bharat

सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रावर २२ जुलै रोजी होणार सुनावणी! पाच न्यायाधिशांचे संविधान पीठ गठित

भारतीय संविधानातील अनुच्छेद १४३ अंतर्गत राष्ट्रपतींनी सादर केलेल्या संवैधानिक संदर्भात सर्वोच्च न्यायालयात येत्या २२ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. विधेयकांना मंजुरी देण्याच्या प्रक्रियेतील राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या अधिकारांच्या मर्यादा आणि जबाबदाऱ्यांबाबतचे हे महत्त्वाचे प्रकरण असून, या प्रकरणाच्या सुनावणीसाठी पाच न्यायाधीशांचे संविधान पीठ नेमण्यात आले असून, त्यामध्ये मुख्य न्यायाधीश बी. आर. गवई, न्या. सूर्यकांत, न्या. विक्रम नाथ, न्या. पी.एस. नरसिंह आणि न्या. ए.एस. चांदुरकर यांचा समावेश आहे.

Read More

वंशावळीतून वगळणे ही फसवणूकच; सर्वोच्च न्यायालयाचा बहिणींना दिलासा

बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (बीएमआरसीएल) कडून ३३ कोटी रूपयांची भरपाई मिळवण्यासाठी वंशावळ आणि विभाजन करारात खोटेपणा करून पाच बहिणींना संपत्तीतून वगळल्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने दोन आरोपीविरुद्ध फौजदारी खटला चालवण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. याबाबतीत न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्या. पी.बी. वराले यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, “प्रथमदर्शनी पुरावे असे दर्शवतात की संबंधित कागदपत्रे मुद्दाम खोटी तयार करण्यात आली असून, त्याचा उद्देश दिवंगत के. जी. येल्लप्पा रेड्डी यांच्या पाच मुलींना का

Read More

विमान अपघातानंतर माध्यमांच्या वार्तांकनांमुळे अपघातग्रस्तांच्या कुटूंबियांना भावनिक ठेच पोहोचल्याचा आरोप!

विमान अपघातांनंतर माध्यमांमध्ये होणाऱ्या वार्तांकनाबद्दल नियंत्रण ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची मागणी करणारी एक जनहित याचिका शुक्रवार दि.१८ जुलै रोजी मद्रास उच्च न्यायालयात कोइम्बतूर येथील वकील एम. प्रवीण यांनी दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय, नागरी विमान वाहतूक महासंचालक (डीजीसीए) आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव एनएफडीसी - नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा येथे 'भारत पॅव्हेलियन'चे करणार उद्घाटन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय माहिती व प्रसारण, रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव येत्या १८ जुलै २०२५ रोजी मुंबईतील एनएफडीसी कॉम्प्लेक्समधील नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा (NMIC) येथील गुलशन महलमध्ये भारत पॅव्हेलियनचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव राजेश कुमार मीणा आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कथाकथनाची

Read More

भाजपा महिला विभागाचे महिला बचत गटांना मार्गदर्शन :खानिवडे

नायगांव पूर्व विभागातील जुचंद्र गावात (छत्रपती शिवाजी महाराज चौक) येथील भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कार्यालयात जुचंद्र परिसरातील नव्याने तयार केलेल्या महिला बचत गटासाठी पहिल्यांदाच मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. वसई विधानसभा आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई पाटील यांच्या नेतृत्वात महिला मोर्चाच्याहर्षलाप्रविण गावडे यांनी आयोजन केले होते. ह्या महिला बचत गटाच्या मार्गदर्शन शिबिराला वसई पूर्व दक्षिण मंडळाचे अध्यक्ष उदय शेट्टी, अल्पसंख्यांक महिला मोर्चाच्

Read More

‘उदयपूर फाइल्स’ चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, कन्हैयालाल हत्याकांडातील आरोपीची मागणी फेटाळली

उदयपूर फाइल्स कन्हैया लाल टेलर मर्डर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करत कन्हैया लाल हत्या प्रकरणातील एका आरोपीने सर्वोच्च न्यायालयात याचिका बुधवार, दि. ९ जुलै रोजी दाखल केली गेली. न्या. सुधांशू धुलिया आणि जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर मोहम्मद जावेद या आरोपीने असा दावा केला आहे की, या हत्येप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. अशावेळी जर हा चित्रपट प्रदर्शित झाला तर त्याचा प्रभाव खटल्यावर होऊ शकतो आणि परिणामी निष्पक्ष न्यायदानाच्या प्रक्रियेत बाधा आणू शकतो.

Read More

तृणमुल काँग्रेसच्या गुंडांची विधानं लक्षात घेता, कोलकाता बलात्कार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने तातडीने दखल घ्यावी!

कोलकाता लॉ कॉलेजच्या कॅम्पसमध्ये २४ वर्षीय कायद्याच्या विद्यार्थिनीवर झालेल्या क्रूर सामूहिक बलात्कारामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेची दखल म्हणून, सर्वोच्च न्यायालयाचे वकील सत्यम सिंह राजपूत यांनी भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांना खुले पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो घ्यावा आणि कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय मुक्त आणि निष्पक्ष चौकशी सुनिश्चित करण्यासाठी न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशीचे आदेश द्यावेत, अशी विनंती केली.

Read More

आणीबाणीच्या काळात संविधानाची हत्या ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल; न्यायव्यवस्थेलाही गुलाम बनवण्याचा होता हेतू

"भारतात आणीबाणी लागू करणार्‍यांनी केवळ आपल्या संविधानाची हत्या केली नाही; तर न्यायव्यवस्थेलाही त्यांचे गुलाम बनवण्याचा त्यांचा हेतू होता. या काळात लोकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्यात आले. शेवटी, जनतेचा विजय झाला, आणीबाणी उठवण्यात आली आणि आणीबाणी लादणार्‍यांचा पराभव झाला. अनेक लोकांना कठोर छळ करण्यात आला. ‘मिसा’अंतर्गत कोणालाही अटक करता येत होती. विद्यार्थ्यांनाही त्रास दिला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबण्यात आला,” असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. आपल्या ‘मन की बात’ या १२३व्या कार्यक

Read More

सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

“शिशु मंदिर हे ओडिशाच्या शिक्षण विभागातील नाडीसारखे आहे. ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारे चालवले जाणारे सरस्वती शिशु विद्या मंदिर, भारतीय पद्धती आणि मूल्यांवर आधारित सामान्य लोकांना दर्जेदार शिक्षण देण्यात अतुलनीय भूमिका बजावते,” असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील सरस्वती विद्या मंदिरात ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारा आयोजित प्रदेशिका प्राचार्य परिषदेच्या समारोपादरम्यान ते बोलत होते.

Read More

रिपब्लिकन पक्षाच्या भारत जिंदाबाद यात्रेला देशभरात उर्त्स्फुत प्रतिसाद --- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

पहलगाम मध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने सिंदुर ऑपरेशन करुन पाकिस्तानी अतिरेक्यांचा खात्मा केला .सिंदुर ऑपरेशन यशस्वी झाल्याबद्दबल भारतीय सैन्याचे आणि प्रधानमंत्री नरेद्र मोदींचे अभिनंदन करण्यासाठी तसेच सिंदुर ऑपरेशनचा विजय साजरा करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देशभरात भारत जिंदाबाद यात्रा काढण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.त्यांच्या आवाहनाला देशभरात रिपब्लिकन कार्यकर्त्यांने प्रच

Read More

ऑपरेशन सिंदूर’ ची संपूर्ण कहाणी! ऑपरेशन कसे पार पडले? – वाचा सविस्तर

दहशतवाद्यांनी केलेला पहलगाम हल्ला पाकिस्तानच्या नापाक कृत्याचे प्रदर्शन घडवून आणणारा होता. या हल्ल्यानंतर भारत सरकार पूर्णपणे एक्शन मोडवर होते. दि. २२ एप्रिल रोजी पर्यटकांना लक्ष्य करून झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’व्दारे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय पाकिस्तानवर जोरदार हल्ला करण्याची मागणी करत होते. पंतप्रधान मोदीजीच्या अनेक भाषणातून दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणाऱ्याला ‘न भूतो न भविष्यते’अशी शिक्षा दिली जाईल असेही सांगितले होते.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121