नाटक कलाकाराचे चरित्र घडवते. त्याची सर्वांगीण प्रगती नाटकामुळे होते. जीवनातील विविध क्षेत्रांवर नाटकाचा प्रभाव पडतो, त्याचा फायदा नक्कीच कलाकाराला आयुष्यात सर्वत्र होतोच. बालनाट्यामध्ये भूमिका साकारणार्या कलाकारांच्या आयुष्यात नाटकाच्या प्रभावाचा त्यांच्याच भाषेत घेतलेला आढावा...
Read More
मागील दोन वर्षांत महाराष्ट्रातील कुपोषित बालकांचे प्रमाण घटले असून, अतितीव्र कुपोषित बालकांची संख्या निम्म्यावर आणण्यात महायुती सरकारला यश आले आहे. यासाठी प्रत्यक्ष गृहभेटींपासून ते पोषण ट्रॅकर अॅपसारख्या तंत्रज्ञानाच्या सूक्ष्म वापराने कुपोषणमुक्त महाराष्ट्राकडे राज्याची सुरु झालेली वाटचाल ही निश्चित स्वागतार्ह अशी!
संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ’जग ब
आपली मुले आपला आरसा असतात. आपण स्वत:ला जसे प्रेझेंट करतो तसेच मुले वागतात. मुलांना संस्कार हे बसवून द्यावे लागत नाही. आपल्याच वागण्या, बोलण्यातून मुले शिकतात असे मत लेखिका नांदिनी पित्रे यांनी व्यक्त केले.
भारतात मुले दत्तक घेण्यासाठी दत्तक पालकांना करावा लागणारा प्रतीक्षा कालावधी हा दीर्घ असल्यामुळे अनेक अडचणीला समोर जावे लागते, या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने सुओ मोटो दाखल करत संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावत या संदर्भातील विस्तृत माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
विशेष मुलांच्या आयुष्यात आनंद खुलवण्यासाठी झटणार्या निर्वाणा स्कूलमधील लक्ष्मी विनायक लेले यांच्याविषयी...
नाटकामधील प्रत्येक विभाग समान पद्धतीने महत्त्वाचा असतो. सगळ्या विभागांच्या संपूर्ण योगदानावरच नाटकाचे यशापयश अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक विभागाची माहिती बालकलाकारांना होणे आवश्यक असते. यातूनच त्यांची नाटकाविषयीची समज अधिक व्यापक होत जाते. या लेखात नाटकाच्या पार्श्वभूमीचा घेतलेला आढावा...
Children's drama भाषा या विषयावरून सध्या अनेक मतप्रवाह समोर येत आहेत. मातृभाषेतून शिक्षण ते प्रांतिक अस्मिता असे अनेक कंगोरे या मुद्द्याला आहेतच. पण, भाषा ही समाजाच्या सर्वांगाला स्पर्श करणारी असल्याने नाटकामध्येही अशा अनेक पैलूंचा विचार करणे क्रमप्राप्तच. बालरंगभूमीवर भाषेचा हा मुद्दा कसा प्रभाव टाकतो, याचा घेतलेला आढावा...
( Dont impose your wishes on your children Dr Uday Nirgudkar ) “आईवडिलांनी करिअर निवडताना आपल्या इच्छा मुलांवर लादू नयेत. आपल्या पाल्याला आपण जे क्षेत्र देतो, त्याचा आपल्याला किती अभ्यास आहे? हेही तितकेच महत्त्वाचे आहे. शाळा, क्लासला घातले म्हणजे आपली जबाबदारी संपली, अशी भावना पालकांनी ठेवू नये,” असे ज्येष्ठ पत्रकार तथा मार्गदर्शक डॉ. उदय निरगुडकर म्हणाले.
पालक म्हणून आपल्या मुलांना परीक्षेची तयारी करताना पाहणे, ही काहीजणांसाठी कदाचित एक तणावपूर्ण गोष्टही असू शकते. कारण, आजच्या स्पर्धात्मक युगात चांगले गुण मिळवण्याचा दबाव फक्त विद्यार्थ्यांवरच नाही, तर तो पालकांवरही असतो. पण, या कठीण काळात आपण आपल्या मुलांना सर्वोत्तम साहाय्य कसे करू शकतो? अभ्यासयोग्य वातावरण निर्माण करण्यापासून सकारात्मक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यापर्यंत पालक म्हणून आपण आपल्या मुलांना परीक्षेदरम्यान चांगली कामगिरी करण्यास मदत करू शकतो. या लेखात आम्ही तुम्हाला काही उपयुक्त ‘टिप्स’ आणि उपाय सां
लहान मुलांना गोष्टी आवडतातच. या आवडीमध्ये काळाच्या ओघात काहीही बदल झालेला नाही. बदल झाला असेलच तर तो गोष्टी सांगण्याच्या माध्यमांमध्ये. बालनाट्य हा त्यातीलच एक माध्यम. यातून विविध गोष्टींचे प्रत्यक्ष सादरीकरण करून, लहान मुलांना ते सादर करता येते. या बालनाट्य निर्मितेचेही विविध टप्पे आहेत. यातील संहिता या महत्वाच्या टप्प्याचा घेतलेला आढावा....
बालकांना बालगृहांमध्ये आल्यावर आपलेपणाची जाणीव निर्माण व्हावी यासाठी बालगृहांचे आधुनिकीकरण करावे, असे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंगळवार, २८ जानेवारी रोजी दिले.
सीरियामध्ये ( New Syria ) गेल्या महिनाभरात ११६ बालके मृत्युमुखी पडली. म्हणजे, दिवसाला सरासरी चार बालके! पण, या बालकांवर कुणीही हल्ला केला नव्हता. हळूहळू सीरिया गृहयुद्धातून बाहेर पडतो आहे. मात्र, या गृहयुद्धातील न वापरलेली किंवा न फुटलेली विस्फोटके अजूनही सीरियाच्या भूमीत विखुरलेली आहेत. परिसरातील सुप्त अवस्थेतील बॉम्ब, विस्फोटक शेल्स, ग्रेनेड किंवा क्लस्टर म्युनिशनच्या स्फोटाने ही बालके मुत्युमुखी पडली. ‘युनिसेफ’सह संपूर्ण जगाने याबाबत शोक आणि चिंता व्यक्त केली आहे. आधीच अनेक दशके सुरू असलेल्या सीरियामध्ये
दिव्यांगांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ‘अतुल्य इनक्लुसिव्ह सेल’ ( Atulya Inclusive Cell ) हा समूह विशेषतः दृष्टिहीन मुलांसाठी अनेक विध उपक्रम राबवित आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांची शिक्षणाप्रतिची निष्ठा, चिकाटी आणि अडचणींवर मात करण्याची जिद्द लक्षात घेता, या उपक्रमात सहभागी असलेल्या समूहाला ‘अतुल्य’ असे नाव देण्यात आले. दि. २७ सप्टेंबर २०२२ रोजी प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक, प्राध्यापक स्वप्नील मयेकर आणि प्राध्यापिका डॉ. शेफाली कोंडेवार यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कल्याण
मराठी नाट्यसंपदेतील बालनाट्य परंपरा अखंड सुरु ठेवण्याचा ध्यास घेतलेल्या डोंंबिवलीच्या मधुरा संकेत ओक यांच्याविषयी...
Happy Children Day नुकताच बालदिन साजरा झाला. खरं तर बालपण हे खेळण्या-बागडण्याचे वय. पण, काही मुले या खेळण्या-बागडण्याच्या वयातही उंच भरारी घेतात, की ज्यामुळे कायमच त्यांच्या कामगिरीचे कौतुक आणि आश्चर्यही वाटते. अशाच विविध क्षेत्रांत बालवयातच आपला ठसा उमटविणार्या बालवीरांचा बालदिनानिमित्ताने हा अल्पपरिचय...
गेली सात वर्षे दिव्यांग मुलांच्या विकासासाठी माधुरी पंडित-आंबेरकर शाळा चालवत असून, त्यांच्या विकासासाठी अविरतपणे कार्यरत आहेत. याच दिव्यांगांच्या जननीविषयी... (माधुरी आंबेरकर)
नाटककार रत्नाकर मतकरी यांचं "अलबत्या गलबत्या" हे गाजलेलं बालनाट्य आता थ्रीडीमध्ये रुपेरी पडद्यावर येणार आहे. लेखक दिग्दर्शक वरूण नार्वेकर या नाटकावरून चित्रपट करण्याचं शिवधनुष्य पेलत असून, अभिनेते वैभव मांगले मध्यवर्ती भूमिका साकारणार आहेत. पुढीलवर्षी १ मे २०२५ ला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं.
आपले मूल सुदृढ असावे, गुटगुटीत व हसरे असावे, तसेच त्याचे सर्वांनी कौतुक करावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. पण, याबाबतीत सर्वच पालक एवढे सुदैवी नसतात. अनेक लहान मुलांच्या वर्तणुकीच्या समस्या त्यांच्या पालकांना भेडसावत असतात. या मुलांच्या अशा विचित्र वागणुकीवरून बर्याच वेळा पालकांनाही टीका सहन करावी लागते. तेव्हा मुलांमध्ये वर्तणुकीच्या समस्या का निर्माण होतात? यावरील काय उपाय करता येतील? याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया.
‘साहित्य अकादमी’चा ‘उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार-२०२३’ बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांच्या ‘छंद देई आनंद’ या पुस्तकास नुकताच घोषित झाला. त्यानिमित्त त्यांच्या साहित्यप्रवासाचा घेतलेला वेध...
मुंबई : साहित्य अकादमीचे २०२३ सालचे युवा पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. पुरस्कारांसाठी मराठी विभागाअंतर्गत ७ नामांकने होती तर बालसाहित्य पुरस्कारासाठी ५ नामांकने जाहीर झाली होती. त्यापैकी विशाखा विश्वनाथ यांच्या 'स्वतःला स्वतःविरुद्ध उभे करताना' या काव्यसंग्रहाला युवा साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच बालसाहित्य विभागात एकनाथ आव्हाड यांच्या 'छंद देई आनंद' या काव्यसंग्रहाला पुरस्कार मिळाला आहे.
वृत्तनिवेदक, रेडिओजॉकी म्हणून आपल्या आवाजाने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्या रश्मि वारंग यांच्या जीवनप्रवासावरील लेख...
अमेरिकेत गोळीबाराच्या घटना थांबायचे नाव घेत नाहीय. आता गोळीबाराची आणखी एक घटना समोर आली आहे. नॅशविल शहरातील एका खासगी ख्रिश्चन शाळेत एका अज्ञात महिलेने अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात ३ शाळकरी मुलांसह ६ जणांची हत्या झाली आहे. मात्र पोलिसांशी झालेल्या चकमकीत गोळीबार करणारी महिला ठार झाली आहे.
डोंबिवली : समाजात स्त्रियांना सन्मानाने वागावले जावे हा बदल घडण्यासाठी अजून खूप वेळ जाणार आहे. समाजात बदल अपेक्षित असेल तर मुलांची जडणघडण करतानाच त्यांना स्त्रियांना सन्मानाने वागावले पाहिजे हे शिकविण्याची गरज आहे. समाजात बदल घडेल तेव्हा मालिकामधून सोशिक स्त्री दाखविणे बंद होईल, असे मत अभिनेत्री अनिता दाते-केळकर यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) निवडणूक आयोगाला काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान राजकीय साधन म्हणून लहान मुलांचा गैरवापर केल्याप्रकरणी पक्ष आणि त्यांचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रारीची चौकशी करून आवश्यक कारवाई करण्यास सांगितले आहे.
मुंबईमधल्या सेवावस्तीत अनेक समस्या आहेत. बालकांच्या संस्कारक्षम जडणघडणीची समस्या हा तर मोठा प्रश्न. तसेच महिला सक्षमीकरण हा मुद्दाही महत्त्वाचा. महिला आणि बालकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काम करणार्या ‘अस्मिता’ संस्थेच्या कार्याचा मागोवा या लेखात मांडण्याचा केलेला हा प्रयत्न...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी करोना संसर्गामुळे माता-पित्यांचे छत्र गमाविलेल्या मुला-मुलींना ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रेन’ योजनेअंतर्गत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आर्थिक मदत जारी केली. यावेळी केंद्रीय मंत्री आणि राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
दादर सार्वजनिक वाचनालयातर्फे २ मे ते ११ जून य कालावधीसाठी लहान मुलांसाठी मोफत बालवाचनालय चालवण्यात येणार आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ य वेळेत हे वाचनालय सुरु असणार आहे
बच्चे कंपनी आता होणार 'लसवंत' : ६ ते १२ वर्षांवरील मुलांना मिळणार 'ही' लस
शालेय वयात ‘बालभारती’च्या पुस्तकातील चित्र पाहून ते हरखून जात. मात्र, आज त्याच ‘बालभारती’च्या पुस्तकात त्यांच्या चित्रांचा समावेश करण्यात आला आहे. जाणून घेऊया चित्रकार राहुल पगारे यांच्याविषयी...
उत्तर मुंबईतील कांदिवली पश्चिम पावनधाम इमारतीत केंद्र सरकारच्या पोषण अभियानतंर्गत शुक्रवारी पोषण पंधरवडा साजरा झाला. यावेळी भाजप खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित होते. ‘मी १९९२ साली प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आलो. तेव्हापासून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे प्रश्न सभागृहात उपस्थित करून ते सोडवले. आजही मी त्यांच्यासाठी कामात तत्पर आहे, कार्यरत आहे.", असे गोपाळ शेट्टी कार्यक्रमदारम्यान म्हणाले. ३०० अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी अतिशय परिश्रमपूर्वक पोषणयुक्त अन्न धान्य, खाद्यान्न पदार्थ प्रदर्शनात मांडले होते. ब
सादीक शेख अध्यक्ष असणाऱ्या टीपू सुलतान पक्षाचे अध्यक्ष आहेत. याच पक्षाच्या ट्विटर अकाऊंटद्वारे वांद्राचे नाव हजरत टीपू सुलतान करणार असल्याची धमकी देण्यात आली. "आता तर केवळ मैदानाचं नाव टीपू सुलतान ठेवण्यात आले आहे. भविष्यात वाद्र्याचे नाव बदलून हजरत टीपू सुलतान करू", असा इशारा पक्षातर्फे देण्यात आला आहे.
ओपन वॉटर पॅरा स्विमींग आणि ओपन वॉटर स्विमींगमध्ये जागतिक विक्रम
खरोखरच ते पालक धन्य आहेत, ज्यांनी आपल्या अपत्यांनासुस्थितीत ठेवले आहे. पालक म्हणजे आपल्या पाल्यांचे सुयोग्य रीतीने पालन-पोषण व संगोपन करणारे घटक! माता-पित्यांनी अगदी जन्माला येण्यापूर्वीपासून म्हणजेच गर्भाधान संस्कारापासून आपल्या बाळाची काळजी घ्यावयास हवी.
धर्मराज फाऊंडेशनतर्फे साजरा केल्या जाणाऱ्या जय अंबिका सार्वजनिक नवरात्रोत्सवात शालेय साहित्याची सजावट केली आहे. लहान मुलांना शाळेची गोडी लागावी यासाठी हा प्रयत्न केला आहे, अशी माहिती भाजपा डोंबिवली ग्रामीण सरचिटणीस रविंद्र पाटील यांनी दिली आहे.
सीरम इन्स्टिट्युटने लहान मुलांसाठी तयार केलेल्या कोरोना लसीच्या चाचणीला परवानगी देण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी महिन्याभरापूर्वी येत्या ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सीरमची लहान मुलांसाठीची कोवोवॅक्स कोरोना लस लॉन्च होणार असल्याचे सांगितले होते.
छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा उल्लेख राज्यातले हे महाविकास आघाडी सरकार केवळ घोषणांपुरताच करते की काय? राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई, रमाईंच्या या महाराष्ट्रात महिलांवरील अन्यायाची दखल हे मायबाप सरकार घेणार आहे की नाही? असे प्रश्न उपस्थित करावे लागतात, याचे खरेच वैषम्य वाटते.
दि. १९ऑगस्ट, १९८२रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने पॅलेस्टाईनच्या आग्रहाखातर ४ जून हा दिवस हिंसेमध्ये बळी पडलेल्या बालकांना समर्पित करायचे ठरवले. त्यावेळी पॅलेस्टाईनने भूमिका मांडली होती की, इस्रायलच्या हल्ल्यात लहान मुलं मारली जात आहेत, तर त्यावेळी संयुक्त राष्ट्र महासभेने जागतिक स्तरावरील हिंसेत बळी जाणार्या बालकांचे स्मरण करून ४ जून हा दिवस त्या बालकांना समर्पित केला.
करोना संसर्गामुळे देशातील अनेक मुलांना आपल्या मातापित्यांना गमवावे लागले आहे. मातापित्यांचे छत्र हरपलेल्या मुलांचे पालकत्व आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे.
घाटकोपर येथील ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’मध्ये असणार्या तब्बल १६४ वर्षे जुन्या तरीही भरभक्कम असणार्या दोन पोलादी तोफांना नवी झळाळी देत, त्या पुनःस्थापित करण्यात येणार आहेत. त्यामुळे लवकरच घाटकोपर पूर्व परिसरातील टिळक पथावर असणार्या ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’मध्ये निसर्गाशी जवळीक साधण्यासोबतच ऐतिहासिक ठेवाही अनुभवता येणार आहे.
राज्य शासनामार्फत देण्यात येणारा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, आस्वादक स्वर्गीय रत्नाकर मतकरी यांना जाहीर झाला आहे. रुपये ५ लाख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
बालनाट्य, एकांकिकांपासून ते अगदी गूढकथांपर्यंत रसिकमनाचा नेमका ठाव घेणारे ज्येष्ठ रंगकर्मी, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते म्हणजे रत्नाकर मतकरी यांचे १७ मे रोजी निधन झाले. एक हौशी चित्रकार आणि परखड वक्ते म्हणूनही मतकरी सुपरिचित होते. तेव्हा, अशा या रसिकप्रिय, अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या कारकिर्दीवर थोडक्यात प्रकाश टाकणारा हा लेख...
आपण अनेकदा पाहतो मॉल, चित्रपटगृह आणि गार्डनच्या बाहेर अनेक चिमुरडी आपले बालपण बाजूला ठेवून काम करत असतात आणि आपण कधीच आतमध्ये जाऊन यांचा अनुभव घेऊ शकणार नाही, असे म्हणत निराश होऊन जगत असतात. पण अशाच चिमुकल्यांना या बालपणाच्या आनंदावर तुमचादेखील हक्क आहे, या आशेचा किरण दाखवणारा अनोखा उपक्रम अशा मुलांसोबत मुंबईत साजरा करण्यात आला.
काही वेळापूर्वी सुप्रसिद्ध लेखिका श्रीमती गिरिजा कीर यांचे दीर्घ आजारानंतर निधन झाले. त्या ८६ वर्षाच्या होत्या.
अनेक वाहिन्यांवर सुरु असलेल्या रीएलीटी शो म्हणजे विविध कलागुणांना वाव देण्याऱ्या कार्यक्रमात लहान मुले, चित्रपटात किंवा इतर मनोरंजाच्या कार्यक्रमात मोठ्या वयाच्या कलाकारांनी केलेले नृत्य सादर करत असल्याचे माहिती-प्रसारण मंत्रालयाच्या लक्षात आले आहे.
चिल्ड्रेन्स एड सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
गैरवापर! काही संकेतस्थळांवर साईड-इफेक्ट्स अतिशयोक्त स्वरूपात दिले जातात. त्यामुळे रुग्णांमध्ये भीती निर्माण होऊ शकते व त्यामुळे औषधे कोर्स पूर्ण होण्याआधीच बंद केली जातात आणि याचा परिणाम म्हणून प्रतिजैविकांना प्रतिकार तयार होतो किंवा एकंदर निष्पत्ती वाईट होते.
१०० पैकी एका मुलाला हृदयविकार असतो. मात्र, प्रौढांमध्ये होणाऱ्या हृदयविकारांहून हे आजार वेगळे असतात. बाळ आईच्या पोटात असताना त्याचे हृदय सामान्य पद्धतीने विकसित न झाल्यामुळे हे विकार उद्भवतात. मुलांमधील हृदयविकाराचे निदान लवकरात लवकर होणे महत्त्वाचे आहे. हृदयातील निदान न झालेला दोष वाढू शकतो आणि काही महिन्यात किंवा वर्षात त्यावर शस्त्रक्रिया करणे शक्य होत नाही. दोष कोणत्या प्रकारचा आहे यावर हे अवलंबून असते. त्याचप्रमाणे हा दोष सुधारला गेला नाही, तर मुलाची वाढ अनेक मार्गांनी खुंटते.
स्वत:च्या व्यावसायिक फायद्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पठडीबद्ध केलेल्या वाटांपेक्षा वेगळा, स्वयंपूर्ण आणि भविष्याभिमुख विचार करणे तरुणांना विशेषत: पालकांना दडपणाचे वाटते. त्यामुळे करिअरचा विचार आपल्या समाजात साचेबद्धपणे केला जातो असे दिसते.
महाराष्ट्रात २७ नोव्हेंबर, २०१८ पासून सुरू झालेल्या मोहिमेमध्ये जवळपास ३.३७ कोटी मुलांना सहा आठवड्यांच्या कालावधीत विनामूल्य, सुरक्षित आणि प्रभावी लस टोचण्याचं लक्ष्य आहे. सहा आठवड्यांच्या मोहिमेतील पहिल्या पाच आठवड्यांमध्ये शाळा, अंगणवाडी आरोग्य केंद्रे आणि परिसरात लसीकरण शिबिरांचे आयोजन करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सहाव्या आठवड्यात पहिल्या टप्प्यात राहून गेलेल्या लाभार्थ्यांना लस मिळेल, यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.