शालेय (स्कूल) बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्याने आपल्या मुलांच्या वाहतूकीसाठी अनधिकृत रिक्षाचा पर्याय निवडणाऱ्या पालकांना राज्य शासनाकडून दिलासा मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन नियमावली आणण्यात येत आहे. ही नियमावली अंतिम करून याबाबत तातडीने अधिसूचना जारी करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले.
Read More
राज्य सरकारने मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी नवीन नियमावली जारी केली असून यापुढे ‘डिजी प्रवेश पास’शिवाय मंत्रालयात प्रवेश मिळणार नाही. सोमवार, ११ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने यासंदर्भातील शासन आदेश जारी केला.
१ ऑगस्टपासून नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI - National Payment corporation of India) नवे युपीआय नियम लागू करणार आहे. ही नियमावली भारताची डिजिटल पेमेंट सिस्टम अधिक मजबूत आणि जलद करण्यात फायदेशीर ठरणार आहे.
‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’च्या माजी कर्मचाऱ्याच्या निवृत्ती वेतनात केलेली एकतृतीयांश कपात ही नियमांचे उल्लंघन असल्याचे ठरवत, सर्वोच्च न्यायालयाने बँकेचा निर्णय रद्द केला. न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि न्या. जयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, “पेन्शन हा केवळ नोकरदार वर्गाचा विवेकाधीन (मनमानी) निर्णयावर आधारित नसून, तो कर्मचाऱ्याचा संवैधानिक अधिकार आहे. जो कोणत्याही प्रक्रियात्मक न्यायाशिवाय किंवा कायद्याशिवाय नाकारता किंवा कमी करता येणार नाही.”
केंद्र सरकारने ‘वक्फ सुधाराणा कायद्या’अंतर्गत ‘एकीकृत वक्फ व्यवस्थापन, सक्षमीकरण, कार्यक्षमता आणि विकास नियम, २०२५’ हे नवी नियमावली गुरूवार, दि. ३ जुलै रोजी अधिसूचित केली आहे. हे नियम वक्फ मालमत्तेच्या पोर्टल आणि डेटाबेस निर्मितीपासून नोंदणी, लेखापरीक्षण आणि देखभालीपर्यंतच्या विविध प्रक्रियांशी संबंधित आहेत.
(New Rules For Ola, Uber On Peak-Hour Pricing) केंद्र सरकारने ओला, उबर, इनड्राइव आणि रॅपिडो यांसारख्या कॅब कंपन्यांना यांना मोठा दिलासा दिला आहे. आता या कंपन्यांना पीक अवर्स (peak hours) म्हणजे गर्दीच्या वेळांमध्ये दुप्पट भाडं आकारण्याची परवानगी देण्यात आली आहे.केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने १ जुलै रोजी जारी केलेल्या मोटार व्हेकल ॲग्रीगेटर गाईडलाईन्स (MVAG) नुसार ही परवानगी देण्यात आली आहे.
दि. १ जुलै २०२५ पासून देशात अनेक बदल करण्यात आले आहेत. रोजच्या दैंनदिन जीवनाला उपयुक्त असणाऱ्या गोष्टीबद्दल हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. ज्यात पॅनकार्ड, आधारकार्ड, रेल्वे तिकीट बुकिंग यांसह अन्य गोष्टींचासुद्धा समावेश आहे.
(Safety Rules for Two Wheelers) रस्ते अपघात नियंत्रणात आणण्यासाठी तसेच दुचाकी वाहनचालकांच्या सुरक्षितेसाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जानेवारी २०२६ पासून देशात उत्पादित होणाऱ्या सर्व दुचाकी वाहनांमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) अनिवार्य करण्याची तसेच, नवीन बाईक खरेदीवर दोन BIS प्रमाणित हेल्मेट्स देणे अनिवार्य असणार आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला आहे.
मुंबईतील झोपडपट्टीवासीयांना शहराच्या बाहेरील भागात नाही तर मुख्य शहरात घरे प्रदान करणे, हे खऱ्या समानतेच्या दिशेने एक पाऊल आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवार, दि. १९ रोजी व्यक्त केले आहे. ‘एनजीओ अलायन्स फॉर गव्हर्नन्स अँड रिन्यूअल’ (NAGAR) या संस्थेनी विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली, (डीसीपीआर) २०३४ ला उच्च न्यायालयात एका याचिकेनद्वारे आव्हान दिले होते.
Ban on TikTok): राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव भारत सरकारने टिकटॉक अॅपवर ऑक्टोबंर २०२३ मध्ये बंदी घातली होती. ट्रेड मार्क्स रजिस्ट्रारने ट्रेड मार्क्स नियम, २०१७ च्या नियम १२४ अंतर्गत ‘सुप्रसिद्ध’(Well-Known) ट्रेडमार्कच्या यादीत टिकटॉकचा समावेश करण्यास नकार दिल्याने,टिकटॉक लिमिटेडने एका याचिकेव्दारे मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
शहरी वायू प्रदूषणाला तोंड देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, क्रेडाई-एमसीएचआयने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि डब्ल्यूआरआय इंडिया यांच्या सहकार्याने बांधकाम स्थळांवरील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी क्षमता-निर्मिती कार्यशाळा आयोजित केली. मुंबईतील क्रेडाई-एमसीएचआय कार्यालयात आयोजित या कार्यशाळेत मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) मधील साइट अभियंते, सुरक्षा अधिकारी, पर्यावरण व्यावसायिक आणि प्रकल्प व्यवस्थापकांना बांधकाम क्रियाकलापांची संबंधित प्रदूषण नियंत्रण उपायांवर व्यावहारिक प्रशिक्षण
बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून भारतीय नागरिक असल्याचा बनाव रचणार्या रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी महायुती सरकारने जन्म-मृत्यू नोंदणी नियमांमध्ये बदल केले आहेत. ‘घुसखोरमुक्त महाराष्ट्रा’साठी अशा बोगस ओळखीच्या पुराव्यांवरच मुळापासून घाव घातल्याने, घुसखोरांची कागदोपत्री निपज तरी थांबेल, अशी आशा...
देशातील बहुतेक राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (एचएसआरपी) नंबर प्लेट लावण्याचे काम सुरू आहे. राज्यातही ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी लावण्याचे काम सुरू आहे. राज्यातील दुचाकी, तीन चाकी, चार चाकी व जड वाहनांचे ही नंबर प्लेट लावण्याचे दर अन्य राज्यांमधील दराप्रमाणे आहे.
‘केवल कुंभक’ हा एक उच्च कोटीतील प्रयत्नाशिवाय साधणारा प्राणायाम ( Pranayama ) आहे. योगशास्त्राचा मूळ उद्देश चित्तवृत्ती निरोध साधून देणारा हा प्राणायाम आहे, ज्यात कोणतीही आग्रही भूमिका अपेक्षित नाही. यम, नियमांचे पालन शनैः शनैः साधत गेल्यास हा प्राणायाम साधतो.केवल कुंभकाचे सिद्धीचा एकमेव उपाय म्हणजे मनोलय साधणे हा होय. त्यासाठी आसन नव्हे, योगासन, प्राणायाम यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास अत्यावश्यक आहे.
एखाद्या व्यक्तीने त्याच्या हयातीत कमविलेल्या चल-अचल संपत्तीचे त्याच्या पश्चात योग्य पद्धतीने वाटप होण्याकरिता, संपत्ती नियोजन प्रत्येकाने त्याच्या हयातीतच म्हणजे, तो जीवंत असतानाच करावे. यासाठी नामांकन (नॉमिनेशन) ( Nomination Rules ) आणि इच्छापत्र (व्हिल) हे दोन प्रमुख पर्याय आहेत. भारतीयांमध्ये इच्छापत्राबाबत अजूनही पुरेशी जागरुकता असल्याचे दिसून येत नाही. इच्छापत्र करणार्यांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. बर्याच जणांना याबाबत पुरेशी माहितीही नसते. या पार्श्वभूमीवर नामनिर्देशन करणे सहज आणि सोपा पर्याय आहे. त्
मुंबई : काही दिवसात ग्रेगोरियन नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. लोक या इंग्रजी नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस ( Mumbai Police ) अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मुंबई पोलिसांकडून मध्यरात्री मुंबई शहरात वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली. नाकाबंदीमध्ये वाहतूक नियमांचा पालन न करणारे वाहन चालक तसेच मध्यरात्री फिरणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली.
उल्हासनगर : ‘उल्हासनगर महानगरपालिके’चे आयुक्त विकास ढाकणे यांनी मालमत्ता कर विभागाचा आढावा घेतला असून विभागातील कर्मचार्यांची कर आकारणी व कर संकलन याबद्दलची बौद्धिक पातळी, काम करण्याचा कार्यक्षमता व वसुलीच्या उदिष्टांच्या पूर्ततेसाठी लागणारी इतर क्षमता यांचा मेळ असणे आवश्यक असल्याचे त्यांचे निदर्शनास आले. त्यामुळे महापालिकेच्या ( Municipal Corporation ) आर्थिक हिताकरिता मालमत्ता कर विभागातील कर्मचार्यांनी त्यांच्या कामात सुधारणा करण्यासाठी मालमत्ता कर विभागातील सर्व कर्मचार्यांची तसेच महापालिकेतील इच्छुक
लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये जास्त वजन घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. नुकतेच वांद्रे टर्मिनस येथे अंत्योदय एक्स्प्रेसच्या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने कठोर पावले उचलत नवीन नियम लागू केले आहेत. या नियमांनुसार आता विहित मर्यादेपेक्षा जास्त सामान घेऊन जाणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
( Uniform Civil Code )उत्तराखंडच्या समान नागरी कायद्याची नियमावली तयार झाली असून आता लवकरच राज्यात कायदा लागू केला जाईल, असे प्रतिपादन उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी शुक्रवारी केले आहे.
एअर इंडिया कंपनीने अखेर २५ कर्मचाऱ्यांवर कारवाई करत त्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. त्यांच्या 'बेजबाबदार ' वर्तनामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे. मंगळवारी व बुधवारी हजारो प्रवाशांना शेकडो विमाने रद्द झाल्याने गैरसोयीला सामोरे जावे लागले होते. अचानक अनेक कर्मचारी यांनी 'सिक लिव' (आजारी रजा) घेत सामुहिक रजा घेतली होती.
अल्ट्ररनेटिव फंड साठी (Alternative Fund) नियमात बदल करण्याची मागणी कर्जदारांकडून सातत्याने करण्यात येत होती. आरबीआयने यांचा आढावा घेत यातील कडक शिथिल करत गुंतवणूकदारांना दिलासा दिला आहे.
संपूर्ण देशात सध्या एकदिवसीय आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचे वारे वाहत आहेत. ५ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या वर्ल्ड कपचा आज (२१ ऑक्टोबर) साऊथ आफ्रिका विरुद्ध इंग्लंड हा विसावा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आहे. यावेळी कोणतीही अडचण उद्भवू नये म्हणून मुंबई पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे.
मंत्रालयात केल्या जाणाऱ्या आत्महत्येच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शासनाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. मंगळवारी दुपारी एका व्यक्तीने शिक्षक भरती लवकर घेण्यात यावी तसेच कंत्राटी पद्धतीने करण्यात येणारी भरती थांबविण्यात यावी या मागण्यांसाठी दुसऱ्या मजल्यावरून सुरक्षा जाळीवर उडी मारून आंदोलन केले. दरम्यान, या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर गृहविभागाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या सुचनांमुळे मंत्रालयात होणारे प्रकार थांबण्यास यश मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भारतभरातील जाहिरातदारांचे प्रतिनिधित्व करणारी राष्ट्रीय संस्था इंडियन सोसायटी ऑफ अॅडव्हर्टायझर्स (आयएसए) ने २ ऑगस्ट रोजी मुंबईत आपली मीडिया चार्टर लाँच केली.या चार्टरसह, जाहिरात संस्थेचे उद्दीष्ट ब्रँड्सच्या हितांचे रक्षण करताना निष्पक्ष आणि पारदर्शक व्यवहार सुनिश्चित करणे हे असेल.हे एक मजबूत आणि नैतिक जाहिरात इकोसिस्टम तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करते.
राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) गुरूवारी दि. ९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्याला पर्यावरणाची हानी करणाऱ्या घन आणि द्रव कचरा व्यवस्थापनाचे व्यवस्थापन न केल्यामुळे १२ हजार कोटी रुपयांची पर्यावरणीय भरपाई ठोठावली आहे. एनजीटी कायद्याच्या कलम १५ अंतर्गत राज्याला दंड ठोठावण्यात आला आहे. न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले. घन आणि द्रव कचरा व्यवस्थापनाच्या निकषांकडे दुर्लक्ष केल्यामुळे पर्यावरणाचे सतत होणारे नुकसान भरून काढण्यासाठी हा दंड ठोठावण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देश
‘आंतरराष्ट्रीय योग दिना’च्या निमित्ताने आपण योग प्रकारांची माहिती करुन घेत आहोत. मागील भागात ‘बहिरंग योग - यम’ म्हणजे नेमके काय, याविषयीची सविस्तर माहिती आपण करुन घेतली. आजच्या भागात ‘बहिरंग योग - नियम’ यासंबंधीच्या विविध पैलूंची सविस्तर माहिती करुन घेऊया.
मशिदींवरील बेकायदा भोंग्यांना होणारा विरोध हा मुद्दा सध्या देशात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मात्र, नुकतीच ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी याबद्दलची केलेली टिप्पणी लक्षात घेता समजते की, हा मुद्दा धार्मिकतेचा नसून सामाजिकच आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही हीच बाब प्रकर्षाने अधोरेखित केली. देशात याबद्दल भिन्न मते असली तरीही परदेशातील नागरिकांनी प्रार्थनास्थळावरील भोंगे हा विषय फक्त सामाजिक मुद्दाच ठेवला. विशेषतः मुस्लीम राष्ट्रांनीही नियमांचे पालन करण्यातच राष्ट्रहित मानले.
आंतरराष्ट्रीय सीमारेषा असलेल्या राज्यांमधील सीमा सुरक्षा दलाच्या अधिकारक्षेत्राच्या विस्तारावरून केंद्र आणि राज्यांमध्ये निर्माण झालेल्या वादाचा धुरळा अद्याप खाली बसलेला नसताना आता आयएएस (कॅडर) नियम १९५४ मधील सुधारणांवरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. तेव्हा हा वाद नेमका काय आहे, राज्यांची, केंद्र सरकारची भूमिका काय, त्याचा या लेखात घेतलेला हा सविस्तर आढावा.
कळव्यातील खारेगाव उड्डाणपुलाचे काम दि. २५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची हमी ठाणे महापालिकेने रेल्वेला दिली होती. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या पुलाचा लोकार्पण सोहळा शनिवारी पार पडला. या कार्यक्रमास कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड हे उपस्थित होते. मात्र यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी कोविड नियमांना अक्षरश: तिलांजली दिल्याचे यावेळी दिसून आले.
“इच्छेप्रमाणे कपडे परिधान करणे, शिक्षण घेणे आणि काम करणे हा आमचा अधिकार आहे. आमचा अधिकार मिळवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आमच्या विरोधातली हिंसा थांबवायलाच हवी. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आम्हाला सहभाग हवाच,” अशा आशयाच्या मागण्या दि. ११ जानेवारी रोजी अफगाणिस्तानातील भिंतीवर लिहिलेल्या दिसल्या. तसेच या मागण्यांना समर्पक अशी चित्रेही काढण्यात आली होती. तालिबानी सत्तेत नसते तर त्यांनी या मागण्या करणार्यांचा गळाच चिरला असता. पण, तालिबानी आता अफगाणिस्तानमध्ये सत्तेत आहेत. मात्र, जगातल्या बलाढ्य देशांन
आम्ही राज्यात सत्तेवर आहोत. प्रत्यक्ष ‘डब्ल्यूएचओ’पेक्षासुद्धा कोरोनाचे ज्ञान आमच्या नेत्यांना जास्त आहे. घाबरता कशाला? येणार्या काळातही साहेब ‘फेसबुक लाईव्ह’ करून जनतेला अत्यंत मोलाचे आणि उत्साहाचे मार्गदर्शन करतीलच की. काय म्हणता, साहेब आणि नेते घरात सुरक्षित राहतील. आम्हाला भाकरीसाठी आणि लेकरांच्या भविष्यासाठी घराबाहेर जाऊन काम करावेच लागेल. मग त्यात काय नवीन साहेबांनी आधीच सांगितले, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी.’ अजून किती समजावयचे?
राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर
तलाव खर्चासह काही जबाबदारी महापालिका घेणार
“ ‘ड्रोन’ वापरासंबंधीचे नवीन नियम भारतातील या क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण क्षण आहे. ड्रोन वापरासंबंधीचे नवीन नियम हे स्टार्ट-अप्स आणि या क्षेत्रात काम करणार्या आपल्या युवकांना मोठ्या प्रमाणात मदत करतील,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवार, दि. 26 ऑगस्ट रोजी केले.
वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन होऊ नये. यासाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाने नवीन अधिसूचना जारी केली आहे,त्यानुसार राज्य सरकारला वाहतूक नियमांच्या उल्लंघनाशी संबंधित गुन्ह्याच्या 15 दिवसांच्या आत गुन्हेगाराला नोटीस पाठवावी लागेल. तसेच, चलन निकाली होईपर्यंत इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड ठेवावे लागतील.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने राज्य सरकारने सोमवार, दि. 16 ऑगस्टपासून अनेक निर्बंधांत काही अटींसह शिथिलता दिली आहे. ‘ब्रेक द चेन’अंतर्गत शॉपिंग मॉलमधील प्रवेशाबाबत सुधारित आदेश जाहीर केले आहेत. मात्र, आता यातील जाचक अटींमुळे कर्मचार्यांच्या रोषाचा सामना सरकारला करावा लागण्याची चिन्हे आहेत. केवळ दोन डोस घेतलेल्या आणि दोन डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या कर्मचार्यांनाच आता शॉपिंग मॉलमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. राज्य सरकारने काढलेल्या सुधारित परिपत्रकात म्हटले आहे की, राज्यातील सर्व मॉल आणि शॉपिंग सेंट
भारतात व्यवसाय करणार असाल तर तुमचे नियम नव्हे, तर भारतीय कायद्यांचे पालन करावेच लागेल; अशा शब्दात संसदेच्या माहिती व तंत्रज्ञानविषयक स्थायी समितीने ट्विटरला नुकताच दिला आहे.
नव्या माहिती व तंत्रज्ञान नियमावलीविरोधात याचिका
देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे प्रमाण वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने लसीकरणाबाबत केंद्र सरकारने नवी नियमावली जाहीर केली. सध्या केंद्र सरकारने लसीकरणाबाबत नवी नियमावली आणली असून, त्यानुसार यापुढे केंद्राकडून पुरवला जाणारा लसींचा साठा हा फक्त शासकीय लसीकरण केंद्रावरच वापरला जाईल.
स्थानिक प्रशासनाला निरंकुश अधिकार
राज्यात कोरोनाची दुसरी लाट अधिक वेगाने फैलावत आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात होळीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी निर्बंध अधिक कडक करण्यात येत आहेत.
सोमवारपासून सुरू होणार कडक अंमलबजावणी
२०२१ मध्ये दैनंदिन जीवनाशी संबंधित काही महत्वाचे आणि मोठे बदल होणार आहेत. हे बदल तंत्रज्ञान, आरोग्य, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात घडणार आहेत.
दैनंदिन जीवनात नियमितपणे ऑनलाईन व्यवहार करताय ? मग १ जानेवारी २०२१ पासून लागू होणाऱ्या नव्या ऑनलाईन व्यवहारांच्या बाबतीतले नियम जाणून घ्या....
नवरात्रौत्सव, दुर्गापूजा आणि दसऱ्यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाकडून नियमावली जाहीर
सततच्या नियमबदलांमुळे चाकरमान्यांना त्रास; भाजप नेते निलेश राणे राज्य सरकारवर बरसले
बकरा ही ऑनलाईन खरेदीची गोष्ट नाही; काँग्रेस नेत्याचे वक्तव्य
‘लॉकडाऊन ५’ची नवीन नियमावली राज्य सरकारकडून जारी!
इमारत सील करण्याबाबतच्या नियमांमध्ये पालिकेकडून बदल!
चाळीशीच्या आतील रूग्णांची संख्या सर्वांधिक