महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. मंगळवार, २९ जुलै रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यास मान्यता देण्यात आली.
Read More
(World's Largest Dencentralized Solar Power Project) शेतकर्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात जगातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. एकूण १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या पहिल्या पाच सोलर पार्कचे लोकार्पण शनिवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी येथे करण्यात आले.
(Pm Narendra Modi) काँग्रेस शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देते. भारताला विकासापासून रोखणारे त्यांच्यासोबत आहेत. इंग्रजांप्रमाणेच काँग्रेसचे केवळ देशाला लुटण्याचे विचार राहिले आहेत. एका परिवाराची देशावर सत्ता कायम ठेवण्यासाठी त्यांची धडपड असते. दलित, आदिवासी, वंचित घटकांना त्यांनी कधीही बरोबरीचे मानले नाही. काँग्रेसने बंजारा समाजाविषयी सदैव अपमानजक व्यवहार केला, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार, ५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते विविध विकासकामांचं लोकार्पण करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाशिम, ठाणे असा त्यांचा दौरा राहणार आहे. त्यांच्या हस्ते वाशिममध्ये सुमारे २३ हजार ३०० कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
अनेक वर्षे अनेक लोकांना संधी असतानासुद्धा मराठी भाषेचा गौरव करण्याचा योग त्यांना मिळाला नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर केली. ते वाशिममधील कार्यक्रमात बोलत होते. वाशिमधील पोहरादेवीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचं लोकार्पण पार पडलं.
खासगी वाहनावर लाल दिवा लावणे तसेच अधिकाऱ्यांचे चेंबर बळकावल्याच्या आरोपांमुळे ट्रेनी आयएएस पूजा खेडेकर यांची बदली झाली आहे. वाशिम जिल्हाधिकारी म्हणून त्यांची बदली करण्यात आली आहे. आयएएस असलेल्या पूजा खेडकर यांना ३ जुन २०२४ पासून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात शिकाऊ अधिकारी म्हणून पाठवण्यात आले होते.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे दि. २३ फेब्रुवारी २०२४ शुक्रवारी निधन झाले. राजेंद्र पाटणी यांनी ५९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अनेक दिवसांपासून ते आजाराशी झुंज देत होते. परंतु मुंबई येथे सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. राजेंद्र पाटणींच्या निधनाने भाजपसह राजकीय वर्तुळाला मोठा हादरा बसला आहे.
बंजारा सामाजाची काशी म्हणून पोहरादेवीला ओळखले जाते. गुरुवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज यांच्या २८५ व्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी धर्मगुरु महंत जितेंद्र महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. शोभायात्रेमध्ये बंजारा समाजाच्या बांधवांचा मोठा सहभाग होता. त्यासोबतच युवा पिढीनेसुद्धा शोभायात्रेत आपला विशेष सहभाग नोंदविला होता. दरम्यान ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक पोहरादेवी परिसरात निघाली होती. युवापिढी भगवा ध्वज फडकवताना यावेळी दिसून आली. (Sevalal Jayanti Poharadevi
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज, २४ जुलै रोजी विधानपरिषदेत ३ मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल. पुरात अनेकजण वाहून गेली. तसेच अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे गावकऱ्यांचं घरादाराचं नुकसान झालं. यावर अजित पवार यांनी तातडीची मदत जाहीर केली आहे.
पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मदतीमध्ये यंदा वाढ करण्यात आली असून पूरग्रस्तांना यंदा पाच हजार रुपयांऐवजी प्रति कुटुंब दहा हजार रुपयांची मदत केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत आणि विधानपरिषेदतही केली.
राज्यातील अनेक घडामोडीनंतर पक्षसंघटनेसाठी उद्धव ठाकरे महराष्ट्र दौरा करणार आहेत. याची सुरूवात ते विदर्भातून करत आहेत. यासाठी 9 आणि 10 जुलै रोजी विदर्भ दौऱ्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. या दौऱ्यात ते यवतमाळ, वाशीम, अमरावती, अकोला आणि नागपूर येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. मात्र, दौऱ्यापूर्वीच 'उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान' अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत.
हस्तलिखितं हेच जीवन असणारे आणि आपल्या कलांनाही तेवढाच न्याय देणारे हस्तलिखितसंवर्धन तज्ज्ञ जाणकार रवींद्र पोटदुखे यांच्याविषयी जाणून घेऊया...
येत्या काही दिवसात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे लोकार्पण होत आहे. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाची पाहणी केली. नागपूर येथून समृद्धी महामार्गास प्रारंभ होत असून तेथून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी पाहणी दौरा सुरु केला. वर्धा जिल्ह्यात समृद्धीचा 55 किलोमीटरचा मार्ग आहे. या संपूर्ण मार्गात प्रवास करत मार्गाची पाहणी करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः
"कॉलेजमध्ये परीक्षा देण्यासाठी यायचे असेल तर हिजाब उतरवून या आणि मगच कॉलेज मध्ये या" असे कॉलेज प्रशासनाने सांगत कॉलेज मध्ये नीट (NEET) ची परीक्षा देण्यासाठी आलेल्या मुस्लिम विद्यार्थिनीस प्रवेश नाकारला
ज्यात वर्धा जिल्ह्यात २४ तासांमध्ये सरासरी १३६ मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू तसेच देवळी या तालुक्यात मुसळधार पावसामुळे काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती मिळाली आहे.
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तहसीलमध्ये उजलका रेल्वे फार्म कॉम्प्लेक्समध्ये पाण्याच्या शोधात आलेल्या ११ नीलगायी विहिरीत पडल्या. या नीलगायींकडे कोणाचे लक्ष न गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री उशिरा या नीलगायींच्या मृतदेहांना जेसीबीने बाहेर काढण्यात आले.
पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी आरोपसत्राला सामोरे गेल्यानंतर गायब झालेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड आज पोहरादेवी गडावर जाणार आहेत. राठोड यांच्या घराबाहेर गाड्यांचा ताफा उभा ठेवण्यात आलेला आहे. इतके दिवस अक्षरशः गायब असणारे राठोड आज सबंध प्रकाराबाबत काय उत्तरं देतील, याकडे संपूर्ण महाराष्ट्रचं लक्ष लागून राहीलेलं आहे.
सरकारकडून वेळेवर न होणाऱ्या नोकर भरतीमुळे आणि वाढत्या बेरोजगारीमुळे अडचणीत सापडलेल्या तरुणांची व्यथा मांडणारे पत्र वाशिमच्या एका तरुणाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. हे पत्र गजानन राठोड या तरुणाने उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.
दिल्लीमध्ये झालेल्या तबलिगींच्या कार्यक्रमामध्ये वाशिम येथून एक जण हजर होता, असा प्रशासनाला संशय आहे. या व्यक्तिला होम क्वारंटाईन केले गेले आहे. मात्र, ही व्यक्ती आपण दिल्लीच्या कार्यक्रमाला गेलोच नाही असे आकांडतांडव करत आहे.
बुलडाण्यात लोणारनजीक जीप आणि आरामबस दरम्यान शनिवारी रात्री झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले. सर्वजण वाशिमचे राहणारे आहेत.
वाशिम जिल्ह्याला १२ लक्ष ८४ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून जिल्हा प्रशासनाने एकूण १३ लक्ष ८८ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे
गेल्या तीन दिवसांमध्ये वाढलेल्या तापमानामुळे काल जिल्ह्यातील एका महिलेचा सरपंचाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघातापासून सावध करण्याची गरज निर्माण झाली आहे.