राज्यातील रेकॉर्डब्रेक उन्हाच्या झळांनी केवळ तापमानातच लक्षणीय वाढ झालेली नाही, तर उष्माघाताच्या बळींची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते. तेव्हा, ऋतुनुसार जीवनशैलीतील बदलांचा विचार करता, उन्हाळ्यात केवळ द्रवपदार्थांचे सेवन वाढवण्याबरोबरच अन्य पथ्येही पाळणे तितकेच गरजेचे. तेव्हा एकूणच उन्हाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, यासंबंधी मार्गदर्शन करणारा हा लेख...
Read More
खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा झाला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याला गालबोट लागलं. या सोहळ्यादरम्यान काही जणांचा उष्मघातामुळे मृत्यू झाला. त्यानंतर विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली.
राज्यात मे महिन्याच्या मध्यामध्ये जाणवणारा उन्हाचा चटका आता एप्रिलमध्येच जाणवू लागला आहे. एप्रिलमध्येच वातावरणातील आर्द्रता वाढल्याने बहुतांश शहरांतील तापमानाने चाळीशीचा टप्पा ओलांडल्याने महाराष्ट्र होरपळून निघाला आहे. याच पार्श्वभुमीवर शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. वाढत्या उष्णतेमुळे मे महिन्याची सुट्टी आता दि.२१ एप्रिलपासूनच दिली जाणार आहे.