मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी साबरमती नदीवर ३६ मीटर उंच म्हणजेच १२ मजली इमारतीइतक्या उंचीचा पूल सध्या अहमदाबादमधील साबरमती नदीवर बांधला जात आहे. एकूण ४८० मीटर लांबीचा हा पूल पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद–दिल्ली मुख्य मार्गालगत बांधला जात आहे. ज्याची उंची सुमारे १४.८ मीटर आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर, तो केवळ आधुनिक संपर्काचे प्रतीक ठरणार नाही तर हाय-स्पीड पायाभूत सुविधांमध्ये व अस्तित्वातील रेल्वे नेटवर्कमध्ये सुसंवाद कसा साधता येतो याचे उत्कृष्ट उदाहरणही ठरेल.
Read More
मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ १८ ऑगस्ट २०२५ पासून कार्यान्वित होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना न्यायासाठी मुंबई, नागपूर किंवा छत्रपती संभाजीनगर येथे जावे लागणार नाही.
मुंबई उच्च न्यायालयाने ७/११ लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व १२ आरोपींना निर्दोष मुक्त केल्याच्या निर्णयाला आव्हान देत महाराष्ट्र सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आज, बुधवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
पश्चिम दृतगती महामार्गांवर शौचालयांची सुविधा नाही. मुंबईहून दहिसर, विरारला जाण्यासाठी दीड-दोन तास लागतात. त्यामुळे प्रवाशांची अडचण होते. याचा आढावा घेऊन पश्चिम दृतगती महामार्गांवर ज्या जागा आहेत तिथे शौचालयांची सुविधा प्रवाशांसाठी करणार का? अशी विचारणा आज सभागृहात बोलताना आ. दरेकर यांनी शासनाला केली.
; प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनावेळी दक्षता घेण्याचे निर्देश महापालिकेच्या प्रलंबित प्रकल्पांना गती देऊन, त्यात प्रकल्पबाधितांना घरे दिल्यानंतर मोकळ्या होणाऱ्या जागांवर कोणत्याही परिस्थितीत पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची काटेकोरपणे दक्षता घेण्याचे निर्देश केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री तसेच उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. अतिक्रमण झाल्यास कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.
ओडिसाच्या जगन्नाथ पुरी येथील रथयात्रेला सुरुवात झाली की, मणिपुर येथे कांग उत्सवाची धुमधाम सुरु होते. कांग हा मणिपूरमधील मेईतेई समुदायाद्वारे साजरा केल्या जाणाऱ्या प्रमुख हिंदू सणांपैकी एक आहे. याची रचना साधारण जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेसारखीच असते. भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांची रथावर बसून यात्रा काढली जाते. कांग उत्सवादरम्यान केले जाणारे विधी सुद्धा जगन्नाथ पुरी रथयात्रेसारखेच असतात.
पश्चिम रेल्वेवरील प्रवाश्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेच्या माहिम आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान दि. ३ मे व ४ मेच्या रात्री ४ तासाचा जंम्बो मेगा ब्लॉक असणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
आज गणितातील प्रमेये, सिद्धांत हे पाश्चात्त्य गणिततज्ज्ञांच्या नावे असले, तरी भारतीय गणिती परंपरा ही ज्ञानसमृद्ध आणि काळाच्या पलीकडचा विचार करणारी होती. परंतु, दुर्दैवाने वसाहतवाद आणि युरोपीय वंशश्रेष्ठत्वाच्या सिद्धांतामुळे प्राचीन भारतीय गणिती परंपरा पद्धतशीरपणे दुर्लक्षित केल्यामुळे ती काहीशी अडगळीत पडली. पण, आज सर्वच क्षेत्रांत भारतीय ज्ञानपरंपरेचे पुनर्जागरण होत असताना, गणिती परंपरेचा समृद्ध वारसाही प्रत्येक भारतीयाने जाणून घेणे, त्याचा प्रचार-प्रसार करणे, हे देखील तितकेच महत्त्वाचे. तेव्हा, भारतीय गणित
( External Affairs Minister Jaishankar on Western countries ) परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रायसीना डायलॉगमध्ये पाश्चात्य देशांच्या दुटप्पी धोरणावर जोरदार हल्लाबोल केला. काश्मीर आणि अफगाणिस्तानच्या मुद्द्यांवर पाश्चात्य देशांच्या ढोंगी वृत्तीवर त्यांनी टीका केली.
पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी दादर ते भुसावळ दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाडीला पालघर स्थानकांवर अतिरिक्त थांबा देण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार, आता दादरहून सुटणारी भुसावळ गाडी पालघरला थांबेल. ०९०५१/०९०५२ दादर-भुसावळ या विशेष गाडीला पालघर स्थानकावर अतिरिक्त थांबा दिला आहे. मुंबई रेल प्रवासी संघाने ही मागणी केली होती.
भारतीय रेल्वेमध्ये सरळसेवा भरतीतून थेट नियुक्ती झालेल्या आणि पश्चिम रेल्वेवरील पहिल्या मोटारवुमन प्रीती कुमारी यांच्याविषयी....
पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी उपनगरीय नसलेल्या इतर विभागातील २०० किमी पेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी तीन दिवस आधी (प्रवासाचा दिवस वगळता) अनारक्षित तिकिटे बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा सर्व अनारक्षित तिकीट प्रणाली (UTS) काउंटरवर उपलब्ध आहे, ज्यामुळे प्रवाशांना तिकिटे बुक करण्याची सोय आणि सुविधा मिळेल.
पश्चिम रेल्वेच्या ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान दि. ०८/०९ फेब्रुवारी २०२५ रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येईल. ब्रिज क्रमांक ५ च्या पुनर्बांधणीचे काम पूर्ण करण्यासाठी शनिवार/रविवार, ०८/०९ फेब्रुवारी २०२५ रोजी ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान शनिवार दि. ८ रात्री १०:०० ते रविवार दि. ९ सकाळी ११:०० पर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गांवर १३ तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात येईल.
मध्य रेल्वेवर रविवार, दि.२९ रोजी अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक मुख्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी प्रवासासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांचा ‘खोळंबा’होणार आहे.
नवीन वर्षांसाठी मुंबई नगरी सज्ज झाली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर आणि पर्यटकांचा उत्साह शिगेला पोहोचला असून, गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट, मरीन लाइन्स गिरगाव, दादर, माहिम, जुहू, वर्सोवा या पर्यटन स्थळी थर्टी फर्स्टचा आनंद घेण्यासाठी लोकांची गर्दी होते. मुंबईकरच नव्हे तर पुणे, रायगड आणि राज्याच्या विविध भागांतून पर्यटक मोठ्या संख्येने मुंबईत येत असतात. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने विशेष सेवा चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रातील पश्चिम घाटाच्या पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रातील (maharashtra western ghat) वनआच्छादनात १ हजार ८०५.७५ चौ.किमीने घट झाली आहे. शनिवार दि. २१ डिसेंबर रोजी प्रकाशित झालेल्या अहवालामधून ही बाब समोर आली आहे (maharashtra western ghat) . विशेष म्हणजे सकल पश्चिम घाटातील घनदाट वन आच्छादनामध्ये गेल्या दहा वर्षात वाढ झाली असली तरी, मध्यम आणि खुल्या स्वरुपाच्या जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याने एकूणच वनक्षेत्रामध्ये ५८.२२ चौ.किमीने घट झाली आहे. (maharashtra western ghat)
‘थँक्सगिव्हिंग डे’ म्हणजे अमेरिका आणि कॅनडासारख्या काही पाश्चिमात्य देशात, त्यांच्या दैवतांप्रती, नातेवाईकांप्रती आणि एकंदरीत लाभलेल्या आयुष्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा दिवस. दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी, पाश्चिमात्य देशांमध्ये ‘थँक्सगिव्हिंग डे’ साजरा केला जातो. यावर्षी दि. २८ नोव्हेंबर रोजी ‘थँक्सगिविंग डे’ साजरा झाला. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात १७व्या शतकात झाली.
प्रवाशांमध्ये एसी लोकल गाड्यांची वाढती लोकप्रियता आणि वाढती मागणी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने आज बुधवार, २७ नोव्हेंबरपासून मुंबई उपनगरीय मार्गांवर एसी लोकल सेवेची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार या मार्गावर १३ नवीन एसी सेवा सुरू केल्याने, एसी सेवांची एकूण संख्या आता आठवड्याच्या दिवशी ९६ वरून १०९ आणि शनिवार आणि रविवार ५२ वरून ६५ होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. मात्र, विधानसभा निवडणुकीत हा बालेकिल्ला उद्ध्वस्त करत महायुतीने येथे जोरदार मुसंडी मारलेली दिसून येते.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाच्या कोचिंग डेपोने नवीन द्वि-मार्गी स्विच कंट्रोल पिट प्रदीपन प्रणाली म्हणजेच पिट इल्यूमिनेशन कंट्रोल यशस्वीरित्या कार्यान्वित केली आहे. या नव्या प्रणालीमुळे ऊर्जा संवर्धनामध्ये महत्त्वपूर्ण प्रगती साधन भारतीय रेल्वेला शक्य होणार आहे. या आधुनिक प्रणालीमध्ये, १६ व्हॅट किंवा ४८ व्हॅटचे एकूण १२० एलइडि पिट दिवे आहेत. हे खड्डे दिवे एकाच ठिकाणाहून नियंत्रित केले जाऊ शकतात आणि दोन सर्किट्समध्ये विभागले जातात, जे ऊर्जा संरक्षणास हातभार लावतात.
कांदिवली रेल्वे स्थानक परिसरात धीम्या आणि जलद मार्गावरील डाऊन ट्रॅकवर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा प्रभावित झाली. मंगळवार दि.१२ रोजी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या बिघाडामुळे कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. सुमारे तासाभरानंतर बिघाड दुरुस्त करण्यात आला, त्यामुळे रेल्वेसेवा पूर्ववत होऊ शकली, मात्र यादरम्यान बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी दिसून आली.
दिवाळी, छटपूजेसारख्या सणासुदीच्या काळात रेल्वेला होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मध्य आणि पश्चिम रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लावले होते. मात्र, सणासुदीचा काळ संपल्याने ९ नोव्हेंबरपासून फलाट तिकीट विक्री पुन्हा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
( Western Railway ) नुकतंच मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणानंतर आता पश्चिम रेल्वेने नवे निर्देशपत्रक जारी केले आहे. या पत्रामध्ये प्रामुख्याने प्रवाश्यांसाठीच्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश केलेला आहे. त्यामध्ये असेह म्हटले आहे की, प्रवाशांचे सामान त्यांच्या संबंधित प्रवासी वर्गासाठी अनुज्ञेय आणि विहित मर्यादेपेक्षा जास्त असल्यास त्यांना दंड आकारला जाईल.
ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स विद्यापीठाने नुकत्याच केलेल्या अभ्यासात, भारतातील समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर देशाच्या जीडीपीमध्ये १६,००० कोटी रुपयांनी वाढ करण्याचा अंदाज आहे. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कार्यान्वित झाल्यामुळे मालवाहतूक खर्च आणि प्रवासाच्या वेळेत लक्षणीय घट झाली आहे, ज्यामुळे वस्तूंच्या किंमती ०.५ टक्क्यांपर्यंत कमी झाल्या आहेत, असे या अहवालात म्हणण्यात आले आहे.
लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये जास्त वजन घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. नुकतेच वांद्रे टर्मिनस येथे अंत्योदय एक्स्प्रेसच्या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने कठोर पावले उचलत नवीन नियम लागू केले आहेत. या नियमांनुसार आता विहित मर्यादेपेक्षा जास्त सामान घेऊन जाणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
मुंबई उपनगरीय लोकल सेवेद्वारे दररोज लाखो प्रवासी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या (एमआरव्हीसी) माध्यमातून पश्चिम आणि मध्य रेल्वेवरून ये-जा करतात. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी १७ स्थानकांचा विकास करण्यात येत आहे. सुमारे ९४७ कोटी रुपये खर्च करून ही विकास कामे करण्यात येत असून प्रवाशांसाठी विविध सुविधांची निर्मिती आणि स्थानकांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे.
भारतातील सरीसृप शास्त्रज्ञांनी किंग कोब्राच्या मूळ प्रजातीचे विभाजन करुन या सापाच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावला आहे (western ghat king cobra). 'टॅक्सोनाॅमी' म्हणजेच वर्गीकरणशास्त्राच्या अभ्यासानंतर पश्चिम घाटात आढळणाऱ्या किंग कोब्रा सापाचे नाविन्य ओळखून संशोधकांनी या प्रजातीचे नामकरण 'आॅफिओफॅगस कलिंगा' असे केले आहे (western ghat king cobra). शिवशंकराच्या गळ्यातील सापाला कानडी भाषेत 'कलिंगा' म्हणतात. त्यावरुन या प्रजातीचे नामकरण करण्यात आले आहे. (western ghat king cobra)
उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रासमुक्त, आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा देत तिकीटविरहित प्रवासास प्रतिबंध करण्यासाठी पश्चिम रेल्वे वेळोवेळी विशेष तिकीट तपासणी मोहिमेचे आयोजन करते. विशेषत: मुंबई उपनगरी विभागात ही मोहीम राबविण्यात येते.
मुंबई उपनगरीय मार्गावर पश्चिम रेल्वेची वातानुकूलित (एसी) लोकल सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय झाली असून एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या पश्चिम रेल्वे ७ रेक असलेल्या ९६ एसी लोकल सेवा चालवत आहे. त्यामुळे या एसी ईएमयू लोकलच्या सक्षम देखभालीसाठी पश्चिम रेल्वेकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. याला आता यशही आले आहे. पश्चिम रेल्वे अभियंत्यांच्या प्रयत्नांमुळे एसी रेकमध्ये तांत्रिक बिघाड होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
पश्चिम रेल्वेने मिशन मोडवर विविध मान्सून पूर्व तयारीची कामे हाती घेतली आहेत. यामध्ये यांत्रिक, सिग्नलिंग, इलेक्ट्रिकल मालमत्ता आणि उपकरणे इत्यादींची देखभाल आणि अद्ययावतीकरण केले आहे. पश्चिम रेल्वेने सर्व कामे निर्धारित उद्दिष्टात पूर्ण झाल्याची खात्री केली आहे.
मान्सूनकाळात पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अखंडित आणि सुरक्षित प्रवास करता यावा याकरिता पूर्वतयारीची कामे सुरु आहेत. पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून पायाभूत सुविधांच्या सुधारणांमुळे, पावसाळ्यात गेल्या काही वर्षांत उपनगरीय कामकाज अधिक चांगले झाले आहे आणि पश्चिम रेल्वेने मुसळधार पाऊस असूनही, किमान व्यत्यय यांसह मुंबई उपनगरीय विभागात सुरळीत आणि सामान्यपणे रेल्वे सेवा चालवली असल्याचा दावा केला आहे.
०१०च्या नागरी सेवा बॅचचे भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (IRTS) अधिकारी विनीत अभिषेक यांनी मंगळवार, दि. १० जून रोजी पश्चिम रेल्वेचे नवीन मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. व्यवस्थापन विषयात पदवीधर असणाऱ्या विनीत यांच्याकडे शहर नियोजन आणि वाहतुक विषयक १९वर्षांहून अधिक वर्षांचा अनुभव आहे. यासोबतच, मुंबई सेंट्रल विभाग, पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक पदाच्या कार्यकाळात त्यांनी तिकीट तपासणी आणि भाडे नसलेल्या महसूलाच्या क्षेत्रात अनेक उपक्रमांचे नेतृत्व केले. यामुळे विभागाला इतिहासात प
मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे.
हन्मुंबई महानगरपालिकेतर्फे के पूर्व विभागात अंधेरी (पूर्व) येथील ‘बी. डी. सावंत मार्ग व कार्डिनल ग्रासिअस मार्ग जंक्शन ते कार्डिनल ग्रासिअस मार्ग व सहार मार्ग जंक्शन येथे प्रत्येकी १५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी आणि नवीन १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी (पार्ले आऊटलेट) या दोन मुख्य जलवाहिन्या जोडण्याचे व जुनी नादुरुस्त १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी काढून टाकण्याचे काम बुधवार, दिनांक २९ मे २०२४ रोजी सकाळी ९ वाजेपासून गुरुवार, दि. ३० मे रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत (१६ तास) हाती घेण्यात येणार आहे.
अनधिकृतरित्या आणि विनातिकीट लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येते आहे.याच पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेवरील सर्व प्रवाशांना त्रासमुक्त, आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा मिळाव्यात यासाठी मुंबई उपनगरीय लोकल सेवा, मेल/एक्स्प्रेस तसेच पॅसेंजर ट्रेन्स आणि हॉलिडे स्पेशल रेल्वेमध्ये तिकीट तपासणी मोहीम सातत्याने राबवली जात आहे.
रेल्वे प्रवाशांनी युटीएसच्या माध्यमातून तिकीट काढून डिजिटल इंडिया मोहिमेला प्रोत्साहन देण्याचे आवाहन पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. भारतीय रेल्वेने आता मोबाइल ॲपवरील यूटीएसच्या जिओ-फेन्सिंग निर्बंधांची बाह्य मर्यादा मागे घेतली आहे. त्यामुळे अगदी घरबसल्याही लोकल ट्रेन प्रवासी ऍपच्या माध्यमातून रेल्वेचे तिकीट काढू शकतात.
मध्य रेल्वे, भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आईआरसीटीसी) च्या सहकार्याने प्रवाशांना, विशेषत: अनारक्षित डब्यांमध्ये (जनरल क्लास कोच) स्वस्त दरात स्वच्छतापूर्ण अन्न आणि नाश्ता उपलब्ध करून देण्यासाठी एक नवीन उपक्रम घेऊन येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत सांस्कृतिक राष्ट्रवाद अतिशय जोरदारपणे मांडला आहे. त्याचप्रमाणे जागतिक अराजकतावाद्यांना भारतात ढवळाढवळ करण्यापासूनही रोखण्याचे यशस्वी प्रयत्न झाले आहेत. परिणामी भारतीय निवडणुकांनाच लक्ष्य करून त्याद्वारे भारतावर हल्ला करण्याचा पाश्चिमात्यांचा प्रयत्न आहे.
अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले पुलाचे बांधकाम करताना त्याची उंची रेल्वे प्रशासनाच्या धोरणानुसार वाढवण्यात आली, परिणामी पुलाचे पोहोच रस्ते देखील अधिक उंच झाले. याचा परिणाम म्हणून बर्फीवाला पुलाच्या दिशेने तीव्र उतार तयार झाला. वाहन चालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने इतक्या तीव्र उतारावर आहे, त्या स्थितीत जोडणी करणे शक्य नाही.
दि. १४ जानेवारीला ‘आर्मी डे’ हा वेस्टर्न कमांडमध्ये साजरा करण्यात आला. या दिवशी पराक्रम गाजवलेल्या सैनिकांना आणि युनिट्सना ‘शौर्य पुरस्कार’ आणि ‘युनिट साईटेशन’ने गौरवण्यात येते. ‘युनिट साईटेशन’ हे युनिटला गेल्या काही वर्षांतील केलेल्या, अत्यंत पराक्रमी दहशतविरोधी कारवाई करता दिले जाते. या वर्षीचे ‘जिओसी इन सी ईस्टर्न कमांड’चे ‘युनिट साईटेशन’ हे ‘२१ पॅरा स्पेशल फॉर्सेस’ या बटालियनला प्रदान करण्यात आले. आजचा हा लेख हा या फॉर्सेस यांनी केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’विषयी, जो अत्यंत धोकादायक होता आणि ज्याला माध्यम
खार सबवेच्या ठिकाणी होणारी वाहतूककोंडी आणि वांद्रे रेल्वे स्थानकावरुन वांद्रे रेल्वे टर्मिनसला जाण्यासाठी नागरिकांची होत असणारी कसरत तसेच प्रवाशांना होत असणारा त्रास लक्षात घेता या ठिकाणी आता महापालिकेच्यावतीने पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत नवी भरती केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात रेल्वेकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अॅप्रेंटिसशीपसाठी येत्या दि. १० जानेवारीपासून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तसेच, या अॅप्रेंटिसशीपकरिता इच्छुक उमेदवारांना अर्ज करावयाचा आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे रविवार, दि. २४ डिसेंबर रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. या दरम्यान गाड्यांच्या वेळापत्रकात होणाऱ्या बदलांमुळे प्रवाशांनी योग्य नियोजन करून प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
मुंबईतील प्राचीन व आध्यात्मिक इतिहास लाभलेल्या वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावाच्या सुशोभीकरण प्रकल्पाचे सोमवार, दि. १८ डिसेंबर रोजी राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यतामंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेच्या 'डी' विभागामार्फत या प्रकल्पांतर्गत तलावाच्या पायऱ्यांची, संरक्षक भिंतीची, दीपस्तंभाची दुरुस्ती तसेच सभोवतालच्या मुख्य मंदिरांचे सुशोभीकरण यासारखी विविध कामे करण्यात येणार आहेत.
अंधेरी रेल्वे स्थानक येथे गोपाळकृष्ण गोखले पूलाच्या गर्डर स्थापित करण्याच्या कामासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने रविवार, दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी १२. ४५ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यंत (दि. २ डिसेंबरच्या मध्यरात्री) रेल्वे भागात गर्डर स्थापित करण्यासाठी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.
इस्रायलमधील जनभावनेशी खेळ करून लोकांनी सरकारवर दीर्घकाळ युद्धविराम लागू करण्यासाठी दबाव आणावा, यादृष्टीने प्रयत्न केले जातील. इस्रायलसाठी गाझा शहराप्रमाणे खान युनिस आणि राफा भागातील भुयारांचे जाळे उद्ध्वस्त करणे तसेच ‘हमास’ची इस्रायलमध्ये रॉकेट डागण्याची क्षमता कमी करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी इस्रायल अमेरिकेच्या दबावालाही झुगारून हे युद्ध पुढे नेईल.
‘बिईंग डिफरंट’ म्हणजेच प्रस्तुत ‘धर्म माझा वेगळा’ हे पुस्तक ललित, हलके-फुलके, रसाळ वगैरे अजिबात नाही. तलवार किंवा बंदूक ही रसाळ असून कशी चालेल? ती खणखणीत, कठोरच असायला हवी. तसेच हा ग्रंथ म्हणजे एक बौद्धिक शस्त्र आहे. प्रत्येक हिंदूने, विशेषतः कार्यकर्त्याने ते शांतपणे वाचून, समजून, पचवण्याची फार-फार गरज आहे.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय विभागात १० दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला. त्याची सुरुवात दि.२७ ऑक्टोबरपासून झाली. दरम्यान वांद्रे ते गोरेगाव दरम्यान सहाव्या मार्गिकेच्या बांधकामासंदर्भात नॉन इंटरलॉकिंगचे काम सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे लोकल ट्रेनच्या २,५२५ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कांदिवली, मालाडसह अनेक स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली.
खार आणि गोरेगावच्या सहाव्या लाईनच्या बांधकामाच्या संदर्भात सुरू असलेल्या नॉन-इंटरलॉकिंगच्या कामामुळे पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय विभागात २६ ऑक्टोबर ते ०६ नोव्हेंबर दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉक दरम्यान पश्चिम रेल्वेने २,५२५ लोकल सेवा रद्द केल्या आहेत.
पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस ते वेरावळ रेल्वे स्थानकादरम्यान नवीन रेल्वे सुरू केल्याची घोषणा शुक्रवारी (२० ऑक्टोबर) केली. प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने पश्चिम रेल्वेने ही नवीन साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेन सेवा सुरू केली आहे. ही ट्रेन २१ ऑक्टोबर २०२३ पासून धावेल.