देशातील जगप्रसिद्ध मंदिरांवर शासनाचे नियंत्रण असून, मंदिरांचे नियंत्रण व व्यवस्थापन हिंदूंकडे देऊन मंदिरात दान येणाऱ्या धनसंपत्तीचा उपयोग हिंदू समाजहितासाठीच व्हावा. तसेच व्यसनाधीन युवक देशासाठी गंभीर मुद्दा आहे. यासाठी बजरंग दल व दुर्गा वाहिनीतर्फे जनजागृतीपर विशेष अभियान राबविले जाईल. यांसह इतर विषयांवर जळगावातील केंद्रीय प्रबंध समितीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील बैठकीत चर्चामंथन होऊन अभियानाची दिशा ठरविली जाईल, असे विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री बजरंगलालजी बागडा यांनी सांगितले.
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे रोजगार मेळाव्यात सहभागी होत विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त झालेल्या ५१ हजारांहून अधिक युवकांना नियुक्ती पत्रे वितरित केली. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी युवकांना शुभेच्छा देत देशसेवेच्या नव्या जबाबदाऱ्यांची सुरुवात केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
आजकाल ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याचे बघायला मिळत असताना, अनेक संस्था आणि व्यक्तीदेखील त्यांच्या हितासाठी पुढे येत आहेत. मात्र, हे प्रयत्न अतिशय तुटपुंजे असल्याचेही मान्य करावे लागेल. एका आकडेवारीनुसार भारतातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही २०५० सालापर्यंत, भारतातील एकूण लोकसंख्येच्या २१ टक्के असणार आहे. कालच ’लोकसंख्या दिनी’ जी लोकसंख्यावाढीबाबत आलेली आकडेवारी धक्कादायक अशीच. यामध्ये वाढ होणार असून, ती १४८ कोटींवर जाईल. पुण्याच्या दृष्टीने विचार करता, अलीकडील काळात झपाट्याने प्रगती करणार
जिल्हाधिकारी आंचल गोयल; ‘झेप: एक पाऊल कौशल्याकडे’ कार्यक्रमात मार्गदर्शन “उंच झेप घेण्यासाठी संधीचे सोने करा आणि विविध कौशल्ये आत्मसात करा. मोबाइलचा वापर सोशल मीडियापेक्षा शासकीय योजनांसाठी अधिक करा. नकारात्मकतेवर मात करून स्वतःला विकसित करा,” असे प्रेरणादायी उद्गार मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी बुधवार, दि. ९ जुलै रोजी काढले.
राष्ट्र विघातक डाव्या कडव्या विचारांनी तरुणाई प्रभावित होऊन ती नक्षलवादाकडे वळण्याचा धोका रोखण्यासाठी, देशाच्या संविधानाला झुगारणाऱ्या घातक नक्षल विचारांना पायबंद बसावा म्हणून महाराष्ट्र सरकारचे विशेष जनसुरक्षा विधेयक हे एक महत्वाचे पाऊल ठरणार असल्याचे मत विशेष जनसुरक्षा विधेयक समितीचे अध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
१५ दिवसांच्या कालावधीत सुरु राहणार मोहीम पश्चिम रेल्वेने रेल्वे प्रवासी सुरक्षा उपक्रमात लोकप्रिय कार्टून पात्र 'छोटा भीम' च्या सहकार्याने एक नवीन सुरक्षा जागरूकता मोहीम सुरू केली आहे. यामोहिमेचा मुख्य उद्देश प्रवाशांना चालत्या ट्रेनमध्ये चढणे किंवा उतरणे या धोक्यांबद्दल जागरूक करणे आहे. ही मोहीम मुंबई सेंट्रल आणि रतलाम विभागांतर्गत चर्चगेट आणि इंदूर स्थानकांवर अनुक्रमे सुरू करण्यात आली. ही मोहीम १५ दिवसांच्या कालावधीत अंधेरी, बोरिवली, उज्जैन आणि रतलाम स्थानकांवर देखील राबवली जाईल.
(Yogayatan Jankalyan Trust) गेल्या १५ वर्षांपासून शिक्षण आणि सेवा क्षेत्रात सक्रिय असलेल्या योगायतन जन कल्याण ट्रस्टने या वर्षीही त्यांच्या वार्षिक 'मोफत पुस्तक वितरण मोहिमे' अंतर्गत मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या ३००० मुलांना शैक्षणिक पुस्तकांचे वितरण केले.
( Maharashtra in Khelo India Youth Championship) 'भले शाब्बास!, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या क्रीडा गौरवात आणखी भरच घातली आहे. या यशामुळे आपण सर्व खेळाडू महाराष्ट्राचा अभिमान आहात,' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेलो इंडिया युवा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाची हॅट्ट्रिकाचा पराक्रम साधणाऱ्या महाराष्ट्राच्या चमुतील खेळाडुंचे अभिनंदन केले आहे.
आज जगाचा वेग झपाट्याने वाढतो आहे, त्याबरोबरच माणसाचा श्वासदेखील कोंडला जातो आहे. तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे कामाचे तास वाढले, आकांक्षापूर्तीचा अट्टहासही वाढला. या सगळ्यात माणसाचे समाधान सहज हरवलेले दिसून येते. जगभरातल्या लाखो तरुणांना ( Youth ) ही समस्या समजतच नाही. ‘जास्त काम म्हणजे, जास्त यश’ हे एक सूत्र, सातत्याने मानवी मनावर बिंबवले गेले. त्यामुळे सतत यशस्वी होण्याचे व्यसन लागलेल्या उद्योगपती आणि व्यावसायिकांच्या मनात थांबण्याचा विचारच येत नाही. या सगळ्यात प्रत्यक्ष काम करणार्या तरुणांवर काय परिणाम हो
मुंबई : स्वामी विवेकानंद १६१ वी जयंती युवा दिनाचे औचित्य साधून के पूर्व बृहन्मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त मनिष वळंजू यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्ण मित्र ( Patient Friendly Workshop ) सहयोगी संस्थेने विलेपार्ले पूर्व येथील वैष्णवी बेनक्वेट हॉल येथे रुग्ण मित्र स्नेह संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी अध्यक्ष म्हणून आयसीएमआर अनुवांशिक संशोधन केंद्र प्रमुख डॉ.शैलेश पांडे, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, रुग्ण मित्र विनोद साडविलकर यांच्या हस्ते पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षांना
National Youth Day स्वामी विवेकानंद जयंती म्हणजेच राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधत शिक्षक चळवळीतील युवा कार्यकर्ते डॉ विशाल कडणे यांच्या हेल्पिंग हँड फाऊंडेशनतर्फे (Helping Hand Foundation -NGO) मुंबईसह आसपासच्या विभागातील शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षकांसाठी विशेष प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये १७२५ स्पर्धकांनी सक्रिय सहभाग घेतला. १२ जानेवारी ‘राष्ट्रीय युवा दिन’ या संकल्पनेवर आधारित ह्या प्रश्नमंजूषा स्पर्ध्येमध्ये युवा दिनाबाबत ३० प्रश्न समाविष्ट होते.
उद्या, दि. १२ जानेवारी. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. आपला देश हा तर जगातील सर्वाधिक युवा संख्या असलेला देश. युवा ही देशाची खरी संपत्ती मानली जाते. वर्तमान सुधारण्याची आणि भविष्य घडवण्याची ताकद या युवांमध्ये असते. आपल्या देशातील युवांनी ( Young Marathi Generation ) प्रत्येक क्षेत्रात मोलाचे योगदान दिलेलेच आहे. आज साहित्य क्षेत्रही याला अपवाद नाही. आपली अभिजात आणि समृद्ध असलेली मराठी भाषा टिकवून ठेवण्याचे आणि पुढे नेण्याचे काम अनेक युवा साहित्यिक क
'Woke Culture'ची वाळवी तरुणाईला कशी पोखरत चालली आहे...
मुंबई : ‘माय होम इंडिया’ आयोजित ‘जनजातीय युवा गौरव पुरस्कार’ ( Tribal Youth ) सोहळा शनिवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी बजाज इमेराल्ड, अंधेरी पूर्व येथे संपन्न झाला. यावेळी, जनजातीय समाजासाठी कार्य करणार्या दहा प्रख्यात समाजसेवकांना सुविख्यात मल्लखांब प्रशिक्षक पद्मश्री उदय देशपांडे यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कारार्थी स्वतः जनजातीय समुदायातील असून, आज ते आपल्याच समाजाच्या कल्याणाकरिता काम करत आहेत. कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर उदय देशपांडेंसह अंधेरी पूर्व मतदारसंघाचे नवनिर्वाचित आ. मुरजी पटे
Hindu बांगलादेशात एका हिंदू (Hindu) तरुणाला मौलाना आणि लष्कराने बेदम मारहाण केली. मुस्लीम तरुणावर प्रेम असल्याने तरुणाची हत्या करण्यात आली. ही घटना घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी सांगितले की, अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांचे वृत्त खोटे असून अतिशयोक्ति असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मुंबई : प्रा. यशवंतराव केळकर युवा पुरस्कार-२०२४ च्या निवड समितीने या वर्षासाठी 'ट्रेनिंग अँड एज्युकेशनल सेंटर फॉर हियरिंग इम्पेयर्ड' (टीच)चे सह-संस्थापक दीपेश नायर ( Dipesh Nair ) यांची निवड केली आहे. ते कर्णबधिर आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण क्षेत्रात समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी महत्वपूर्ण काम करत आहेत. हा पुरस्कार गोरखपूर येथे २२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशना दरम्यान दिला जाईल.
योजनेचे उद्धिष्ट - उमेदवारांना उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरुप - उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) द्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल.
चंद्रपूरमधून एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. इथे एका शिक्षकाने विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला आहे. मुख्य म्हणजे आरोपी शिक्षक अमोल लोडे हा युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष असल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या योजनेंतर्गत नवीन कामगारांची नावनोंदणी करण्यात आली आहे. जून २०२४ मध्ये तब्बल २१.६७ लाख नवे कर्मचारी जोडले गेले आहेत. दरम्यान, विमा महामंडळाकडून जारी करण्यात आलेल्या तात्पुरत्या वेतनश्रेणीच्या आकडेवारीनुसार नव्या कर्मचारी संख्येत वाढ दिसून आली आहे.
आगरी समाजाला पूर्वी जी वागणूक मिळत होती त्याबद्दल दुःख होत असे. त्यातुनच काहीतरी प्रगती करण्यासाठी समाज शैक्षणिक दृष्टया प्रगत झाला पाहिजे यासाठी आमचा अट्टाहास होता. तो आमचा उद्देश सफल झाला. आता समाज शैक्षणिक दृष्ट्या प्रगत झाला असून, डॉक्टर, वकील, इंजिनिअर असे मर्यादित न राहता सर्वच क्षेत्रात समाजातील मुले मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहे. जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात आगरी समाजातील युवक मानाने समाजाचे नाव मोठे करीत आहेत ही कौतुकाची गोष्ट आहे, असे गौरवोद्गार आगरी युथ फोरम डोंबिवलीचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी काढले.
'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' दरवर्षी १० लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणार असून कुशल व रोजगारक्षम महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करेल, असे मत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले. सह्याद्री अतिथीगृह येथे 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी' खाजगी क्षेत्रातील उद्योजकांनी रोजगाराची मागणी नोंदविण्यासाठी आयोजित केलेल्या 'उद्योजकांशी संवाद'या बैठकीत ते बोलत होते. यावेळी कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, आयुक्त निधी चौधरी
कल्याण : रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका रुग्णावर अवघड अशी मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वीपणे कल्याणातील जी प्लस हार्ट रुग्णालयाने त्यांचा जीव वाचवला आहे. त्याबद्दल रुग्णाच्या नातेवाइकांसह इतरांकडूनही जी प्लस हार्ट रूग्णालयातील डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.
मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासह पर्यावरण आणि क्रीडासंस्कृती या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या डोंबिवलीतील ‘न्यास’ या संस्थेच्या कार्यावर टाकलेला हा प्रकाश.
परळच्या पोस्टगल्ली परिसरातील हिंदू तरुणांवर भ्याड हल्ला करणाऱ्या कट्टरपंथींविरोधात राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा ( Mangal Prabhat Lodha ) बुधवारी चांगलेच आक्रमक झाले. हिंदूंवर हल्ले कराल, तर याद राखा, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला. त्याचवेळी या प्रकरणाची तक्रार दाखल करून घेण्यास कुचराई करणाऱ्या भोईवाडा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना त्यांनी खडेबोल सुनावले.
आपल्या शिक्षणाचा, बुद्धीचा आणि युवाशक्तीचा समाजासाठी विधायक उपयोग व्हावा, या हेतूने स्थापन झालेल्या ‘उमंग द युथ फोरम’ या संस्थेच्या प्रवासावर टाकलेला हा प्रकाश.
आजची तरूण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात सापडली आहे. अन्वेषण यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा अमली पदार्थांची तस्करी रोखण्यास प्रयत्न करत आहेत; मात्र ते अपुरे पडत आहेत. तस्करांविरुद्ध कठोर कारवाई केली, तरच अमली पदार्थांचा भस्मासूर आटोक्यात येऊ शकतो. प्रत्येकाने काय करावे, यावर विचार करण्याची वेळ आहे.
केरळ विद्यापीठाच्या ‘युवक महोत्सवा’स वादग्रस्त नाव दिल्याबद्दल, विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. या महोत्सवाच्या लोगोबद्दलही आक्षेप घेतला जात आहे. या लोगोमध्ये इस्रायलच्या नकाशावर पॅलेस्टिनी स्कार्फ दाखविण्यात आला आहे. विद्यापीठाचा महोत्सव असताना, त्यात इस्रायल-हमास संघर्ष यांचा अंतर्भाव कशासाठी? असे उद्योग करणार्या आयोजकावर कडक कारवाई करायला हवी.
केरळमधील सर्वात मोठ्या विद्यापीठात युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याला ‘इंतिफादा’ असे नाव देण्यात आले आहे. केरळ विद्यापीठात दि.७ मार्च ते दि.११ मार्च या कालावधीत होणारा युवा महोत्सव 'आक्रमकतेच्या विरोधात कलेचा निषेध' या टॅगलाइनसह आयोजित केला जात आहे. ज्याचा थेट अर्थ इस्रायल-हमास युद्धात हमासला पाठिंबा आहे. आता या 'इंतिफादा' विरोधात एका विद्यार्थ्याने केरळ आणि लक्षद्वीप हायकोर्टात याचिका दाखल करून नाव बदलण्याची मागणी केली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ ॲनिमल्स आणि झीमॅक्स टेक सोल्युशन प्रा. लिमिटेड या सेवाभावी संस्थेच्यावतीने मुंबईतील पाळीव प्राण्यांची नोंदणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेद्वारे महानगरातील विविध सदनिका, बंगले, सोसायटीमधील नागरिकांकडे असलेल्या पाळीव प्राण्यांची माहिती संकलित करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी गट प्रत्येक सोसायटीला भेट देणार आहेत. मुंबईकर नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेऊन कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे.
देशातील युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने दरवर्षी देशात राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. केंद्र सरकारच्या युवक आणि क्रीडा मंत्रालयातर्फे 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी यंदा महाराष्ट्रावर सोपविण्यात आली आहे. या महोत्सवाचे शुक्रवार, दि. 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नाशिक येथील तपोवन मैदानातील दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन होत आहे. त्यानिमित्ताने राष्ट्रीय युवा महोत्सवाविषयीची माहिती जाणून घेऊया...
नागपूर : 'लव्ह जिहाद’विरोधी कायदा करण्याविषयी शासन अत्यंत गंभीर आहे. या कायद्यासंदर्भात राज्य शासनाने बर्याच गोष्टी केलेल्या आहेत. लवकरच या संदर्भात तुम्हाला निर्णय समजेल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवार दि. १५ डिसेंबर रोजी दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० :३० वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत @2047 : युवकांचा आवाज’ उपक्रमाची सुरुवात करणार आहेत. या उपक्रमाचा उद्देश देशातल्या युवकांना विकसित भारत @2047 च्या पूर्ततेसाठी आपल्या कल्पनांचे योगदान देण्यासाठी व्यासपीठ प्रदान करणे हा असणार आहे.
शिक्षणाचा ध्यास असलेल्या कल्याणमधील सुप्रिया प्रकाश नायकर यांनी आठ वर्षांनंतर घर आणि शिक्षण ही तारेवरची कसरत करीत विविध पदव्या संपादन केल्या. वेळेचे नियोजन आणि सासरकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाल्याचे सांगणार्या सुप्रिया यांच्या प्रवासाविषयी.
दिल्लीतील समाजसेविका जसप्रीत कौर यांनी काँग्रेसची युवा शाखा भारतीय युवक काँग्रेसद्वारे दिला जाणारा 'इंदिरा प्रियदर्शिनी पुरस्कार' स्वीकारण्यास नकार दिला आहे. काँग्रेस हा सर्वात भ्रष्ट पक्ष असून शीख नरसंहाराला तोच जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
'अखिल भारतीय विद्यार्थी परिषद' आणि 'विद्यार्थी निधी' यांच्या संयुक्त विद्यमाने 'प्रा. यशवंतराव केळकर युवा पुरस्कार' दरवर्षी दिला जातो. यंदाच्या पुरस्कारासाठीची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. अभाविपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. यशवंतराव केळकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा हा पुरस्कार सेवा, शिक्षण, पर्यावरण, सामाजिक, शैक्षणिक, विज्ञान, तंत्रज्ञान इत्यादी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्यांना दिला जातो.
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे कै. मधुकर आठल्ये, कै. मनमोहन आठल्ये आणि कै. एस. एम. गोडबोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शनिवार दि. २१ ऑक्टोबर २०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजता ‘युवा महोत्सव’आयोजित केला आहे. यात प्राजक्ता काकतकर आणि शिवानी मिरजकर यांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम केंद्राच्या गोखले सभागृहात सादर करण्यात येणार आहे.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी बुधवारी वनवासी युवा आदानप्रदान कार्यक्रम (टीवायईपी) अंतर्गत २०० वनवासी युवकांशी संवाद साधला. यावेळी देशातून नक्षलवादाचे उच्चाटन करण्यासाठी वनवासी युवकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत गृहमंत्री शाह यांनी व्यक्त केले.
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या माध्यमातून ठाणे फुटबॉल असोसिएशनने आयोजित केलेल्या ठाणे युथ लीग मुलींच्या फुटबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेतून आगामी राष्ट्रीय ज्युनिअर आणि सब ज्युनिअर मुलींच्या महाराष्ट्राच्या संघासाठी काही खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
भारतात वास्तव्यास असलेल्या तिबेटी नेत्यांची, ’जी २०’ परिषदेमध्ये तिबेटच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी, अशी त्यांची मागणी होती. चीनने आमचा देश ताब्यात घेतला आहे आणि त्यामुळेच चीन हा देश विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही, असा संदेश या परिषदेसाठी येणार्या नेत्यांना देऊ इच्छित आहोत, असे निदर्शकांचे म्हणणे होते. ही निदर्शने ‘तिबेटी युथ काँग्रेस’ने आयोजित केली होती.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दि. १२ ऑगस्ट रोजी लखनऊमध्ये अमली पदार्थमुक्त राज्य-सशक्त राज्य अभियानाचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी युवकांना आवाहन केले आहे की, नशेमुळे सर्वनाश होतो. त्यापासून दूर राहा.आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त त्यांनी तरुणांना शुभेच्छाही दिल्या. यानिमित्ताने त्यांनी ट्विट करून म्हटले की, 'आंतरराष्ट्रीय युवा दिना'निमित्त सर्व तरुण मित्रांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!
काश्मिरी हिंदूंचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या युथ फॉर पनून या संघटनेने सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल करून घटनेतील कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या २०१९ सालच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.
केरळमध्ये 'समान नागरी कायद्यांच्या विरोधात काढण्यात आलेल्या रॅलीत हिंदुविरोधी घोषणा देण्यात आल्या. 'मुस्लिम युथ लीग'ने काढलेल्या या रॅलीत हा प्रकार घडला. दरम्यान संघटनेने आपल्या एका नेत्याला निलंबित केल्याची घोषणा केली आहे. भाजपने या घटनेचा निषेध केला आहे. मात्र कन्हागड येथील रहिवासी यांनी या प्रकरणी अब्दुल सलाम यांना जबाबदार ठरवले आहे. दरम्यान MYL ने डॅमेज कंट्रोलला ही अक्षम्य चूक असल्याचे निवेदन जारी केले आहे.
बलात्कार हा शब्द जरी कुणी उच्चारला किंवा वाचनात आला, तरी अंगावर काटाच उभा राहतो. केवळ देशच नाही, तर जगभरामध्ये हे क्रूर कृत्य करणार्या नराधमांची संख्या कमी नाही. या मुद्द्यावर आधारित ’अजमेर ९२’ हा चित्रपट दि. २१ जुलै रोजी देशभरात प्रदर्शित झाला. या पुष्पेंद्र सिंग दिग्दर्शित चित्रपटाची ही समीक्षा...
“समाज निरोगी राहावा, यासाठी व्यायामाचा प्रसार-प्रचार करण्याचे काम बजरंगबलीने मला दिले आहे,” असे सांगत तरुणाईला फिटनेसचे धडे देणारे व बॉडीबिल्डर घडवणारे गोपाळ गायकवाड यांचा प्रवास...
एकांकिका आणि दोन अंकी नाटकातून प्रायोगिक रंगभूमीशी नाळ जोडलेला, तसेच रंगभूमीवरील ‘अलबत्या गलबत्या’ या सुप्रसिद्ध व्यावसायिक नाटकात चिंची चेटकिणीची भूमिका साकारणार्या निलेश गोपनारायण यांच्याविषयी...
मुंबई : साहित्य अकादमीचे २०२३ सालचे युवा पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. पुरस्कारांसाठी मराठी विभागाअंतर्गत ७ नामांकने होती तर बालसाहित्य पुरस्कारासाठी ५ नामांकने जाहीर झाली होती. त्यापैकी विशाखा विश्वनाथ यांच्या 'स्वतःला स्वतःविरुद्ध उभे करताना' या काव्यसंग्रहाला युवा साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच बालसाहित्य विभागात एकनाथ आव्हाड यांच्या 'छंद देई आनंद' या काव्यसंग्रहाला पुरस्कार मिळाला आहे.
आपल्या अल्प अशा आयुष्यामध्ये विलक्षण काम करताना जयंतरावांनी भारतीय विज्ञान तथा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आंदोलनामध्ये भारतीय वैज्ञानिकांनी दिलेल्या योगदानावरील दृष्टिक्षेप यावर मौलिक कार्य केले. भारत सरकारच्या भारतीय स्वातंत्र्याच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमांतर्गत जयंतरावांनी हा विषय जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वपूर्ण काम केले.
मुस्लीमबहुल येमेन देशांतर्गत संघर्षाने ग्रासलाय. येमेन सरकार व हुती विद्रोही गटातील संघर्षात अन्य देशही पडद्यामागून सूत्रे हलवित आहेत. विद्रोहींना इराणचे, तर येमेन सरकारला सौदीचे समर्थन आहे. सौदी समर्थित सरकार आणि हुती विद्रोहींचा येमेनच्या अनेक भागांवर कब्जा आहे. या रक्तरंजित संघर्षाला आठ वर्षं पूर्ण होत आली असून, आता येमेनमध्ये शांतता नांदण्याची चिन्हे दिसू लागली आहे. येमेनमधील दोन्ही गट शांतता प्रस्थापित करण्यासाठी इच्छुक आहेत. अमेरिकेचे विशेष दूत टीम लिंडर किंग नुकतेच येमेन खाडीच्या दौर्यावर गेले. त्या
मुंबई : उद्योग विभागाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या माध्यमातून बारा हजाराहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर झाले असून यामधून सुमारे एक लाखाहून अधिक युवकांच्या हातांना काम मिळणार आहे. या योजनेअंतर्गत राज्याने मागील वर्षापेक्षा अडीचशे टक्के अधिक काम करून शासनाने भरीव कामगिरी केली आहे. चालू आर्थिक वर्षात राज्याने एकूण 12 हजार 326 कर्ज प्रकरणे मंजूर केली असून यात रुपये 276 कोटी रुपये इतक्या अनुदान रकमेचा समावेश आहे. राज्याची ही कामगिरी मागील वर्षाच्या 250% पेक्षा अधिक आहे. यात
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मुंबई पालिका निवडणुकीची तयारी सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांची दि. २९ मार्च रोजी मुंबईत जाहीर सभा होणार आहे. मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने 'युवा मंथन'चे मुंबईच्या चेंबूरमध्ये संध्याकाळी ५ वाजता आयोजन करण्यात आले आहे. या जाहीर सभेतून मुंबई पालिका निवडणुकीच्याप्रचाराचा नारळ शरद पवार फोडणार का? हे पाहणे महत्तवाचे ठरणार आहे. या राष्ट्रवादी युवक काँग्रेसमधील युवकांचा सहभाग मोठ्या संख्येने पाहायला मिळणार आहे.