संवाद साधने नसतानाही यशस्वी सत्याग्रह...
मला आठवतंय, मी नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती आणि महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. त्यावेळी आणीबाणी म्हणजे काय, ती का लादली गेली, त्यामागचे राजकारण काय इत्यादी काहीच सखोल कळले नाही. पण, सर्व स्वातंत्र्यावर गदा आली आहे, वर्तमानपत्रावर बंदी, संघावर बंदी, भाषणस्वातंत्र्यावर बंदी हे सर्व जरा विचित्र आहे, अन्यायकारक आहे, हे समजण्यासारखे वय होते, एवढे नक्कीच. हा अन्याय दूर झाला पाहिजे, अशी साद माझ्यातील तरुण रक्ताने मला दिली.पण, नक्की काय करायचे?
Read More