अॅनिमल' चित्रपटात मिळालेल्या घवघवीत यशानंतर अभिनेत्री तृप्ती डिमरी विशेष चर्चेत आहे. बुलबुल चित्रपटातील तृप्ती 'अॅनिमल' आणि 'भूल भूलैय्या ३' मध्ये वेगळ्याच अंदाजात दिसली. एका चित्रपटामुळे एका पाठोपाठ एक मोठे चित्रपट तिने पटकावले. लवकरच ती 'धडक २' मध्ये झळकणार असून अनुराग बासू दिग्दर्शित 'आशिकी ३' मध्येही तिची वर्णी लागली होती. मात्र, आता 'आशिकी ३' मधून तिचा पत्ता कट झाल्याची माहिती मिळत आहे.
Read More
२०२४ हे वर्ष भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्वाचे ठरले. प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळवत अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई केली. अवघ्या काही दिवसांनी २०२४ हे वर्ष संपेल आणि २०२५ हे वर्ष नव्याने मनोरंजनासाठी सज्ज होईल. जाणून घेऊयात २०२४ या वर्षात कोणत्या टॉप १० चित्रपटांनी तुफान कमाईसह प्रेक्षकांची मने जिंकली. ‘सॅकलिंक’ने २०२४ वर्षातील ब्लॉकबस्टर सिनेमांची यादी दिली आहे. यात हिंदीतील ४ तर आणि ६ दाक्षिणात्य चित्रपटांचा समावेश आहे.
दिवाळीच्या निमित्ताने चित्रपटगृहात दोन मोठे चित्रपट १ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाले होते. यात रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ आणि अनीस बाझमी दिग्दर्शित ‘भूल भूलैय्या ३’ या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन केलं. मुळात या दोन्ही चित्रपटांचे आधीचे भाग सुपरहिट होतेच आणि त्यात यांचीही कामगिरी तशी पाहायला गेल्यास बरी ठरली. सध्या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑपिसवर किती कमाई केली त्याची आकडेवारी समोर आली असून यात कार्तिकने अजयला मागे टाकले आहे. शिवाय, १४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘कंगुवा
अभिनेता राजपाल यादव यांनी आजवर विविध हिंदी चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारल्या आहेत. नुकताच प्रदर्शित झालेल्या भूल भुलैया ३ चित्रपटात तो झळकला होता. चित्रपटामुळे तर राजपाल यादव चर्चेत आहेच पण दिवाळीबद्दल एक व्हिडिओ करत हिंदु समाजाच्या भावना दुखावल्यामुळे राजपाल यादवची विशेष चर्चा सुरु आहे. याच विषयाबद्दल राजपाल यादवचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो पत्रकाराचा कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पत्रकाराने राजपाल यादव यांना एक प्रश्न विचारला, ज्यानंतर त्याचा रागाचा प
हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन ब्लॉकबस्टर चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले आणि दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवला. ‘सिंघम अगेन’ आणि ‘भूल भूलैय्या ३’ या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांची दिवाळी अगदी धमाकेदार केली आहे. एकाच दिवशी दोन्ही चित्रपटांची टक्कर बॉक्स ऑफिसवर कसा परिणाम करणार या चर्चा रंगल्या होत्या खऱ्या पण दोन्ही चित्रपटांनी अनपेक्षितपणे कमालीची कामगिरी केली आहे.
अभिनेता कार्तिक आर्यनची प्रमुख भूमिका असणारा 'भूल भुलैया ३' हा चित्रपट १ नोव्हेंबर २०२४ रोजी देशभरात प्रदर्शित झाला. सिंघम अगेन या चित्रपटासोबत टक्कर देत भूल भूलैय्या ३ ने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला अवघ्या तीन दिवसांत जमा केला आहे. दरम्यान, कार्तिकने नुकताच चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी त्याच्यासोबत घडलेला एक विचित्र किस्सा सांगितला आहे.
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर हिंदीतील दोन मोठे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. भूल भुलैय्या ३ आणि सिंघम अगेन या दोन चित्रपटांची चांगलीच टक्कर होणार आहे. अजय देवगण आणि कार्तिक आर्यन १ नोव्हेंबर २०२४ रोजी बॉक्स ऑफिसवर आमने-सामने येणार आहेत. दरम्यान, या दोन्ही चित्रपटांचे यापूर्वीचे प्रत्येक भाग यशस्वी झाले आहेत. त्यामुळे आता नेमक्या कोणच्या चित्रपटाकडे प्रेक्षक वळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तसेच, दोन्ही चित्रपटांसाठी प्री-बुकिंग जोरदार सुरु झाले असून काही अंशी वाद देखील सुरु आहे.