भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ठिकठिकाणी हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे. अशातच छत्तीसगड वक्फ बोर्डाने जारी केलेल्या निर्देशाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. छत्तीसगड वक्फ बोर्डाने राज्यातील सर्व मशिदी, दरगाह आणि मदरशांमध्ये १५ ऑगस्ट रोजी तिरंगा फडकवणे आणि राष्ट्रगीत गाण्याचे निर्देश दिले आहेत. हा निर्णय राष्ट्रीय एकता आणि बंधुता वाढवण्यासाठी घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
Read More
केंद्र सरकारच्या निर्णायक आणि बहुआयामी रणनीतीमुळे देशातील नक्षलवादाचे कंबरडे मोडले असून, “नक्षलमुक्त भारत” हे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरण्याच्या मार्गावर आहे. सुरक्षा कारवाया, पायाभूत विकास आणि स्थानिक सहभाग या तीन पायांवर उभारलेल्या धोरणामुळे नक्षलग्रस्त भागात लक्षणीय सुधारणा झाली आहे.
विशेष प्रतिनिधी छत्तीसगढमध्ये नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी चकमकीमध्ये दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.
तीन वर्षांपूर्वी छत्तीसगडमधून आलेला हत्तींचा कळप महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात स्थायिक झाला आहे. थोडा फार प्रमाणात याठिकाणी मानव-हत्ती संघर्षाची ठिणगी पेटली आहे. ही ठिणगी पेटण्यामागचे मुख्य कारण म्हणजे वन्यजीव भ्रमणमार्गाची न पटलेली ओळख. त्याविषयी माहिती देणारा हा लेख...
विशेष प्रतिनिधी छत्तीसगढ पोलिसांनी सोमवारी सांगितले की त्यांनी छत्तीसगढ-तेलंगणा सीमेवरील करेगुट्टा टेकड्यांच्या सभोवतालच्या घनदाट जंगलात 'ऑपरेशन संकल्प' दरम्यान सुमारे ३१ संशयित माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. बिजापूरचे पोलिस अधीक्षक जितेंद्र यादव म्हणाले की, बुधवारी बिजापूरमध्ये पत्रकार परिषदेत या कारवाईची सविस्तर माहिती दिली जाईल.
( accident in Raipur Chhattisgarh ) छत्तीसगडच्या रायपूर येथे भीषण अपघातात एकूण १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अपघातातील गंभीर जखमींचा आकडाही मोठा आहे. त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका कारने ट्रेलरला जोरदार धडक दिली, त्यात हा अपघात झाला.
नक्षलवाद्यांविरोधात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलून इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) आणि छत्तीसगढ पोलिसांनी छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या नेलांगूर येथे कंपनी ऑपरेटिंग बेस (सीओबी) यशस्वीरित्या स्थापित केला आहे.
( 22 Naxalites surrender in Chhattisgarh ) केंद्र सरकारच्या नक्षलविरोधी धोरणामुळे नक्षलवाद्यांमध्ये घबराट पसरली आहे. छत्तीसगडमधील सुकमा येथे शुक्रवारी पोलीस अधीक्षक (एसपी) किरण चव्हाण यांच्या उपस्थितीत नऊ महिलांसह बावीस नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम
( 50 Naxalites surrender in Chhattisgarh ) केंद्र सरकार नक्षलवाद्यांविरोधात सातत्याने कठोर कारवाई करत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दि. ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवाद संपवण्याचा प्रण घेतला आहे. अशातच, विजापूरमध्ये रविवार, दि. ३० मार्च रोजी ५० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून हिंसाचाराचा मार्ग सोडल्याची माहिती समोर येत आहे. स्वतः गृहमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे.
मध्य प्रदेशातील जगप्रसिद्ध खजुराहो मंदिराप्रमाणेच एक मंदिर छत्तीसगढमध्येही आहे. या मंदिरावर असणार्या वेगवेगळ्या कामशिल्पांमुळे याला ‘छत्तीसगढचे खजुराहो’ असे नाव पडले असावे. असे हे मंदिर म्हणजे फणीवंशीय राजांनी उभारलेले ‘भोरमदेव मंदिर.’ अशा या फारशा परिचित नसलेल्या ‘भोरमदेव मंदिरा’ची ‘जिज्ञासा’ उलगडणारा हा लेख...
सध्या अमेरिकेकडून मिळालेल्या ‘युएसएड’चे प्रकरण देशात चांगलेच चर्चेत असून, यानिमित्ताने परदेशी माध्यमांतून मिळणार्या निधींच्या गैरवापराचा प्रश्नही केंद्रस्थानी आला आहे. याच पार्श्वभूमीवर छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनीही परदेशी निधी धर्मांतरणासाठी वापरल्याचा संशय असणार्या ‘एनजीओं’वर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा दिला आहे.
Conversion छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदास साई यांनी अधिकाऱ्यांना राज्यात परदेशी निधी मिळवणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. बेकायदेशीरपणे मदतीचा वापर धार्मिक धर्मांतरासोबत कामांसाठी केला जातो. धर्मांतरासारख्या अवैधपणे कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही संघटनेवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
Hanuman Chalisa मोहम्मद इशाक खान नावाच्या कट्टरपंथीने छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातील हनुमान चालीसाचे (Hanuman Chalisa) पठण करण्यात येणाऱ्या मंदिरातील एका अधिकाऱ्याला धमकावण्यात आले होते. धर्मावर एवढेच प्रेम असेल तर अयोध्येत जाऊन राम मंदिर बांधण्यात आले आहे तिथे जा. जर हनुमान चालीसाचे पठण थांबवले नाहीतर संबंधित परिसरात तोडफोड केली जाईल अशी धमकी त्याने दिली आहे. ही घटना २७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
छत्तीसगडमधील रायगडमध्ये गोमातेचे शीर कापून फेकल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना घडली आहे. जेल कॉम्प्लेक्सच्या छतावर गायीचे कापलेले शीर सापडले. तसेच गायीच्या शरिराचे अवशेष भोवताली विखुरलेले आढळले आहेत. याप्रकरणाचा तपास आता छत्तीसगड पोलिसांनी सुरू केला होता.
देशात क्रीडा क्षेत्र नवनवीन उंची गाठत आहे. अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. मात्र, त्यामागे देशांतर्गत स्पर्धांचा वाढलेला दर्जा हे मुख्य कारण आहे. अशीच एक उत्तम दर्जा असलेली वनवासी क्रीडा महोत्सव ( Vanvasi krida mahotsav ) स्पर्धा छत्तीसगढमध्ये पार पडली. या स्पर्धेचा घेतलेला हा आढावा...
छत्तीसगड राज्यातील पत्रकार मुकेश चंद्राकरची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव हे सुरेश चंद्राकर आहे. पोलिसांनी एक विशेष पथक तयार करत आरोपी सुरेशला हैदराबाद येथून अटक केली आहे. याप्रकरणाची माहिती स्वतः आयजी पी सुंदरराज यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
छत्तीसगड येथील काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नासिर अली यांना बागीचा पोलिसांनी धार्मिक तणाव निर्माण केल्याप्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ३ जानेवारी २०२४ रोजी घडली आहे. याप्रकरणी काँग्रेस नेते नासिर अली विरोधात नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Mukesh Chandrakar छत्तीसगडमधील विजापूर येथील पत्रकार मुकेश चंद्रकार हत्या प्रकरणात प्रशासनाने आरोपीवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. आरोपी काँग्रेस नेते आणि कंत्राटदार सुरेश चंद्राकर यांच्या घरावर बुलडोझर फिरवला आहे. प्रशासनाने बेकायदेशीर बांधकामे पाडण्यास सुरूवात केली आहे या प्रकरणामध्ये सविस्तर चौकशी सुरू आहे. तसेच आरोपींची तीन बँक खाती जप्त करण्यात आली आहे.
conversion छत्तीसगड येथे बालोदमध्ये एका तरुणाने पत्नीच्या ख्रिश्चन धर्मांतरण (conversion) करण्याच्या दबावाखाली आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. सूरज दिवांगन उर्फ गजेंद्र असे ३५ वर्षीय मृत पतीचे नाव असून त्याने एक सुसाईड नोटही लिहिली होती. गजेंद्रने आपल्या सुसाईड नोटमध्ये पत्नी राजेश्वरी आणि इतर सासरच्या मंडळींवर कारवाईची इच्छा लिहून नमूद केली होती. याप्रकरणी आता हिंदूंनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. मात्र आता पोलिसांनी धर्मांतरणाचे आरोप फेटाळून लावले आहेत. ही घटना शुक्रवारी २० डिसेंबर २०२४ रोजी घडली
हैदराबाद : छत्तीसगढ-तेलंगण सीमा भागात मुलुगु जिल्ह्यातील एतुरागरामच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवादी ( Naxalites ) यांच्यात चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देत सात नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.
आपल्या अतरंगी कोमेंटरीने लोकांची मनं जिंकणारा नवज्योत सिंह सिद्धू आता चांगलच अडचणीत आला आहे. लिंबू पाणी आणि कच्ची हळद यासारख्या आयुर्वेदिक उपचारांनी कॅन्सर बरा होत असल्याचा दावा केल्यानंतर छत्तीसगढ सिव्हील सोसायटीने सिद्धू दामप्तयाला नोटीस पाठवला आहे.
(Chhattisgarh) छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत १० नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आल्याची मोठी बातमी समोर येत आहे. २० नक्षलवाद्यांचा ओडिशा सीमेवरून छत्तीसगडमध्ये घुसण्याचा प्रयत्न सुरू होता, यातच छत्तीसगड,ओडिशा आणि तेलंगणा या राज्यांच्या ट्राय जंक्शनवर ही चकमक झाल्याची माहिती समोर येत आहे.
(Amit shah) केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी छत्तीसगढ मधील नक्षलवादी हिंसाचारातील पीडितांशी संवाद साधला. यामध्ये बस्तर शांतता समितीच्या अंतर्गत छत्तीसगढ मधील नक्षलप्रभावित भागात नक्षली हिंसाचारामुळे बाधित ५५ जणांचा समावेश होता. यावेळी काही पीडितांनी आपली व्यथा गृहमंत्र्यांना सांगितली.
छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यामध्ये वंदे भारत (Vande bharat) एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. बागबाहरा रेल्वेस्टेशन जवळ वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत ट्रेनच्या तीन डब्यांचे नुकसान झाले आहे. या ट्रेनची शुक्रवार, दि.१३ रोजी रायपूर ते विशाखापट्टणम दरम्यान चाचणी घेण्यात आली होती. दरम्यान, विशाखापट्टणम येथून परतताना या ट्रेनवर दगडफेक करण्यात आली.
उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमधील आग्रा-लखनऊ एक्सप्रेस वेवर दि. ८ जून २०२४ रोजी मध्यरात्री ३.३० वाजता भीषण अपघात झाला. बस चालकाला झोप लागल्यामने हा अपघात झाल्याची माहिती आहे. तरी या अपघातात भाविकांनी भरलेली बस पलटी झाल्याने ३० हून अधिक लोक जखमी आणि २ जणांचा मृत्यू झालेला आहे.
छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये जीवनदीप सिंग नावाच्या तरुणावर अर्शद, नफीस, शोएब आणि राजा खान उर्फ सज्जाद अली यांनी हल्ला केला होता. जीवनदीपच्या गळ्यातील तुळशीची माळ पाहून हल्लेखोरांनी त्याला हिंदू समजून बेदम मारहाण केली आणि त्याची गाडीही फोडली. ज्या भागात हा हल्ला झाला त्या भागाला स्थानिक लोक 'मिनी पाकिस्तान' म्हणतात. सध्या सर्व आरोपी जामिनावर बाहेर आले आहेत. दि. ६ मे २०२४ ला ही घटना घडली.
छत्तीसगडमधील विजापूर येथील पीडिया जंगलात शुक्रवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले. या चकमकीत दोन जवान जखमी झाल्याचीही माहिती आहे.
छत्तीसगढमधील लोकसभेच्या ११ पैकी भाजप किती जागा जिंकतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे. २०१४ मध्ये भाजपने दहा जागा जिंकल्या होत्या. आता भाजप सर्व ११ जागा जिंकतो का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
छत्तीसगडच्या सूरजपुर जिल्ह्यातील एका मशिदीतील इमामावर घरात घुसून बलात्काराचा आरोप लावण्यात आला आहे. इमामचे नाव गुलाम गौस आहे. तो पाणी द्या सांगत घरात घुसला होता. पीडितेतर्फे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर त्याने तिच्या पतीची हत्या करण्याचीही धमकी दिली आहे. बुधवारी, दि. १० एप्रिल २०२४ रोजी ही घटना उघडकीस आली होती. मात्र, पीडितेने हिम्मत करत पाच दिवसांनी पोलीसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीसांत तक्रार दाखल झाल्यावर इमाम फरार झाला आहे. त्याचा शोध सध्या सुरू आहे.
भारताला गेली कित्येक दशके नक्षलवाद्यांनी पोखरण्याचा प्रयत्न केला. बिहार-झारखंडपासून छत्तीसगड ते महाराष्ट्रापर्यंत नक्षलवाद्यांनी रक्ताचे पाट वाहिलेत. महाराष्ट्रातील गडचिरोतील नक्षलग्रस्त भागातील हिंसाचार नवा नाही. छत्तीसगडमध्ये तर नक्षलींनी काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वाचा खात्मा केला होता. आता याच छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी २९ नक्षलींना कंठस्नान घातले आहे. नक्षलवादाविरोधातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या कारवाईपैकी ही एक कारवाई आहे. 29 Naxals killed in encounter in Chhattisgarh
छत्तीसगडमधील रायगड जिल्हात मोठ्या प्रमाणावर घरवापसी झाली आहे. या वेळी 'कोरबा आदिवासी समाजा'तील ५६ कुटुंबातील २०० लोकांनी हिंदू धर्मात घरवापसी केली आहे. त्यांनी धार्मिक विधी पार पाडून सनातन धर्मात घरवापसी केली. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि अखिल भारतीय घर वापसी अभियानाचे प्रमुख प्रबल प्रताप सिंह जुदेव यांनी वैयक्तिकरित्या सर्वांचे पाय धुतले आणि सर्वांना हिंदू धर्मात घरवापसी करुन घेतली.
छत्तीसगडच्या जशपूरमध्ये जनजागृती सभेच्या नावाखाली हिंदू देवी-देवतांविषयी असभ्य भाषेचा वापर करण्यात आला. भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा आणि राष्ट्रीय एकता परिषद यांनी संयुक्तपणे ही बैठक आयोजित केली होती. या कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये हिंदू देवता आणि हिंदूंच्या विरोधात भडकावल्या जात आहे.
छत्तीसगडच्या दुर्गमध्ये धर्मांतरावरून वाद झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रार्थना सभेच्या बहाण्याने शेकडो लोकांचे धर्मांतर करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांनी या सभेला विरोध केला तेव्हा मिशनऱ्यांच्या लोकांकडून त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. ही घटना दि. ३ मार्च रोजी घडली.
छत्तीसगडमधील मुंगेली जिल्ह्यातील लोरमी पोलीस स्टेशन परिसरात भाजप नेते शैलेंद्र जैस्वाल यांच्या मृत्यूचा खुलासा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी, दि. २९ फेब्रुवारी २०२४ सोनिया लाक्रा नावाच्या मुलीलाही अटक केली. सोनियांने शैलेंद्र यांना ब्लॅकमेल तर केलेच पण धर्मांतरासाठी दबावही टाकला, असा आरोप करण्यात येत आहे.
छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये लव्ह जिहादचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. इम्रान बेगने प्रथम एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीशी मैत्री केली आणि नंतर तिला उत्तर प्रदेशात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारापूर्वी इम्रानने पीडितेला बेशुद्ध केले होते. पोलिसांनी एफआयआर नोंदवून इम्रानला अटक केली आहे. इम्रानचा मदतनीस मोठा भाऊ कामरान बेग यालाही अटक करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकरणात पोलिसांनी मौलवी आणि मौलानाविरुद्ध एफआयआर नोंदवली आहे. अमेठीतील एका मशिदीचा मौलाना मोठ्या आवाजात अश्लील गाणी वाजवून तरुणीसोबत अश्लील कृत्य करताना पकडला गेला. दुसऱ्या घटनेत छत्तीसगडमधील बिलासपूर येथील एका दर्ग्याच्या मौलवीविरुद्ध अंधश्रद्धा पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिथे क्रॉस असलेल्या मुलींची छायाचित्रेही जप्त करण्यात आली आहेत.
छत्तीसगडमधील कावर्धा येथील लालपूर गावात दि. २० जानेवारी २०२४ रोजी अयाज, इद्रिश, मेहताब आणि शेख रफीक यांच्यासह सहा जणांनी मिळून गोसेवक साधराम यादव (५०) यांचा आयएसआयएस दहशतवाद्यांप्रमाणे गळा चिरून खून केला होता. दि. २२ जानेवारीला होणाऱ्या रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी दहशत पसरवण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले होते.
छत्तीसगडमधील भाजप सरकारने धर्मांतरविरोधी विधेयकाचा मसुदा तयार केला आहे. यामध्ये दुसऱ्या धर्मात धर्मांतर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने किमान ६० दिवस अगोदर त्याची वैयक्तिक माहिती एका फॉर्ममध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करावी लागेल. त्यानंतर जिल्हा दंडाधिकारी पोलिसांना धर्मांतराचा खरा हेतू, कारण आणि उद्देशाचे मूल्यांकन करण्यास सांगतील.
छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये विद्यार्थ्यांना ब्रह्मा-विष्णू-महेश न मानण्याची आणि हिंदू धर्म न पाळण्याची शपथ घ्यायला लावणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलांचे धर्मांतर करणाऱ्या या मुख्याध्यापकालाही शिक्षण विभागाने निलंबित केले आहे. त्यांच्या या कृत्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
काँग्रेसप्रणित देशभरातील २८ राजकीय पक्षांची ‘इंडी’ आघाडीला गळती लागली असून ममता बॅनर्जी, केजरीवाल यांच्या पाठोपाठ आता नितीशकुमारही त्यातून बाहेर पडले. काँग्रेसी अहंकारी वृत्ती तसेच ताठरपणा विरोधकांना अशी भूमिका घेण्यास प्रवृत्त करणारा ठरला. कोणत्याही हेतूशिवाय एकत्र आलेले हे पक्ष संधी मिळताच, आघाडीतून बाहेर पडले, हेच सत्य.
लोकसभा निवडणुकीस अवघे काही महिने बाकी असताना, आपल्या इच्छित स्थळी म्हणजे सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी विरोधी पक्ष निघाले तर आहेत. मात्र, गोलचक्करभोवतीच गरगर फिरण्याची वेळ त्यांच्यावर आल्याचे दिसत आहे. यातून वेळीच मार्ग न काढता आल्यास सत्तेपर्यंत तर सोडा; मात्र सत्तेच्या जवळपासही पोहोचणे, त्यांना शक्य होणार नाही.
भाजपने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील निरीक्षकांची नावे जाहीर केली आहेत. हे निरीक्षक प्रत्येक राज्यातील आमदारांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करतील.
भाजपला मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ मिळालेला चमकदार विजय हा कार्यकर्त्यामुळेच शक्य झाला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले.भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा व राज्यसभा सदस्यांना संबोधित केले. यावेळी तीन राज्यांमधील भाजपच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या निवडुकानध्ये तेलंगणा वगळता मध्यप्रदेश, राजस्थान, आणि छत्तीसगड मध्ये वनवासींबरोबरच दलितांनीही भाजपलाच मतदान केले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणामधील ९८ अनुसुचीत जाती आरक्षित मतदारसंघांपैकी भाजपने ५७ जागा जिंकल्या, तर कॉंग्रेसने ४० जागा जिंकल्या आहेत. २०१८ मध्ये, भाजपने यापैकी ३२ आणि कॉंग्रेसने ४५ जागा जिंकल्या होत्या.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या १० खासदारांनी बुधवारी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरामच्या विधानसभा निवडणुकांचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमताने विजयी झाला, तर तेलंगणा काँग्रेसकडे गेला आणि मिझोराममध्ये नवीन पक्ष झेडपीएम सत्तेवर आला. ज्या राज्यांमध्ये भाजपने बाजी मारली तेथे थेट काँग्रेसशीच स्पर्धा होती. आम आदमी पार्टी (आप), जनता दल युनायटेड (जेडीयू) आणि समाजवादी पार्टी (एसपी) यांनीही या राज्यांमध्ये आपले उमेदवार उभे केले होते. मात्र, या सर्वच पक्षांच्या उमेदवारांना आपले डिपॉ
तीन राज्यांमध्ये काँग्रेसच्या झालेल्या दणदणीत पराभवानंतर आज होणारी इंडिया आघाडीची बैठक रद्द करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचा पोपट आता आयसीयूमध्ये असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.भाजपचा पराभव करण्यासाठी मोठा गाजावाजा करून काँग्रेसने इंडिया आघाडीची स्थापना केली होती. या आघाडीमधील २८ पक्ष एकत्र येऊन भाजपचा सामना करणार असल्याचा दावादेखील कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर करण्यात आला होता. त्यानंतर या आघाडीच्या विविध बैठकादेखील आयोजित करून त्यामध्ये लोकसभेसाठीची रणनिती आखण्यात येत असल्याचेही सा
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भाजपचा मोठा विजय हा प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि सुशासनाचा विजय असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, तेलंगणातही भाजपला पाठिंबा सतत वाढत आहे. या निवडणुकीत देशाला जातींमध्ये विभागण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण देशात चारच जाती आहेत- महिला शक्ती, युवाशक्ती, शेतकरी आणि गरीब कुटुंब. या ४ जातींना सक्षम करूनच देश मजबूत होईल, असे ते म्हणाले.
लंगाणा विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस ला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तेलंगणाच्या स्थापनेपासूनच मुख्यमंत्री असलेल्या बीआरएस पक्षाच्या के चंद्रशेखर राव यांचा काँग्रेस ने दारुण पराभव केला आहे. आत्तापर्यंत च्या अकड्यानुसार २०१८ च्या निवडणूकीत ८८ जागा मिळवून सत्तेवर असणाऱ्या केसीआर यांना यावेळी ३९ जागांवर समाधान मानावे लागत आहे. काँग्रेसच्या या विजयाचे शिल्पकार ए. रेवंथ रेड्डी यांना मानण्यात येत आहे.