सार्वजनिक स्वच्छतेसाठी नेमलेले बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी तसेच बाह्य संस्थांचे कर्मचारी यांनी अधिकाधिक जबाबदारीने स्वच्छता केल्यास मुंबई महानगर हे अधिक स्वच्छ आणि सुंदर राहील. त्यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य योग्यप्रकारे पार पाडावे. तथापि, नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रावर अनुपस्थित राहिल्यास अथवा कर्तव्यात कोणत्याही प्रकारची कसूर करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. गृहनिर्माण संकुलांमधून संकलित केलेला कचरा खासगी कंत्राटदार रात्रीच्या वेळी रस्त्यांवर टाकून देत असल्याचे निदर्शनास आले आहे. असे प
Read More
या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढली असून, स्थानिक रहिवाशांनी या मोहिमेचे स्वागत केले आहे आणि नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आणि कर्मचारी वर्गाच्या मदतीने परिसर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी झाला आहे. उमेश यमगर, सहा. आयुक्त, 'ड' प्रभाग
कचरा संकलन केंद्रावर रांगा लावाव्या लागत असल्याने घंटागाडीवरील वाहन चालक आणि सफाई कामगारांना दररोज तीन तास अतिरिक्त काम करावे लागत आहे. त्या कामाचा मोबदला दिला जात नाही
मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागातील विविध ठिकाणी शनिवार, दि. ८ जून रोजी सखोल स्वच्छता मोहीम (डीप क्लीन ड्राईव्ह) राबविण्यात आली. त्यात, एकाच दिवसात ८५ मेट्रिक टन राडारोडा (डेब्रीज), २५ मेट्रिक टन टाकाऊ मोठ्या वस्तू आणि ६५ मेट्रिक टन कच-याचे संकलन करण्यात आले. तर, ३१६ किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करण्यात आले.
महाबळेश्वरमध्ये बेशिस्त पर्यटकांकडून उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे (gaur in mahabaleshwar). याठिकाणी उघड्यावर पडलेल्या प्लास्टिकचा कचरा रानगवा खात असल्याचे छायाचित्र पुण्यातील वन्यजीव छायाचित्रकाराने टिपले आहे (gaur in mahabaleshwar). त्यामुळे महाबळेश्वरमधील वन्यजीवांच्या अधिवासाला देखील प्लास्टिकचा विळखा बसल्याचे समोर आले आहे. gaur in mahabaleshwar
कचर्यासारख्या सहज दुर्लक्ष होणार्या विषयाचे गांभीर्य ओळखून, कचरानिर्मिती कमी करण्यासाठी, जनसाक्षरतेचा ध्यास घेतलेल्या गार्गी गीध यांच्याविषयी...
शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना, कचर्याचे प्रमाणदेखील वाढत असून, कचर्याच्या ब्लॅक स्पॉटमुळे दिवसभर शहरात अस्वच्छता असते. दरम्यान, शहर परिसरात ज्या ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जातो. असे ७८ ब्लॅक स्पॉट मनपाने शोधले आहे.
देहूरोड कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील कचरा पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगत मोठ्या प्रमाणात जाळला जातो. याचा रुपीनगर आणि तळवडे भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारने पुढाकार घेवून कॅन्टोन्मेंट हद्दीतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारावा, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली.
मुंबईतील कचरा मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घोडबंदर पूल ते सातिवली खिंड दरम्यान आणून टाकला जातो. ही बाब बेकायदेशीर आहे. त्यामुळे तातडीने हा प्रकार थांबविला पाहिजे, अशी मागणी भाजप महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा कार्यकारिणी सदस्य केदारनाथ म्हात्रे यांनी पोलिस निरीक्षक, महामार्ग ट्राफिक पोलिस विभाग कोल्ही-चिंचोटी यांच्या कार्यालयात भाजपा शिष्टमंडळासह लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
प्रदूषण हा मानवी आयुष्यातील एक महत्त्वाचा आणि वैश्विक स्तरावर ऐरणीवर आलेला प्रश्न. मानवासाठी हा प्रश्न दिवसेंदिवस जटील ठरत असला, तरी त्यावर विविध उपाय शोधण्याचे प्रयत्नही तितक्याच वेगाने सुरु आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून नुकतेच ‘आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन’ म्हणजेच (International Zero Waste Day)हा दिवस संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या पुढाकारातून गुरुवार, दि. ३० मार्च रोजी जगभर साजरा करण्यात आला.
नुकताच पितृपंधरवडा संपला, या दिवसात सर्वात जास्त मागणी असते ती कावळ्याला. हा कावळा इतर दिवशी खिडकीवर येऊन कावऽऽ कावऽऽ करू लागला तर त्याला हाकलले जाते. जाणून घेऊया याच निसर्गाच्या स्वच्छता दूताची गोष्ट...
कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाबाहेरील पदपथावरच वैद्यकीय कचर्याची विल्हेवाट लावण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या ‘ग्राऊंड झिरो’ मोहिमेदरम्यान निदर्शनास आला आहे. केंद्र सरकारने वैद्यकीय कचर्याच्या व्यवस्थापनासाठी दिलेल्या निर्देशांना केराची टोपली दाखवत या ठिकाणी काही गोडाऊन माफियांकडून पदपथासहरस्त्यावरच वैद्यकीय कचर्याची विल्हेवाट लावली जात आहेत.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून ‘माझी वसुंधरा अभियाना’अंतर्गत पुरस्कार मिळवल्याचा बडेजाव केला जात आहे. मात्र, मागील अनेक दिवसांपासून कल्याण-डोंबिवली शहरातील कचर्याचे ढीग पाहता महानगरपालिका प्रशासन खरोखर शहरातील स्वच्छतेसाठी काम करीत आहे का, असा प्रश्न उपस्थित करत, पुढील दहा दिवसांत कचर्याची समस्या न सोडविल्यास भारतीय जनता पार्टीच्यावतीने मोठे जन आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे कल्याण पश्चिमचे माजी आमदार व भाजप भटके विमुक्त आघाडीचे संयोजक नरेंद्र पवार यांनी महागनरपालिका आयुक्तांना पत्र लिहून दिला आहे.
मुंबई महापालिकेकडून खेळाची मैदाने बांधण्यात आली होती. मात्र, आता त्याचा वापर गाड्या पार्किंगसाठी तसेच कचरा टाकण्यासाठी होत असून याकडे मुंबई महापालिका दुर्लक्ष करत असल्याची तक्रार कांदिवलीतील चारकोप येथील स्थानिकांनी दै. ’मुंबई तरुण भारत’शी बोलताना केली.
ठाणे शहरात नालेसफाईची कामे ८० ते ९० टक्के पूर्ण झाल्याचा दावा ठाणे मनपाचे आयुक्त विपीन शर्मा यांनी केल्यानंतरही शहरातील अनेक नाले अद्याप तुंबलेलेच असल्याचे समोर आले आहे.
कचरा हा शहर आणि ग्रामीण परिसराला भेडसावणारा मोठा प्रश्न बनत चालला आहे.असे असले तरी दिवसेंदिवस विविध तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण अनेक समस्यांची उत्तरे शोधत आहोत. कचर्याचे योग्य नियोजन करणे हे सरकार समोरचे मोठे आव्हान आहे. पण अशातच गोव्यातील साळीगावमध्ये कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी एक मोठा प्रकल्प उभा आहे. गोवा स्थापनादिना निमित्त या प्रकल्पाचा आढावा घेणारा हा लेख...
सालाबादप्रमाणे यंदाही मान्सूनने मुंबईला कवेत घेण्यासाठी अवघे काही दिवस असताना, अद्याप नालेसफाई, पर्जन्यजल वाहिन्यांच्या स्वच्छतेच्या कामांची पूर्तता झालेली नाही. तेव्हा, मुंबईच्या ‘तुंबई’ होण्यामागची अशाच काही सफाईदार दाव्यांची ही रखडगाथा...
मुंबईत दररोज साचणारा कचरा साफ करून जनतेला दिलासा देणार्या सफाई कर्मचार्यांच्या १९० कोटी रुपयांच्या भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) हातसफाई करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेकडून यावर्षीचा वार्षिक अर्थसंकल्प जाहिर करण्यात आला आहे. एकुण ४५,९४९ कोटींच्या या अर्थसंकल्पात अनेकविध तरतूदी करण्यात आल्या आहेत.
नैसर्गिक आपत्ती अथवा कुठल्याही कारणामुळे जमा झालेल्या हरित कचर्यावर अत्यल्प किमतीत प्रक्रिया करून त्यामार्फत तयार होणार्या साधनांचा वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित काही कामासाठी वापर केला जातो. ज्यामुळे एकतर हरित कचर्याचे नियोजन झाले व त्यातून वैद्यकीय क्षेत्रातील कामांतही मदत होते. अर्थात, समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मार्ग अनेक आहेत, तिथे आवश्यकता आहे ती फक्त इच्छाशक्तीची. पण, मुंबईकरांचं दुर्दैव हेच की, मुंबई महापालिकेकडे याच इच्छाशक्तीचाच मुळी अभाव दिसून येतो.
दरदिनी साडेपाच हजार मेट्रिक टन कचरा
समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेत २०० किलो कचरा जमा
जगातील महासागर, समुद्र, नद्या-नाले, ओढे, पर्वत इतकेच काय, जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्टदेखील मानवनिर्मित कचर्यामुळे आच्छादित झालेले दिसते. इतकेच काय तर पृथ्वीपासून लाखो किलोमीटर दूर अंतराळातही असाच कचरा तरंगतोय.
प्लास्टिक कचरा द्या, जेवण घ्या...
मुंबई स्वच्छ आणि दुर्घटनामुक्त करण्यासाठी १०५००कॅमेऱ्यांची नजर
‘एन्व्हायर्नमेन्ट लाइफ’ या स्वयंसेवी संस्थेने रविवारी प्रबळगड-माची धबधब्याजवळ राबविलेल्या स्वच्छता मोहिमेमधून तब्बल ६०० किलो कचरा गोळा केला.
: प्लास्टीक कचऱ्याची जगासमोर उभी आहे. मात्र, दिल्लीतील एका कंपनीने या समस्येवर मात करण्यासाठी नवकर प्लास्टीक या कंपनीने त्यांचा कोट्यवधींचा प्लास्टीक बनवणारा प्लांट बंद करून बायो कॅरीबॅगचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. कंपनीचे सर्वेसर्वा पंकज यैन यांनी २०१७ मध्ये प्लास्टीकच्या भस्मासुराची उभी असलेली समस्या पाहून हा पर्याय स्वीकारला. त्यानुसार दिल्लीतील एनसीआर येथे बायोकॅरीबॅगचा प्लांट उभा केला.
एक महिला जखमी झाली असून एकाच मृत्यू झाला आहे
निसर्गावर प्रेम करणाऱ्या आणि निसर्गभाव जोपासणाऱ्या पर्यटकांपेक्षा ऐपत आहे म्हणून शेखी मिरवणारे हौशी पर्यटक नेपाळमध्ये जास्त येताना दिसतात आणि याचा पुरावा म्हणजे या परिसरात साचणारा कचरा.
कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करण्यासाठी या सगळ्या वस्तू आधी वेगळ्या कराव्या लागतात. त्यासाठी मोठी यंत्रसामग्री आणि ऊर्जा लागते. तरीसुद्धा १०० टक्के वर्गीकरण होत नाही. ओल्या कचऱ्यात प्लास्टिकचे बारीक कण मिसळले जातात. याला उपाय एकच. कचऱ्याचं वर्गीकरण हे घरातच व्हायला हवं, जे सहज शक्य आहे.
शहरातील अनेक दुकानांच्या समोरील रस्त्यावर कचरा टाकलेला आढळून आल्याने संतप्त झालेल्या नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी व्यापार्यांना खड़ेबोल सुनावले. स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येकाची असून यापुढे कचरा आढळल्यास दंड आकारण्यात येईल, अशा सूचना त्यांनी या वेळी व्यापार्यांना दिल्या.
शहरातील प्रभाग क्रमांक 16 व 17 मध्ये नगरपालिका प्रशासनाकडून वेळोवेळी साफसफाई होत नसल्याने तसेच गटारींमधील गाळ काढण्यात येत नसल्यामुळे या प्रभागातील नागरिकांच्या घरात सकाळच्या सुमारास पाणी जाते.
भूलथापा मारण्यात महापालिकेतील लोकप्रतिनिधी आणि अधिकार्यांचा हात कुणीही धरणार नाही. 17 मजलीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नवीपेठेत रविवारी दिवसभर ‘गल्लीभर’ कचरा पेटवून दिल्याने तो धुमसत होता.
महापालिका क्षेत्रांमध्ये दरदिवशी निर्माण होणारा सुका कचरा उचलण्यासाठी महापालिकेच्यावतीने खासगी कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे.
नवी दिल्ली... देशाची राजधानी आणि राजकीय घडामोडींचे केंद्र. पण, सध्या याच दिल्लीला कचऱ्याच्या भीषण समस्येने ग्रासले आहे.
फ्रान्समधील प्यू ड्यू फोयू या ऐतिहासिक पार्कमध्ये सध्या कावळ्यांना कचरा उचलण्याचं ट्रेनिंग दिलं जात आहे. आतापर्यंत सहा कावळ्यांनी ही कला उत्तमरित्या अवगतही केली आहे.
राज्य शासन आता यापुढे कोणत्याही नगरपालिका क्षेत्रासाठी डंपिंग ग्राऊंड देणार नाही. त्यामुळे कचरा समस्येचे निर्मुलन करणे काळाची गरज आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाचे हे कर्तव्य आहे.