हैद्राबादमधील पुप्पलागुडा येथे राहणाऱ्या एका सहा वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत मुलीचे नाव मिधुन असून ती मूळ तेलंगणाच्या जनगाव जिल्ह्यातील कोट्टापल्ली गावातील गोविंद अशोक आणि अनुषा यांची मुलगी होती.
Read More
2020-21 साली शेतकरी संघटना आणि त्यांच्या नेत्यांनी आंदोलनाच्या नावाखाली दिल्लीची चौफेर नाकाबंदी केली. त्यावेळी केंद्र सरकारच्या तीन प्रस्तावित कृषी कायद्यांविरुद्ध या शेतकर्यांचा असंतोष उफाळून आला होता. इतका की, हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेले शेतकरी पोलीस, न्यायालयाचे आदेश यांपैकी काहीएक जुमानण्याच्या मनस्थितीत नव्हते. दि. 26 जानेवारी 2021 रोजीच्या प्रजासत्ताकदिनी या तथाकथित शेतकर्यांनी ट्रॅक्टर दिल्लीत उधळून अक्षरश: धुमाकूळ घातला. एवढेच नाही तर ठिकठिकाणी दगडफेक, जाळपोळ करून राजधानीला वेठीस धरले. त
(Sharmistha Panoli Arrest Case) कोलकाता पोलिसांनी अटक केलेल्या हिंदू सोशल मीडिया इन्फ्लुएंसर शर्मिष्ठा पानोली हिला तुरूंगात मूलभूत सुविधा नाकारल्या गेल्याचा आणि तिला धमक्या मिळाल्याचा आरोप तिच्या वकिलांनी केला आहे. शर्मिष्ठाचे वकील मोहम्मद समीमुद्दीन यांनी यासंदर्भात अलीपूर न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच न्यायालयाने ४ जूनपर्यंत या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
(Sheikh Hasina) बांगलादेशाच्या अंतरिम सरकारने माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पासपोर्ट रद्द केल्याची माहिती समोर येत आहे. बांगलादेशातील विद्यमान अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते आहे. शेख हसीना यांच्यासह आणखी ९७ जणांचे पासपोर्ट रद्द करण्यात आले आहेत.
(Israel) इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि माजी संरक्षण मंत्री योव्ह गॅलंट तसेच हमासच्या लष्करी कमांड यांच्याविरोधात युद्ध आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी हेग स्थित इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट (ICC) अर्थात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने गुरुवार दि. २१ नोव्हेंबर रोजी अटक वॉरंट जारी केले आहे.
(fake notice) राज्यात मागील काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात सायबर गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सायबर चोरटे फसवणुकीसाठी विविध प्रकारच्या क्लृप्त्या वापरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. अनेक नागरिकांना आयुक्तांच्या नावे सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप, ई-मेल, तसेच मेसेज व फोन करून कायदेशीर कारवाईचा धाक दाखवून अटक करण्याची धमकी दिली जात आहे. असे कॉल आल्यास अथवा मेसेजेस आल्यास न घाबरता थेट पोलिसांशी संपर्क साधा, असे अवाहन मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केले आहे.
पुणे न्यायालयाने मनोज जरांगेंचे अटक वॉरंट रद्द केल्याची माहिती पुढे आली आहे. एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी जरांगेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यानंतर आज ते पुणे न्यायालयात हजर झाले होते. दरम्यान, आता त्यांचे अटक वॉरंट रद्द करण्यात आले आहे.
मनोज जरांगे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप असून पुणे न्यायालयाने ही अटक वॉरंट काढली आहे. त्यामुळे आता जरांगेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नोएडातील ग्रॅण्ड ओमॅक्स सोसायटीत महिलेशी शिवीगाळ करणाऱ्या श्रीकांत त्यागीच्या मुसक्य नोएडा पोलीसांनी अखेर आवळल्या आहेत. त्यागीवर २५ हजार रुपयांचे इनाम होते. त्याचे तीन साथीदारही गजाआड झाले आहेत. त्यागीच्या अटकेनंतर पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या काळातील कायदा सुव्यवस्था चोख असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यागी फरार होता. त्याची माहिती मिळवण्यासाठी नोएडा पोलीसांनी एक शक्कल लढविली.
पत्राचाळ घोटाळ्यातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या संजय राऊतांना ईडीकडून अटक झाल्यानंतर आता त्याच प्रकरणातील दुसरे प्रमुख नाव असलेल्या वर्षा राऊत याही ईडीच्या रडारवर आल्या आहेत
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी भाजपचे कल्याण शहर कार्यालय तोडले. त्यावर संतप्त झालेल्या भाजपने बाजारपेठ पोलिस ठाणे ते शिवाजी चौकार्पयत मोर्चा काढला. तसेच शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन केले. ज्या शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे त्यांना अटक करा अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप पदाधिका:यांनी पोलिसांना दिला आहे.