कल्याण जवळील टिटवाळा मांडा परिसरात एका इमारतीवर मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. या मोबाईल टॉवरला टिटवाळा मांडा ग्रामस्थांनी कडून विरोध केला आहे. याबाबत मांडा टिटवाळा ग्रामस्थांनी टिटवाळा पोलीस स्टेशन सह कल्याण डोंबिवली महापालिकेला तक्रार केली आहे. संबंधित टॉवर उभारल्यास परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.
Read More
अंबरनाथ सारख्या जागरूक व गतिमान शहरातील ही न्यायालयाची वास्तू न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांचे प्रतिबिंब ठरेल, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनी चिखलोली-अंबरनाथ येथे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय व नूतन न्यायालयीन इमारतीचे उद्घाटनप्रसंगी केले.
मा. उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र. 24/2019 व रिट याचिका क्र.13864/2018 मध्ये पारीत केलेल्या आदेशानुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र घेतलेल्या परंतू भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न करता वापर सुरू केलेल्या इमारतींची यादी नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nmmc.gov.in यावर तसेच महानगरपालिकेची सर्व 8 विभाग कार्यालये याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या मुंब्रा परिसरातील अतिक्रमण झालेल्या जमिनीवर बांधलेल्या १७ अनधिकृत इमारती पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते, त्यावर मंगळवार, दि. १७ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देत याचिका फेटाळली आहे.
केंद्र शासनाच्या संरक्षण कार्य अधिनियम १९०३ अंतर्गत लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे जुहू परिसरातील ७५ वर्षे जुन्या २०० इमारती आणि झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास तब्बल दोन दशकांपासून रखडलेला आहे. या परिसरातील वायरलेस केंद्र बंद केल्यानंतरदेखील त्याच्या ५०० मीटरच्या परिघात कोणतेही बांधकाम किंवा पुनर्विकास करण्यास बंदी कायम आहे. परिणामी, सुमारे १ हजार कुटुंबांचे आयुष्य अंधारात अडकले आहे.
हरित इमारती निर्माणाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या व्याख्या असल्या, तरी ऊर्जावापर, पाण्याचा वापर, घरातील पर्यावरणीय गुणवत्ता, इमारतीचे उभारण्यात येणार्या जागेवर होणारे परिणाम आणि सामान्यतः इमारतींचे नियोजन, डिझाईन, बांधकाम आणि प्रक्रिया म्हणून सर्वाधिक पर्यावरणपूरक पद्धतीच हरित इमारती म्हणून स्वीकारली जाते. ‘महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण धोरण - 2025’ नव्या गृहनिर्माण धोरणात अधिकाधिक पर्यावरणपूरक इमारत उभारणीवर भर देण्यात आला आहे. त्याचा आढावा घेणारा लेख...
Repair of MHADA buildings before monsoon पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींच्या दुरुस्तीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्वसन मंडळ (म्हाडा) यांना उद्देशून पाठवलेल्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
( Guidance camp on self-redevelopment of buildings by cooperative housing societies in Panvel ) पनवेल-सिडको सहकारी गृहनिर्माण संस्था संघ मर्यादित यांच्या विद्यमाने आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या सहकार्याने 'सहकारी गृहनिर्माण संस्थाचा इमारतींचा स्वयंपुनर्विकास' या विषयावर उद्या रविवार, २३ मार्च रोजी सकाळी १० वाजता पनवेल शहरातील विरूपाक्ष हॉल, अशोक बाग (वडाळे तलाव पनवेल) समोर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु होऊन, आता तीन वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. लाखोंच्या संख्येने झालेल्या मनुष्यहानीनंतरही, हा संघर्ष थांबण्याचे नाव नाही. अमेरिकेत झालेल्या सत्तांतरानंतर या संघर्षाला पूर्णविराम मिळेल, या आशेवर कोट्यवधी लोक जगत आहेत. युद्ध ही गोष्ट भीषण आहे, पण त्याहून भयावह म्हणजे या युद्धाचा परिणाम! दुसर्या विश्वयुद्धानंतर अनेक राष्ट्रांना स्थिरस्थावर होण्यासाठी, काही दशकांचा काळ जावा लागला. या दशकांमध्ये झालेली राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थित्यंतरांमुळे, जगभरातील समाजमन ढवळून निघाले. वर्तमा
ठाणे : बाळकूम, कोलशेत, मानपाडा ढोकाळी येथील मूळ सातबारा उताऱ्यातील क्षेत्र आणि नवीन मालमत्ता पत्रक या दस्तऐवजातील नोंदीत मोठी तफावत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण होऊन यशस्वी नगरसारख्या जुन्या वसाहतीतील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. त्यामुळे मूळ सातबारा उताऱ्यातील क्षेत्र आणि मालकी हक्क कायम करून देण्याची मागणी आमदार संजय केळकर ( Sanjay Kelkar ) यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे अधिवेशनात केली.
मुंबई शहरातील दरडप्रवण क्षेत्रात सेफ्टी नेट बसवून ही क्षेत्रे अधिक संरक्षित करणे आणि तेथील नागरिकांच्या जीविताची काळजी घेणे हे आमचे प्राधान्य असून दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई बनविण्याचे आमचे लक्ष्य आहे. याचबरोबर म्हाडा, महानगरपालिका, एमआयडीसी यासह इतर शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुंबईतील विक्रोळी आणि भांडूप भागातील डोंगराळ परिसरातील झोपडपट्टीवासियांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पावसाळ्यात भूसख्खलन, दरड कोसळणे यांसारख्या दुर्घटना घडू नये यासाठी पावसाळापूर्वी नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे यासाठी महानगरपालिकेने आवाहन केले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांतर्गत असलेल्या निवासी इमारतींपैकी एकूण १८८ इमारती अतिधोकादायक आणि मोडकळीस आल्या असल्याचे आढळून आले आहे. ‘सी-१’ श्रेणीत मोडणाऱ्या या इमारतींची यादी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने ही यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.
शेअर बाजारात ज्यांना थेट गुंतवणूक करावयाची नसते, अशांसाठी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे हा एक पर्याय असतो. फिजिकल सोन्यात ज्यांना गुंतवणूक करावयाची नसते, अशांसाठी देखील हल्ली अन्य बरेच पर्याय उपलब्ध आहेत. तसेच, ज्यांना रिअल इस्टेटमध्ये थेट गुंतवणूक करावयाची नाही, अशांसाठीचा गुंतवणूक पर्याय म्हणजे ‘रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट’ अर्थात ‘रिट्स.’ आजच्या लेखात त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी दोन धोकादायक इमारतीचा भाग कोसळल्याने या इमारतीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कडोंमपा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. अशा संभाव्य घटना टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने एका विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. कडोंमपा आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांनी याबाबत लेखी आदेश दिले आहेत.
नाशिक येथील सांस्कृतिक केंद्र ‘महाकवी कालिदास कलामंदिरा’चे ’स्मार्ट सिटी’अंतर्गत सुमारे २१ कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण केल्यानंतरही नाट्यमंदिराचे शुक्लकाष्ट संपण्याचे नाव नाही. रविवार, १४ मे रोजी ’कालिदास कलामंदिरा’त एका व्यावसायिक नाटकाचा प्रयोग सुरू असताना ऐन उन्हाळ्यात वातानुकूलित यंत्रणा बंद पडली. त्यावेळी कलामंदिराचे व्यवस्थापक कहाणे जागेवर नव्हते.
मुंबई असो ठाणे अथवा पुणे किंवा नाशिक, पावसाळा आला की इमारतींच्या पडझडीच्या घटना हमखास घडताना दिसतात. त्यानिमित्ताने महानगरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न, पुनर्वसनाची समस्या आणि एकूणच परिस्थितीचा आढावा घेणारा हा लेख...
मुंबई महानगरपालिका पावसाळ्यापूर्वी दरवर्षी अनेक धोकादायक इमारतींना नोटिसा पाठवते.
कल्याण पश्चिमेतील रामबाग लेन क्र.1 मध्ये बुधवारी इमारत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही दोन मजली इमारत कोसळल्यानेे परिसरात खळबळ उडाली. या दुर्घटनेत एका व्यक्तीच्या मृत्यूसह एक जण जखमी झाला आहे. या धोकादायक इमारतीत सूर्यभान व उषा काकड हे दाम्पत्य झोपेत असतानाच हा प्रकार घडल्याने दोघेही ढिगार्याखाली अडकले. नंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. दोन इमारतींचा सामायिक जिना असल्याने मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी व जवानांनी काकड दाम
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील धोकादायक इमारती आणि दरडींखाली राहणार्या रहिवाशांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील मुंबई शहर बेटावरील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून यंदाचे वर्षी २१ इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत. या २१ इमारतींमध्ये मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या १४ इमारतींचाही समावेश आहे.
मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून अवघ्या सहा महिन्यांत कुर्ल्यामध्यें एका बेकायदा इमारतीचे बांधकाम झाल्याचे उघड झाले आहे. कुर्ला येथील कुरेशी नगर मधील चर्बी गल्ली मध्ये ही इमारत बांधली गेली आहे
सरकारी बांधकामांमध्ये प्रामुख्याने निवासी इमारती, रस्ते, पूल, धरणे, कार्यालये, इस्पितळे इत्यादी वास्तूंचा समावेश होतो. तेव्हा, या अनुषंगाने मुंबई महानगर क्षेत्रातील काही प्रमुख विकास प्रकल्पांचा आढावा घेणारा हा लेख...
विहंग ग्रुप ऑफ बिल्डर्सने बांधलेल्या विहंग गार्डन ठाणेचे बी १ आणि बी २ अशा दोन इमारती अनधिकृत असून त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश २०१२ मध्ये देण्यात आले होते. ह्या दोन्ही बी १ आणि बी २ इमारतींना अजूनही वापर परवाना (OC) मिळाला नाही. त्याचप्रमाणे या इमारतीचे ९ ते १३ क्रमांकाचे मजले अनधिकृत असल्याचे व ते ताबडतोब तोडण्याचे आदेशसुद्धा २०१२ मध्ये देण्यात आले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माहितीच्या अधिकारा खाली केलेल्या अर्जाच्या उत्तरात ठाणे महापालिककेनी त्यांना ही माहिती दिली आहे.
मुंबईत आठवडाभरात ५०० इमारतींचे निर्बंध उठवले
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पालिकेची नवी नियमावली जारी!
सील इमारतींच्या संख्येत वाढ!
नागपाड्यातील सुलतानी-मिश्रा या इमारतीचा काही भाग आज दुपारी एकच्या सुमारास कोसळला.
सर्वाधिक धोकादायक इमारती घाटकोपरमध्ये
अवाढव्य मुंबानगरीत अनेक इमारतींना अशा आगी लागतात. अशा कठीण प्रसंगात अग्निशमन दलाच्या अग्निवीरांना वा अलीकडे नेमलेल्या अग्निवीरबालांना धैर्य दाखवून संकटात सापडलेल्यांची सुटका करण्यासाठी मोठे काम करावे लागते. सरकारने व पालिकेने अशा वीरांना सहकार्य व मदत करून उत्तेजन द्यावे.
पावसाळा सुरु झाला असून पुन्हा एकदा धोकादायक इमारतींचा प्रश्न सर्वच महानगरपालिका क्षेत्रांमध्ये ऐरणीवर आला आहे.
बहरीनमधील मनामा येथे सुरू असलेल्या ४२ व्या परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे.
येत्या काही दिवसांत मान्सूनला सुरुवात होणार असून कोणत्याही परिस्थितीत एका आठवड्यात नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचे आदेश