कोल्हापूर : “अलमट्टी धरणाच्या ( Almatti Dam ) पूररेषेबाबत सरकार लक्ष ठेवून आहे. त्यासाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे. समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात आला आहे. शासनाचा प्रयत्न पूरस्थिती नियंत्रणात आणण्याचा आहे. त्यासाठी आवश्यकता पडल्यास सर्वोच्च न्यायालयात जाऊ,” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. ६ जानेवारी रोजी दिली. ते नांदणी मठातील पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सव सोहळ्यात ते बोलत होते.
Read More
राज्यात गेल्या आठवड्यपासून सुरु असलेला मुसळधार पाऊस अजुणही काही दिवस तसाच चालू राहण्याचा हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे
कोल्हापूर, सांगली तसेच सांगली जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसाने कृष्णेच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कर्नाटक पाटबंधारे विभागाने अलमट्टी धरणातून १ लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या समन्वयाने कसं चांगलं होईल, उद्या १० वाजता होणार बैठक
महाराष्ट्रातील कोयना धरण भरल्यानंतर त्या धरणातून पाणी सोडावेच लागते आणि आलमट्टी धरण भरल्याशिवाय कर्नाटक पाणी खाली सोडत नाही, असे हे त्रांगडे. याबाबत दोन्ही राज्यांतील राज्यकर्त्यांना जलसमन्वय ठेवून मार्ग काढावा लागेल. त्यासाठी दोन्ही राज्यांनी समन्वय ठेवल्यास निश्चितच त्याचे रुपांतर संघर्षात होणार नाही.