अभिनेता विक्रात मेस्सी याची प्रमुख भूमिका असणारा ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट १५ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला होता. शोभा कपूर, एकता आर. कपूर, अमूल व्ही. मोहन आणि अंशुल मोहा यांची निर्मिती असलेला हा चित्रपट आता ओटीटी प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून ZEE5ने 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाच्या वर्ल्ड प्रीमियरची घोषणा केली आहे.
Read More
हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या सत्य घटनांवर आधारित चित्रपट मोठ्या प्रमाणात येताना दिसत आहेत. याच यादीत २००२ मध्ये झालेल्या गुजरातमधील गोध्रा हत्याकांडावर चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे. ‘ॲक्सिडंट और कॉन्स्पिरसी गोध्रा’ (Accident Or Conspiracy Godhra) या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.