नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि डीआरपी विविध उपक्रमांच्या माध्यमातून धारावीकरांच्या स्वप्नातील धारावीचे चित्र समजावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून एनएमडीपीएलचा सामाजिक उपक्रम असणाऱ्या धारावी सोशल मिशनने शालेय तरुणींसाठी आणि शिक्षकांसाठी 'स्वप्नातील धारावी' या विषयावर निबंध लेखन स्पर्धा घेतली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार दि.८ रोजी संपन्न झाला.
Read More
मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त ‘समरसता साहित्य परिषद’, महाराष्ट्रतर्फे ‘राज्यस्तरीय खुली लेखन स्पर्धा’ ( Writing Competition ) आयोजित करण्यात आली आहे. “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे धार्मिक सामाजिक आणि राजकीय नेतृत्व कालातीत आहे. त्यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त परिषदेतर्फे राज्यस्तरीय खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यास आम्हाला आनंद होत आहे,” असे मत समरसता परिषदेचे कार्याध्यक्ष प्रसन्न पाटील यांनी व्यक्त केले.
जुलै २०१८ च्या ‘ललित’च्या अंकात ‘हिंदू कादंबरी लेखन स्पर्धा’ जाहीर केली होती. प्रा. डॉ. भालचंद्र नेमाडेंची बहुचर्चित ‘हिंदू’ कादंबरी वाचायची आणि त्यावर आधारित कादंबरी लिहायची. पण, ‘हिंदू’चा पूर्वार्ध लिहायचा नाही, त्याचप्रमाणे ‘हिंदू’चा उत्तरार्धही लिहायचा नाही. ‘हिंदू’मध्ये असंख्य उपकथानकं विखुरलेली आहेत. त्यातील एका उपकथानकावर स्वतंत्र कादंबरी लिहायची. अशी ही अभूतपूर्व स्पर्धा! या स्पर्धेची शेवटची तारीख होती ३१ डिसेंबर, २०१८. माननीय मधु मंगेश कर्णिक, प्रा. डॉ. विलास खोले आणि प्रा. रंगनाथ पठारे यांच्या न