YRS Congress

अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यासक्रम तमिळ भाषेत प्रसारित करा, गृहमंत्री अमित शाह यांचा दावा

Amit Shah तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी हिंदी भाषेविरोधात फतवा काढला असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. हिंदी भाषेमुळे तमिळ भाषेकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्टॅलिन यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: एमके स्टॅलिन यांना सांगितले की, राज्यात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण हे तमिळ भाषेत सुरू करावे. ७ मार्च २०२५ रोजी रानीपेट जिल्ह्यातील थाकोलममधील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ५६ व्या स्थापन दिनाच्या समारंभात अमित शाह यांनी संबोधित केलं.

Read More

"आपली मुलं महागडया शाळेत शिकतात तिथंही हिंदी भाषा शिकवली जाते मग.....," राष्ट्रीय शिक्षण धोरणाला विरोध करणाऱ्या द्रमुकला अन्नामलाईंकडून चपराक

आपलीही मुलं महागड्या शाळांमध्ये शिक्षण घेतात. तिथेही हिंदी, इंग्रजी आणि तमिळ भाषेचे ज्ञान दिले जाते. याला आता अन्नामलाईंनी द्रमुकचे ढोंग आहे का? प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सुनावले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० वरून तामिळनाडूत मोठा वादंग निर्माण झाला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे नेते एमके स्टॅलिन यांनी या धोरणाविरूद्ध आवाज उठवला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे धोरण तामिळनाडूवर हिंदी भाषा लादण्याचे षडयंत्र असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Read More

ममता बॅनर्जींना इंडी आघाडीच्या बैठकीचे आमंत्रण नाही; नाराजी केली व्यक्त

तीन राज्यात भाजपच्या विजयानंतर इंडी आघाडीच्या बैठकीबाबत राजकीय वातावरण तापले आहे. भाजपकडून काँग्रेसचा दारुण पराभव झाला. यानंतर, 6 डिसेंबर रोजी दिल्लीत होणारी इंडी आघाडीची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सीएम एमके स्टॅलिन, नितीश कुमार आणि अखिलेश यादव यांनी बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी बैठकीला न येण्याचे कारण दिले आहे. या बैठकीसंदर्भात राहुल गांधींनी फोन केल्याचेही सांगितले. ममता बॅनर्जी यांनी यावेळी आपली नाराजी ही बोलून दाखवली आहे.

Read More

उदयनिधी स्टॅलिन यांना हिंदुस्तानी भाऊचा सल्ला; म्हणाले- 'हिंदुस्तानी भाऊ एकटा...'

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू-मलेरिया या आजारांशी केली होती. त्यांच्या या विधानावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान आता हिंदुस्तानी भाऊने ही उदयनिधींच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. हिंदूस्तानी भाऊ म्हणाले की, " सनातन धर्म डेंग्यू मलेरियासारखा असून त्याला नष्ट करायला हवे, असे विधान करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन यांनी लक्षात घ्यावे की, सनातन धर्म संपवण्यासाठी असे अनेक जण आले. पण सनातम धर्म संपला नाही, तर ते लोकचं संपले. तसे

Read More

पवारांचा राजीनामा ; राहुल-स्टॅलिन यांचा सुप्रिया सुळेंना फोन!

शरद पवार यांनी नुकतेच २ मे रोजी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर संपुर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले. मात्र दि. ४ मे रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि द्रमुकचे नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी सुप्रिया सुळे यांना फोन केल्याची चर्चा माध्यामातून रंगत आहे. शरद पवार यांच्या राजीनामा घोषणेनंतर दोन्ही नेत्यांनी फोन करून पवारांनी राजीनामा का दिला? याबाबत माहिती घेतली असल्याचे सांगितले जात आहे. तसेच शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी या दोन्ही नेत्यांची भूमिका आहे...

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121