तुमच्यासाठी सिने-भारत मधून देणार आहोत. कुटुंबासोबत आणि मित्रांसह चित्रपटगृहात जाऊन चित्रपटांचा मनमुराद आनंद घ्या...
मराठी चित्रपटसृष्टीत ६०-७० च्या दशकापासून ते आता २१ व्या शतकापर्यंत विविधांगी भूमिका साकारुन आपल्या अभिनयाची भुरळ ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी रसिक प्रेक्षकांवर घालत आहेतच. आपल्या अभिनयाची कारकिर्द सुहास जोशी यांनी विजया मेहता दिग्दर्शित आणि जयवंत दळवी लिखीच बॅरिस्टर या नाटकातून १९७२ मध्ये सुरु केली. त्यानंतर सुहास यांनी मागे वळून न पाहता मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवली.
बायका एका छताखाली राहू शकत नाहीत ही संकल्पना खऱ्या अर्थाने दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांच्या 'झिम्मा' आणि 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाच्या माध्यमातून मोडित काढली आहे. करोनानांतर प्रदर्शित झालेल्या पहिल्या झिम्मा या चित्रपटाने प्रेक्षकांना चित्रपटगृहात ओढून आणले. प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादामुळेच आता 'झिम्मा २' प्रदर्शित होत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी झिम्मा चित्रपटाचा करण जोहर हिंदी रिमेक बनवणार असून स्टारकास्टही निश्चित झाल्याचे वृत्त समोर आले होते. या वृत्ताबाबत दिग्दर
एकदिवसीय विश्वचषकच्या अंतिम सामन्याकडे सध्या संपुर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियात चुरशीची लढत १९ नोव्हेंबरला पाहायला मिळणार आहे. अहमदाबादयेथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड कपसाठीचा थरार पाहायला मिळणार आहे. अनेक कलाकारांसोबत अभिनेता सिद्धार्थ जाधव देखील क्रिकेटप्रेमी आहे. आणि भारत-ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याबद्दल त्याने रेडिओ मिरचीला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले आहे. सिद्धार्थने यावेळी भारतीय क्रिकेट संघाला एक सल्ला दिला आहे. तो म्हणाला, "माझी इच्छा आहे की त्या ऑस्ट्रेलियाची अशी
करोनानंतर मराठी प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून नेणारा चित्रपट म्हणजे हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा'. सात बायकांचा परदेशातचा प्रवास आणि त्यांना सोबत नेणारा त्यांचा टुर गाईड आणि तेथील धमाल मस्ती प्रेक्षकांना मनोरंजित करणारी आणि जीवनाचे कारी सार सांगणारी देखील होती. २०२१ नंतर आता पुन्हा एकदा ७ बायका परदेशात जाणार असून यावेळी इंदु डार्लिंग अर्थात अभिनेत्री सुहास जोशी यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सगळ्यांचे रियुनियन होणार आहे. नुकताच 'झिम्मा २' चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा पार पडला. यावेळी दिग्दर्शक ह
'झिम्मा' चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांचे पात्र म्हणजे माझ्या सासूबाईंचे अर्थात ज्येष्ठ अभिनेत्री उज्वला जोग यांचे असल्याचा खुलासा दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी केला. २४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘झिम्मा २’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉंच झाला. यावेळी हेमंत ढोमे यांनी ‘महाएमटीबी’शी संवाद साधताना झिम्मा चित्रपटाबद्दलच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला.
मराठी मनोरंजनसृष्टीतील चॉकलेट बॉय अशी ओळख असणाऱ्या सिद्धार्थ चांदेकर याने त्याच्या आईचे दुसरे लग्न लावून समाजात एक नवा आदर्श निर्माण केला. आता आई किंवा वडिलांचे दुसरे लग्न लावून देणे यात कसला आदर्श असे ताशेरे नक्कीच ओढले जातील. पण वयाच्या प्रत्येक टप्प्यात साथीदार सोबत हवा असे वाटणे काही गैर नाही, आणि तिच बाब ओळखून सिद्धार्थ आणि मिताली यांनी सीमा चांदेकर यांचे लग्न लावले. आपल्या आईचे दुसरे लग्न का लावले? याचं कारण सिद्धार्थ चांदेकरने महाएमटीबीशी बोलताना सांगितले. २४ नोव्हेंबर रोजी 'झिम्मा २' चित्रपट प्रदर्श