(Two Pakistani arrested in Punjab ) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंजाब पोलिसांनी दोन पाकिस्तानी हेरांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही अमृतसरमधील आर्मी कॅन्टोन्मेंट आणि हवाई दलाच्या तळाशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवत होते.
Read More
( Two MMRDA projects win prestigious awards ) ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ (एमएमआरडीए)च्या दोन प्रकल्पांना नवी दिल्लीत पार पडलेल्या ‘बिल्ड इंडिया इन्फ्रा अॅवॉर्ड्स २०२५ ’मध्ये दोन प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कार महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना १५९व्या प्राधिकरण बैठकीत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत प्रदान केले.
नागपूर : ‘अडीच वर्षां’चा पेटेंट कायमस्वरुपी उबाठा ( UBT ) गटाच्या नावावर होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसने त्यांच्यासमोर अडीच-अडीच वर्षांचा प्रस्ताव ठेवला असून त्यावर होकार येत नाही, तोवर गटनेता जाहीर करणार नाही, अशी भूमिका घेतल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
नागपूर : शपथविधीनंतर नवनिर्वाचित मंत्री संजय शिरसाट ( Sanjay Shirsat ) यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांबाबत सूचक वक्तव्य केले आहे. अडीच वर्षे पूर्ण होण्याआधीच मंत्र्यांना डच्चू मिळू शकतो, याकडे त्यांनी माध्यमांचे लक्ष वेधले.
तुमच्या आघाडी सरकारने अडीच वर्षांत काय केले? आणि महायुती सरकारने दोन वर्षांत काय केले हे होऊन जाऊ द्या दूध का दूध पानी का पानी, आम्ही हिशोब द्यायला तयार असून तुम्ही काय केले ते सांगा अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला खुले आव्हान दिले. निमित्त होते ते कल्याण पश्चिमेतील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालय उद्घाटन सोहळ्याचे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. बाळा नांदगावकर यांना शिवडी, तर दिलीप धोत्रे यांना पंढरपूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सोमवार, दि. ५ ऑगस्ट रोजी सोलापूर दौऱ्यावर असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भात घोषणा केली.
फादर्स डे जवळ आला आहे आणि तुमच्या जीवनातील मार्गदर्शक असलेल्या वडिलांना सन्मानित करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. नेहमीचे टाय किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू देण्याऐवजी नाविन्यता व व्यावहारिकतेचे संयोजन असलेले काहीतरी भेट म्हणून दिले तर? इलेक्ट्रिक स्कूटर कार्यक्षमतेला महत्त्व देणाऱ्या, तसेच रोमांचक राइडचा आनंद घ्यायला आवडणाऱ्या किंवा अत्याधु निक तंत्रज्ञानाची प्रशंसा करणाऱ्या वडिलांसाठी योग्य गिफ्ट ठरू शकते. इलेक्ट्रिक स्कूटर्स पर्यावरणदृष्ट्या लाभदायी असण्या सोबत परवडणाऱ्या आणि वापरण्यास सोप्य
सलग 24 तास ठाणे महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरण तलावात पोहण्याचा विक्रम ठाण्यातील दोन जलतरणपटूंनी केला आहे. मानव मोरे व आयुष तावडे हे राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू असून त्यांनी केलेल्या या विक्रमाचे ठाणेकरांकडून कौतुक होत आहे.
आपले मूल सुदृढ असावे, गुटगुटीत व हसरे असावे, तसेच त्याचे सर्वांनी कौतुक करावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. पण, याबाबतीत सर्वच पालक एवढे सुदैवी नसतात. अनेक लहान मुलांच्या वर्तणुकीच्या समस्या त्यांच्या पालकांना भेडसावत असतात. या मुलांच्या अशा विचित्र वागणुकीवरून बर्याच वेळा पालकांनाही टीका सहन करावी लागते. तेव्हा मुलांमध्ये वर्तणुकीच्या समस्या का निर्माण होतात? यावरील काय उपाय करता येतील? याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया.
भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक दुचाकी विकल्या जातात, जर कोणी स्वत:साठी वाहन खरेदी करण्याचा विचार केला तर त्याच्या मनात सर्वात आधी दुचाकी येते. दुचाकीला भारतातील लोक सर्वाधिक पसंती देतात. तसेच दुचाकी चोरीच्या घटना बहुतांश मोठ्या प्रमाणात घडताना पाहायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमची बाईक चोरी होण्यापासून वाचवू शकता.
कल्याण डोंबिवली महापालिकेतील जंतूनाशक फवारणीचे कंत्राट मिळविण्यासाठी बनावट प्रमाणपत्र मिळविले. ते महापालिका प्रशासनास सादर केले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात दोन जणांच्या विरोधात फसवणूक केल्याच्या आराेपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना काळात बंद असलेला नाटयगृहाचा शनिवारी अखेर पडदा उघडणार आहे. मधला काही काळ वगळता आता तब्बल दोन वर्षीनी तिसरी घंटा ऐकू येणार आहे. महाराष्ट्रात नाटकाचा पहिला प्रयोग करण्याचा मान डोंबिवली शहराने पटकविला आहे.
आजपासून नव्या किमती लागू, सर्वात स्वस्त एचएफ100 हजार रुपयांनी महाग हीरो मोटोकॉर्पतर्फे सर्व दुचाकी एक्स-शोरूमची किंमत हजार ते तीन हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे. नव्या किंमती दि. २० सप्टेंबरपासून लागू करण्यात आल्या. आता हिरोच्या बाईक आणि स्कुटर खरेदी करण्यासाठी आता बजेट वाढविण्याची गरज आहे. कच्चा माल आणि सुटे भागांच्या किंमती वाढल्याने ही वाढ केल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
चिनी प्रशासनाने एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यामध्ये सांगितले आहे की, हाँगकाँगची शिक्षण प्रणाली २०२२ पर्यंत पूर्णत: बदलली जाणार आहे. या शिक्षणामध्ये देशभक्ती, निष्ठा या विषयांचा भर दिला जाणार आहे. जेणेकरून हाँगकाँगची भविष्यातली युवापिढी देशभक्त होईल. यावर हाँगकाँगची जनता प्रश्न विचारत आहे की, कोणता देश? आम्ही चिनी नाही. आमचा देश चीन नाही. आमचा देश हाँगकाँग आहे. आमच्या देशाबद्दल आम्हाला अभिमान, स्वाभिमान, प्रेम, निष्ठा आहे. त्यामुळेच तर चीनचे कुठल्याही प्रकारचे पारतंत्र्य आम्हाला नको आहे.
तुमच्याकडे दोन हजारांची नोट असेल तर ती आत्ताच खपवा, असे व्हायरल मेसेज गेल्या काही दिवसांत तुम्हालाही मिळाले असतील. दोन हजारांची नोट एटीएममधून बाहेर येण्यास अडचण येत असल्याने त्याऐवजी आता आरबीआय एक हजाराची नवी नोट आणणार असल्याचेही या मेसेजमध्ये सांगण्यात आले असेल पण खरेच दोन हजारांची नोट बंद होणार आहे का ? तुमच्याकडे असलेल्या दोन हजारांच्या नोटा तुम्हाला बदलाव्या लागणार आहेत का ? वाचा सविस्तर...
दुचाकींच्या हप्त्यावर आकारण्यात येणाऱ्या जीएसटीच्या दरामध्ये कपात होण्याची शक्यता असल्याने दुचाकीस्वारांना आताच्या तुलनेत कमी विमा भरता येईल.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास योजनेंतर्गत पिंपळे नाल्यावरील सुशोभिकरणासाठी आ. स्मिता वाघ यांच्या प्रयत्नाने 2 कोटींचा निधी मंजूर झाल्याने या कामाचे भूमिपूजन माजी आ.साहेबराव पाटील यांच्या हस्ते होऊन थाटात शुभारंभ मंगळवार 5 रोजी करण्यात आला.
ठाण्यातील पाचपखाडी भागात गुरुवारी पहाटे अज्ञात इसमांनी नऊ दुचाकी पेटवून दिल्याने खळबळ उडाली.
डांभुर्णी-जळगाव महामार्गावर गावापासून दीड किमी अंतरावर असलेले शालिग्राम रेवा चौधरी यांच्या शेताजवळील वळणावर शुक्रवारी दुपारी यावल तालुक्यातील सौखेडा ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका गर्भवती महिलेला घेऊन जळगावकडे जात असताना समोरून डांभुर्णीकडे येत असलेले मोटारसायकल दुचाकी वाहन (हीरो होंडा क्र. एमएच.19, 2293) यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या घटनेमध्ये समाधान कोळी आणि अंकुश काळी (रा.चांदसर ता.धरणगाव) यांचा जागीच मृत्यू झाला.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून सतत रिपिटर परीक्षेची फी कमी करण्यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाकडे मागणीचे निवेदन, आंदोलने करण्यात आली.
जळगावातील टी.व्ही.टॉवरसमोर दुचाकी अचानक समोर आल्याने पोलीस व्हॅनवर आदळली. प्रसंगी पोलीस व्हॅनने दुचाकीस वाचविण्याच्या प्रयत्नात वाहकाचे नियंत्रण सुटल्याने व्हॅन दोन पटली घेवून बाजूला कलंडल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. यात दुचाकीस्वार ठार झाले असून पोलीसही गंभीर जखमी झाले.
तालुक्यातील आरावे रात्री २ वाजेच्या सुमारास अचानक घराचा सरा मोडल्याने मातीच्या धाब्याचे लाकडी घर पडले. त्याखाली दबून १९ आणि १५ वर्षीय दोन चुलत बहिणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यात दोन जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शहरातील समतानगर येथील बेपत्ता झालेली दोन अल्पवयीन मुले ५ रोजी कल्याण रेल्वे स्थानकावर ‘समतोल’ प्रकल्पाच्या सहकार्यांना आढळून आली. ती त्यांनी ८ रोजी जळगाव पोलिसांच्या उपस्थितीत त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केली. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती.
जळगाव कडून शेंदुर्णीकडे दुचाकीने जात असलेल्या दोघांना समोरुन भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकने धडक दिल्याने एक जागीच ठार झाला, तर दुसर्यास जळगाव येथे उपचारास नेत असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
येथील प्रतिष्ठा महिला मंडळ तर्फे महिलांना आर्थिक दृष्टीने स्वावलंबी करण्याकरीता यंदा २ दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रा(आय टी सेक्टर) तील तब्बल दोन लाख नोकर्यांसाठी जपानने आपले दरवाजे उघडले आहेत! एकीकडे अमेरिकेने भारतीय आयटी तज्ञांना नोकर्या देणे जवळपास बंद केलेले असतांना जपानचा हा देकार त्यांना सुखावणारा आहे.