complaint

‘उदयपूर फाइल्स’ चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, कन्हैयालाल हत्याकांडातील आरोपीची मागणी फेटाळली

उदयपूर फाइल्स कन्हैया लाल टेलर मर्डर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करत कन्हैया लाल हत्या प्रकरणातील एका आरोपीने सर्वोच्च न्यायालयात याचिका बुधवार, दि. ९ जुलै रोजी दाखल केली गेली. न्या. सुधांशू धुलिया आणि जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर मोहम्मद जावेद या आरोपीने असा दावा केला आहे की, या हत्येप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. अशावेळी जर हा चित्रपट प्रदर्शित झाला तर त्याचा प्रभाव खटल्यावर होऊ शकतो आणि परिणामी निष्पक्ष न्यायदानाच्या प्रक्रियेत बाधा आणू शकतो.

Read More

‘कहानी २’ चित्रपटाच्या कॉपीराइट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुजॉय घोष यांना दिला अंतरिम दिलासा!

प्रसिद्ध पटकथा लेखक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी दाखल केलेल्या विशेष रजा याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने नोटीस बजावली आहे. 'कॉपीराइट कायदा, १९५७' अंतर्गत घोष यांच्यावर फौजदारी खटला दाखल झाला होता. हा खटला रद्द करण्याची मागणी झारखंड उच्च न्यायालयाने फेटाळून लावली असता, सर्वोच्च न्यायालयाने दंडाधिकारी यांच्या समोर वैयक्तिकरित्या हजर राहण्यापासूनही सूट देत घोष यांना दिलासा दिला आहे.

Read More

तृणमुल काँग्रेसच्या गुंडांची विधानं लक्षात घेता, कोलकाता बलात्कार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने तातडीने दखल घ्यावी!

कोलकाता लॉ कॉलेजच्या कॅम्पसमध्ये २४ वर्षीय कायद्याच्या विद्यार्थिनीवर झालेल्या क्रूर सामूहिक बलात्कारामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेची दखल म्हणून, सर्वोच्च न्यायालयाचे वकील सत्यम सिंह राजपूत यांनी भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांना खुले पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो घ्यावा आणि कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय मुक्त आणि निष्पक्ष चौकशी सुनिश्चित करण्यासाठी न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशीचे आदेश द्यावेत, अशी विनंती केली.

Read More

"जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन मिळायला पाहिजे"; ग्रॅच्युइटी कायद्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे निरीक्षण

ग्रॅच्युइटी पेमेंट कायदा,१९७२ हा जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना लागू होतो आणि त्यांना या कायद्याअंतर्गत सेवानिवृती वेतन दिले पाहिजे, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अलिकडेच दिला आहे. प्रदीप पोकळे हे २०२० मध्ये अमरावती जिल्हा परिषदेतून सेवानिवृत्त झाले होते. त्याअगोदर त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत फौजदारी खटल्यामुळे त्यांचे निलंबन झाले होते. नियंत्रण प्राधिकरणाने २०२३ मध्ये प्रदीप पोकळे यांचा ग्रॅच्युइटी पेमेंटचा अर्ज मान्य करत जिल्हा परिषदेला १०% व्याजासह २० लाख र

Read More

वैष्णवीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या अ‍ॅड. दुशिंग यांच्यावर मारहाणीचा गुन्हा; जुनं प्रकरण काय?

(Vipul Dushing) पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणी न्यायालयात हगवणे कुटुंबातील आरोपींची बाजू मांडणारे वकील विपुल दुशिंग हे सध्या चर्चेत आले आहेत. त्यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना केलेल्या खळबळजनक दाव्यांमुळे त्यांच्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. वैष्णवीच्या चारित्र्यावर गंभीर आरोप करणाऱ्या या वकिल दुशींग यांच्यावरच सरकारी वकीलाला कॉलर पकडून मारहाण केल्याचा गुन्हा नोंद असल्याची माहिती माध्यमांमधून समोर आली आहे. काही वर्षांपूर्वीचं हे प्रकरण असून आता पुन्हा चर्चेत आलं आहे.

Read More

"नवऱ्यानं बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही"; हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद

(Vaishnavi Hagwane Case Hearing) वैष्णवी हगवणेच्या मृत्यूला आता जवळपास दोन आठवडे पूर्ण होत आले. मात्र वैष्णवीच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. दररोज या प्रकरणात नवनवीन खुलासे होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हे प्रकरण सतत चर्चेत आहे. मात्र आता कोर्टात झालेल्या युक्तिवादामुळेच या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. कोर्टात झालेल्या युक्तिवादात हगवणेंच्या वकिलानं वैष्णवीच्या चारित्र्यावर गंभीर आरोप केले आहेत. वैष्णवीची एका व्यक्तीसोबत चॅटिंग पकडल्यानंतर ती आत्महत्येचा प्रयत्न करत होती,

Read More

जोधपूरमधून गेल्या ४८ तासांत 'लव्ह जिहाद'ची तिसरी घटना उघड! स्नॅपचॅटवर अल्पवयीन मुलीला हिंदू असल्याचे भासवत प्रेमाच्या जाळ्यात ओढलं

(Jodhpur Love Jihad Case) राजस्थान येथील जोधपूरमधून लव्ह जिहादची प्रकरणे समोर येत आहेत. लव्ह जिहादच्या नावाखाली निष्पाप हिंदू मुलींना लक्ष्य केले जात आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे या घटना एकामागून एक उघडकीस येत आहेत. अवघ्या दोन दिवसांत अशी तीन प्रकरणे समोर आली आहेत. रविवारी २० एप्रिल रोजी जोधपूरच्या खांडा फालसा पोलीस स्टेशन परिसरात एका तरुणाला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याने स्नॅपचॅटवर 'अशोक मालवीय' हे नाव वापरत हिंदू असल्याचे भासवत एका अल्पवयीन मुलीशी मैत्री केली होती.

Read More

Santosh Deshmukh Case Hearing : वकील Ujjwal Nikam यांचा पहिलाच युक्तिवाद, बीडच्या कोर्टात काय झालं?

Santosh Deshmukh Case Hearing : वकील Ujjwal Nikam यांचा पहिलाच युक्तिवाद, बीडच्या कोर्टात काय झालं?

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121