( BJP Fourth Candidate List ) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची २९ ऑक्टोबर ही शेवटची तारीख असल्याने महाविकास आघाडी, महायुतीमधील घटक पक्ष आणि इतर पक्ष आपल्या उर्वरित जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. यादरम्यान भाजपने आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली असून या यादीत दोन नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये मीरा भाईंदर मतदारसंघ व नागपूर विभागातील उमरेड विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
Read More
विधानसभा निवडणूकीसाठी भाजपचा तिसरी यादी सोमवार, २८ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. २६ उमेदवारांची ही यादी असून यात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात भाजपने चरणसिंग ठाकूर यांना मैदानात उतरवले आहे.
विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेसने २३ जणांची दुसरी यादी जाहीर केली आहे. शुक्रवारी रात्री महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेत अर्ध्या तासाच्या आत दुसरी यादी जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यांनी शनिवारी सकाळी आपली यादी जाहीर केली. याआधी काँग्रेसने ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता त्यांनी २३ जणांची दुसरी यादी जाहीर केली आहे. तसेच लवकरच तिसरी यादी येणार असल्याचेही काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने उबाठा गटाने दुसरी यादी जाहीर केली आहे. १५ उमेदवारांची ही यादी असून यात ५ महिलांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, भायखळा विधानसभा मतदारसंघात यंदा शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवार, २६ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. तसेच पुढील यादी आज रात्री किंवा उद्यापर्यंत जाहीर करणार असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी भाजपने शनिवार, २६ ऑक्टोबर रोजी दुसरी यादी जाहीर केली आहे. यात कसबा पेठ विधानसभेत हेमंत रासणे तर जतमध्ये गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याआधी भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणूकीसाठी उबाठा गटाने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. यात आदित्य ठाकरेंना वरळी विधानसभेतून पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात केदार दिघे यांना तिकीट देण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची ४४ उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ही यादी जाहीर केली. दुसरी यादी उद्या अंतिम होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
निवडणूका जवळ आल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, विधानसभेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसकडून नुकतीच ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीतूनच लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महायूती आणि महाविकास आघाडीनंतर परिवर्तन महाशक्ती या नावाने स्थापन करण्यात आलेल्या तिसऱ्या आघाडीने सोमवारी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत विधानसभा निवडणूकांसाठी १० उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणूकांच्या तारखांची घोषणा झाली असून सर्वच पक्षांची जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. यापूर्वी वंचितने अनुक्रमे ११ आणि १० उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी पक्षाची बैठक पार पडली. त्यानंतर पुणे येथे पत्रकार परिषद घेत अजित पवार यांनी आपल्या पहील्या उमेदवाराची Sunil Tatkare Raigad घोषणा केली आहे. यावेळीच अजित पवार यांनी महायुतीच्या सर्व जागांच्या घोषणेसाठी निश्चित तारखेची माहीती दिली.
दिनांक २८ मार्चला एकत्रित महायुतीची ( mahayuti candidates ) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यावेळी जागा कुणाला किती मिळणार हे जाहीर केले जाईल. आतापर्यंत ९९ टक्के जागा वाटपाचे काम पूर्ण झाले असून आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत सांगितले.
भाजपची चौथी यादी जाहीर, खडसेंच्या कन्येला संधी
राज ठाकरे यांचे निकटवर्तीय असणाऱ्या बाळा नांदगावकरांना दुसऱ्या यादीतही स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.