आदित्य ठाकरेंसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील एन एम जोशी पोलीस स्थानकात शुक्रवारी मध्यरात्री गुन्हा दाखल केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा गुन्हा दाखल केला. पुलाची चाचणी झाली नसतानाही आदित्य ठाकरे यांनी पुलाचे उद्धघाटन केले आहे. यामुळे आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेना पदाधिकारी सुनिल शिंदे, सचिन अहिर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More
भीमा आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या मागणीचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील खेड , मदत व पुनर्वसन मंत्री अनिल तालुक्यातील भीमा-आसखेड येथील प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांबाबत शासनाकडून कार्यवाही सुरू असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.
पंढरपूर तीर्थक्षेत्राचा बहुआयामी व सर्वंकष विकास करण्याकरिता कॉरिडॉरची निर्मिती प्रस्तावित आहे. कॉरिडॉरचा प्रारूप विकास आराखडा जाहीर करण्यात आला असून जनतेच्या सूचना, हरकती यांचा विचार करून या आराखड्यास अंतिम मान्यता देण्यात येईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरमध्ये कॉरिडॉर करण्यासंदर्भात सदस्य मनीषा कायंदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीस उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते.
महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाला (महानंद)उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासन करेल, असे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
पुण्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अतिविशेषोपचार विषयात अध्यापकीय संवर्गात सहयोगी प्राध्यापक , सहायक प्राध्यापक तसेच क व ड संवर्गातील १२१ पदे भरण्यात आली आहेत. तसेच इतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी विधानपरिषदेत दिली.
महिनाअखेरीस होऊ घातलेल्या चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभेच्या पोट निवडणुकीत शुक्रवार, दि. १० फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी लढतीचे चित्र स्पष्ट झाले.कसबा पेठेत थेट काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांत थेट लढत होणार आहे आणि चिंचवडमध्ये मात्र अपक्ष राहुल कलाटे यांनी उमेदवारी कायम ठेवल्यामुळे तिरंगी लढत होत आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि अपक्ष अशी लढत होईल.
मुंबई : वरळीतील अनेक समस्या प्रलंबित असल्याने माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल मतदार संघात नाराजी असल्याचे छत्र आहे. त्यामुळे भाजपने वरळी मतदार संघात आदित्य यांच्या विरोधात रान पेटवायला सुरुवात केली. त्याचा पहिला अंक जबोरी मैदानात दहीहंडी उत्सव साजरा करून मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी सुरु केला. तर दुसरीकडे वरळीतील शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. येत्या काही दिवसात वरळीतील काही शिवसैनिक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याने आदित्य ठाकरे यांची चिंता वाढ
विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहाचे कुठलेही कामकाज सुरू होण्यापूर्वी शिवसेनेच्या नेत्यांनी विधान परिषदेचे आमदार मनीषा कायंदे यांनी भंडारा गोंदियातील महिलेवर झालेल्या अत्याचाराचा प्रकरण चर्चेसाठी आणण्याची मागणी केली.
स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांनी खऱ्या अर्थाने दहीहंडी उत्सवाला मोठ केलं आणि म्हणूनच दिघेंच्या ठाण्यात जगातील सर्वात उंच मानवी मनोरे रचण्याचा रेकॉर्ड नोंदवला गेला. या दहीहंडी उत्सवाने अनेक नेत्यांची राजकीय करियर घडवली. त्यातल्या काहींना मंत्रीपद मिळाल्यावर त्यांनी या उत्सवाकडे पाठ फिरवली तर या उत्सवावर प्रेम असणारे अनेक नेते आजही या उत्सवाचे आयोजन करतात. सध्या मुंबई-ठाण्यात ज्याची हंडी त्याचा मतदारसंघ असे समीकरण बनलंय. नुकताच आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंच्या मतदार संघातील जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सवाच्य
पवारांनी आमदारांच्या पक्ष सोडण्यासाठी भाजपला वा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरणे, त्याला सत्तेचा गैरवापर म्हणणे, हा उलट्या बोंबा मारण्याचाच प्रकार. उलट या घडामोडींचे वर्णन 'जे पेरले ते उगवले' पासून 'जसे कराल तसे भराल' या शब्दांतच केले पाहिजे. कारण, पवारांचे राजकारणच फोडाफोडी शब्दाने सुरू होते आणि आता तिथेच संपतानाही दिसते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष शिवसेनेत प्रवेश हा मुंबईत राष्ट्रवादीसाठी खूप मोठा झटका
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे मुंबई विभागीय अध्यक्ष अॅड. निलेश भोसले यांच्या कार्यपद्धतीला कंटाळत मुंबईतील चार जिल्हाध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत. भोसले यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून हा निर्णय घेत असल्याचा आरोप त्यांनी राजीनाम्यावेळी दिलेल्या पत्रात नमूद केला आहे.
कालच्या संसदेत काँग्रेस अध्यक्षांनी पंतप्रधानांना दाखवून दिले की आम्ही तुमच्याबद्दल वाईट चिंतन करीत नाही असे म्हणत पवार यांनी राहूल गांधी यांच्या संसदेतील वर्तनाचे समर्थन केले.