युनेस्कोकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसास्थळांचा दर्जा मिळाल्याने डोंबिवलीत भाजपातर्फे शनिवारी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. डोंबिवलीतील पूर्व, पश्चिम आणि ग्रामीण भागात एकमेकांना पेढे भरवित आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला.
Read More
(Karnataka High Court Slams Siddaramaiah Govt Over Bengaluru Stampede) आयपीएल २०२५ च्या अठराव्या हंगामातील आरसीबीच्या ऐतिहासिक विजयानंतर ४ जून रोजी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आणि ५० हून अधिक लोक जखमी झाले. या पार्श्वभूमीवर कर्नाटक उच्च न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेत सरकारकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) हेमराज बागुल यांचा गुरुवार, दि. ५ जून रोजी वाढदिवस आहे. बागुल हे प्रशासनातील एक अनुभवी आणि कार्यतत्पर अधिकारी म्हणून परिचित आहेत. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना आणि धोरणांच्या जनजागृतीमध्ये त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे.
(Virat Kohli reacts to Bengaluru stadium stampede) यंदाच्या आयपीएल विजेत्या 'रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु' संघाच्या विजयाच्या आनंदाला चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमुळे गालबोट लागले. जेतेपदाच्या जल्लोषावेळी खेळाडूंच्या स्वागतासाठी स्टेडियम गेटवर चाहत्यांची तुफान गर्दी जमली होती. या गर्दीत झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. तर ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर विराट कोहली याने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
अनुभवा वन्यजीव जनजागृतीची नांदी! वन्यजीव संवर्धनासाठी होणार लोककलांचा आविष्कार जेव्हा रंगमंचावर धुमाकूळ घालणार तुमचे आवडते कलाकार
आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहलयात वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचसोबत लहान मुलांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी तसेच महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी भारत गौरव टुरिस्ट ट्रेन अंतर्गत 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' या विशष पर्यटन रेल्वेची आयआरसीटीसीतर्फे घोषणा करण्यात आली आहे.
(Pandharpur Chaitri Yatra) वारकरी संप्रदायातील महत्त्वाची यात्रा म्हणजे पंढरपूरची चैत्री यात्रा. या चैत्र एकादशीच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक दरवर्षी न चुकता पंढरपूरला येतात. यंदाही या यात्रेला जवळपास चार ते पाच लाख भाविक येतील असा अंदाज प्रशासनाचा आहे. याच सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मंदिर प्रशासन आता सज्ज झाले आहे.
( gudipadwa celebration in maharashtra ) हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. राज्यात विविध ठिकाणी शोभायात्रा आणि गुढी उभारण्याची परंपरा आहे. तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिरावर प्रथम गुढी उभारण्यात येते. तर, मुंबई- पुण्यासह शहरांमध्ये संस्कृती- परंपरांचे प्रतिक असलेल्या शोभायात्रा काढल्या जातात.
यंदा देशात बहुतांश ठिकाणी होळी आणि धुलिवंदनाचा सण शांततामय वातावरणात पार पडला असला तरी, झारखंडमध्ये मात्र धर्मांधांनी हिंदूंच्या मिरवणुकीवर केलेल्या हल्ल्यामुळे गालबोट लागले. पण, त्याहीपेक्षा शरमेची आणि तितकीच धक्कादायक बाब म्हणजे, सोरेन सरकारने हिंदूंवर फौजदारी गुन्हे दाखल केले आणि धर्मांधांना पाठीशी घातले.
(Priyanka Chaturvedi on SpiceJet Holi Celebration) देशभरात १४ मार्चला धूलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान १३ मार्चला राजधानी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानातील प्रवाशांनादेखील होळीचा आनंद लुटण्याची संधी मिळाली. स्पाईस जेटच्या क्रू मेंबर्सकडून प्रवाशांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, उबाठा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी या सगळ्यावरुन स्पाइस जेटवर निशाणा साधत टीका केली आहे.
होळीच्या निमित्ताने ही जी धुळवड सुरू आहे, त्यात थोडाफार रंग अशा लोकांवर पडला आणि ते रंगले, तर त्यांचे भलेच होईल. हिंदूंनी उगीच अपराधीपणाचा भाव बाळगण्याचे कारण नाही.
कोणत्याही देशासाठी त्या देशातील नागरिकांची राष्ट्रनिष्ठा हा फार मौल्यवान घटक असतो. मात्र, गेल्या ७५ वर्षांच्या काळात देखील, भारतातील अनेक नागरिकांच्या मनात देशाविषयी प्रेम नाही. याचे प्रत्यंतर अनेक घटनांमधून दिसून येत असते. त्याला निमित्त कधी क्रिकेटचा सामना असतो, कधी सण, तर कधी प्रांतीय, भाषिक अस्मिता...
दि. २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.3० वाजता ‘भारतीय भिक्खू संघ’, ‘देव देश प्रतिष्ठान’, ‘छबी सहयोग फाऊंडेशन’ आणि ‘संविधान वार्ता’ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान दिवस सोहळा शहीद स्मारक माता रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर पूर्व येथे आयोजित करण्यात आला. त्यानिमित्ताने या कार्यक्रमाचा मागोवा घेणारा हा लेख...
( Let's Imagine ) गेली सहा वर्षे आमची ‘लेट्स इमॅजिन’ संस्था कलेचा आस्वाद घेत वाडा व विक्रमगडमधील जिल्हा परिषद शाळेच्या मुलांबरोबर पणत्या रंगविणे, शुभेच्छा कार्ड व एन्व्हलप सुशोभित करणे, कंदील तयार करणे अशा कलाप्रकारांची दिवाळी कार्यशाळा घेत दिवाळी साजरी करत आहे. या कलाप्रकारातूनही आनंद मिळतो आणि नवनवीन कल्पना आकाराला येतात. शिकण्याची आणि अनुभवांची समृद्ध देवाणघेवाण होते. यावर्षी आम्ही विक्रमगडमधील मोह बुद्रुक या शाळेत दिवाळीची कार्यशाळा घेतली. मोह बुद्रुक शाळेतील या मोहवून टाकणार्या अनुभवाचे शब्दचित्रण...
सध्या देशभरात सर्वत्र दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत म्हणजेच देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सगळ्या ठिकाणी दिवाळी साजरी होत आहे. आपला देश हा वैविध्यपूर्णतेने नटलेला आहे त्यामुळे आपल्या देशात दिवाळी साजरी करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहे. देशात विविध भागात दिवाळी कशाप्रकारे साजरी केली जाते हेच जाणून घेऊया या व्हिडिओतून.
( Diwali Celebration )हिंदू सण आले की इस्लामिक कट्टरंपथी कुठल्या न कुठल्या प्रकारे त्यास गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात. राज्यात तीन ठिकाणी दिवाळीला विरोध दर्शवण्याचा प्रकार घडला आहे. कुठे काय घडलं? पाहा संपूर्ण व्हिडिओ
( Ayodhya Deepotsav 2024 ) अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिरात आज यंदा तब्बल ५०० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भव्यदिव्य असा दीपोत्सव साजरा होणार आहे. यंदाच्या वर्षी श्रीराम मंदिरासह शरयु घाटावर तब्बल २५ लक्ष दिवे लावण्याचे संकल्प हिंदू समाजाने केला आहे.
(Rasrang 2024) डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ, डोंबिवली आयोजित ''रासरंग - २०२४'' हा नवरात्रोत्सव गुरूवारपासून रंगणार आहे. यंदाही अधिक भव्यतेने आणि कलात्मक पद्धतीने या महोत्सवाचे ३ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत डोंबिवली येथील डी. एन. सी. शाळेच्या मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. यंदाही नैतिक नागदा यांचे जल्लोषमय संगीत हे प्रमुख आकर्षण असणार आहे.
गोव्यातील पेडणे गावचे रहिवासी असलेले मकबूल माळगिमनी हे गेल्या सहा वर्षांपासून गणेशोत्सवाचा सण साजरा करत आहेत. मूळचे कर्नाटकातील हुबळीचे हे कुटुंब गोव्यात स्थायिक झालेले आहे. प्रत्येक वर्षी ते त्यांच्या कुटुंबीयांसह हा उत्सव मनोभावे साजरा करतात. त्यांच्या या निर्णयाला त्यांच्याच मुस्लीम समाजामधून विरोध करण्यात आला होता, परंतु मकबूल माळगिमनी यांनी गणेशोत्सव हा सर्वधर्मींयाचा सण आहे, असे आदरपूर्वक निक्षून सांगितले.
कल्याण : भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिम मंडळातर्फे शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला शिव जन्मोत्सव सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला.
दिवाळी म्हणजे रोषणाईचा सण. सगळीकडे दिव्यांची आरास पाहायला मिळते. सामान्य माणसांपासून ते अगदी कलाकारांपर्यंत सगळेच आपल्या कामाचा क्षीण विसरुन कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करतात. अशीच एक कलाकार जोडी खुप खास पद्धतीने दिवाळी साजरी करते. अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही जोडी दरवर्षी महिलाश्रम आणि अंध मुलींसाठी आवर्जुन फराळ पाठवतात आणि दिवाळी आनंदात साजरी करतात असे निवेदिता यांनी सांगितले.
स्वातंत्र्यदिनाच्या शुभमुहूर्तावर वीआय कंपनीने खास डेटा प्लान जाहीर केले आहेत. १२ ते १७ ऑगस्ट दरम्यान प्रीपेड ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या डिल्स लागू केल्या जातील. ५० जीबी पर्यंत वाढीव डेटासाठी १९९ रुपयेपासून रिचार्ज प्लान ठेवण्यात आला आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिन सोहळा पार पडणार असून यासाठी देशभरातून अनेक लोक उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे यावर्षी या कार्यक्रमासाठी हर घर जल योजनेच्या लाभार्थ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
धुळ्यातील साखरी तालुक्यातील निजामपूरपासून पुढे तीस किमी अंतरावर असलेल्या चिखलीपाडा गावातील एका मेणबत्तीच्या कारखान्याला शॉर्टसर्किट झाल्यानं भीषण आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीमध्ये चार महिलांचा जागीच मृत्यू झाला. तसेच दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांना नंदुरबारला रुग्णालयात हालवण्यात आलं आहे.
श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगडच्यावतीने दीपावलीच्या पूर्वसंध्येला शनिवारी रात्री किल्ले रायगडावर ‘श्री शिवचैतन्य सोहळा’ मोठ्या आनंदाने, उत्साहाने आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.
दिवाळीच्या आनंद साजरा करत असताना, दुसरीकडे क्रिकेटप्रेमींचा आनंद द्विगुणित झाला. तो ‘टी-20’ विश्वचषक स्पर्धेतीलपहिल्या सामन्यात भारताच्या रोमहर्षक विजयाने. अटीतटीच्या सामन्यात विजय मिळाल्याने पुण्यात सर्वच ठिकाणी आतषबाजी करण्यात आली. चौकाचौकांत युवकांनी एकत्र येऊन जल्लोष केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून भारताच्या या टीमवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. विशेष म्हणजे, दिवाळीच्या शुभेच्छा देताना पुणे शहर पोलिसांनी लक्षवेधक ट्विट करुन ‘ ’विराट’ दिवाळी सेलिब्रेशन पुणेकर,’ अशा शब्दांत पुणेकरांना अनोख्या शुभेच्छा
कोरोनामुळे सार्वजनिक उत्सव आणि कार्यक्रमांना ब्रेक लागला. पण, आता फडणवीस-शिंदे सरकारमुळे हे उत्सव कोणत्याही अडथळ्यांशिवाय साजरे करायला मिळणार म्हणून नागरिकांमध्ये उत्साह शिगेला आहे. त्याचे प्रतिबिंब सांस्कृतिक कार्यक्रमाची राजधानी म्हणून ख्यातनाम पुण्यात उमटले नाही तरच नवल.
अशोक मामांचा ' हा ' गुण तुम्हाला माहित आहे का?
राष्ट्रीय शिक्षण संस्थाचा दि. 3 जुलै रोजी शताब्दी सोहळा साजरा करत आहे. 100 वर्षांपूर्वी मनमाडसारख्या कामगार वस्तीच्या गावात शाळा सुरू करणे, हे एक आव्हानच होते आणि विपरित परिस्थितीतदेखील हे आव्हान रावसाहेब यांनी लीलया पेलले व शाळेची मुहूर्तमेढ रोवली. विंदा करंदीकरांसारखे सारस्वत विद्यालयात काही काळ शिक्षक म्हणून कार्यरत होते. ज्ञानदानाची सदावर्ते घालणार्या या संस्थेने पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडले सुसंस्कृत समाज घडविण्याचे काम नि:स्वार्थपणे केले आहे, त्याविषयी...
सहकार तपस्वी स्व. गुलाबराव पाटील यांचा जन्मशताब्दी सोहळा संपन्न
राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असताना, शिक्षक वर्गाने सामाजासाठी नवीन आदर्श निर्माण केला आहे. ५ सप्टेंबर रोजी डॅा. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करतो. याच दिवशी आपण शिक्षण दिन म्हणून साजरा करत असतो. "शिक्षक" हे स्थान प्रत्येकाच्या जीवनात अत्यंत आदराचे, जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणारे आहे.
एकाच रंगांची वस्त्रे परिधान केल्याने सगळ्या महिलांमध्ये एकता दिसते अशी या मागील धारणा
रशियाच्या घटना दुरुस्तीवरील मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल पुतीन यांचे केले अभिनंदन
'अग्गंबाई सासूबाई'च्या सेटवर मकर संक्रांत सेलिब्रेशन
दिवाळीचा पाडवा काल साजरा करण्यात आला. बहीण भावाच्या नात्याचा गोडवा वाढवणारा भाऊबीजेचा सण आज साजरा होत आहे.
सोशल मीडिया आणि वेब सीरिजच्या काळात आजकाल सगळेजण नेटफ्लिक्स अँड चिल अशा जगात असले तरी बॉलिवूडमधील काही सिनेमे हे अजरामर आहेत. काळ कितीही पुढे गेला, लोक कितीही पुढारले तरी हे चित्रपट पाहण्याची मजा काही वेगळीच. त्यापैकीच एक चित्रपट म्हणजे बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याने बॉलिवूडमध्ये दिग्दर्शकीय पदार्पण केलेला 'कुछ कुछ होता है' हा चित्रपट.
हिंदी चित्रपटसृष्टीतले महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ७६ वा वाढदिवस. त्यानिमित्ताने चित्रपट सृष्टीतील सर्व कलाकार, त्यांचे चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
अमूल या भारतातील एका अग्रगण्य दुग्ध उत्पादन संस्थेने त्यांच्या नेहेमीच्या अनोख्या अंदाजात पंतप्रधानांना एका व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
परेश रावल म्हणजे बाबुराव गणपतराव आपटे या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालणारे चतुरस्त्र अभिनेते. आज त्यांचा ६९ वा वाढदिवस. होली नावाच्या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या या अभिनेत्याने सहकलाकाराच्या भूमिकेचे महत्व अख्या चित्रपट सृष्टीला जाणवून दिले असे म्हणायला हरकत नाही.
प्रत्येकाच्या मनात उत्सव फुलायला हवा. तो फुलला की, जीवन आनंदाने फुलेल. संक्रांत म्हणजे नात्यांचा उत्सव! माणूसपणाचा, माणुसकीचा उत्सव! प्रेमाचा आणि स्नेहाचा उत्सव म्हणजे संक्रांत. संपन्नता व समृद्धीचा उत्सव म्हणजे संक्रांत. दानाचा व दातृत्वाचा उत्सव म्हणजे संक्रांत. मना-मनातस्निग्धता, गोडवा निर्माण करत समाजाला सुदृढ करणारा उत्सव.
विवेकानंद प्रतिष्ठानमधील सर्व विभागांच्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धा 20- 21 डिसेंबरला काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल आणि ब.गो.शानभाग विद्यालयाच्या क्रीडा मैदानावर झाल्या.
येथील कुंदन फाउंडेशनतर्फे जळगाव बांभोरी पुलाजवळ, जलाराम बाप्पानगरात 8 डिसेंबरपर्यंत वृंदावन धामचे पिठाधीश्वर तथा जगतगुरु डॉ.राजेंद्रदास महाराज यांचे भागवत कथा सप्ताह होत आहे.
भोसरी प्रकरणात माजीमंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्यावर भूखंड खरेदी प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. मात्र पुणे एसीबीने त्याचा अहवाल न्यायालयामध्ये सादर केला.
भारतातील शेतकऱ्यांचे भवितव्य जपणारे हे सरकार आहे असे मत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केले आहे.
अहाहा, त्या अनुपम सोहळ्याचे वर्णन काय करावे... शब्दांचे भांडारही अपुरे पडावे... निसर्गात ‘सृजना’ची पालवी फुटलेली, चैतन्याला बहर आलेला... नगरजन उत्कंठीत झालेले... लहान-थोर सुवार्ता ऐकण्यासाठी व जयजयकार करण्यासाठी अधीर झालेले...
प. न. लुंकड कन्या शाळेतील इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी मैथिली पवनीकर हिचा १३ वा वाढदिवस तिच्या कुटुंबीयांनी आगळ्यावेगळा उपक्रम राबवून साजरा केला.
याबद्दल सर्वस्तरातून भारतीय संघाचे कौतुक केले जात आहे.