‘वारली’ने कात टाकली आहे. जिव्या सोमा मशेंनी ‘वारली’ला जगाच्या कानाकोपर्यात पोहोचविलं आहे, तर हर्षल त्याच ‘वारली’ला विविध रंगात वैविध्यपूर्ण ढंगात आणि आदिवासी जीवनातील सर्वच प्रकारच्या वार्षिक दिनमानांना चित्रस्वरुपात जगभर पोहोचविणार असे त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून दिसते. अशा या कलाकाराचा कलावेध घेणारा हा लेख...
Read More
भारतीय खाद्यसंस्कृतीचा जगात पाचवा क्रमांक लागतो आणि चवीच्या दृष्टीने पाहिल्यास दुसरा क्रमांक! अशी ही भारताची वैविध्याने नटलेली आणि तितकीच समृद्ध खाद्यसंस्कृती. नुकताच ‘आंतरराष्ट्रीय नो डाएट डे’ साजरा झाला. त्यानिमित्ताने मुंबईच्या अगदी जवळ असलेल्या वसईच्या खाद्यसंस्कृतीचा घेतलेला आढावा...
मुंबईच्या ‘लेट अस इमॅजिन टूगेदर’ या गेल्या चार वर्षांपासून समाजभावनेतून कार्यरत तरुणांच्या समूहाने दि. २५ जून रोजी वाडा तालुक्यातील तीन जिल्हा परिषदांच्या शाळांना भेट दिली व तेथील विद्यार्थ्यांसह छत्री रंगवण्याची कार्यशाळाही मोठ्या उत्साहात संपन्न झाली. त्याचेच केलेले हे अनुभवचित्रण...
प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत होणाऱ्या संचलनात वनवासी संस्कृतीचा इतिहास ६ बाय ४५ फुटांच्या चित्रातून दिसणार
‘कोस्टल रोड’ प्रकल्पातील जाचक अटींविरोधात संताप
कलेची हौस असणे आणि या कलात्मक दृष्टीतून आपल्या व्यवसायाला नवी उंची देणे, हे सगळ्यांनाच जमते असे नाही. पण, मधुरा जोग यांनी स्वकर्तृत्वाने हे सिद्ध केले. त्यांच्या या प्रवासाचा घेतलेला मागोवा...
“वसईतल्या एका फादरने मला ‘बायबल’मधील प्रसंग वारली चित्रशैलीत काढण्याची ऑफर दिली होती. त्यासाठी हवा तेवढा पैसा देतो, असे सांगितले. मात्र, मी त्या कामाला नकार दिला. कारण, मी ‘बायबल’मधील प्रसंग रेखाटले असते, तर माझे समाजबांधवही तिकडे आकर्षित झाले असते आणि त्यायोगे ख्रिश्चन धर्मांतर घडविण्याचा फादरचा मनसुबा यशस्वी झाला असता,” असे सांगणारे, वारली चित्रकलेच्या माध्यमातून हिंदुत्वाचा वारसा जोपासणारे आणि ‘संपूर्ण रामायण’ वारली चित्रशैलीत रेखाटून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना ते चित्र सादर करणारे डहाणूमधील वारली कल
वारली चित्रसंस्कृतीचे आणि मशे परिवाराचे नशीब पालटले. एका दुर्लक्षित जमातीतील कलेला व वारली जमातीला मशे यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. आदिवासी पाड्यांवर झोपडीच्या चार भिंतीतली बंदिस्त कला त्यांच्या प्रयत्नांनी जगाच्या कॅन्व्हासवर पोहोचली !
दहाव्या शतकात निर्माण झालेली व अकराशे वर्षे जीवंत असणारी वारली चित्रकला मानवी जीवनाला, त्याच्या आनंदाला, वेदनेला, सुखदु:खांना सचित्र रूप देते. जीवनाच्या वास्तवाचे परिणामकारक चित्रण वारली चित्रशैलीला वेगळे परिमाण देते.