राज्य सरकारकडून वरळी बीडीडी चाळीचा पुनर्विकास केला जात आहे. त्याच कामाची पाहणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे तेथे पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. चाळीचं काम सुरू असलेल्या ठिकाणची राज ठाकरेंनी पाहणी केली. चाळीतील स्थानिक नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. या समस्या घेऊन अनेकदा बीडीडी चाळीतील रहिवाशी आणि व्यापारी राज ठाकरे यांच्या भेटीला येत होते.
Read More