डोनेशियाने आपली राजधानी जकार्ता येथून ‘नुसंतारा’ या नवीन शहरात स्थलांतरित करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. जकार्ता ही इंडोनेशियाची राजधानी आणि सर्वात मोठे शहरी केंद्र. मात्र, जकार्ताचा भूभाग दिवसेंदिवस वेगाने जलमय होतोय. जकार्ताचा जवळपास ४०टक्के भूभाग आता समुद्रसपाटीच्या खाली आहे. पर्यावरण तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, जकार्ताचा एक तृतीयांश भाग २०५० सालापर्यंत जलमय होण्याची शक्यता आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी इंडोनेशियन सरकारने आपली राजधानी नुसंतारा या नवीन शहरात हलवण्याची योजना आखली आहे.
Read More
इंडोनेशियात नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी सैन्य नेते आणि संरक्षणमंत्री प्रबोवो सुबिआंतो यांनी विजय मिळवला. त्यामुळे या सत्तापरिवर्तनाने इंडोनेशियात अनेक बदल होण्याची शक्यता आहे.
जगातील सर्व सस्तन प्राण्यांपैकी ‘सुमात्रन गेंडा’ (डिसेरोरहिनस सुमाट्रेन्सिस) आणि ‘जावन गेंडा’ (र्हायनो सोनडाईकस) हे दोन मोठे सस्तन प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या काही महिन्यांतील तज्ज्ञांच्या मुलाखती आणि अलीकडील अहवाल पाहिले, तर लक्षात येईल की, या दोन्ही प्रजातींची संख्या नोंदवलेल्या स्थितीपेक्षा वाईट स्थितीत आहे
इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये जवळपास एक कोटींहून अधिक लोकं राहतात. मात्र, आता हे शहर हळूहळू बुडण्याच्या मार्गावर आहे. दरवर्षी जवळपास 25 सेंटीमीटरच्या अंतराने शहर बुडत चालले असून शास्त्रज्ञांच्या मते, हे महानगर 2050 पर्यंत पूर्ण बुडण्याची शक्यता आहे. यावर आता इंडोनेशियन सरकारनेही उपाय शोधण्यास सुरूवात केली असून त्यानुसार आता सरकार नवीन राजधानी बनविण्याच्या तयारीला लागले आहे. बोर्नियो द्वीपवर नुसानतारा हे नवी राजधानी वसवली जाणार आहे. सौरऊर्जेच्या साहाय्याने पर्यावरणपूरक अशा भव्य उंच इमारतींचे बांधकामही या