(India-Pakistan Conflict) पहलगाम दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor)राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ नेस्तनाबूत केले. यानंतर गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर १० मे रोजी युद्धविराम देण्यात आला. यानंतर रविवार, दि. ११ मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरबाबत विस्तृत
Read More
भारत आणि फ्रान्सने सोमवार, दि. २८ एप्रिल रोजी २६ राफेल मरीन लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी ६३ हजार कोटी रुपयांच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी केली. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक येथील संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयात हा करार करण्यात आल्याचे भारतीय नौदलाने सांगितले. सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीने या महिन्याच्या सुरुवातीला या कराराला मंजुरी दिली होती.
South Korea Bomb गुरूवारी ६ मार्च रोजी मोठा अपघात झाला. KF-16 या लढाऊ विमानाने प्रशिक्षणादरम्यान दोन घरांवर बॉम्ब पाडले आहेत. यामुळे आता ८ लोकांचा यामध्ये अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. एका अहवालानुसार, संबंधित घटना ही कोरियाच्या सीमेनजीक असलेल्या पोचेओन शहरात घडली आहे. हे शहर उत्तर-पूर्व दिशेला असल्याचे सांगण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी फ्रान्स दौऱ्यामध्ये भारतीय नौदलासाठी २६ राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा करार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता भारतीय नौदलासदेखील शक्तीशाली अशा राफेलचे बळ मिळणार आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेच्या ‘जीई एरोस्पेस’ने भारतीय हवाई दलासाठी लढाऊ जेट इंजिन तयार करण्यासाठी भारताच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडसोबत (एचएएल) सामंजस्य करार करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये ‘एफ ४१४’ इंजिनांच्या भारतातील संयुक्त उत्पादनाचा समावेश आहे.
भारतीय वायूदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच बाप - लेकीने मिळून फायटर जेट उडवला आहे.
भारतीय हवाई दलासाठी अत्याधुनिक लढाऊ विमाने खरेदी करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. २००७ साली, हवाई दलातील लढाऊ विमानांची कमी होत असलेली संख्या वाढवण्यासाठी, १२६ आधुनिक लढाऊ विमाने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
पाकिस्तानशी केलेल्या एका करारानुसार चीन २५ ‘जे-१०सी’ लढाऊ विमाने देणार आहे. त्यामागे भारतविरोधाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. भारताला पाकिस्तान आणि चीन दोघेही समानपणे स्पर्धक मानतात. त्याचमुळे भारताविरोधात पाकिस्तानच्या लष्करी शक्तीला बळ देण्यासाठी चीन अत्याधुनिक लष्करी साहित्य आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा करत आहे.
फ्रान्सहून ७००० किमी अंतर कापत भारतात होणार दाखल!
जुलैअखेरीस ५ ‘राफेल’ लढाऊ विमाने भारतात दाखल होणार!
रशियाकडून ३३ लढाऊ विमाने खरेदी करण्याची संरक्षण मंत्रालयाची घोषणा
इराण आणि अमेरिकेतील तणाव गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढला असून इराणवर युद्धाचे ढग गडद होण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकेने कतारमध्ये पहिल्यांदाच ‘एफ-२२’ स्टेल्थ फायटर विमाने तैनात केल्याने कोणत्याही क्षणी युद्ध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.