निसर्गाची किमया ही निराळीच. निसर्गाने पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला एकमेकांशी बांधून ठेवले आहे. त्यामुळे, साहजिकच प्रत्येक जीव एकमेकांवर अवलंबून आहे. त्यामुळे एखाद्या प्राण्याची टाकाऊ गोष्टदेखील दुसर्यासाठी लाखमोलाची असते. देवमाशाची उलटी ( Whale Vomate ) हा तसाच एक प्रकार होय!
Read More
वरळीतील स्थानिक मच्छीमारानी 'व्हेल' माश्याची 'उलटी' कांदळवन कक्षाकडे सुपूर्द केली आहे. संजय बैकर यांनी आपल्याकडे 'स्पर्म व्हेल' माश्याची उलटी असल्याचे सांगून ती कांदळवन कक्षाकडे हस्तांतरित करण्याची विनंती केली. ही उलटी घन स्वरुपात असून वरळीच्या लोटस जेट्टी बंदरावर, अपर प्रधान मुख्य वन संरक्षक विरेंद्र तिवारी यांच्या उपस्थितीत हे 'अंबरग्रीस' (स्पर्म व्हेलची उलटी) ताब्यात घेण्यात आले.
गेल्या महिन्याभरात मुंबईमधून 'व्हेल' या सागरी सस्तन प्राण्याच्या उलटीच्या (एम्बर्ग्रिस) तस्करीची सात प्रकरणे उडकीस आली आहेत. या माध्यमातून एकूण ६८ किलो 'एम्बर्ग्रिस' ताब्यात घेण्यात आलंय. या तस्करीमागे गुजरात आणि कर्नाटकमधील तस्करांचे धागेदोरे असल्याचे दिसून आले असून काही प्रयोगशाळाही यामध्ये गुंतल्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई हे व्हेलच्या उलटीच्या तस्करीचे केंद्रबिंदू ठरल्याचे चित्र दिसतंय.
गेल्या आठवड्यामध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शहरातील दोन ठिकाणी छापा मारून व्हेल माशाची उलटीची (एम्बर्ग्रिस) तस्करी उघडकीस आणली. मुलुंडमध्ये मारलेल्या छाप्यामध्ये २.७ किलो वजनाची व्हेलची उलटी हस्तगत करण्यात आली, तर लोअर परळ येथून ७.७५ किलो वजनाचे ‘एम्बर्ग्रिस’ ताब्यात घेण्यात आले. गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात वन्यजीवांप्रमाणेच सागरी जीवांच्या तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.