(PM Modi inaugurates Chenab Bridge) जगातील सर्वात उंच रेल्वे पूल जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर तयार करण्यात आला आहे. या पूलामुळे काश्मीरचे खोरे देशाच्या इतर भागांशी जोडले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच असलेल्या या चिनाब पुलाचे शुक्रवारी ६ जून रोजी उद्घाटन केले आहे. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव देखील उपस्थित होते. तसेच कटरा रेल्वे स्थानकावरून कटरा आणि श्रीनगरला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधानांनी हिर
Read More
(Chenab Bridge) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार दि. ६ जून रोजी सकाळी ११ वाजता जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पूलाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी भारतातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल अर्थात अंजी पुलाचेही उद्घाटन केले. तसेच कटरा रेल्वे स्थानकावरून कटरा आणि श्रीनगरला जोडणाऱ्या उधमपूर-कटरा-श्रीनगर-बारामुल्ला या रेल्वे मार्गिकेचे लोकार्पण केले. याच पार्श्वभूमीवर जगातील सर्वात उंच रेल्वे पूलाची वैशिष्ट्ये काय आहेत, हे जाणून घेऊया...
पहलगाम हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरला भेट दिली. यावेळी त्यांनी रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिजचे तिरंगा फडकावून उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी अंजी ब्रिज आणि कटरा येथे काश्मीरची पहिली ट्रेन कटरा-श्रीनगर वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवला.
देशात २०२७ ची जनगणना दोन टप्प्यात आणि जातींची गणना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२७ च्या जनगणनेसाठी संदर्भ तारीख १ मार्च २०२७ रोजीची असेल.
पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या चार राज्यांमध्ये - गुजरात, राजस्थान, पंजाब तसेच जम्मू आणि काश्मीरमध्ये आजपासून नागरी संरक्षण मॉक ड्रिल पुन्हा सुरू होणार आहेत.
कलम 370च्या निरस्तीकरणानंतर जम्मूकाश्मीरचा बदलेलेला चेहरा जगाने अनुभवला. फुटीरतावाद्यांच्या नादी लागलेल्या तरुणाईच्या डोळ्यात उज्ज्वल भविष्याची स्वप्ने दिसू लागली. हे सारे एका रात्रीत झाले नाही. हा बदल होण्यासाठी जम्मूकाश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था आणि केंद्र सरकार यांची प्रचंड मेहनत आहे. त्याचा या लेखात घेतलेला आढावा....
जम्मू आणि काश्मिरच्या राजौरी भागात दि. १० मे च्या पहाटे पाकिस्तान कडून करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये भारतीय अधिकारी राज कुमार ठाकूर हुतात्मा झालेत. त्यांना तत्काळ सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारा दरम्यानच त्यांचा मृत्यु झाला. हल्ल्यादरम्यान त्यांच्यासह असलेले दोन कर्मचारी देखील जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.
'ऑपरेशन सिंदूर’नंतर सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार! नागरिकांसाठी गृहमंत्र्यांनी जारी केले महत्वाचे निर्देश
पहलगाम दहशतवादी हल्लानंतर केंद्र सरकारने अनेक निर्देश जारी केले आहेत. ज्यात व्हिसावर आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांनी २७ एप्रिलपर्यंत देश सोडावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असे निर्देश दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडे काही याचिकाकर्त्यांनी दावा केला की, त्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट आणि आधार कार्ड आहेत. यासंदर्भात शुक्रवार, दि.२ मे रोजी न्यायालयाने एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींच्या भारतीय नागरिकत्वाच्या दाव्यांची पडताळणी करण्याचे आदेश केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना दिले.
परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी बुधवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अलिकडच्या दहशतवादी हल्ल्याबाबत चर्चा केली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) महासंचालक सदानंद दाते गुरुवारी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे पोहोचले.
आता बालाकोट नाही तर पाकिस्तानवर अशी कारवाई करा की, असे हल्ले पुन्हा कधीही होणार नाहीत, अशी प्रतिक्रिया जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी दिली आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी यावर भाष्य केले.
पहलगाम हल्ल्यातील दोषींना सोडणार नाही
पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या नक्षलवादी हल्या नंतर सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मिर मध्ये मोठ्या प्रमाणात मोहिम राबवली.या कारवायात नक्षलवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ हून अधिक साथिदारांना ताब्यात घेतले आहे. त्या बरोबरच जम्मू-काश्मिर मध्ये ठिकठीकाणी नाका बंदी करण्यात आली आहे.
जम्मू काश्मीर पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या हल्या नंतर आज खोऱ्यात पुन्हा हिंसाचार झाला. कूपवाड्या जिल्ह्यात एका दहशतवाद्यांनी घरात घूसून सामान्य नागरिकाची हत्या केली.
२२ एप्रिल २०२५ रोजी काश्मीरमध्ये स्थित पहलगामच्या बैसारन व्हॅलीमध्ये भीषण दहशतवादी हल्ला झाला असून एकूण २६ पर्यटकांना ठार मारण्यात आले. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर काही पर्यटक त्यांचा दौरा सोडून त्यांच्या देशात परतले. पण काही पर्यटक असे आहेत ज्यांना काश्मीरचे सौंदर्य एक्सप्लोर करायचे आहे म्हणून ते काश्मीरला भेट देत आहेत आणि काश्मीरच्या सौंदर्याबद्दल त्यांचे मत मांडत आहेत. असे चित्र [X] च्या माध्यमातून समजले.
पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या संशयित स्थानिक दहशतवाद्यांवर मोठी कारवाई सुरू आहे. पुलवामा हल्ल्यानंतर, लष्कराने शोपियान आणि कुलगाममध्ये दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली आहेत.
दहशतवादाची नांगी ठेचण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक को निर्णय घ्यावा. सर्व विरोधी पक्ष सरकारसोबत उभे आहेत,” अशी ग्वाही विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीत मोदी सरकारला दिली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकार सज्ज झाले आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह होते. त्याचप्रमाणे सरकारतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाज
जम्मू-काश्मीरमधील पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वसईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. या हल्ल्यात भारतीय नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याने संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पाकिस्तानचा झेंडा जाळून जाहीर निषेध नोंदवला.
पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवार, २३ एप्रिल रोजी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी भाजपतर्फे ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. भाजपच्या प्रदेश कार्यालयात मुंबई अल्पसंख्याक मोर्चाच्यावतीने जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली.
उत्तर मुंबई भाजपच्या निषेध मोर्चात कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी
Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मिरच्या पहलगाममधील बैसरन खोऱ्यात मंगळवारी ४ दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू तर २० पेक्षा जास्त पर्यटक जखमी झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात काहींनी आपला नवरा गमावलाय, काही तरुणांना आपले प्राण गमवावे लागलेत. काहींनी आपल्या डोळ्यांसमोर वडिलांना मारताना पाहिलंय. सैरभर पळणारे लोक, मृतांचा खच, रक्ताचे पाट, मृतांच्या कुटुंबियांचा आक्रोश, किंकाळ्या आणि बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज या सगळ्या भयावह प्रसंगाचं वर्णन बचावलेल्या पर्यटकांनी स
धर्म विचारून गोळीबार करणे हे अतिशय निंदनीय असून समाजाला विभाजित करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याबाबत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Jammu and Kashmir मधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर २ दहशतवादी ढेर, पाकिस्तानातून भारतात करत होते अवैध घुसखोरी
Pahalgam जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये २८ पर्यटकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा पहिला स्केच आणि ग्रुप फोटो समोर आला आहे. आता संबंधित दहशतवाद्यांची स्केचद्वारे ओळख पटली असून त्यांची नावे आसिफ फौजी, सुलेमन शाह आणि अबू तल्हा अशी नावे आहेत. हे दहशतवादी द रेझिस्टंस फ्रंटचे असल्याचे सांगितले जात आहे. ही दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोएबाचा सहयोगी असल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्यक्षदर्शीची चौकशी करण्यात आल्यानंतर हे रेखाचित्र तयार करण्यात आले आहे. सूत्रानुसार, केंद्रीय तपास संस्था, एनआयए आत
दशतवाद्यांनी प्रथम हिंदू आहात का असे विचारले आणि त्यानंतर अतुल मोने यांना गोळ्या घातल्या, अशी धक्कादायक माहिती मृत मोने यांचे नातेवाईक राहुल अकुल यांनी दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने तसे वृत्त दिले आहे.
Terrorists काश्मीरच्या पहलगाममध्ये भयानक दहशतवादी घटना घडल्यानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई तसेच उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की, देशात हिंदू-मुस्लिम असं सर्वकाही सुरू आहे. दहशतवाद्यांना अस्वस्थ वाटत आहे आणि म्हणूनच दहशतवादी त्यांची ओळख विचारपूस करत हत्या करत आहेत. त्यांनी सांगितले की, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा एक संदेश असून देशात मुस्लिम आणि अल्पसंख्यांकांना मोठी समस्या निर्माण होईल.
Kalma काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात एकूण २० हिंदूंवर गोळीबार करत दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. हा हल्ला मंगळवारी २२ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी करण्यात आला होता. यावेळी काहींनी कलमा पठण करत आपले प्राण वाचवले आहेत. आसाममधील एका प्राध्यापकाने कलमा वाचून कशापद्धीने आपले प्राण वाचवले याची आठवण करून दिली आहे.
( Union Home Minister Amit Shah to visit Jammu and Kashmir ) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुढील आठवड्यात जम्मू आणि काश्मीरला भेट देऊन तेथील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
जम्मू-काश्मीरमधील वेगवान विकासकामे पाहता, तेथील फुटीरतावादी गटांनीही आता विकासाची कास धरली आहे. कोणे एकेकाळी काश्मीर पेटवून देऊ, अशी वल्गना करणार्या फुटीरतवाद्यांनी मुख्य प्रवाहात सहभागी होणे, हे मोदी सरकारच्या यशस्वी काश्मीर नीतीवर शिक्कामोर्तब करणारेच. शिवाय फुटीरतावाद्यांशिवाय काश्मीरमधील पानही हलत नाही, या काँग्रेसच्या दाढी कुरवाळणार्या पूर्वापार धोरणालाही यानिमित्ताने कायमस्वरुपी सुरुंग लावला आहे.
Vande Bharat Railway भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून जम्मू काश्मीरपर्यंत पोहोचण्यासाठी वंदे भारत रेल्वेची सुविधा करण्यात आली आहे. एप्रिल २०२५ मध्ये काश्मीर खोऱ्यात रेल्वे पाठवण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. देशातील आतापर्यंतचा हा सर्वात महत्त्वाचा आणि कठीण प्रकल्प पूर्ण करण्यात आला आणि तो इतर भागांशी जोडला गेलेला आहे. जम्मू काश्मीरला जाणारी पहिली वहिली रेल्वे वंदे भारत एक्सप्रेस असेल अशी माहिती समोर आली आहे.
( AMIT SHAH On Separatism in Jammu and Kashmir is a historical fact ) जम्मू आणि काश्मीरमधील फुटीरतावादी संघटना ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सला मोठा धक्का बसला आहे. जम्मू काश्मीर पीपल्स मूव्हमेंट आणि डेमोक्रॅटिक पॉलिटिकल मूव्हमेंटने हुर्रियत कॉन्फरन्सशी असलेले सर्व संबंध तोडण्याची घोषणा केली आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यापासून ही संघटना खोऱ्यात निष्क्रिय झाली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांचा विजय म्हटले आहे.
Jammu and Kashmir केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरमधील अवामी कृती समिती, जम्मू आणि काश्मीर इत्तेहादुल मुस्लिमीन या दोन संघटनांवर ५ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. तसेच हा निर्णय ११ मार्च २०२५ रोजी घेण्यात आला असून ज्यात त्यांना UAPA १९६७ या कलमांतर्गत त्यांना बेकायदेशीर असल्याचे घोषित करण्यात आले. एएसीचे नेते मिरवाईज उमर फारूख आहेत आणि जेकेआयएमचे नेते मसरुद अब्बास अन्सारी आहेत.
देशाच्या परराष्ट्र नितीचे जनक असे ज्यांना काँग्रेसीजन संबोधतात, ते जवाहरलाल नेहरु, अर्धे काश्मीरच देशापासून तोडून पाकिस्तानला Nehru Threw Away Kashmir देण्यास तयार असल्याची बाब समोर आली आहे. देशाच्या अनामिक वीरांनी पार्थपराक्रमाने रक्षण केलेली भूमी देण्याचा निर्णय घेताना, संसदेलाही विश्वासात न घेण्याचा करंटेपणा त्यावेळेच्या काँग्रेसने केला होता...
पाकिस्तान हा जगात एकटा पडलेला देश. हा देश सध्या अक्षरश: भीक मागूनच दिवस काढतो आहे. त्याच्या वक्तव्यांची दखल घेण्याचे भारताला काहीच कारण नाही. पण, आपली बाजू जागतिक मंचावर स्पष्ट होणे गरजेचे. म्हणूनच पाकिस्तानला आधी आपल्या जनतेला दोनवेळचे अन्न पुरवा, मग जगाची उठाठेव करा, असा सल्ला भारताला द्यावा लागला.
Pakistan-occupied भारताच्या स्वातंत्र्यानंतरही अद्यापही जम्मू-काश्मीरचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. अशातच आता दिल्लीचे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी मोठे विधान केले आहे. पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरची (POJK) वापसी होणे हे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळातच होईल. जम्मू काश्मीर पीपल्स फोरम आणि मीरपूर (POJK) बलिदान समितीने आयोजित केलेल्या (POJK) संकल्प दिवस कार्यक्रमात त्यांनी सांगितले. यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, (POJK) भारतात विलीन करण्याचे स्वप्न प
जम्मू आणि काश्मीरच्या सोपोरेमध्ये न्यायालयाने मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या पीर बाबाला १४ वर्षांची सक्तमजुरी आणि १ लाख रुपये दंड ठोठावत शिक्षा केली. ५४ वर्षीय पीर बाबा यांचे खरे नाव हे एजाज अहमद शेख आहे. २०१७ मध्ये त्याच्यावर आरोप दाखल करण्यात आले. या प्रकरणामध्ये न्यायालयाने १७ फेब्रुवारी रोजी दोषी असल्याचे घोषित करण्यात आले होते.
Shab-e-Barat जम्मू-कश्मीरमध्ये विविध ठिकाणी शब-ए-बारात (Shab-e-Barat) गुरूवारी ३१ फेब्रुवारी साजरी करण्यात आली. अनेक मशिदींमध्ये लोक जमले होते. अनेक ठिकाणी नमाज अदा करण्यात आली. याचवेळी सलग सहाव्या वर्षी श्रीनगरच्या जामा मशिदीत शब-ए-बारातला कोणतेही वाईट कृत्य घडले नाही. संबंधित बारातला कोणतंही गालबोट लागले नाही. सुरक्षेच्या अनुश्रंगाने स्थानिक प्रशासनाने मशीद बंद ठेवण्यास सांगितल्याने ओमर अब्दुल्लांनी सोशल मीडियावर ट्विट केलं आहे.
देशातील अन्य राज्यांप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये ( Jammu-Kashmir ) देखील रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांनी मोठ्या संख्येने घुसखोरी केली आहे. एकीकडे केंद्र सरकार घुसखोरांवर कारवाई करण्यासाठी कठोर पावले उचलत आहेत, तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला हे रोहिंग्यांवर कारवाई होऊ नये, अशी भूमिका घेताना दिसतात. “केंद्र सरकारने रोहिंग्यासंदर्भात नियोजन केले नसल्याने त्यांना बेकायदेशीर भारतात राहावे लागते,” असेही अब्दुल्ला यांचे म्हणणे. त्यानिमित्ताने अब्दुल्लांना घ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्ग बोगद्याचे राष्ट्रार्पण करण्यात आले. त्यानिमित्ताने जम्मू-काश्मीरला वेगवान वाहतूक, सार्वकालिक कनेक्टिव्हिटी, सीमा सुरक्षा आणि पर्यटनाला चालना देणार्या महामार्ग, बोगदेनिर्मितीच्या विकासकामांचा आढावा घेणारा हा लेख...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी सोमवार, दि. १३ जानेवारी रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, त्यांनी जम्मू-काश्मीर आणि भारताच्या विकासासाठी कठोर परिश्रम करणार्या आणि आपले आयुष्य पणाला लावणार्या कामगारांचे आभार मानले. त्यांनी कामगारांच्या दृढ निर्धार आणि बांधिलकीचे तसेच काम पूर्ण करताना आलेल्या सर्व अडथळ्यांवर मात केल्याबद्दल यांचे कौतुक केले.सोनमर्ग बोगद्याच्या प्रत्यक्ष कामाला भाजप-रालोआ सरकार सत्तेत आल्यानंतर २०१५ मध्य
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ‘कलम ३७०’ रद्द केल्यावर पाच वर्षांत त्या राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती सुधारली. राज्यातील फुटीरतावाद व दहशतवादही आटोक्यात आला. पण, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हाती सत्ता गेल्यानंतर विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात पुन्हा ‘कलम ३७०’चे तुणतुणे वाजविले गेले. त्यामुळे अशा फुटीरतावादी शक्तींना विधानसभेत आणि विधानसभेबाहेरही आळा घालण्याचे आव्हान ओमर अब्दुल्ला सरकारसह केंद्र सरकारलाही पेलावे लागणार आहे.
'जहाँ हुए बलिदान मुखर्जी, वह कश्मीर हमारा हैं’, ‘पाकिस्तानी अजेंडा नहीं चलेगा’ आणि ‘जय श्रीराम’च्या घोषणा देऊन भाजप आमदारांनी सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स - काँग्रेस सरकारच्या ‘कलम ३७०’ पुन्हा बहाल करण्याच्या प्रस्तावास कडाडून विरोध करून प्रस्तावाच्या बुधवार दिनांक ६ नोव्हेंबर रोजी चिंध्या केल्या.
जम्मू काश्मीर मधील कश्मीरी पंडीतांचा जीव घेणारा, दहशतवादाचा पुरस्कार करत भारतविरोधी गरळ ओकणारा, तरूणांची माथी भडकवणारा, कुख्यात गुंड यासीन मलिक आता कारागृहात आयुष्य कुंठीत आहे. त्याच्या सोबत जेल मध्ये अमानवी व्यव्हार केला जातो आहे, म्हणून त्याने उपोषणास सरूवात केली आहे. बाहेर त्याची पाकिस्तानी बायको मुशाल दारोदारी भटकत आहे. अशातच त्यांनी काँग्रेसच्या राहुल गांधी यांना पत्र लिहून तिचा नवरा यासीन मलिक कसा अहिंसक माणूस आहे आणि या उपोषणामुळे त्याला कसा त्रास होत आहे हे त्यांनी सांगितलं.
नवी दिल्ली : ( Jammu-Kashmir ) जम्मू-काश्मीरमध्येही दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांवर बुलडोझरची कारवाई करण्यात येणार आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांची घरे जमीनदोस्त केली जातील, असा इशारा जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिला आहे. या कारवाईबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Jammu and Kashmir विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) येथे झालेल्या बैठकीत नुकताच गदारोळ झाला. ही बैठक समोवारी ३ नोव्हेंबर २०२४ रोजी झाली होती.जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निव़डणुकच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत कलम ३७० आणि ३५ए हटवण्याच्या विरोधात ठराव मांडण्यावरून गदारोळ निर्माण झाला आहे.
( Akhnoor Operation ) जम्मू-काश्मीरमधील अखनूरमध्ये मंगळवारी दि.२९ ऑक्टोबर रोजी झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
Jammu and Kashmir भारतीय लष्करांच्या रुग्णवाहिकेवर झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला असल्याची घटना जम्मू-काशमीरच्या अखनूर येथे घडली. सोशल मीडियावर तीन दहशतवाद्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी सातच्या सुमारास झालेल्या हल्ल्यानंतर लष्कराने घटनास्थळाला वेढा घातला आणि कारवाईला सुरुवात केली.
Jammu and Kashmir खोऱ्यातील गुलमर्गजवळ गुरुवारी दहशतवाद्यांनी वाहनांवर हल्ला केला. या हल्ल्यात लष्कराने दोन जवान शहीद झाले असल्याची माहिती आहे. या हल्ल्यात दोन लष्कर जवान जखमी झाले आहेत. तसेच लष्करात कुली म्हणून काम करणाऱ्या दोन जणांचाही मृत्यू झाल्याची घटना आहे. या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले आहेत. या झालेल्या हल्ल्यात जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर आता भारतीय लष्करांच्या जवानांकडून दहशतवाद्यांचा नाहीनाट करण्यासाठी शोध मोहिम राबवण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.