लडाखचे पोलिस महासंचालक (डीजीपी) एस. डी. सिंग जामवाल यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी वांगचुक यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचे सांगून, २४ सप्टेंबर रोजी लेहमध्ये झालेल्या हिंसाचारासाठी त्यांना जबाबदार धरले.
Read More
'घरत गणपती' या मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या सिनेमाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. याच कारणाने हा चित्रपट पुन्हा एकदा सिनेमागृहांमध्ये रिलीज करण्यात आला. याचनिमित्ताने दिग्दर्शक आणि अभिनेता भूषण प्रधान यांच्याशी खास बातचीत.
दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते अभिनव कश्यप यांनी अभिनेता सलमान खान याला गुंड म्हटले आहे. दबंग सारख्या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनव कश्यप यांनी केले आहे. व्यावसायिक मतभेद आणि वैयक्तिक मतभेदामुळे सुरू झालेला हा वाद आता पुन्हा बॅालीवूडमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. कश्यप यांनी सलमानच्या कुटूंबावरही टीका केली आहे.
संगीतकार, गायक व लोकप्रिय संगीत दिग्दर्शक श्रीधर फडके यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या समृद्ध संगीत प्रवासाला वाहिलेला एक आगळावेगळा सांगीतिक कार्यक्रम ‘झाले मोकळे आकाश…’ आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, ९ सप्टेंबर रोजी सायं. ६.३० वा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले येथे रंगणार आहे. हा कार्यक्रम व्हॅल्युएबल ग्रुप प्रस्तुत असून, जीवनगाणी व स्वरगंधार तर्फे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य आहे .
(Shikhar Dhawan Summoned by ED) भारताचा माजी फलंदाज शिखर धवनला ईडीने एका ऑनलाइन बेटिंग ॲप जाहिरातीशी संबंधित प्रकरणात समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे. चौकशीसाठी गुरुवारी ४ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता तो ईडी कार्यालयात हजर होता. ऑनलाइन बेटिंग ॲपशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि गुंतवणूकीची शक्यता तपासण्यासाठी ईडीने हे पाऊल उचलले आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) मध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असणार आहे.
आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांच्या निवासस्थानासह १३ ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापेमारी केली आहे. ही कारवाई दिल्लीतील रुग्णालय बांधकामातील घोटाळ्याच्या तपासाशी संबंधित असल्याचे ईडी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
खालिद का शिवाजी या चित्रपटामुळे नव्या वादाची ठिणगी पडली आणि इतिहासप्रेमी आक्रमक झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये ३५ टक्के मुस्लिम समाजाची लोकं होती. त्यांचे ११ अंगरक्षक सुद्धा मुस्लिम होते. त्याच बरोबर मुस्लिमांसाठी राजांनी रायगडावर मशिद सुद्धा बांधली होती अशा काही वाक्यांमुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला. शिवरायांच्या इतिहासाचं चुकीचं चित्रण नेमकं का केलं जातंय ? महाराजांच्या सैन्यातील मुस्लिम सैनिकांचं, सरदारांचं वास्तव काय आहे, त्याच बरोबर चित्रपटाच्या निर्मात्यांची, दिग्दर्शकाची या संदर
जुन्या सखाराम बाईंडर या नाटकाला नव्या साच्यात घालत तयार झालेला 'मॅड सखाराम' सध्या प्रेक्षकांना खळखळून हसवतोय. पु.लं देशपांडे यांनी विजय तेंडुलकर लिखित नाटकाचा विडंबन केलं. ज्याचं नाव होतं भगवान श्री सखाराम. या नाटकाला दिग्दर्शक मंगेश सातपुते यांनी नव्या रुपात आणलं. ज्याचं नाव मॅड सखाराम. सध्या हे नाटक रंगभूमीवर हास्यलहरी पसरवत आहे. याच निमित्ताने दिग्दर्शक मंगेश सातपुते यांच्याशी केलेला मनसोक्त संवाद.
(Anil Ambani) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ३ हजार कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी रिलायन्स समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल अंबानी यांना समन्स बजावले आहेत. ईडीकडून ५ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी त्यांना ईडी मुख्यालयात (नवी दिल्ली) हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्याच आठवड्यात, ईडीने रिलायन्स समूहाशी संबंधित अनेक संस्था आणि व्यक्तींच्या जागेवर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (PMLA) छापे टाकले होते. या कारवाईत मुंबईतील ३५ हून अधिक ठिकाणी छापे टाकले. यामध्ये सुमारे ५० कंपन्
(ED raids former Commissioner of Vasai Virar) सक्तवसुली संचालनालयाने (ED - Enforcement Directorate) वसई-विरार शहर मनपाचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या वसई येथील दीनदयाळ नगरमधील निवासस्थानासह १२ ठिकाणी मंगळवारी सकाळी छापे टाकल्याची मोठी कारवाई समोर आली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, वसई, विरार येथील ठिकाणांचा समावेश आहे. यातील बहुतांश छापे हे पवार यांच्यांशी संबंधित असणाऱ्या ठिकाणांवर टाकण्यात आले आहेत.
देशभरात धर्मांतरणाचे रॅकेट चालवणाऱ्या छांगुरविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई सुरू केली आहे. ईडीने छांगुरच्या सुमारे ७५ कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या मालमत्तांवर जप्तीची प्रक्रिया सुरू केली असून, यामध्ये महाराष्ट्रातील लोणावला येथील मालमत्तेचाही समावेश आहे.
(Bhupesh Baghel's Son Arrested) छत्तीसगडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते भूपेश बघेल यांच्या मुलाला मद्य घोटाळा प्रकरणात शुक्रवारी १८ जुलैला ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या अटकेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’च्या माजी कर्मचाऱ्याच्या निवृत्ती वेतनात केलेली एकतृतीयांश कपात ही नियमांचे उल्लंघन असल्याचे ठरवत, सर्वोच्च न्यायालयाने बँकेचा निर्णय रद्द केला. न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि न्या. जयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, “पेन्शन हा केवळ नोकरदार वर्गाचा विवेकाधीन (मनमानी) निर्णयावर आधारित नसून, तो कर्मचाऱ्याचा संवैधानिक अधिकार आहे. जो कोणत्याही प्रक्रियात्मक न्यायाशिवाय किंवा कायद्याशिवाय नाकारता किंवा कमी करता येणार नाही.”
रेल्वेची सुरक्षा सांभाळणार्या आरपीएफ आणि जीआरपीच्या देशभरातील शीर्षस्थ अधिकार्यांची दिल्लीत अलिकडेच राष्ट्रीय परिषद पार पडली. रेल्वे मंत्रालयातील बडी मंडळीदेखील यावेळी उपस्थित होती. या संपूर्ण परिषदेत रेल्वेतील गुन्हेगारी हाच चिंतनाचा विषय होता. परिषदेनंतर आयपीएस सोनाली मिश्रा यांच्या नावावर डीजी आरपीएफ म्हणून शिक्कामोर्तब झाले होते, सोनाली मिश्रा असे या महिला पोलीस अधिकार्याचे नाव असून त्या १९९३ च्या तुकडीच्या आयपीएस अधिकारी आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूद्ध पोलिस महासंचालकांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. अॅड. नित्यानंद शर्मा, अॅड. पंकज कुमार मिश्रा आणि अॅड. आशिष राय यांनी ही तक्रार केली आहे. वरळीतील विजयी रॅलीमध्ये राज ठाकरेनी भडकाऊ भाषण केल्याचे आरोप केले आहेत. महाराष्ट्रात रहात असलेल्या परराज्यातील नागरिकांवर हल्ले केले जात आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे अनावरण भारताचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या हस्ते शनिवार दि. ५ जुलै रोजी सरकारी विधी महाविद्यालय (GLC) मुंबई येथे करण्यात येणार आहे. याकरिता सरकारी विधी महाविद्यालयाच्या आवारात स्मारकाचा अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
एअर इंडियाच्या सर्व बोईंग विमानांचे संपूर्ण सूरक्षा ऑडिट होईपर्यंत सर्व विमानांची विमानसेवा रद्द करा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात वकील अजय बन्सल यांनी दाखल केली आहे. देशातील विमान सेवेच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत ही याचिका दाखल करण्यात आली असून यावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
गरिबीवर मात करत शिक्षणावर श्रद्धा ठेवून आणि महाविद्यालयात प्राध्यापक ते बँकेच्या संचालकपदापर्यंत झेप घेणार्या शुक्राचार्य गायकवाड यांच्याविषयी...
ज्ञानदानाचे व्रत हाती घेऊन, दिव्यांगांचे आयुष्य उजळून टाकण्यासाठी स्वतःच्या अधुपणावर मात करत समाजासाठी प्रेरणादायी ठरलेल्या बाळासाहेब सोनवणे यांच्याविषयी...
( ED arrested former Chairman and Managing Director of UCO Bank, Subodh Kumar Goyal ) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) यूको बँकेचे माजी अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सुबोध कुमार गोयल यांना नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानावरून अटक केली आहे. बँक फसवणूक प्रकरणात ‘कॉनकास्ट स्टील अॅण्ड पॉवर लिमिटेड’सह इतरांविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीसंदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे.
(Suchita Bhikane appointed as Executive Director of Mahapareshan) महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) कार्यकारी संचालकपदी (मानव संसाधन) अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमती सुचिता भिकाने यांची नियुक्ती करण्यात आली. श्रीमती भिकाने यापूर्वी कोकण भवन येथे उपायुक्त (भूसंपादन) या पदावर कार्यरत होत्या.
महावितरण कंपनीचे संचालक (प्रकल्प) म्हणून श्री. सचिन तालेवार यांनी बुधवारी (दि. ७) कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते इंदूर येथील मध्यप्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनीचे संचालक (तांत्रिक) म्हणून कार्यरत होते. श्री. तालेवार गेल्या २८ वर्षांपासून महावितरणमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत.
vulgar and casteist language used by director Anurag Kashyap against the Brahmin community
National Herald गैरव्यवहार प्रकरणी ‘ईडी’ने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि त्यांचे सुपुत्र राहुल गांधी यांच्यावर आरोपपत्र दाखल केल्याने काँग्रेसी इकोसिस्टीमने लोकशाही धोक्यात असल्याची आरोळी ठोकली. पण, मुळात हा घोटाळा आणि त्यासंबंधीच्या चौकशीला गेल्या काही वर्षांची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे ही राजकीय सूडबुद्धीने केलेली कारवाई मुळीच नाही. पण, मुळात काँग्रेस आणि घोटाळे हे राजकीय समीकरणही जुनेच! आजच्या लेखात नेहरुंच्या काळातील जीप खरेदी घोटाळा, संजय गांधींचा ‘मारुती’ प्रकल्पातील गैरव्यवहार, राजीव गांधींचा ‘बोफ
(Air India Airlines 'Pee-gate' 2.0) एअर इंडिया एअरलाईन्सच्या विमानातील गैरवर्तनाची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एअर इंडियाच्या दिल्ली-बँकॉक विमानामध्ये एका भारतीय नागरिकाने जपानी सहप्रवाशावर लघवी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एअर इंडियाने दिलेल्या निवेदनात केबिन क्रूने यावर तातडीने कारवाई केली असून भारतीय नागरी उड्डाण मंत्रालयाला ही बाब कळवल्याचे म्हटले आहे.
दि. १८ एप्रिल रोजी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा मराठी चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून, या चित्रपटात ज्ञानेश्वरांसह त्यांच्या भावंडाना त्रास देणार्या विसोबा खेचर यांची भूमिका अभिनेते योगेश सोमण यांनी साकारली आहे. त्यांच्या या आगामी चित्रपटाबरोबरच, सावरकरांवरील वेबसीरिज, ओटीटी माध्यमांविषयी योगेश सोमण यांची भूमिका दै. ‘मुंबई तरुण भारत’ने जाणून घेतली.
यंदाच्या कडाक्याच्या उष्णतेचा प्रभाव कमी करता यावा, यासाठी मे महिन्यात सगळ्यांच्या मनाला थंडावा देणारा ‘गुलकंद’ हा चित्रपट दि. १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने अभिनेते आणि विनोदवीर समीर चौघुले यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केलेली ही दिलखुलास बातचीत...
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, अंधत्वाचे प्रमुख कारण ठरणार्या आजारांपैकी एक म्हणजे काचबिंदू (Glaucoma). हा एक डोळ्यांचा गंभीर आजार असून वेळीच निदान आणि उपचार न केल्यास कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकते. याच आजाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘जागतिक काचबिंदू सप्ताह’ दरवर्षी मार्च महिन्यात साजरा केला जातो. आज दि. १२ मार्च हा दिवस ‘जागतिक काचबिंदू दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने नेत्ररोगतज्ञ, ‘अनिल आय हॉस्पिटल्स ग्रुप’च्या मेडिकल डायरेक्टर, डॉ. अनघा हेरूर यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्
मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक-निर्माते राजेश मापुस्कर आणि कास्टिंगच्या दुनियेत बादशाह म्हणून ओळखले जाणारे रोहन मापुस्कर हे दोघे भाऊ एकत्र येऊन प्रेक्षकांसाठी एक खास भेट घेऊन आले आहेत. मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स , थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत 'एप्रिल मे ९९’ हा चित्रपट येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणजे, १६ मे २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या चित्रपटाचे पो
मुंबईतील न्यू इंडिया कॉ-ऑपरेटिव्ह बँकेत १२२ कोटींचा गैरव्यवहार झाल्याने, या बँकेवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संचालक मंडळाविरोधात कायदेशीर कारवाई सुरू झाली असली, तरी सामान्य खातेदारांना त्याचा फटका बसणार आहेच. ऑडिट किती महत्त्वाचे आहे, हे या बँकेच्या गैरकारभारातून स्पष्ट झाले आहे.
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक आणि मुख्य वनसंरक्षक पदावर अनिता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे (anita patil director). राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक पदावर पहिल्यांदाच भारतीय वन सेवेतील महिला अधिकाऱ्याची पूर्णवेळाकरिता नियुक्ती करण्यात आली आहे (anita patil director). पाटील या २०१० च्या तुकडीच्या अधिकारी असून त्या भारतीय वन सेवेतील महाराष्ट्रामध्ये नेमणूक झालेल्या पहिला महिला अधिकारी आहेत. (anita patil director)
स्वत:मधील कलेच्या आवडीला करिअर म्हणून बघत, त्यामध्ये देदिप्यमान कामगिरी करणार्या रंगभूमीवरील कला क्षेत्रातील नव्या दमाचा दिग्दर्शक असलेल्या वृशांक कवठेकर यांच्याविषयी...
मुंबई : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ( Punyashloka Ahilyabai Holkar ) यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्ष निमित्ताने ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या मुंबई येथील कीर्ती एम. डुंगुरसी महाविद्यालय (स्वायत्त) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचे आयोजन शुक्रवार, दि. १० जानेवारी व शनिवार, दि. ११ जानेवारी रोजी करण्यात आले होते.
(Zero Pendency) उच्च आणि तंत्र शिक्षण विभागातील एकही फाइल प्रलंबित राहू नये, यासाठी या विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला असून, येत्या ३१ जानेवारीपर्यंत 'झीरो पेंडन्सी' उपक्रम राबवला जाणार आहे.
श्यामबाबूंनी ( Shyam Benegal ) ज्या काळात ते सिनेमे केले आहेत, त्या काळाच्या कसोटीवर ते सिनेमे खरे उतरले आहेत, या दृष्टीने त्यांचा विचार करणे महत्त्वाचे ठरते.
'पुष्पा २: द रुल' हा अल्लू अर्जूनचा चित्रपट सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत ‘पुष्पा २’ चित्रपटाने १४०० कोटींच्या पुढे बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे. या चित्रपटाच्या हैदराबादमधील प्रिमिअरला झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेला जीव गमवावा लागला होता. आणि त्या महिलेचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. श्रीतेज असं त्या मुलाचं नाव असून या प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. परंतु तेलंगणा उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर एका दिवसानंतर त्याची सुटका
दिग्दर्शकाला ‘चित्रपट दिसतो’ असे म्हणतात. पण, म्हणजे नेमके त्याला चित्रपट किंवा त्यातील प्रत्येक दृश्य व्हिज्युअली कसे दिसेल, ते समजणे म्हणजे नेमके काय, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘झिरो से रिस्टार्ट’ हा चित्रपट. दिग्दर्शक विदु विनोद चोप्रा गेली ४५ वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. १९७६ सालापासून त्यांनी ‘शॉर्ट फिल्म्स’ने त्यांचा दिग्दर्शकीय प्रवास सुरू केला, तो आज २०२४ सालापर्यंत अविरत सुरू आहे. नुकताच त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘१२वी फेल’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकून तुफान प्रतिसाद मिळवला. द
मुंबई : मुंबै बँक, रायगड बँकचे संचालक व ‘मुंबई हाऊसिंग फेडरेशन’चे अध्यक्ष आणि भाजपचे मुंबई उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रकाश दरेकर यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’चे ( MTB ) स्पेस सेलिंग सेल्स एक्झिक्युटिव्ह रविंद्र जाधव यांनी त्यांच्या दहिसर कार्यालयात भेट देत ‘निवडक कालजयी सावरकर’ पुस्तक देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक आणि निर्माते सुभाष घै यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीमुसार, घै यांना श्वास घेण्यास त्रास आणि अशक्तपणा आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष घै यांच्या तब्येतीत आता सुधारणा होत असून डॉक्टर करत असलेल्या उपचारांना ते प्रतिसाद देत आहेत.
मुंबई : महावितरणचे कार्यकारी संचालक ( Executive Director ) (प्रकल्प) सुनिल रंगनाथ पावडे (वय ५४ वर्षे) यांचे सोमवारी रात्री जळगाव येथे ह्दयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुख:द निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर पारनेर (जि. अहिल्यानगर) तालुक्यातील दरोडी या त्यांच्या मूळ गावी बुधवारी (दि. ४) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार होते.
राज्याच्या पोलिस महासंचालकपदी पुन्हा एकदा रश्मी शुक्ला यांची नियूक्ती करण्यात आली आहे. त्या लवकरच आपला पदभार स्विकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रश्मी शुक्लांना पदावरून हटवण्यात आले होते.
रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम रिटर्न्स या चित्रपटाची कथा मराठमोळे दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन ( Kshitij Patwardhan ) यांनी लिहिली असून नेमकी ती कशी सूचली, रामायण हाच कथानकाचा भाग असावा असं का वाटलं अशा अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांनी Unfiltered गप्पा मारत दिल्या.
(ED) सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने देशविरोधी ‘व्होट जिहाद’चा कणा मोडून मालेगाव, नाशिक आणि मुंबईसमध्ये छापेमारी केली आहे. यावेळी ‘व्होट जिहाद’साठी वापरण्यात येणाऱ्या १२५ कोटी रुपयांच्या बेनामी व्यवहारांचा बुरखा फाडण्यात आला आहे
राज्याच्या पोलिस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या पदावर कोणाची नियूक्ती होणार? अशी चर्चा सुरु असताना आता संजय वर्मा यांची वर्णी लागली आहे.
राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. विरोधकांकडून वारंवार त्यांच्या बदलीची मागणी करण्यात येत असताना आता केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांची बदली कोणत्या ठिकाणी केली याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक गुरुप्रसाद यांचा रविवार दिनांक ३ नोव्हेंबर २०२४ रोजी दुर्दैवी अंत झाला. बंगळुरू येथील त्यांच्या फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. वयाच्या ५२व्या वर्षी त्यांचे निधन झाले असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन-तीन दिवसांपूर्वीच त्यांनी आत्महत्या केली असा अंदाज आहे. ‘एडेलू मंजुनाथ’ आणि ‘डायरेक्टर्स स्पेशल’ अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन गुरुप्रसाद यांनी केले.
Phullwanti : निमित्ताने दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या स्नेहल प्रवीण तरडेंशी खास गप्पा
हरहुन्नरी नाट्य दिग्दर्शक, लेखन आणि अभिनेते योगेश सोमण यांनी आजवर आपल्या लिखाण आणि अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. १९८७ पासून त्यांची रंगभूमीशी जोडलेली नाळ आजही कायम आहे. त्याचा हाच कलाप्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न दै. मुंबई तरुण भारतने केला आहे. यावेळी त्यांनी अभिनयाबद्दल त्यांचे स्पष्ट मत देखील मांडले.
हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांच्यामुळे कुणाला मार खावा लागला असेल यावर तुमचा विश्वास बसतो का? नाही ना. पण खरंच असं घडलं होतं. '12th फेल' या चित्रपटाचे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी एकदा अमिताभ बच्चन यांना ४ कोटी रुपयांची रोल्स रॉयस भेट दिली होती. आणि त्यानंतर काय घडलं होतं याचा किस्सा त्यांनी शेअर केला आहे. २००७ साली विधू विनोद चोप्रा यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'एकलव्य: द रॉयल गार्ड' या चित्रपटात काम केले होते. कमी बजेटमुळे त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासाठी ६५ हजार रुपयांची रुम बुक