पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मागील दहा वर्षांत देशात अनेक महत्त्वाचे पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्णत्वास आले, तर हजारो प्रकल्पांची कामे निर्माणाधीन आहेत. त्यापैकीच एक म्हणजे समर्पित रेल्वे कॉरिडोर. या प्रकल्पामुळे मालवाहतुकीला ( Rail Freight Transport ) गती आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळणार आहे. ऑस्ट्रेलियातील ‘न्यू साऊथ वेल्स विद्यापीठा’ने नुकत्याच केलेल्या अभ्यासात, भारतातील समर्पित मालवाहतूक कॉरिडोर देशाच्या जीडीपीमध्ये १६ हजार कोटी रुपयांची भर घालण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Read More