प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2024 साठी पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मान्यता दिली आहे. देशातील पहिल्या महिला माहुत पार्वती बरुआ, जशपूरचे वनवासी कार्यकर्ते जागेश्वर यादव आणि सरायकेला खरसावनचे आदिवासी पर्यावरणवादी चामी मुर्मू यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक उदय विश्वनाथ देशपांडे यांनाही पद्मश्री जाहिर झाला आहे.
Read More