पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेश उत्सव २०२५ मध्ये उत्कृष्ट सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या गणेश मंडळांचा गौरव करण्यात आला. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश गेला आहे.
Read More
मुंबईचा सार्वजनिक गणेशोत्सव चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनाशिवाय अपूर्ण आहे. उत्सवाबरोबरच सामाजिक भान जपणारे मंडळ अशी ओळख आहे चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची.
भारताची कलात्मक अभिव्यक्ती आणि समाजजागृती यामध्ये मोलाचे योगदान असलेल्या डॉ. भूपेन हजारिका यांचे जन्मशताब्दी दि. ८ सप्टेंबर रोजीवर्ष सुरु होत आहे. भूमेनदांनी त्यांच्या संगीत सेवेने देशातील जनतेच्या आशा आकांक्षाचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या रचना आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. त्यांच्या जनशताब्दी वर्षारंभाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलेल्या भावना..
शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या रा. स्व. संघाचे क्षितिज किती अफाट विस्तारलेले आहे, त्याचे दर्शनच सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या तीनदिवसीय व्यापक उद्बोधनातून झाले. हिंदूराष्ट्र, मुस्लीम मानसिकता, संस्कृती, राजकारण, रोजगार अशा मानवी आयुष्यातील प्रत्येक बिंदूंना स्पर्श करणारे सरसंघचालकांचे विचारामृत हे संघाच्या आजवरच्या प्रवासाची फलश्रुती आणि भविष्याची दिशा स्पष्ट करणारे असेच...
गणेशोत्सवाचा सण म्हटला, तर कोकण आपसूकच डोळ्यांसमोर तरळते. गणेशोत्सवातील पर्यावरणपूरक सजावटीच्या जनजागृतीला आता कुठे सुरुवात झालेली असतानाच, तळकोकणातील लोकांनी पर्यावरणपूरक सजावटीची कास परंपरेतूनच धरली आहे. ‘माटी’ या स्वरुपात धरलेली ही कास नेमकी या आहे, याविषयी या लेखातून जाणून घेऊया...
International Owl Awareness Day (IOAD) raises awareness about our beloved nocturnal raptors annually on August 4. Owls have long captivated us with their mystery and perceived wisdom, but their representation in pop culture media, folklore, and material possessions does not always do these magical creatures justice. Despite their prominence in diverse international cultures, we often unintentionally harm our beloved owls. American Bird Conservancy and Partners in Flight (PFI) suggests that a third or more
घुबड आणि लक्ष्मीदेवी यांचा सहसंबंध समजून घेताना ऋग्वेदाच्या खिलसूक्तामधे आलेल्या श्रीसूक्ताचा विचार आपल्याला करावा लागेल. याचे कारण ऋग्वेद हा भारतीय संस्कृतीचा मूळ आधार मानला जातो (international owl awareness day).
रानपिंगळा म्हणजे छोट्या आकाराची घुबड प्रजाती. आपल्या भागात सामान्यपणे सर्वत्र आढळणाऱ्या ठिपकेवाला पिंगळा या घुबडा प्रमाने दिसणारा व साधारणता त्याच आकाराचा. भारतातील एकमेव दिवसा वावरणारा छोटा घुबड (international owl awareness day).
जनतेने आपल्या परिसरात सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या व्यवहाराबद्दल निडरपणे पोलिसांना माहिती द्यावी. जनतेच्या सहकार्याने कामठी शहर अमलीपदार्थ मुक्त करू, असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
सध्या मान्सून सक्रीय झाला असून पावसाळ्यात ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा देण्यासोबतच ग्राहक व कर्मचारी यांच्या विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. त्यासाठी स्थानिक पातळीवर तात्काळ उपाययोजना कराव्यात. कोणत्याही कारणामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी स्वरूपात किंवा दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करून खंडित विजेचा कालावधी कमीत कमी राहील याची दक्षता घ्यावी असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी बुधवारी (दि. १८) दिले.
संगीत क्षेत्रात प्राविण्यप्राप्त असलेले रवींद्र पोंक्षे. सामाजिक जाणिवेतूनअनेक वर्षे त्यांनी रचनात्मक कार्य केले. संगीतकार आणि संवेदनशील कलाकार म्हणून ही स्वतःचा ठसा उमटवणार्या रवींद्र पोंक्षे यांच्या कलाक्षेत्रातील योगदानासह सामाजिक भानही लक्षणीय आहे. त्यांच्या विचारकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
जय श्रीराम… जय शिवराय! "धर्मो रक्षति रक्षितः" या सनातन विचारातून प्रेरणा घेत नवी मुंबईत कार्यरत स्वराज्य सामाजिक संस्था व स्वराज्य मावळा प्रतिष्ठान या संघटना समाजाच्या रक्षणासाठी अविरत कार्यरत आहेत. या मुलाखतीमध्ये आपण जाणून घेणार आहोत — स्वसंरक्षणासाठी राबवले जाणारे प्रशिक्षण उपक्रम लव्ह जिहाद व लेंड जिहादविरोधातील सजग भूमिका धार्मिक-सांस्कृतिक जागृतीचे प्रयत्न आणि भविष्यातील कार्ययोजना गुरुनाथ मुंबईकर आणि संजय उलवेकर हे दोघेही केवळ वैयक्तिक पातळीवर नव्हे, तर आपल्या कुटुंब आणि मित्र परिवारासह या का
आज शाश्वततेच्या दृष्टीने आपल्या सर्वांना जागरूक होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार दि. ४ जून रोजी केले.
सार्वजनिक स्वच्छता, त्याविषयीची जनजागृती याविषयी व्यापक मोहिमा राबवून पर्यावरणाच्या शाश्वततेचे व्रत घेतलेल्या पुण्यातील सत्या नटराजन यांच्याविषयी...
(Cancer awareness campaign at kalyan and dombivali) राज्य सरकार आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहिम पार पडली. या मोहिमेला आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ला आणि असंसर्गजन्य रोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांच्या पुढाकाराने ही मोहीम पार पडली.
हल्लीचा जमाना हा ऑनलाईन खरेदीचा. तरीही ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांचे हक्क, अधिकार यांच्याविषयीची जागरुकता अभावानेच दिसून येते. पण, ई-कॉमर्सच्या युगात ग्राहकांनी खरेदी करताना खबरदारी घेण्याबरोबरच, आपले हक्क समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे. आज ‘जागतिक ग्राहक दिना’निमित्ताने याबाबतचा घेतलेला सविस्तर आढावा...
गेल्या काही वर्षांत वाढलेल्या सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांची संख्या चिंताजनक म्हणावी लागेल. म्हणूनच नागरिकांनी सायबर गुन्ह्यांची तत्काळ तक्रार करावी, यासाठी हेल्पलाईन क्रमांक, हेल्पलाईन संकेतस्थळ अशी व्यवस्थादेखील सरकारतर्फे उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सरकार, रिझर्व्ह बँकेसह अनेक स्वयंसेवी संस्था, व्यक्तींद्वारेही या गुन्ह्यांबाबत जागरुकता वाढविण्याची मोहीम राबवली जात आहे. तरीही फसवणूक होणार्यांचे प्रमाण आणि अशा गुन्ह्यांमधील रक्कम यांचे प्रमाण मोठे आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगणे हाच यावरील प्रभावी
‘मातृशक्तीचा जागर आणि कॅन्सरमुक्त राहो प्रत्येक घर’ हे ब्रीदवाक्य घेऊन सेवाकार्य करणार्या नवी मुंबईच्या डॉ. दिपाली बापूराव गोडघाटे यांच्या सम्यक विचारकार्यांचा मागोवा घेणारा हा लेख...
आज अन्नाची होणारी नासाडी ही फार मोठी समस्या आहे. देशासमोरील उपासमारीच्या समस्येवर अन्नाची नासाडी थांबवणे हा सुद्धा एक पर्याय आहे. यासाठीच संतजनांनी सुद्धा अन्नाच्या ब्रह्मशक्तीची आणि त्याच्या महत्त्वाची जाणीव वेळोवेळी करून दिली. तीच जाणीव नव्या रुपात करून देण्यार्या आणि गरजुंची क्षुधातृप्ती करणार्या रेस्टोरेंट क्रिकेट लीगविषयी...
पश्चिम महाराष्ट्र प्रांतात दि. ११ ते दि. १९ जानेवारी या कालावधीत ‘सेवा सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले होते. समाजाला (कुटुंबांना) रा. स्व. संघाची ओळख व्हावी, संघकार्याची (सेवाकार्यांची) माहिती मिळावी व प्रत्यक्ष संघ/सेवा कार्यातील त्यांचा सहभाग वाढीस लागावा, तसेच सेवा वस्तीतील कुटुंबांच्या सशक्तीकरणाच्या प्रक्रियेस पूरक सहकार्य ‘कुटुंब प्रबोधन गतिविधी’तील ( Kutumb Prabodhan Gatividhi ) दोन उपक्रमांमधून मिळून त्यास चालना मिळावी, असा हेतू यामागे होता. तसेच ‘कुटुंब प्रबोधना’च्या वेगवेगळ्या आयामांच्या विस्ताराचाही
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त ‘सागरी सीमा मंचा’तर्फे वेसावे (वर्सोवा) ते धाकटी डहाणू अशी उत्तरेकडील किनारपट्टीवरील किल्ले, जलदुर्ग व बेटांवर परिक्रमा आयोजित करण्यात आली होती. दि. ९ ते दि. १२ जानेवारी या कालावधीत ही परिक्रमा ( Ocean Tour ) यशस्वीरित्या पार पडली. या परिक्रमेचा मागोवा या लेखात घेतला आहे.
मुंबई : जे आमचे आहे, ते आम्हाला मिळालेच पाहिजे, अशी भावना मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी व्यक्त केली. रविवार, दि. २९ डिसेंबर रोजी बालाजी मंदिर वरळी येथे आयोजित आरंभ गर्जना सोहळा धार्मिक विधीला ते उपस्थित होते.
social awareness आज, दि. 20 डिसेंबर रोजी पुणे येथे सायंकाळी 5 वाजता ‘भाऊबीज निधी’ समर्पण सुविख्यात लेखिका व माध्यमतज्ज्ञ शेफाली वैद्य यांच्या हस्ते ‘महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण’ संस्थेस सुपूर्द करण्यात येणार आहे. त्यानिमिताने ‘भाऊबीज निधी’ संकल्पनेचा इतिहास व ओळख या लेखाद्वारे करून देत आहोत.
मुंबई : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी प्रशासन सज्ज झाले आहे. २० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यात जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी निवडणूक यंत्रणा सर्वांना आवाहन करत आहे. विधानसभा निवडणुकीत राज्याचं मतदानाचं प्रमाण वाढावं असं उद्दिष्ट राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं समोर ठेवलंय आणि त्यासाठी राज्यभर मतदार ( Voters ) जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत.
मी, मैत्रेय दादाश्रीजी, मैत्रीबोध परिवाराच्या वतीने, 'तरुण भारत' सारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्राने आम्हाला आज आमंत्रित केल्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो. काही आध्यात्मिक मर्यादा असल्यामुळे स्वतः प्रत्यक्ष हजर राहता आले नाही, त्याबद्दल क्षमा असावी. परंतु आजचा विषय हा सद्य वेळेस अनुरूप आणि अतिशय महत्त्वाचा असल्याकारणाने, आपले मत मांडण्यापासुन स्वतःला रोखता आले नाही.
भारतामध्ये स्तनांच्या कर्करोगाचे दरवर्षी नव्याने सुमारे अडीच लाख रुग्ण आढळतात. दरवर्षी ऑक्टोबर महिना हा ‘स्तन कर्करोग जनजागृती’ महिना म्हणून पाळला जातो. त्यानिमित्ताने स्तनाच्या कर्करोगामागची कारणे काय आहेत? त्याची लक्षणे कशी ओळखावी? या आजारावर कोणकोणत्या उपचार पद्धती आहेत? ‘स्तन कर्करोग जनजागृती महिना’ म्हणजे काय? २०२४च्या स्तन कर्करोग जनजागृतीची संकल्पना काय आहे? याविषयी इत्थंभूत माहिती जाणून घेण्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने डोंबिवलीतील ‘अनिल कॅन्सर क्लिनिक’चे संस्थापक अणि कॅन्सरच्या सुमारे २५ हजारांहून
(Konkan) विषारी सापांचे माहेरघर कोकणचे किनारी सडे Species & Habitats Awareness Programme. The First Ever Wildlife Video Series In Marathi.
सामाजिक समस्येवर प्रबोधन करणारे देखावे सार्वजनिक गणेशोत्सवात सादर केले जातात. ठाण्यातील जिजामातानगर येथील चैतन्य मित्र मंडळाने गणेशोत्सवाच्या देखाव्यातून "वेळीच ओळखा... नशेचा विळखा" हा विषय घेत नशेच्या आहारी जाणार्या तरुणाईला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. आजची तरुणाई नशेच्या आहारी जाऊन आपलं अस्तित्व, कुटुंब सर्वच गमावून बसते. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. म्हणूनच चैतन्य मंडळाचा हा देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
पावसाळ्यात सर्पदंशाचे (snake bite) प्रमाण वाढते. सर्पदंशाच्या भीतीनेच बहुतांश वेळा सर्पदंश झालेल्या व्यक्तीचा मृत्यू होतो. गोरेगावच्या आऱे दुग्ध वसाहतीमध्ये काही दिवसांपूर्वीच एका महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाला. शहरी भागातही सर्पदंशाचे (snake bite) प्रमाण अधिक आहे. असे असूनही त्यासाठी गरजेची असलेली अत्यावश्यक सेवा सहजरित्या उपलब्ध होत नाही. त्यानिमित्ताने या लेखातून सद्यःपरिस्थितीचा घेतलेला हा आढावा...
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो,मुंबई विभागाच्या माध्यमांतून दि. १३ जून २०२४ पासून नशा मुक्त भारत पंधरवडा हा स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे. दि. १७ जून २०२४ रोजी दादर स्थानकाजवळ अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमात ८०० हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. ज्यात आरपीएफ कर्मचाऱ्यांचा ही सहभाग होता. यावेळी अंमली पदार्थ विरोधी ई-प्रतिज्ञापत्राचा प्रचार करण्यात आला.
सुमारे वीस वर्षांहून अधिक काळ राजे एडवर्ड स्मारक अर्थात केईएम रुग्णालयात तंबाखू बंद क्लिनिक द्वारे तंबाखू व्यसनाधीन रुग्णांवर उपचार आणि समुपदेशन केले जात आहे. हे क्लिनिक आता अद्ययावत करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने बजाज इलेक्ट्रिकल फाउंडेशन यांच्याशी सामंजस्य करार केला आहे.
दि. १ मे १९६० या दिवशी मराठीला एक स्वतंत्र ओळख मिळाली. तोवर मराठीचा वापर, तिचा उपयोग व्यवहारात होता, परंतु भाषेला म्हणावी तशी प्रतिष्ठा नव्हती. भाषेला जेव्हा सत्तेची जोड असते, तेव्हा तिचा पैस, तिचा विस्तार चौखूर उधळतो. शिवकालापासून ते पेशवाईपर्यंत मराठीने हिंदुस्थानावर राज्य केले. होळकर, शिंदे, पवार अशा नावांच्या आधाराने तिने धार, इंदूर, माळवा, दिल्लीपर्यंत मजल मारली. त्यानंतर फंदफितुरी, लाचारी बळावली आणि फिरंगी भाषेचा कराल मेघ हिंदुस्थान ग्रासून राहिला. स्वातंत्र्य मिळवलं. आता सत्तेची परिभाषा बदलली होती. भ
मुंबईला हिवताप मुक्त करण्यासाठी विविध यंत्रणेच्या संयुक्त प्रयत्नांसह नागरिकांचा सहभाग वाढवण्याचे मिशन बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. याचाच भाग म्हणून हिवताप नियंत्रणासाठी जनजागृती करतानाच नागरी सहभाग वाढवण्यासाठीचे विशेष प्रयत्न महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक ९ व पोलीस चौकीजवळ असणाऱ्या जागेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाद्वारे विशेष जनजागृती प्रदर्शन नुकतेच आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाला नागरिकांचा व विशेष करून लहानग्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याच प्रदर्शनात असणारा आग विझवणारा 'फायर रोबो' हा सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला, असे मुंबई अग्निशमन दलातर्फे कळविण्यात आले आहे.
सध्या निवडणुकांचा ज्वर आहे. प्रचाराचे संदर्भही बदलले आहेत. तथापि, लोकशाहीतील ही सर्वात महत्त्वाची प्रक्रिया असल्याने, त्यास कोणतेही गालबोट लागता कामा नये आणि निवडणुका आपल्या अवाढव्य देशात सुरळीत पार पडाव्यात, म्हणून कालानुरूप निवडणूक आयोगाने देखील उपाययोजना केल्या आहेत. त्यांच्या या प्रसार कार्याची प्रशंसा होत आहे, तर दुसरीकडे प्रचारकार्य मात्र काही जणांनी वेगळ्याच वाटेवर आणून ठेवलेले दिसते.
कर्करोग... काही वर्षांपूर्वी फार क्वचित कानावर पडणारा हा शब्द हल्ली वारंवार कानी पडतो, वाचनात येतो. आपल्या कुटुंबात, आप्तेष्टांमध्ये, मित्रपरिवारामध्ये अमूक एका व्यक्तीला कर्करोग झाल्याची बातमी धडकते आणि आपल्याही मनात ‘मला तर कर्करोगाचे निदान होणार नाही ना’ हा विचार क्षणभर स्पर्श करुन जातो. तेव्हा, असा हा काही वर्षांपूर्वी फार अंतरावर वाटणारा कर्करोग आता मानवी जीवनशैलीच्या अगदी समीप येऊन ठेपलेला. परंतु, त्याविषयी सामान्यांना पुरेशी आणि शास्त्रीय माहिती नाही. तेव्हा, आज दि. ७ एप्रिल या ‘जागतिक आरोग्य दिना’नि
ग्रामीण महिलांच्याउपस्थितीत पहिल्यांदाच आयोजित केलेला महिला सशक्तीकरण सोहळा रविवार, दि. १० मार्च रोजी वाडा तालुक्यातील गालथरे गावातील गोवर्धन ईकोव्हीलेज येथे यशस्वीरित्या पार पडला. या सोहळ्याचे शब्दचित्रण या लेखात केले आहे.
आगामी निवडणुकांचे वेध लागल्याने ठाणे जिल्हा निवडणुक विभागही सज्ज झाला आहे. यासाठी मतदार राजाचे अमूल्य 'मत' त्रिस्तरीय सुरक्षाकवचामध्ये सुरक्षित असल्याचे प्रात्यक्षिक ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दाखवण्यात येत आहे.
दैनंदिन जीवनात डिजिटल माध्यमांचा आपण प्रामुख्याने वापर करत असतो. डिजिटल माध्यमांचा वापर करत असताना अनेकदा सायबर क्राईम घडण्याची दाट शक्यता असते म्हणूनच विवा महाविद्यालयातील बीएएमएससी विभाग (मराठी) आणि इका फाऊंडेशन विरार यांच्या संयुक्त विद्यमाने बापूजी बाबाजी जाधव स्मारक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, चांदिप येथे डिजिटल जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.
माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत पर्यावरण संवर्धन व संरक्षण याचे महत्व शालेय ,स्तरावर बाल वयात विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीद्वारे बिंबवण्यासाठी शासन निर्णयाद्वारे राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये "पर्यावरण सेवा योजना" पनवेल महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १४ फेब्रुवारी गोखले एकज्युकेशन सोसायटी हायस्कूल खारघर येथे महापालिकेच्यावतीने ‘आकाश’ या विषयावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस)च्या एमबीए व एमसीए च्या विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे कटाक्षाने पालन करण्याचा निर्धार केला.
राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) च्या वतीने शुक्रवार, ३ नोव्हेंबर रोजी भ्रष्टाचार निर्मुलनासाठी 'दक्षता जागरूकता सप्ताहाअंतर्गत' 'वॉकेथॉन' आयोजित करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता मुख्य दक्षता अधिकारी यू. दिनेश शानभाग यांच्या हस्ते या वॉकेथॉनचा शुभारंभ करण्यात आला.
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणांवरून स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे. पर्यावरणात, वन्यजीवांवर आणि संशोधनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या पर्यावरणातील नवदुर्गांच्या कार्याचा हा अल्पपरिचय...
शिक्षणाच्या मुळाशी ’विनय’ असायला हवा, या संदर्भातील लोकप्रिय सुविचार ‘विद्या विनयेन शोभते’ हा आजही तितकाच लोकप्रिय आहे. त्यानुसार आचरण करणार्या ठाण्यातील कायदेतज्ज्ञ विद्या मोहिते या आहेत. सामाजिक बांधिलकी जपणार्या आजच्या युगातील त्या नवदुर्गाच आहेत.
“या जन्मी मनुष्य म्हणून जन्म मिळणे हे मागच्या जन्मीचेच पुण्य आहे. त्यातही या जन्मात भारतात हिंदू म्हणून जन्माला येणे हे त्याहून जास्त भाग्यच आहे. या कोवळ्या वयात आत्मभान, समाजभान असणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी वेळोवेळी पालकांसह शाळेचेही मार्गदर्शन असतेच. आपल्या भोवती समाजात अनेक बर्या वाईट घटना घडत असतात. त्या घटनांची सत्य परिस्थिती दाखविण्याचे काम ‘संवाद आपल्या कन्यांशी’ या सभेमार्फत होत आहे, याचा विशेष आनंद आहे,” असे प्रतिपादन ‘सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी’चे सरकार्यवाह हेमंत देशपांडे यांनी के
मेडटेक लाईक या भारतातील जुन्या व विश्वासू हेल्थकेअर कंपनीने नुकताच पोलीसांच्या शारीरिक मानसिक ताणतणावाच्या जनजागृतीसाठी शहरातील २१ पोलीस स्थानकात कार्यशाळा घेतली. याव्यतिरिक्त ताणतणाव, दबाव यावर मात करण्यासाठी कार्यशाळा घेतानाच 'स्ट्रेस मॅनेजमेंंट ' वर परिसंवाद घेतला. याप्रसंगी मुंबईतील २१ स्थानकात बीपी मॉनिटरिंग मशीन बसवण्यात आले आहे. याचा नियमित आढावा घेण्यासाठी या कार्यशाळेचा उद्देश राहणार आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित अनेक बाबींवर चर्चा होते. परंतु, त्यांनी समाजाला दिलेली काव्याची देणही तितकीच कालातीत आहे. कोणत्याही काळात समाजप्रबोधन करणारी आहे. काळाच्या पुढचे पाहणारी आहे. म्हणून त्यांच्या १८९८ पासून ते १९२९ पर्यंत लिहिलेल्या कवितेतील काही निवडक, भावगर्भित कवितांच्या ओळींचे रसग्रहण करण्याचा केलेला हा प्रयत्न...
‘राखूया सृष्टीचे भान, करूया निसर्गाचा सन्मान’ हे ब्रीदवाक्य घेऊन ‘सृष्टीभान’ संस्था कार्यरत आहे. ही नोंदणीकृत संस्था असून, शहराच्या आसपास नष्ट होत चाललेली जैवविविधता व उपलब्ध असलेला निसर्ग व जैवविविधता याचा अभ्यास व नोंदणी करून त्याची जनजागृती करण्याचे काम करते. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ म्हणत निसर्गसृष्टीशी तादात्म्य पावत संस्था अंखड कार्यरत आहे. अशा या पर्यावरण रक्षणासाठी झटणार्या संस्थेच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख...
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील अवयवदानाशी संबंधित सर्व समस्या सोडविण्यासाठी आणि अवयवदानाबाबत अधिकाधिक प्रमाणात प्रसार करण्याच्या दृष्टीकोनातून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग काम करणार आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुगणालयात ‘अवयवदान जनजागृती अभियान’ उद्यापासून राबविण्यात येणार असलयाचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.