राज्यात कुठेही गोहत्या सहन केल्या जाणार नाही. यासंदर्भात शासन कठोर कारवाई करेल. गोहत्या रोखण्यासाठी अनधिकृत कत्तलखान्यांत विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात येईल", असा इशारा गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.
Read More
राज्यात गोवंश आणि इतर प्राण्यांची अवैध हत्या वाढत असल्याचा मुद्दा उपस्थित करत, प्राणी रक्षण अधिनियमात सुधारणा करण्याची मागणी भाजप आमदार संजय केळकर यांनी बुधवारी विधानसभेत केली. औचित्याच्या मुद्द्याद्वारे बोलताना त्यांनी सांगितले की, गोवंश हत्येसाठी प्राण्यांची अवैधरित्या राज्याबाहेर वाहतूक केली जाते. काही प्रकरणांमध्ये पोलिसांनी पकडलेली जनावरे तस्करांना परस्पर विकल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
गोहत्या आणि गोमांस तस्करी रोखण्यासाठी राज्य सरकार आगामी अधिवेशनात गोहत्या बंदी विधेयक मांडणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली. तसेच गोमांस तस्करीच्या प्रकरणांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी विशेष तपासणी पथकाची (एसआयटी) स्थापना केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
cow slaughter कट्टरपंथी तरूणांनी पोलिसांवर गोळीबार केल्याचा धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात घडली. महफूज आणि महमूद नावाच्या दोन सख्ख्य़ा भावांनी केलेल्या गोळीबारातून पोलीस थोडक्यात बचावले, मात्र, प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी आरोपींवर गोळीबार केला असून दोन्ही भाऊ जखमी झाल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी एक जिंवत गाय, पिस्तुल, गोळ्या आणि धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. ही घटना ३ सप्टेंबर रोजी घडली आहे.
आसाम पोलिसांनी कट्टर इस्लामिक धर्मगुरू मुफ्ती मुकीबुर रहमान अझहरीला अटक केली आहे. त्याला मंगळवार, दि. २ जुलै २०२४ प्रशासनाविरुद्ध भडकाऊ भाषण केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. आसामचे डीजीपी जीपी सिंग यांच्या सूचनेवरून दारंग जिल्हा पोलिसांनी त्याला पकडले. मुकीबुर रहमान अझहरी यांनी सोशल मीडियावर लखमीपूर पोलीस स्टेशन आणि एसपी यांना हिंसक आंदोलनाची धमकी दिली होती.
मुंबई : महाराष्ट्रात गोवंश हत्या रोखण्यासाठी कडक कायदेशीर उपाययोजना करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी दिले. तसेच, सीमा भागातील पशू वाहतूक संदर्भात भरारी पथकांची स्थापना करुन अवैध पशू वाहतूक रोखण्यात यावी, असे नार्वेकरांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे गोरक्षकांना धमकावण्याच्या, हल्ल्यांच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी, तात्काळ चौकशी करुन एफआयआर नोंदविण्यात यावेत, असे स्पष्ट निर्देश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधान भवन येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत दिले.
मंचर मध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने बंद ची हाक देण्यात आली आहे. लव जिहाद, गोहत्या, धर्मांतर याकडे लक्ष वेधण्यासाठी आंबेगाव तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीने मंचर शहर बंदला व्यावासायाकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मंचर शहरातून पथसंचलन केले असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ड्रोनद्वारे संपूर्ण शहरावर नजरही असणार आहे.
भारत सरकारविरोधात अपप्रचार करणारी संस्था अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अॅम्नेस्टी इंडियाने दि. २३ मे रोजी कर्नाटकमधील नवनिर्वाचित काँग्रेस सरकारसाठी हिंदूविरोधी मागण्यांची यादी प्रसिद्ध केली. त्यात त्यांनी हिजाबवरील बंदी हटवा, गोहत्येला परवानगी द्या आणि मुस्लिम दुकानांवर बहिष्कार टाकणाऱ्या हिंदूंवर कारवाई करण्याचे आवाहन केले.
खोट्या प्रचारासाठी कुप्रसिद्ध असलेल्या अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने मानवी हक्कांच्या नावाखाली पुन्हा मुस्लिम तुष्टीकरणाचा सूर आळवला आहे. अॅम्नेस्टीने कर्नाटक सरकारकडे तीन गोष्टींची मागणी केली आहे. त्यात हिजाब बंदी हटवा, गोहत्या कायदेशीर करा आणि मुस्लिम दुकानांवर बहिष्कार टाकणाऱ्या हिंदूंचा बदला घ्या, अशा मागण्या अॅम्नेस्टीने केली आहे. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार बनताच अॅम्नेस्टी इंडिया पुन्हा सक्रिय झाली आहे का? मानवाधिकाराच्या नावाखाली हिंदूविरोधी निर्णय घेण्याची अॅम्नेस्टीची मागणी काँग्रेस पूर्ण करेल का?, असे
आज दि. ७ एप्रिलच्या जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी आरोग्य व्यवस्था, आहार व्यवस्था, अन्नधान्य उत्पादन, साठवणूक व वितरण व्यवस्था यात आमूलाग्र सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प करून, शुद्ध हवा, शुद्ध पाणी, ध्वनिप्रदूषणमुक्त वातावरण, शुद्ध, भेसळमुक्त नैसर्गिक अन्न व खाद्यपदार्थ यांची वाजवी दरात उपलब्धता करून, त्या आधारे पर्यावरणस्नेही निरोगी जीवन जगण्याच्या आपल्या अधिकाराची जपणूक देशोदेशीच्या शासनकर्त्यांनी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाला भाग पाडण्याची मागणी जनतेने केली पाहिजे.
कृषिसमृद्धीसाठी गोहत्याबंदीविरोधातील आघाडी वेळीच रोखणे आवश्यक
राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा होऊन ६ वर्षे उलटली तरी गोहत्या थांबलेल्या नाहीत. बीफ माफिया आणि कसायांशी काही भ्रष्ट पोलिसांच्या असलेल्या आर्थिक हितसंबंधामुळे राज्यात या कायद्याची म्हणावी तशी अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. बकरी ईदच्या निमित्ताने दरवर्षी राज्यात मोठ्या प्रमाणात गोहत्या केली जाते हे सर्वश्रुत आहे. गोवंश हत्याबंदी कायदा अमलात आल्यापासून यामध्ये थोडीफार घट झाली असली, तरी या हत्या थांबलेल्या नाहीत.
आसाम सरकारने तयार केलेला नवा ‘पशुधन संवर्धन कायदा’ म्हणजे अवैध गोहत्याबंदीच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. तसेच त्याकडे अर्थव्यवस्थेचा समतोल साधून पशुनियमनासाठी केलेला एक उत्तम प्रयत्न म्हणूनही पाहिले पाहिजे.
डान्स बार बंदी उठवण्याचा निर्णय संपूर्णतः न्यायालयाचा आहे, तरीही छगन भुजबळ हा निर्णय राज्य सरकारनेच घेतल्याचे खोटे सांगतात. यावरूनच छगन भुजबळांना ही छोटीशी गोष्टही समजत नसेल, राज्य सरकार व न्यायपालिकेतील फरक कळत नसेल, तर आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी किती असमंजसपणे निर्णय घेतले असतील, याची कल्पना करता येते.
उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात गोहत्येच्या संशयावरून हिंसक आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली.