रॉकिंग स्टार यश हा केवळ स्टार नसून एक आयकॉन आहे. एक आयकॉन ज्याने आपल्या जबरदस्त आकर्षणाने देशाला वेड लावून बॉक्स ऑफिसवर विक्रम केला. 'केजीएफ २' (KGF 2)ला मिळालेल्या उदंड यशाने सिद्ध होते की यश हा एक असा सुपरस्टार आहे जो इंडस्ट्रीला दशकातून एकदा भेटतो. यश आज मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्या लीगमध्ये उभा आहे, ज्यांनी त्यांच्या शैली आणि अद्वितीय व्यक्तिमत्त्वाने अनेक दशके राज्य केले.
Read More
मेगा स्टार’ अमिताभ बच्चन यांनी गेल्या काही वर्षापासून सुरु केलेली ‘कौन बनेगा करोडपती?’ ही दूरदर्शन मालिका कमालीची लोकप्रिय ठरली होती. मनोरंजनाबरोबरच ज्ञान व धन यांचा अनोखा संगम या मालिकेत झालेला होता.
सिनेसृष्टीत अमिताभ आणि ऋषि कपूर यांनी एकत्र एक काळ गाजवलाय. अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करत त्यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. त्यापैकी अमर, अकबर अॅन्थोनी अगदी पहिल्यानंबर वर आहे. ही जोडी तब्बल २७ वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र येत आहे, "१०२ नॉट ऑउट" या चित्रपटात. या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर १ महिन्याने या चित्रपटाचे पहिले पोस्टर आले आहे. "बाप कूल, बेटा ओल्ड स्कूल" असे म्हणत खुद्द अमिताभ यांनी आपल्या इंस्टाग्राम खात्यावरुन हे पोस्टर शेअर केले आहे.
हाउसफुल थ्री नंतर चाहत्यांना अभिषेक बच्चनच्या पुढील चित्रपटाची उत्सुकता होती. अखेर अभिषेकने आज आपल्या पुढील मनमर्झियाँ या चित्रपटाचा 'फर्स्ट लुक' सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचविला आहे. यामध्ये अभिषेक शिख सरदारच्या भूमिकेत दिसून येत आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी चाहत्यांच्या मनात आणखीनच उत्सुकता निर्माण झाली आहे.