हिंदी चित्रपटसृष्टीतील पावरहाऊस अभिनेता रणवीर सिंग याने आत्तापर्यंत 'गली बॉय', 'बाजीराव मस्तानी', 'दिल धडकने दो' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नुकताच त्याचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा प्रदर्शित झाला होता आणि त्यानंतर आता तो हिंदीतील दिग्गज कलाकारांसोबत झळकणार आहे.
Read More
अभिनेत्री यामी गौतम आणि दिग्दर्शक आदित्य धार आई-वडिल झाले आहेत. १० मे अक्षय्य तृतीयेच्या शुभमहुर्तावर यामीने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. यामीने सोशल मिडियावरुन ही आनंदाची बातमी शेअर करत नव्या चिमुकल्याचे नाव काय ठेवले आहे याचाही खुलासा तिने या पोस्टमध्ये केला आहे.
जम्मू- काश्मिरमधून स्वातंत्र्यानंतर जवळपास ७५ वर्षांनी ‘कलम ३७०’ हटवण्यात मोदी सरकार यशस्वी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचा संपुर्ण इतिहास आदित्य जांभळे दिग्दर्शित आणि आदित्य धर निर्मित ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. मात्र, एक धक्कादायक बाब अशी ही ‘आर्टिकल ३७०’ हा चित्रपट आखाती देशांमध्ये दाखवण्यास मनाई करण्यात आली आहे. एका महत्वाच्या आणि राजकीय दृष्ट्या महत्वपुर्ण असणाऱ्या या विषयावरील चित्रपटाला हा मोठा धक्का आहे.
जम्मू-काश्मिरमधून ‘कलम३७० हटवण्यामागचा संघर्ष, काश्मीरचा इतिहास व आतंकवादाची पार्श्वभूमी, राजकीय हस्तक्षेप या सर्व सत्य घटनांची बांधणी आर्टिकल ३७० या चित्रपटात दिग्दर्शक आदित्य जांभळे यांनी मांडली आहे. २३ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी तर या चित्रपटाचे कौतुक केलेच, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील विशेष कौतुक केले होते. दरम्यान, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत असून या चित्रपटाने द कश्मिर फाईल्स चित्रपटाचा देखील रेकॉर्ड मोडीत काढला आहे.
जम्मू-काश्मिरमधून कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला होता. याच सत्य घटनेवर आधारित आर्टिकल ३७० हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन जम्मूच वाच्यता केली होती.
आदित्य धर निर्मित 'आर्टिकल ३७०' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यात अभिनेत्री यामी गौतम विशेष भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, प्रेक्षकांसाठी चित्रपटाच्या टीमने एक खास ऑफर आणली आहे. 'आर्टिकल ३७०' हा चित्रपट आता प्रेक्षकांना केवळ ९९ रुपयांत पाहता येणार आहे.