(kharghar) खारघरमधील जलमार्ग सेक्टर १६ ते बेलापूरला जोडणाऱ्या (KCR) खारघर कोस्टल रोडच्या डिझाइन आणि बांधकामासाठी शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाने (सिडको) निविदा प्रक्रिया सुरू केली. आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवेश सुधारण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प पावसाळ्यासह ३० महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने रस्त्यासाठी कोस्टल रेग्युलेशन झोनला मंजुरी दिली, ज्यामुळे बांधकाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला.
Read More
तेलंगणाच्या कामारेड्डी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या के. व्यंकटरमन रेड्डी (६६,६५२ मते) यांनी माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (५९,९११ मते) यांचा ६७४१ मतांनी पराभव केला आहे. याच मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व काँग्रेसचा संभाव्य मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले ए. रेवंथ रेड्डी (५४९१६) सुद्धा निवडणूक लढवत होते. त्यांचा ही यात पराभव झाला आहे.
पुणे : छत्रपती संभाजीनगर येथील मौलाना अब्दुल कादिर याने छत्रपती संभाजी महाराज यांचा मारेकरी औरंगजेब याच्याबद्दल गौरवोद्गार काढत औरंगजेब हा त्याचा आदर्श असल्याचे विधान केले आहे. हा मौलाना बीआरएस या पक्षाचा पदाधिकारी आणि नेता आहे. त्याच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पुण्याच्या पोलीस आयुक्तांकडे राष्ट्रप्रेमी नागरिकांनी केली आहे. याबाबतचे निवेदन भाजपा ग्रीकॅास किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य संयोजक राहुल प्रेमराज भोसले यांनी दिले आहे.
अमूक एक राजकीय पक्ष हा तमूक एका राजकीय पक्षाची ‘बी टीम’ आहे, हे रोजच्या रोज कानी पडणारे विधान. त्यामुळे एखादा नवा भिडू राजकारणात आला रे आला की, तो लगेचच भाजपची ‘बी टीम’ ठरतो. म्हणजे आम आदमी पक्षाचेच बघा. काँग्रेस आणि भाजप, अशा दोन्ही पक्षांचा हा विरोधकच; पण तरीही ‘आप’वर अधूनमधून ते भाजपची ‘बी टीम’ असल्याचे तथ्यहीन आरोप केले जातात. आता तशीच स्थिती तेलंगणमधून महाराष्ट्रात पाय पसरू पाहणार्या केसीआर यांच्या ‘भारत राष्ट्र समिती’ची.
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या राजकीय पर्यटक असल्याचे तेलंगणाचे मंत्री व भारत राष्ट्र समिती पक्षाचे कार्याध्यक्ष के. टी. रामाराव यांनी म्हणटले आहे. प्रियांका गांधीची तेलंगणात सभा होणार आहे. त्यामुळे भारत राष्ट्र समितीचे सर्वसमावेशक धोरण काँग्रेसने समजून घेण्याची गरज आहे. काँग्रेस हे एक बूडते जहाज आहे. बेरोजगार राजकीय नेते तेलंगणाच्या युवकांना भडकावत आहेत, अशी टीका ही केटीआर यांनी केली.
‘घरात नाही कौल, रिकामा डौल’ अशीच सध्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अवस्था. म्हणजेच गरीब असतानाही श्रीमंतीचा डौल करण्याचा थाट! ठाकरे अर्थो‘अर्थी’ तसे अजूनही श्रीमंत असले तरी माणसांची, कार्यकर्त्यांची श्रीमंती मात्र ते त्यांच्याच कर्तृत्वाने कधीच गमावून बसले आहेत. पक्ष फुटला, सत्ता हातची गेली, खुर्चीही सोडावी लागली. तरी जनता, शिवसैनिक आपल्याच पाठीशी असल्याच्या फुटकळ आशावादावर त्यांचे राजेशाही थाटात गुजराण सुरू दिसते. काल ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही याचेच प्रत्यंतर दिसून आले. खरंतर शरद पवारांनी नि
ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, केसीआर वगैरे इतर इच्छुक नेते नितीशकुमारांचे नेतृत्व मान्य करतील का? राजकीय क्षेत्रात वेगळा आणि रोख व्यवहार असतो. नितीशकुमार या नावाला जरी वलय असले, तरी त्यांचे राजकीय कर्तृत्व मायावती, ममता बॅनर्जी, केजरीवाल वगैरे स्वबळावर एका राज्याची सत्ता मिळवू शकलेल्या नेत्यांच्या तुलनेत फार कमी आहे.
यशवंत सिन्हा यांच्यासारख्या एकेकाळच्या मातब्बर नेत्यास उमेदवारी देऊनही विरोधी ऐक्यास त्याचा लाभ झालेला नाही. कारण, भाजपने द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारीद्वारे देशातील वनवासी समाजाला न्याय दिला आहे. त्यामुळे देशातील अनेक प्रादेशिक पक्षांना आपली भूमिका बदलणे भाग पडले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची केवळ औपचारिकताच उरली आहे. मात्र, पुढे होणार्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्येही विरोधी ऐक्य ढेपाळणार असल्याचे स्पष्ट संकेत यामुळे मिळाले आहेत.
तेलंगणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना घराणेशाहीच्या पक्षांवर जोरदार हल्ला चढविला. तेलंगणमधील ‘केसीआर’ सरकार हे भ्रष्टाचारात बुडलेले असून आता राज्यात भाजप परिवर्तन घडविणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.