घरं फोडणाऱ्या शरद पवारांबद्दल सहानुभूती बाळगण्याची गरज नाही, अशी टीका मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी केली आहे. निवडणुक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना दिलं. यावर आता प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
Read More
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसेने जोरदार तयारी सुरू केली आहे. आगामी सर्व निवडणुका लढवणार असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानुसार पक्षाच्या वतीने मोर्चेबांधणीलाही सुरुवात करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या संभाव्य उमेदवारांची यादीही तयार करण्यात आली आहे. या यादीत एकूण दहा नावांचा समावेश आहे.