केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या वतीने सोमवार, दि. २७ ते ३१ ऑटोबर दरम्यान मुंबईतील नेस्को सेंटर येथे ‘इंडिया मेरीटाईम वीक (खचथ) २०२५’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात १०० हून अधिक देश आणि दहा हजारांहून अधिक व्यावसायिक, अधिकारी आणि गुंतवणूकदार संवाद, सहकार्य आणि धोरणात्मक चर्चेसाठी एका व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. त्यानिमित्ताने सागरी वाहतुकीसंबंधी शिक्षण आणि प्रशिक्षणातून उद्योगनिर्मितीच्या संधीचा आढावा घेणारा हा विशेष लेख...
Read More
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने काळाचौकी येथील बालवीर नवरात्र उत्सव मंडळातर्फे गोठवली येथील आदिवासी वस्ती पाड्यातील विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.
मुंबईच्या जलवाहतुकीत एक ऐतिहासिक बदल घडणार आहे. लवकरच मुंबईच्या समुद्रात ‘वॉटर फ्लाईंग टॅसी’ म्हणजेच ‘पाण्यावर उडणार्या’ इलेट्रिक फेरीज धावताना दिसतील. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरेमंत्री नितेश राणे यांनी आपल्या स्वीडन दौर्यात या नव्या युगाच्या तंत्रज्ञानाची थेट पाहणी केली. राणे यांनी स्वीडनमधील ‘कॅन्डेला’ (उरपवशश्रर) या जागतिक दर्जाच्या हायड्रोफॉईल तंत्रज्ञान कंपनीच्या मुख्यालयाला भेट देऊन त्यांच्या अत्याधुनिक इलेट्रिक नौकांचे निरीक्षण केले आणि स्वतः त्या बोटींचा अनुभवही घेतला. त्यांनी बाल्टिक समुद्रा
उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीला मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मंगळवार, ९ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत ४ महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
मराठा आंदोलकांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित सेवा भारती या संस्थेतर्फे मुंबई महानगर पालिकेसमोर पिण्याचे पाणी व औषधोपचार केंद्र उभारण्यात आले आहे. सेवा भारतीचे कार्यकर्ते तसेच संघाचे स्वयंसेवक आंदोलकांना पाण्याची सेवा देत आहेत.
"सिंधू जल करार ही नेहरुंची सर्वांत मोठी चूक होती. त्यावेळी त्यांनी वैयक्तिक हितासाठी राष्ट्रहिताला तिलांजली दिली,” अशी टीका नुकतीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली होती. त्यानिमित्ताने या करारावेळी संसदेत झालेली चर्चा आणि तुष्टीकरणाच्या राजकारणातून पाकिस्तानचे साधले गेलेले हित याचा मागोवा घेणारा हा लेख...
अगदी आकाश खाली कोसळेल असा पाऊस पडतो. त्यामुळे शहरातील खोलगट भागात पाणी साचते. वाहतुकीच्या साधनांवर मर्यादा येते. मग भर पावसात घराबाहेर पडणार्यांना अतोनात त्रास सहन करावा लागतो, हे चित्र दरवर्षीचेच! पण, यंदा मुंबईतील प्रशासकीय यंत्रणा पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरली. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत नेहमीच येणारा पावसाळा आणि त्यानंतरचा विस्कळीतपणा या सगळ्या गोष्टींची तीव्रता कमी झालेली दिसली. याबद्दल प्रशासन आणि सजग नागरिकांचे अभिनंदन!
गेल्या ४८ तासांत पाकिस्तानकडून भारताला तीन वेळा धमया मिळाल्या आहेत. भारताने सिंधू जलवाटप करार थांबवला, तर भारतावर क्षेपणास्त्रे डागण्याच्या पाकने केलेल्या वल्गना, ढासळलेल्या अर्थव्यवस्थेच्या देशाची हतबलता आणि अमेरिकेच्या खेळातील त्याची भूमिका उघड करणार्या ठरल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने वर्षभरातील सर्व सण – उत्सव पर्यावरणपूरक साजरे करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्या सूचनांचे काटेकोर पालन करुन आपले सण – उत्सव हे निसर्गाला पूरक आणि भूमी, वायू, अग्नि, जल, आकाश या नैसर्गिक पंचतत्वांचे रक्षण व संर्वधन करुन साजरे करावयाचे आहेत.
बिहारच्या सीतामढी येथील पुनौरा धाममध्ये माता सीतेचे एक अद्भुत मंदिर बांधले जाणार आहे. शुक्रवार, दि. ८ ऑगस्ट रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते मंदिराचा शिलान्यास होईल. हा समारंभ तीन दिवस भव्य उत्सव म्हणून साजरा केला जाणार असल्याचे, पुनौरा धाम मंदिराचे महंत कौशल किशोर दासजी यांनी सांगितले.
(Solapur Heavy Rain) सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. गेल्या चोवीस तासांत सोलापूरमध्ये १०६.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी ४ ऑगस्टच्या सकाळी साडेआठ वाजल्यापासून ते बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत हा पाऊस झाल्याची माहिती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात २२ एप्रिल ते १७ जून २०२५ दरम्यान कोणताही संवाद झालेला नाही, हे विरोधकांनी आपले कान उघडे ठेवून ऐकावे; असा घणाघात परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी बुधवारी राज्यसभेत केला आहे.
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारण क्षेत्रात गडचिरोली जिल्ह्यात ऐतिहासिक यश प्राप्त केले आहे. अल्प कालावधीत विक्रमी जलसाठा निर्माण करत गडचिरोलीने संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श निर्माण केला असून जिल्हा प्रशासनाच्या प्रभावी समन्वय आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे मोठे यश मिळाले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कल्याण पूर्वेतील काही परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत असल्याने त्याविरोधात भाजपाने मंगळवारी आंदोलनाचे हत्यार उपसत मोर्चा काढला. भाजपाने महापालिकेच्या ड प्रभाग कार्यालयावर धडक दिली. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रभाग कार्यालयासमोरील कल्याण पूना लिंक रोडवर ठिय्या मांडून तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. महापालिकेच्या विरोधात नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अखेर महापालिकेने पाणी टंचाई सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर भाजपाने रास्ता रोको आंदोलन मा
“येणाऱ्या गणेशोत्सव आणि दुर्गा पूजा उत्सवांमध्ये ६ फूटांपर्यंत उंचीच्या प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावांमध्येच करावे,” असे स्पष्ट निर्देश गुरूवार दि.२४ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोरील सुनावणीदरम्यान हा आदेश दिला आहे. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळणे आणि पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनास प्रोत्साहन देणे.
मुख्यमंत्र्यांच्या ऐतिहासिक करार; ३१ हजार ९५५ कोटींची गुंतवणूक, १५ हजार रोजगार संधी महाराष्ट्राच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प (पंप स्टोरेज) क्षेत्राला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा विभागाने मंगळवारी चार महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केले. या करारांमुळे नवीकरणीय ऊर्जा निर्मितीसह औद्योगिक आणि सामाजिक विकासाला गती मिळणार आहे. महाराष्ट्र हे पंप स्टोरेज प्रकल्पात देशात अग्रणी ठरले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या प्रकल्पांमुळे ६ हजार ४५० मेगावॅट वीजनिर्मिती,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यासाठी “मराठवाडा वॉटर ग्रीड” संकल्पना मांडली, त्यावर कामही सुरू आहे. वीज निर्मितीसाठी वापरले जाणारे ६७ टीएमसी पाणी वीज निर्मितीनंतर बोगद्यातून वशिष्ठ नदीला सोडले जाते आणि हे पाणी अरबी समुद्राला जाऊन मिळते. हे ६७ टीएमसी पाणी जर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याला मिळाले, पाईपलाईनद्वारे हे पाणी तिन्ही जिल्ह्यात फिरवले तर कोकणातील पाणीटंचाई कायमची दूर होईल. त्यामुळे मराठवाड्याप्रमाणे कोकणच्या समृद्धीसाठी कोकण वॉटर ग्रीड होणे अत्यंत गरजेचे आहे. कोकणाच्या आर्थिक
मृद आणि जलसंधारण विभागाच्या स्थापनेपासून रखडलेली विविध पदांची भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागली आहे. विभागातील एकूण ८ हजार ६६७ पदांच्या भरतीस उच्चस्तरीय समितीने मंजुरी दिली असून, लवकरच भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री संजय राठोड यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली.
चाकण नगरपरिषदे अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा कामांमध्ये एकाच कामासाठी दोन वेगवेगळ्या योजना वापरण्यात आल्या. याबाबतची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केले आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील एकूण जलसाठा आता ५९.५६ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे तलाव भरू लागले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना पाणीकपातीपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
वसई - विरार शहरात वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे शहराला अनियमित पाणीपुरवठा होतो, यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रांवर कायमस्वरूपी जनरेटर बसवण्याची मागणी बुधवारी आमदार राजन नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना उपस्थित करून केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत उर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी या सूचनेचा विचार करून विभागाला निर्देश देण्यात येतील असे आश्वासन दिले.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बारावे आणि माेहिली जलशुद्धीकरण केंद्रातील पंप जुने झाले आहेत. त्यामुळे नागरीकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्याचा त्रास नागरीकांना सहन करावा लागतो. हे पंप दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली आहे.
सिंधू जलकरार हा भारत आणि पाकिस्तानमधील जल वाटपाचे नियमन करणारा आणि जागतिक बँकेच्या मध्यस्तीने १९६० साली झालेला आंतरराष्ट्रीय करार. पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने पाकिस्तानबरोबरचा सिंधू जलकरार स्थगित केला. नुकताच भारताने सिंधू जलकरारावर तोडगा काढण्यासाठी पाकिस्तानने स्थापन केलेल्या लवादाला नाकारले. त्यामुळे पाकिस्तानची अवस्था अधिकच बिकट होण्याची शक्यता आहे. या लेखातून आपण सिंधू जलकरारात काय समाविष्ट आहे, या स्थगितीचा अर्थ काय आणि याचे काय परिणाम होऊ शकतात, याचा घेतलेला आढावा...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) आणि महागृहनिर्माण योजना, यांसारख्या प्रकल्पांमुळे नवी मुंबईचा वेगाने विस्तार होत आहे. याचा परिणाम म्हणून या प्रकल्प क्षेत्रांमध्ये पाण्याची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्याची ही वाढती मागणी पूर्ण करण्यासह नवी मुंबईच्या गतिमान विकासाला आधार देणाऱ्या पाणी पुरवठा योजनांची आखणी सिडकोकडून करण्यात येत आहे.
पाण्याचा जलद निचरा होणार; केंद्र सरकारकडून स्वतंत्र निधी मिळणार
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू पाणीवाटप करार स्थगित केल्यानंतर केंद्र सरकार आता बांगलादेशसोबत गंगा नदी पाणीवाटप करारावर पुनर्विचार करण्याची शक्यता आहे.
मासेमारी जेव्हा उपासना आणि पूजाभाव धरून केली जाते, तेव्हा मासेमारी बोट हे देवाचे तरंगणारे मंदिर ठरते. यावेळी सागरी जीव हे देवाचे प्रतीक असतात. असा हा महाराष्ट्रातील मच्छीमार आणि सागरी जीवांचे नाते उलगडणारा हा लेख...
पहिल्या पावसात मुंबई पाण्यात गेली आणि नालेसफाईचा फुगा पुन्हा फुटला. चौफेर टीका झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने युद्धपातळीवर गाळ उपसा सुरू करत, बुधवारअखेर ८२.३१ टक्के गाळ उपसल्याचा दावा केला आहे.
राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे प्रलंबित राहिलेल्या जलसंधारण प्रकल्पांपैकी १ हजार २६७ प्रकल्प रद्द करण्यात आले आहेत. त्यात ‘जलसंधारण’चे ८७२ आणि ‘जलसंधारण महामंडळा’कडील ३९५ प्रकल्पांचा समावेश आहे. काही तांत्रिक अडचणी, जागेचा प्रश्न किंवा स्थानिकांचा विरोध अशा विविध कारणांमुळे ही कामे पूर्ण होऊ शकली नव्हती, अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी बुधवार, दि. ४ जून रोजी दिली.
(India-Pakistan Tensions) पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाने पाकिस्तानी प्रशासन आणि लष्करी यंत्रणांना पूर्णपणे हादरवून टाकले होते. तरीही पाकिस्तानचे भारताविरुद्ध सतत चिथावणीखोर विधाने करणे आणि पोकळ धमक्या देणे अद्याप सुरुच आहे. आणि आता पुन्हा चीनचे नाव पुढे करुन एक नवी धमकी दिली आहे. "जर भारताने सिंधू जल करारावरील स्थगिती मागे घेतली नाही, तर चीन ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह अडवू शकतो, ज्यामुळे भारताला नुकसान सहन करावे लागेल", अशी पोकळ धमकी पाकिस्तानने द
मुंबईतील वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय म्हणून गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळ येथे वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव असून यासाठी बंदरे विभागाने याबाबतचे नियोजन पूर्ण करावे. तसेच गरजेच्या ठिकाणी जेट्टी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सोमवार, २ जून रोजी दिल्या.
मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणेंच्या विभागाला सूचना
पवई तलाव परिसराचे नैसर्गिक जतन आणि पुनरुज्जीवन करण्याच्या मोहिमेंतर्गत मुंबई पालिकेकडून अवघ्या १० दिवसांत १ हजार ४५० मेट्रिक टन जलपर्णी काढण्यात आली. दि. २३ मे ते दि. १ जून या कालावधीत ही स्वच्छता करण्यात आली.
कांदिवली (पूर्व) येथील ठाकूर संकुलद्वार, पश्चिम द्रुतगती महामार्ग येथे जूनमध्ये जलवाहिनी आणि झडप बसविणे ही कामे हाती घेण्यात येणार आहे. सोमवारी काम सुरू होईल आणि दूसरे दिवशी संपेल. या २ दिवसीय काळात पाणीपुरवठा बंद राहणार असून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा असे बृहन्मुंबई महानगरपालिकेने सुचित केले.
मुंबईत पुढील काही दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारत हवामान विभागाने वर्तवला आहे. गेले काही दिवस शहरात पावसाने हजेरी लावली होती. बुधवारी २८मे रोजी पावसाचे प्रमाण कमी झाले. सांताक्रूझ वेधशाळेत १ मिमी आणि कुलाबा वेधशाळेत १७ मिमी पावसाची नोंद झाली.
परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी सोमवारी संसदेच्या परराष्ट्र व्यवहार सल्लागार समितीची बैठक घेतली.
मुंबई मेट्रो लाईन ३ (अक्वा लाईन) च्या आचार्य अत्रे चौक आणि वरळी स्टेशन परिसरात मुसळधार पावसामुळे झालेल्या जलभरावामुळे मेट्रो सेवा तात्पुरती थांबवण्यात आली होती. या प्रकारामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला असून सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
सिंधू जल करारावरील पाकिस्तानच्या अपप्रचाराला सणसणीत उत्तर देताना भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये म्हटले आहे की, पाकिस्तानने भारतावर तीन युद्धे लादून आणि हजारो दहशतवादी घटना घडवून सिंधू जल कराराच्या भावनेचे उल्लंघन केले आहे.
Badlapur residents water worries will be resolved
(Pakistan Army official threatens India in Hafiz Saeed's words) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी भारतीय सैन्याने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत कारवाई केली. मात्र, अजूनही पाकिस्तान सुधारण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. आता तेथील पाकिस्तानी लष्करानेही दहशतवाद्यांची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे. 'जर तुम्ही आमचे पाणी अडवले तर आम्ही तुमचा श्वास रोखू' अशी पोकळ धमकी पाकिस्तानकडून देण्यात आली आहे.
( Shahapur residents water problem ) शहापूर तालुक्यात सध्या भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावपाड्यांमध्ये नागरिक पाण्याविना तहानले आहेत. ‘धरण उशाला, पण कोरड घशाला’ अशी अवस्था सध्या शहापूरवासीयांची झाली आहे. शहापूर तालुका जरी मुंबई आणि ठाणे या महानगरांना पाणीपुरवठा करणारा मुख्य स्रोत असला, तरी इथल्या शेतकर्यांना मात्र सिंचनासाठी पाणी मिळत नाही, ही शोकांतिका आहे.
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता पाकिस्तानने एक पत्र लिहीत सिंधू जल कराराचा पुनर्विचार करा अशी विनवणी पाकिस्तानकडून करण्यात आली आहे.
भारताने पाकिस्तानातील दहशतवादाविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवत पहलगाम येथील हत्याकांडाविरोधात जोरदार प्रत्युत्तर दिलेय. त्यामुळे दोन्ही राष्ट्रांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे देखील घाबरल्याचे पाहायला मिलतेय. त्यांनी आपल्या भावाला, म्हणजेच सध्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना भारतासोबत चर्चा करून मतभेद मिटविण्याचा सल्ला दिल्याचे सांगण्यात येत आहे.
दहशतवाद्यांनी केलेला पहलगाम हल्ला पाकिस्तानच्या नापाक कृत्याचे प्रदर्शन घडवून आणणारा होता. या हल्ल्यानंतर भारत सरकार पूर्णपणे एक्शन मोडवर होते. दि. २२ एप्रिल रोजी पर्यटकांना लक्ष्य करून झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’व्दारे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय पाकिस्तानवर जोरदार हल्ला करण्याची मागणी करत होते. पंतप्रधान मोदीजीच्या अनेक भाषणातून दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणाऱ्याला ‘न भूतो न भविष्यते’अशी शिक्षा दिली जाईल असेही सांगितले होते.
पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात एकूण २६ जणांचा मृत्यू झाला. याचा प्रत्युत्तर म्हणून भारताने सिंधू जलकरार मोडीत काढल्याचे म्हटले होते. त्या दृष्टीने आता जम्मू काश्मीरमधील बगलीहार आणि सलाल धरणांची दारे बंद केली आहेत. यामुळे चीनाब नदीचा प्रवाह कमी झाला आहे.
विशेष प्रतिनिधी भारताने सिंधू करार स्थगित केल्यानंतर आणि बगलिहार व सलाल धरणाचे दरवाजे बंद केल्यानंतर पाकिस्तानमध्ये चिनाब नदीच्या पाण्यात लक्षणीय घट झाली आहे. परिणामी खरिप हंगामात पाकला मोठ्या प्रमाणाच अडचणींचा सामना करावा लागेल.
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एका मोठया हल्याचा प्रयत्न उधळून लावण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. सुरनकोटच्या मारहोट परिसरात तपासादरम्यान सुरक्षा दलांना पाच आयईडी, काही रेडिओ सेट्स, कपडे सापडले. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या लपण्याची जागा शोधून काढल्यानंतर या बाबी उघड झाल्या. पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दल अधिक सतर्क झाले असून जम्मू-काश्मीरमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
वाढलेले तापमान, पर्यायाने वाढलेले बाष्पीभवन यांमुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा कमी झाला असला, तरी मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. महाराष्ट्र शासनानेदेखील मुंबईसाठी ‘निभावणी साठ्या’तून पाणी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे दि. ३१ जुलै २०२५ पर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होईल, अशारितीने नियोजन केले आहे, अशी माहिती मुंबई पालिकेकडून देण्यात आली.
पुणे शहरात पाणी कपात लागू करण्यात आली आहे. शहरातील कात्रज, धायरी, आंबेगाव आणि सिंहगड काही भागांमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्यात येणार आहे. ही कपात सोमवार दि. ५ मे पासून करण्यात येणार आहे.
भारत सरकारने नेमकी काय योजना आखलीय? या योजनेची अंमलबजावणी कशी केली जाणार आहे? सिंधू पाणी कराराबाबतचा हा रोडमॅप काय आहे नेमका?