अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची ताकद असणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ.शरद भुताडिया आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा देशपांडे हे दोन उत्तम कलावंत प्रथमच मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींशी जोडलेले आणि प्रामुख्याने मराठी रंगभूमीवर सक्रिय असणारे हे दोन कलावंत आगामी ‘घरत गणपती’ या चित्रपटात दिसणार आहेत.
Read More
जरतारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साज केसात नजरेचा नखरा नथीचा तोरा डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा..अशी शब्दकळा जिच्या बाबतीत म्हटली गेली ती अभिनेत्री निकिता दत्ता मराठमोळ्या अंदाजात खूपच खुलून दिसत आहे. आणि तिचा मराठमोळा अंदाज सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्यासाठी निमित्त आहे तिचा आगामी मराठी चित्रपट.. 'घरत गणपती'.
मराठी चित्रपटसृष्टीचा ५०-६० दशकाचा काळ गाजवणारे अभिनेते रमेश देव आणि सीमा देव यांनी अनेक सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांना बहाल केले. मराठीतील या जोडीने अनेक सदाहाबर गाणी देखील देऊ केली. याशिवाय त्यांनी अजिंक्य देव यांच्या रुपात एक उत्तम नट देखील मनोरंजनसृष्टीला दिला. नुकतीच अजिंक्य देव यांनी ‘महाएमटीबी’च्या Unfiltered गप्पा With कलाकार या पॉडकास्ट मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता याबद्दल त्यांनी सांगितले.
‘माहेरची साडी’ हा मराठी चित्रपटसृष्टीला आयकॉनिक चित्रपट देणारे अभिनेते अजिंक्य देव सध्या नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ (Ramayan) चित्रपटामुळे चर्चेत आहेत. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या रामायण चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणार असून दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे. आता ‘रामायण’ या चित्रपटात मराठमोळे अभिनेते अजिंक्य देव यांची एन्ट्री झाली असून अद्याप ते कोणती भूमिका साकारणार हे गुलदस्त्यात आहे.
देशात लोकसभेचे (Loksabha Elections 2024) बिगुल वाजले आहे. काही कलाकार विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारीसाठी उभे राहिले आहेत. अशात अभिनेते अजिंक्य देव यांनी व्हिडिओच्या (Loksabha Elections 2024) माध्यमातून नागरिकांना मतदानाचे महत्व आणि देशाचे एक जबाबदार नागरित म्हणून आपले कर्तव्य कसे आहे याचे महत्व पटवून दिले आहे.