मनुष्य म्हटलं की आनंद, दु:ख आणि भीती वाटणं हे तसं स्वाभाविकच. त्यामुळे अशाच मानवी भावभावनांचे उत्कट प्रसंग कथानकामध्ये गुंफत प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी बर्याचदा भयपटांची निर्मिती केली जाते. जरा चित्रपटसृष्टीच्या भयपटांच्या यादीत मागे डोकावून पाहिलं तर ‘भूत’, ‘राज’, ‘वास्तुशास्त्र’, ‘कृष्णा कॉटेज’, ‘फुंक’ अशी मोठीच्या मोठी यादी आहे. ९०च्या दशकात ज्यांचा जन्म झाला आहे, त्यांनी नक्कीच हे भयपट परिचयाचे असतील आणि त्यांची भांबेरी उडाली असेल. पण, कालानुरुप भयपटांच्या सादरीकरणाची पद्धत, तंत्रही बदलले आणि लहान मुल
Read More
मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा 'मुंज्या' हा चित्रपट सध्या तुफान चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटी पार करत नवा इतिहास देखील रचला. यानंतर त्यांचा 'काकुडा' हा चित्रपट आहा जिओ सिनेमा या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित झाला असून या हॉरर-कॉमेडी चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि रितेश देशमुख प्रमुख भूमिकेत आहेत. दरम्यान, सोनाक्षीने पहिल्यांदाच आदित्य यांच्यासोबत काम केले असून मराठी दिग्दर्शकासोबत काम करण्याचं महत्वाचं कारण तिने सांगितलं आहे.
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित मुंज्या हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे. अभिनेत्री शर्वरी वाघ आणि अभिनेता अभय वर्मा यांची प्रमुख भूमिका असलेला हा हॉरर कॉमेडी चित्रपट कमी कालावधीत १०० कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. बॉक्स ऑफिसवर कल्की २८९८ एडी चित्रपटाची लाट आलेली असतानाही मुंज्याने चांगलाच तग धरला आहे. मुंज्याने २० व्या दिवसापर्यंत बॉक्स ऑफिसवर ९० कोटींहून अधिक कमाई केली होती. त्यानंतर आता 'मुंज्या'ने भारतीय बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची यशस्वी कमाई केली आहे.
मराठी दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा हिंदीतील पहिला दिग्दर्शकीय चित्रपट मुंजा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. कोकणातील मुंजाची कथा या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न आदित्य यांनी केला होता. त्यांच्या या प्रयत्नाला तुफान यश मिळाले असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा पार केला आहे.
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ हा चित्रपट सध्या चित्रपटगृह आणि बॉक्स ऑफिस गाजवत आहे. मुळात म्हणजे या चित्रपटात कोणताही मोठा स्टार कलाकार नसूनही हा चित्रपट केवळ कंटेटच्या जोरावर सुपरहिट ठरला आहे. ७ जून रोजी हे कोकणातील हे भूत अर्थात 'मुंज्या' प्रेक्षकांच्या भेटीला आला होता आणि आता या चित्रपटाने १२ दिवसात ६५ कोटींचा टप्पा पार केला आहे.
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ हा हिंदी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. ७ जून २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत ३० कोटींच्या पुढे यशस्वी कमाई केली आहे. हिंदीतील पहिलाच हॉरर-कॉमेडी सुपरहिट झाल्यानंतर आदित्य सरपोतदार आणखी एक हॉरर-कॉमेडी चित्रपट भेटीला घेऊन येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा आदित्य आणि रितेश देशमुख यांची जोडी जमणार असे म्हटले जात होते आता त्यांच्या या आगामी चित्रपटावर आदित्य सरपोतदार यांनी ‘दै. मुंबई तरुण भारत’शी बोलताना शिक्कामोर्तब केला आहे.
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ हा हिंदी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. ७ जून २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत ३० कोटींच्या पुढे यशस्वी कमाई केली आहे. मुंज्या चित्रपटातील चेटुकवाडीबद्दल आदित्य सरपोतदार यांनी ‘दै. मुंबई तरुण भारत’शी बोलताना महत्वाची माहिती दिली आहे.
कोकणातील ‘मुंज्या’ हे भूत हिंदीत मोठ्या पडद्यावर साकारणारे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी आजवर मराठीतही विविध दिग्दर्शकीय प्रयोग केले. ‘उलाढाल’, ‘उनाड’, ‘नारबाची वाडी’, ‘फास्टर फेणे’, असे अनेक सुपरहिट चित्रपट देणार्या आदित्य सरपोतदार यांच्यासोबत दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला संवाद...
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित मुंज्या हा चित्रपट ७ जून रोजी प्रदर्शित झाला. कोकणातील जुन्या परंपरेवर आधारित या चित्रपटाचे कथानक असून हॉरर-कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तसेच, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही उत्तम कमाई केली असून २० कोटींचा टप्पा पार केला आहे.
हिंदी चित्रपटसृष्टी भूतमय होणार आहे असंच काहीसं म्हणण्याची वेळ आली आहे. नुकताच आदित्य सरपोतदार दिग्दर्शित मुंज्या हा हॉरर-कॉमेडी चित्रपट प्रदर्शित झाला. आता मॅडॉकच्या मेकर्सच्याच युनिव्हर्स मधील मुंज्या या चित्रपटानंतर स्त्री २ टा ट्रेलर लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे. राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'स्त्री' चित्रपटाचा हा सिक्वेल आता रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या सिनेमाचे निर्माते दिनेश विजान आणि अमर कौशिक हे एका आगळ्या वेगळ्या ट्वि
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'मुंज्या' चित्रपट सध्या प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवत आहे. शिवाय बॉक्स ऑफिस कलेक्शन देखील तुफान झाले असून प्रेक्षक चित्रपट पाहायला गर्दी करत आहेत. ‘मुंज्या’ हा ‘स्त्री’, ‘रूही’ आणि ‘भेडिया’ नंतर मॅडॉक सुपरनॅचरल युनिव्हर्सचा चौथा चित्रपट असून ती लेगसी या चित्रपटाने देखील कायम ठेवली याचा विशेष आनंद आणि कौतुक आहे. ७ जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची बॉक्स ऑफिसची कमाई समोर आली आहे.
मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य सरपोतदार याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर यामध्ये अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी यांची यामध्ये महत्त्वाची भूमिका असणार आहे.
फास्टर फेणेच्या धमाकेदार प्रदर्शनानंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे "माऊली." फाफेनंतर आता आदित्य सरपोतदार दिग्दर्शित माऊली लवकरच चाहत्यांसाठी सिनेमागृहांमध्ये येणार आहे. दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने फेसबुकच्या माध्यमातून ही माहिती दिली. प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख या चित्रपटात मुख्य भूमिका निभावणार आहे.